औषधे आणि आरोग्य
घरगुती उपाय
औषधशास्त्र
आयुर्वेद
सर्दी
आरोग्य
हिवाळ्यात सकाळी उठल्यावर खूप शिंका येतात, यावर काही औषध आहे का?
3 उत्तरे
3
answers
हिवाळ्यात सकाळी उठल्यावर खूप शिंका येतात, यावर काही औषध आहे का?
13
Answer link
शिंका येणे
सकाळ उगवते तीच मुळी शिंकांनी. सटासट. उसंतही घेऊ न देता शिंका येतात. दहा-बारा शिंका येऊन पुरते बेजार व्हायला होते. ही वेळ कधीही येऊ शकते. एखादी महत्त्वाची बैठक सुरू आहे, तेवढ्यात शिंका सुरू. या शिंका येतात, ऍलर्जीमुळे.
ऍलर्जीमुळे “सायनस‘चा त्रास कसा सुरू होतो?
सायनस म्हणजे नाकाभोवतीच्या हाडांमध्ये असणारी पोकळ जागा. या पोकळीचे तोंड नाकात उघडते. नाकामधील आंतरत्वचेला ओलावा आणण्यास “सायनसेस‘ एक ते दीड लिटर स्राव तयार करतात; परंतु सायनसची वाट किंवा तोंड (नाकात सूज आल्यामुळे) बंद झाल्यास सायनसमधील स्राव बाहेर पडू शकत नाही. स्राव साठल्यामुळे जंतुसंसर्ग होऊन सायनसचे “इन्फेक्शसन‘ होते. ही सूज मूलतः ऍलर्जीमुळे येते, त्यामुळे डोके दुखणे, चेहेरा व डोके जड होणे, थकवा येणे, दिवसभर निरुत्साही वाटणे, कामावरील तसेच अभ्यासातील एकाग्रता कमी होणे व शारीरिक चलनवलन कमी होणे ही लक्षणे आढळतात.
अनेक वर्षांचा त्रास असल्यास त्याचे परिवर्तन परत परत होणाऱ्या अथवा ऱ्हिनोसायन सिटीस मध्ये होऊ शकते. काही लोकांमध्ये सर्दी दाटून पोलिप तयार होतात व सर्व प्रकारचे वास येणे बंद होते, औषधांमुळे सायनस इन्फेक्श न दूर न झाल्यास दुर्बिणीद्वारा अगदी अलगदपणे ही सायनसची तोंडे उघडता येतात; पण काही कालावधीनंतर ऍलर्जीचा कायम स्वरूपी उपचार न केल्याने ती पुन्हा बंद होऊ शकतात. सर्दीच्या योग्य उपायांमुळे सायनस मोकळे राहते व परत परत सायनसच्या इन्फेक्शतनची शक्यचता कमी होते.
http://aaosairam.blogspot.com
√ऍलर्जी म्हणजे काय?
प्रतिकारशक्तीचे मुख्य काम म्हणजे विविध जंतूविरुद्ध शरीराचे संरक्षण करणे. याकरिता आपल्या प्रतिकारशक्तीने शरीराला धोका निर्माण करणाऱ्या व धोका न निर्माण करणाऱ्या गोष्टी ओळखल्या पाहिजेत. ऍलर्जी म्हणजे निसर्गामधील घटकांना शरीराने दिलेला अनैसर्गिक प्रतिसाद होय. हा असा प्रतिसाद शरीराला घातक ठरू शकतो. कारण या घटकांना प्रतिपिंड (antibody) तयार होऊन हिस्टामाईन नावाचे द्रव्य तयार होते.
√ते कसे शोधून काढायचे?
तपासणीसाठी त्वचा सर्वांत उपयोगी पडते. ऍलर्जीची औषधे चालू नसल्यास त्वचेची चाचणी रक्ताच्या तापसणीपेक्षा चांगले निष्कर्ष देते. ऍलर्जी वरील कायमस्वरूपी उपचाराला “इम्युनोथेरपी‘ असे म्हणतात.
