अन्न वजन-उंची वजन वाढवणे आरोग्य आहार

माझे वय २४ आहे व माझे वजन ५१ किलो आहे. काही केल्याने वजन वाढत नाही, काय करावे?

3 उत्तरे
3 answers

माझे वय २४ आहे व माझे वजन ५१ किलो आहे. काही केल्याने वजन वाढत नाही, काय करावे?

18
दुबळी शरीरयष्टी ,तुम्हाला जीवनातील अनेक आनंदायी गोष्टींपासून दूर ठेवतेय ? मग वजन वाढवायचे हे 10 करुन पहाच. 
आयुर्वेदीक उपचारांपासून ते अगदी आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित शस्त्रक्रियेद्वारे वजन कमी करण्यासाठी एक ना अनेक उपचारपद्धती आपल्याला सहज उपलब्ध आहेत. मात्र मनापासून खाऊनदेखील वजन वाढत नसल्याने चिंताग्रस्त असलेल्यांची संख्यादेखील काही कमी नाही . मग वजन वाढवण्यासाठी त्यांनी नेमकं काय करावं ? प्रथम स्नायुंच्या बळकटीसाठी योग्य व्यायाम करा. दिवसांतून दोन वेळा भरपूर जेवण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने ५-६ वेळा खा , पण जंकफूड खाऊ नका . 

पोषकतज्ञ नेहा चंदा यांच्यानुसार ,प्रथम तुम्ही तुमची भूक वाढवा . एकाच वेळी भरपूर खाण्यापेक्षा हळूहळू खाणं वाढवा म्हणजे भूक वाढेल. जसे की नेहमीपेक्षा एक पोळी वाढवा , भात वाढवा . त्याचप्रमाणे रोज एक फळ खा याचा फायदा तुमचं वजन वाढवण्यास नक्की होईल . 

१) दुध : 
दुधातून प्रामुख्याने मिळणारी प्रोटिन्स व कर्बोदके तसेच इतर पोषणद्रव्ये यांमुळे वजन वाढवण्यास मदत होते. १०० मिली दुधातून अंदाजे ३.४ ग्राम प्रोटिन्स मिळतात आणि रोज २ ग्लास दुध प्यायल्यास तुम्ही १४ ग्राम प्रोटिन्स  सेवन करू शकता. 

२) अंडी: 

अंड्यांच्या सेवनाने देखील शरीराला उच्च प्रतीचे प्रोटिन्स मिळतात. १०० ग्राम अंड्याच्या सेवनाने अंदाजे १३ ग्राम  प्रोटिन्स मिळतात . अंड्यातील 'व्हिटामिन ए' व 'व्हिटामिन बी १२' चा आहारात समावेश हितावह आहे. 

३) ओट्स : 

वजन कमी करण्यासोबतच वजन वाढवणाऱ्यासाठी देखील ओट्स चा आहारात वापर असणे आवश्यक आहे. ओट्समधून शरीराला फायबरचा पुरवठा होतो. १०० ग्राम ओट्स मधून १७ ग्राम प्रोटिन्स  मिळतात. ओट्स मधून शरीराला आयर्न (लोह) देखील मिळतात . 

४) केळ 

वजन वाढवण्यासाठी केळ खाण्याचा सल्ला दिला जातो . एका केळ्यातून १०५ कॅलरीज मिळतात ज्या तुम्हाला तात्काळ उर्जा देतात. व्यायामानंतर शरीराची झीज भरून काढण्यास मदत होते. बऱ्याचदा टेनिसपटू ब्रेकमध्ये उर्जा मिळवण्यासाठी केळ खात असल्याचं तुम्ही पाहिलच असेल ! 

५) बटाटा : 

जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुमच्या आहारात किमान ४० % घटकांपासून कर्बोदक असतील अशा पदार्थांचा समावेश करा. तुमच्या आहारात बटाट्याचा समावेश वाढवा. बटाट्यातील 'ग्यूटामिन ' व ' अर्जीनीन ' यासारखी अमिनो अॅसिड वजन वाढवणाऱ्यांसाठी हितावह आहे. बटाट्याचा वापर सालीसकट केला तर ते जास्त फायदेशीर राहील. 

६) सोयाबीन : 

वजन वाढवण्यासाठी लागणारी कर्बोदक पुरेशी मिळवण्यासाठी तुम्ही सोयाबीनचा रोजच्या आहारात समावेश करू शकता. रोजच्या १०० ग्राम सोयाबीन सेवनाने तुम्हाला ३६ ग्राम प्रथिने मिळू शकतात. गव्हाच्या पिठात तुम्ही सोयाबीनचे पीठ एकत्र करून पोळ्या केल्यास आपोआप तुम्ही सोयाबीनचा रोजच्या आहारात समावेश करून घेऊ शकता. 

