3 उत्तरे
3 answers

वजन कसे वाढवायचे?

14


वजन वाढवण्यासाठी लोक हरत-हेचे प्रयत्न करतात. मात्र अयोग्य जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे वजन काही वाढत नाही. आपल्या दिनचर्येत कॅलरी, पोषक तत्वे, फॅट आणि प्रोटीनची मात्र असलेल्या पदार्थांचा वापर वाढवला तर नक्कीच वजन वाढू शकते. यासाठी १० सोप्या टिप्स

नवी दिल्ली : वजन वाढवण्यासाठी लोक हरत-हेचे प्रयत्न करतात. मात्र अयोग्य जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे वजन काही वाढत नाही. आपल्या दिनचर्येत कॅलरी, पोषक तत्वे, फॅट आणि प्रोटीनची मात्र असलेल्या पदार्थांचा वापर वाढवला तर नक्कीच वजन वाढू शकते. यासाठी १० सोप्या टिप्स

 

१. भरपूर कॅलरी देणारे पदार्थ खा. ड्रायफ्रुटस, बदाम, मनुका यात मोठ्या प्रमाणावर कॅलरीज असतात. यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होईल. 

२. पोषकत्वांनी भरपूर असा आहार घ्या. वजन वाढवण्याआधी हे लक्षात घ्या तुम्हाला स्वस्थ शरीर हवयं लठ्ठपणा नकोय. त्यामुळे शरीराला उर्जा मिळेल असे अन्न घ्या.

३. वजन वाढवण्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा. तुम्ही योगाही करु शकता. वेट ट्रेनिंग, ट्विस्ट कर्ल्स आणि डिप्ससारख्या व्यायामुळे शरीरात रक्तसंचार वाढतो आणि अधिक भूक लागते.

४. प्रोटीनची मात्रा वाढवा. प्रोटीनयुक्त मासे,अंडी, मोड आलेले चणे, चिकन, भात, दूध आणि दुधाचे पदार्थ, मेवा, बीन्स यां पदार्थांचे आठवड्यातून दोन वेळा सेवन करा.

५. वजन वाढवण्यासाठी तुमच्या आहारात पनीर, लोणी तसेच तूपाचा समावेश करा. 

६. तुम्हाला वजन वाढवायचे असल्यास अधिक प्रमाणात जेवण करावे लागेल. सुरुवातीला एकदम जेवण वाढवणे जमणार नाही. मात्र हळूहळू सुरुवात करा. 

७. वजन वाढवण्यासाठी हिरव्या भाज्या खाणे लाभदायक ठरते. त्यामुळे तुमचे आरोग्यही सुधारते आणि विनातणाव तुम्ही वजन वाढवू शकता. 

८. वजन वाढवण्यासाठी तुमच्या आहारातून ५०० कॅलरी शरीरात जाणे आवश्यक आहे. तुम्ही शारिरीक काम करत असाल तर कॅलरीजची मात्रा वाढवा. 

९. दिवसातून तीन वेळा मोठा आहार घ्या. तसेच २-३ वेळा अल्पोपहार घ्या. प्रत्येक २-३ तासाला काहीतरी खात राहा. 

१०. वजन वाढवण्यासाठी योग्य झोप मिळणे आवश्यक असते. दिवसांतून किमान आठ तासांची पुरेपूर झोप घ्या.
उत्तर लिहिले · 14/8/2018
कर्म · 35170
7
सर्वात प्रथम चिंता करणे सोडुन दया. 
सतत चिंता,विचार केल्याने जागरण होते त्यामुळे 
चिडचिड होते व आपण खाल्लेल अंगाला लागत नाही. 
जेवन करत असताना टि.व्हि बघु नका व  विचार करु नका. 
खाणे व वेळ खालीलप्रमाणे 
*सकाळी दुध एक ग्लास दुधात दोन चमचे मध.
  सोबत दोन केळी,४ खजुर. 
* अर्ध्या तासांनंतर नाष्टा 
  नाष्ट्यात दोन अंड्याचे आम्लेट. 
*प्रत्येक जेवनानंतर दोन केळी 
*जेवनात भाताचे व बटाट्याचे प्रमाण वाढवा 
*रात्रीच्या जेवनात मसालेदार व तेलकटपणा वाढवा. 
* पाणी भरपुर प्या. 
* दिवसात किमान ३० मिनिटे व्यायाम करा. 
*तुमच्या वजनात वाढ होत आहे असे मनाशी म्हणत रहा. 
*कायम सकारात्मक रहा 
@ best of luck@
उत्तर लिहिले · 14/8/2018
कर्म · 2525
0

वजन वाढवण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी:

1. जास्त कॅलरीज घ्या:
  • आपण जेवणात जास्त कॅलरीज घेणे महत्वाचे आहे.
  • आपल्याला आवश्यक असलेल्या कॅलरीजपेक्षा 300-500 कॅलरीज जास्त घ्या.
2. पुरेसे प्रोटीन:
  • प्रथिने (Protein) स्नायूंच्या वाढीसाठी आवश्यक आहेत.
  • मांस, अंडी, मासे, डाळ, आणि शेंगा यांसारख्या पदार्थांचे सेवन करा.
3. हेल्दी फॅट्स:
  • आपल्या आहारात हेल्दी फॅट्स (Healthy Fats) समाविष्ट करा.
  • नट्स (Nuts), बिया (Seeds), आणि एवोकॅडो (Avocado) हे चांगले स्रोत आहेत.
4. नियमित व्यायाम:
  • वेट ट्रेनिंग (Weight training) आणि व्यायाम स्नायूंच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहेत.
  • व्यायामामुळे भूक वाढते आणि खाल्लेले अन्न पचनासही मदत होते.
5. वारंवार खा:
  • दिवसातून 3 मोठे जेवण करण्याऐवजी 5-6 लहान जेवण करा.
  • दर 2-3 तासांनी काहीतरी खा.
6. पुरेशी झोप घ्या:
  • शरीराला विश्रांती मिळणे आवश्यक आहे.
  • दररोज 7-8 तास झोप घ्या.
7. पाणी भरपूर प्या:
  • शरीराला हायड्रेटेड (Hydrated) ठेवणे महत्त्वाचे आहे.
  • दिवसातून 8-10 ग्लास पाणी प्या.
8. काही महत्वाचे पदार्थ:
  • दूध: प्रोटीन आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत.
  • केळी: कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) भरपूर.
  • नट्स आणि बिया: हेल्दी फॅट्स आणि पोषक तत्वे.
  • बटाटे: कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत.

वजन वाढवण्यासाठी صبر (Patience) आणि सातत्य (Consistency) आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1040

Related Questions

व्हिटॅमिन डी व कॅल्शियम कोणकोणत्या पदार्थांमधून व आणखी कशामधून मिळू शकते?
माझे वय ३७ वर्ष आहे आणि माझे समोरील खालचे दोन दात हलतात, ते पक्के करण्यासाठी काही उपाय सांगा आणि याचा वजनाशी काही संबंध असू शकतो का?
माझं वय ३७ वर्ष आहे आणि माझे वजन फक्त ४३ किलो आहे, तरी वजन वाढवण्यासाठी काय खावे व काही आयुर्वेदिक उपाय सांगा?
सेक्सवर नियंत्रण कसे ठेवावे?
शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी काय करावे?
पायाच्या अंगठ्याचा कोपरा दुखत आहे, ते बरे होण्यासाठी कोणते लिक्विड ऑइंटमेंट (liquid ointment) त्यावर सोडावे?
इलायचीचे फायदे काय?