भारत समाज महिला इतिहास

स्वातंत्र्योत्तर भारतात महिलांचे स्थान काय आहे?

2 उत्तरे
2 answers

स्वातंत्र्योत्तर भारतात महिलांचे स्थान काय आहे?

0
१. बेगम हजरत महल :


राणी लक्ष्मीबाईचा लढा पुढे जर कोणी चालू ठेवला असेल तर अवधच्या बेगम हजरत महलने.

तिचा लढा केवळ स्वतःचे राज्य वाचावे याकरिताच नव्हता तर ब्रिटिशांनी जे मंदिर आणि मस्जिद उद्ध्वस्त करण्याचे धोरण अवलंबलं होतं त्यालादेखील बेगमने विरोध केला, आणि आपलं बलिदान दिलं.

 

२. भिकाजी कामा :


भारतातल्या सर्वच धर्मियांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. त्यात पारशी धर्मीय लोक ही मागे नव्हते. त्यातलंच एक नाव म्हणजे मदाम कामा.

एका सधन पारशी घरातून आलेल्या या स्त्रीने आपली सगळी संपत्ती अनाथ मुलींच्या आश्रमासाठी देऊ केली. समाजात स्त्री-पुरुष समानता यावी यासाठी चळवळ सुरू केली.


४. कमलादेवी चट्टोपाध्याय :


भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काळातच अनेक सुधारणांची चळवळही सुरू झाली होती. कमलादेवी चट्टोपाध्याय या समाजसुधारक. पण समाज सुधारण्याची कामे करताना त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग नोंदवला.

तशा त्या मूळच्या नाटकातील कलाकार, पण स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोठं काम केलं. ब्रिटिशांनी अटक केलेल्या पहिल्या महिला म्हणजे कमलादेवी चटोपाध्याय.

स्त्रियांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर सुधारावा याकरिता त्यांनी काम केलं. स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक लघुउद्योग सुरू केले. अखिल भारतीय महिला परिषद त्यांनीच स्थापन केली.

कमला देवींनी महात्मा गांधीजींच्या १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहात ही भाग घेतला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकातही त्यांनी भाग घेतला. त्या विधानसभेतील पहिल्या महिला उमेदवार होत्या.

 

५. कॅप्टन लक्ष्मी सहगल :


नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी ज्या आझाद हिंद फौजेची स्थापना केली, त्यातील स्त्रियांच्या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी केलं.

आझाद हिंद सेनेबरोबर काम करताना लक्ष्मी सहगल यांनी हेच दाखवून दिलं की, अहिंसक मार्गाने होणारे आंदोलन असो किंवा लढाई करण्याची वेळ येवो, महिला कुठेही मागे नाहीत.

आझाद हिंद सेनेत जाण्यापूर्वी देखील त्यांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होता, त्यासाठी त्यांना ब्रह्मदेशात तुरुंगवासही भोगावा लागला होता.

६. अरुणा असफ अली :


भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हे देखील एक मोठं नाव.’द ग्रँड ओल्ड लेडी’ म्हणून त्या ओळखल्या जातात. भारत छोडो आंदोलनाच्या वेळेस त्यांनी मुंबईत झालेल्या आंदोलनात भारताचा ध्वज हातात घेऊन आंदोलनाचे नेतृत्व केले होते.

आंदोलनात सहभाग घेतला, ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवला म्हणून त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. तुरुंगात असतानाही कैद्यांना देण्यात येणाऱ्या वाईट वागणुकीबद्दलही त्यांनी तुरुंगात देखील आंदोलन केले होते.


७. कनकलता बरुवा :


 
कनकलता बरुवा या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वीरबाला म्हणून ओळखल्या जातात. संपूर्ण भारतभर त्यावेळेस ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन सुरू होतं. अगदी ईशान्य कडील राज्य ही त्याबाबत मागे नव्हती.

कनकलता बरुवा या आसाममधल्या. आसाममधून त्यांनी १९४२ च्या आंदोलनात भाग घेतला होता. त्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी बारंगबारी येथून केलं. त्यावेळेस त्यांना ‘भारत छोडो’ च्या घोषणा देत गोहपुर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करायचे होते.

आणि तिथे त्यांना तिरंगा फडकवायचा होता. परंतु ब्रिटिशांनी त्यांना मध्येच अडवले. त्या ब्रिटिशांना सांगत होत्या की आमच आंदोलन हिंसक नाही, तरीदेखील ब्रिटिशांनी त्यांचं काहीही ऐकून घेतलं नाही.

त्यांच्यावर जोरदार लाठीमार करण्यात आला आणि त्यातच वयाच्या केवळ १८ व्या वर्षी त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले.

 
उत्तर लिहिले · 28/2/2023
कर्म · 9455
0

स्वातंत्र्योत्तर भारतात महिलांच्या स्थितीत महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. शिक्षण, राजकारण, अर्थव्यवस्था आणि सामाजिक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे.

शैक्षणिक प्रगती:
  • शिक्षण क्षेत्रात महिलांसाठी समान संधी उपलब्ध झाल्यामुळे साक्षरता दर वाढला आहे.
  • उच्च शिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे.
राजकीय सहभाग:
  • पंचायती राज संस्थांमध्ये आरक्षResultीमुळे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे.
  • संसद आणि विधानमंडळांमध्ये महिला सदस्यांची संख्या वाढली आहे, परंतु हे प्रमाण अजूनही अपेक्षेपेक्षा कमी आहे.
आर्थिक विकास:
  • महिला आता विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहेत, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे.
  • स्वयंरोजगार आणि उद्योगांमध्ये महिला सक्रिय झाल्या आहेत.
सामाजिक बदल:
  • बालविवाह, हुंडाबळी आणि स्त्री भ्रूणहत्या यांसारख्या सामाजिक समस्यांविरुद्ध कायदे करण्यात आले आहेत.
  • महिलांच्या हक्कांसाठी अनेक सामाजिक संघटना आणि आंदोलने कार्यरत आहेत.

तरीही, महिलांना अजूनही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, जसे की असमान वेतन, कामाच्या ठिकाणी लैंगिक भेदभाव आणि हिंसा. महिला सक्षमीकरणासाठी सरकार आणि समाज एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 4820

Related Questions

स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी काय करावे याबाबत तुमचे विचार लिहा?
स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी काय करावे, याबाबत तुमचे विचार व्यक्त करा?
घरेलू हिंसा बद्दल माहिती द्या?
भारतातील समकालीन समाजातील महिलांची भूमिका स्पष्ट करा?
महिला मतदानाचा अधिकार या विषयी माहिती द्या?
महिला संरक्षणातील भूमिका काय आहे?
भारतातील महिलांच्या चळवळी?