√इम्युनोथेरपी म्हणजे काय?
या उपायांमध्ये ऍलर्जीच्या प्रतिपिंडांना प्रतिबंध केला जातो. हिस्टामाईन हे द्रव्य ऍलर्जीचे माध्यम समजले जाते. हिस्टामाईन विरुद्ध काम करणारी औषधे फक्त ऍलर्जीची लक्षणे थांबवतात. ऍलर्जी होण्याकरता झालेल्या परिणामांचा प्रादुर्भाव थांबवू शकत नाहीत.
इम्युनोथेरपीमध्ये ऍलर्जीचा प्रादुर्भाव होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाते. मग शरीराचा बाह्य ऍलर्जीनिक द्रव्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. एक ते पाच वर्षे ज्या रुग्णांनी हा उपचार केलेला आहे, त्या रुग्णांमध्ये याचे दीर्घकाळ फायदे आढळून येतात. प्रत्येक रुग्णामध्ये हा उपाय पूर्णतः लागू होईलच असे नाही; पण हा उपचार केल्यास ऍलर्जीमुळे होणारा त्रास कमी होतो किंवा औषधाची गरज कमी भासते. जे रुग्ण ठराविक द्रव्याची ऍलर्जी असूनसुद्धा त्यांना टाळू शकत नाहीत किंवा ज्यांना औषध घेऊनसुद्धा ऍलर्जीचा त्रास होत आहे. त्यांनी हा उपचार अवलंबावा यामुळे ते दैनंदिन जीवन सुखाने जगू शकतील. खाद्य पदार्थांच्या किंवा औषधांच्या ऍलर्जीसाठी मात्र हा उपाय अतिशय अवघड आहे. ऍलर्जीवर काम करणारा प्रतिबंधात्मक उपाय हा विशष उपचार केंद्रात (स्पेशल क्लिनिक)मध्ये केला जातो.
नाक, सायनस, श्वारसनलिकेच्या ऍलर्जीमध्ये हा नक्कीच उपयोगी ठरतो. जिभेच्या खाली याची लस देता येते. हळूहळू लसीचे प्रमाण वाढवले की ऍलर्जीचा त्रास कमी होतो. त्रास देणारी द्रव्ये शरीरात असूनसुद्धा प्रतिपिंड निर्माण करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करणारा पदार्थ (antigen) व प्रतिपिंड यांचा त्रास होत नाही. हिस्टामिन हे द्रव्य तयार न झाल्याने ऍलर्जीचे परिणाम दिसत नाहीत.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
╔══╗ संकलन: नितीन जाधव
║██║ स्रोत:- आरोग्य मित्र
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ *+९१८६५५४०७६१९*
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
आपण हि व या अधिक माहिती खालील संकेत स्थळाला भेट देऊन पाहु शकता
*http://aaosairam.blogspot.com*
*नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.*
*!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!*

1
Answer link
हिवाळ्यात बदलेले थंड वातावरणामूळे शिंका येवून सर्दी, खोकल्याच्या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असते. तसेच सर्दीमुळेच शिंका येता असे नाही धूळ, माती, प्रदूषण या अॅलर्जीमुळे देखील शिंका येतात. पण विशेष करून हिवाळ्यात शिंका येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे थंड वातावरणात श्वासोच्छवासाच्या प्रणालीमध्ये संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण येते, शिंका येणे आणि घसा खवखवणे त्रास जाणवतो. या अशा परिस्थितीत शिंकापासून मुक्तता करण्यासाठी अनेक मार्ग असून सर्दी आणि शिंकापासून त्वरित आराम मिळविण्यासाठी चला जाणून घेवू घरगुती उपचार.