७) नुडल्स : 

नुडल्स खाणं हे काहीसं धोकादायक समजलं जात, मात्र यामधून तुम्हाला कर्बोहायड्रेट व कॅलरीज मिळू शकतात. तसेच नुडल्समध्ये भाज्या टाकून खाल्याने तुम्हाला अनेक पोषणद्रव्ये याचबरोबरीने व्हिटामिन्स व अॅन्टीऑक्सिडन्ट मिळतील. 

८) मांसाहार ( चिकन ) : 
शाकाहाराप्रमाणेच मांसाहार देखील घेणे फायदेशीर आहे. चिकन खाणे केवळ चविष्ट नसून १०० ग्राम सेवनातून २५ ग्राम प्रोटिन्स तुम्हाला मिळू शकतात . महिन्याभराच्या नियमित सेवनाचा तुम्हाला नक्कीच तात्काळ परिणाम दिसून येईल. 

९) लोणी : 
जर तुम्हाला लोणी खायला आवडत असेल तर वजन वाढवण्यासाठी तुम्ही लोण्याचा तुमच्या आहारात नक्कीच समावेश करून घेऊ शकता. लोण्यातून तुम्हाला मुबलक प्रमाणात मेद मिळू शकतात. १०० ग्राम लोण्यातून तुम्हाला ८१ ग्राम मेद मिळू शकेल. 

१०) सुकामेवा : 
काजू, बदाम ,अक्रोड , किसमिस यासरख्या तात्काळ कॅलरीज देणारा सुकामेवा आहारात ठेवा. फळांपेक्षा सुकामेवा खाणे हा वजन वाढवण्याचा एक हेल्दी उपाय आहे. फळांपेक्षा सुक्यामेव्यातून शरीराला अधिक कॅलरीज व पोषणद्रव्ये मिळतात.
उत्तर लिहिले · 2/4/2018
कर्म · 115390
0
*टीम अॅडमीन*

▪व्यवसायिकाचे नाव : Nishigandha Jadhav
▪व्यवसायाचे नाव :- * Health Advisor *
▪पूर्ण पत्ता :- *मु. पो. खानापूर, ता. वाई, जि. सातारा*
▪संपर्क क्रमांक :- *9665923768*
वेबसाईट-: nishaghadge1994@gmail.com
▪आपल्या व्यवसायाची/उत्पादनाची सविस्तर व संपूर्ण माहिती :- *वजन वाढवा अथवा घटवा खात्रीशीर इलाज, 3 दिवसात रिझल्ट. मान दुखी, पाठ दुखी, केस गळती, High-Low BP, शुगर सगळ्यावर खात्रीशीर इलाज. Not any side effects.*
▪पेमेंटची पध्दत :- ऑनलाईन, रोख
उत्तर लिहिले · 21/11/2019
कर्म · 150
0

तुमचे वय २४ वर्षे आहे आणि वजन ५१ किलो आहे. वजन वाढवण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे:

आहार (Diet):

  • प्रथिने (Protein): आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. उदा. डाळी, कडधान्ये, पनीर, अंडी, मांस.
  • कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates): भात, गहू, ज्वारी, बाजरी यांसारख्या धान्यांचा आहारात समावेश करा.
  • स्निग्ध पदार्थ (Fats): तूप, तेल, सुका मेवा (dry fruits) यांचा moderate प्रमाणात वापर करा.
  • कॅलरी (Calories): तुमच्या रोजच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरी असलेला आहार घ्या.

व्यायाम (Exercise):

  • नियमित व्यायाम करा. वेट ट्रेनिंग (Weight training) केल्याने स्नायू बळकट होतात आणि वजन वाढण्यास मदत होते.
  • व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जीवनशैली (Lifestyle):

  • पुरेशी झोप घ्या.
  • तणाव कमी करा.
  • धूम्रपान आणि मद्यपान टाळा.

डॉक्टरांचा सल्ला (Doctor's advice):

  • वजन न वाढण्याची काही वैद्यकीय कारणे असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  • जर काही आरोग्य विषयक समस्या असतील, तर डॉक्टरांकडून योग्य उपचार घ्या.

तुम्ही खालील वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता:

टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणत्याही उपायांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1040

Related Questions

माझं वय ३७ वर्ष आहे आणि माझे वजन फक्त ४३ किलो आहे, तरी वजन वाढवण्यासाठी काय खावे व काही आयुर्वेदिक उपाय सांगा?
15 दिवसात वजन कसे वाढवावे?
एका आठवड्यात एक किलो वजन वाढवायचे आहे... कोणी मदत कराल का? प्रेयसी सोबत लग्न ठरणार आहे! उपाय सांगा.
मी खूप अशक्त आहे, तर मी जाड होण्यासाठी काय करू?
माझं वय 28 आहे आणि माझं वजन 49 किलो आहे, मला वजन वाढवायचे आहे, एका आठवड्यात कसे वाढवता येईल?
मला १० किलो वजन वाढवायचे आहे, काही उपाय सांगा?
वजन कसे वाढवायचे?