शिंका येण्याचे हे आहेत कारणे - धूळ, धूर आणि प्रदुर्षणाच्या संसर्गामुळे नाकाच्या आत श्लेष्मल त्वचेला त्रास होतो आणि शिंका येतात. - प्रदूषित वातावरणात राहणे. - सर्दीमुळे शिंका येणे. - अॅलर्जीक रूग्णांमध्ये परागकणांच्या कणांमुळे शिंका येणे . - एखाद्या औषधाच्या अॅलर्जीमूळे शिक येवू शकतात. - थंडीची अॅलर्जीमुळे शिंका येणे देखील होऊ शकते.शिंकेच्या समस्येपासून मुक्त होण्याचे घरगुती उपचाराच्या टिप्स
- आले, लवंगा, दालचिनीचा काढा प्या. - तुळस, आले, लवंगा, मिरपूडचा चहा प्या -. अलसीची चहा प्या, त्यात तुळस आणि आले घाला. -. उकळत्या पाण्यात पुदीनाचे काही थेंब घाला आणि वाफ घ्या, - सतत शिंका येत असल्यावर थोडा हिंग घेवून त्याचा वास घ्या. -. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध, अर्धा चमचे दालचिनी टाकून प्या.- हळदीमध्ये अॅलर्जीपासून मुक्त होण्याची क्षमता आहे. अन्नात हळद वापरलीच पाहिजे. - एक ग्लास कोमट पाणी एक चमचा मध आणि अर्धा लिंबाचा रस प्या. - लवंगा लसूण बारीक करून एका काचेच्या पाण्यात उकळा. हे पाणी गाळल्यानंतर, कोमट प्या आणि दिवसातून दोनदा प्या.
- शिंकण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी नाकात बदाम, अणू, सरसोच्या तेलाचे थेंब टाका. -. सतत शिंका येत असल्यास सुपारीच्या पानांचा रस काढा. दिवसातून तीन वेळा एक-एक चमचा प्या.आराम महत्वाचारोग प्रतिकारशक्ती वाढवीण्यासाठी व शिंकण्याच्या समस्यापासून मुक्त होण्यासाठी आराम हा महत्वाचा आहे. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते त्यात काढे, हंगामी फळांचे सेवन केल्यावर रोगप्रतिकार शक्ती वाढते.कोमट पाणी प्या गरम पाण्याचे सेवन केल्यास सर्दी, सर्दी या समस्येमध्ये आराम मिळतो. थंडी व थंडी असल्यास नियमितपणे थोडेसे गरम पाणी घ्या. गरम पाणी कफ अतिशीत होण्यापासून प्रतिबंधित करते आणि इतर थंड लक्षणे जसे की वारंवार शिंका येणे, नाक अडवून मुक्त करू शकते.
0
Answer link
मला माफ करा, मी वैद्यकीय सल्ला देण्यासाठी योग्य नाही. सकाळी उठल्यावर येणाऱ्या शिंकांसाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
- हवामानातील बदल: हिवाळ्यात हवामान थंड आणि कोरडे असल्यामुळे नाकातील श्लेष्मल त्वचा कोरडी पडते आणि शिंका येतात.
- धूळ आणि ऍलर्जी: घरात धूळ साचलेली असल्यास किंवा तुम्हाला ऍलर्जी असल्यास सकाळी उठल्यावर शिंका येऊ शकतात.
- सर्दी: सर्दी झाल्यास देखील सकाळी उठल्यावर शिंका येतात.
उपाय:
- गरम पाण्याची वाफ घ्या: गरम पाण्याची वाफ घेतल्याने नाकातील श्लेष्मल त्वचा ओलसर राहते आणि शिंका कमी येतात.
- सलाईन नासल स्प्रे (Saline nasal spray): डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सलाईन नासल स्प्रेचा वापर करा.
- घर स्वच्छ ठेवा: घरातील धूळ नियमितपणे साफ करा.
- पुरेशी झोप घ्या: दररोज रात्री 7-8 तास झोप घ्या.
- डॉक्टरांचा सल्ला घ्या: वारंवार शिंका येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य उपचार करा.
तुम्हाला allergy असल्यास डॉक्टरांना सांगा, ते योग्य उपचार देतील.