रक्त गट रक्तदाब रक्त दान आरोग्य

माणसे रक्तदान किती दिवसातून करू शकतात?

2 उत्तरे
2 answers

माणसे रक्तदान किती दिवसातून करू शकतात?

6
आपण दर तीन महिन्यांनी रक्तदान करु श‌कतो.
याविषयी थोडी माहिती
रक्तदान कोणी, केव्हा व कुठे करावे::::::::

वयाच्या १८ वर्षानंतर (६५ वर्षापर्यंत)

वजन ४५ कि.ग्रॅ. च्या वर असल्यास..

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी १२.५ ग्रॅम असल्यास

रक्तदाता पूर्णपणे निरोगी असल्यास

दर ३ महिन्यांनी आपण रक्तदान करता येते.

जवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करता येते.

रक्तदानाचे फायदे :::::::::::::

रक्ताची तपासणी होते (एच.आय.व्ही., गुप्त रोग, कावीळ-ब, क प्रकारची, मलेरिया) वजन, तापमान, रक्तदाब व नाडी परीक्षण होते.

रक्तगट व हिमोग्लोबिनच्या प्रमाणाबाबत माहिती मिळते.

बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.

नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते.

नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत नाही. त्यामुळे हृदय-यकृतासारखे अवयव निरोगी राहतात..
लाईक करा, फॉलो करा
उत्तर लिहिले · 27/12/2020
कर्म · 2910
0

माणसे 3 महिन्यांच्या अंतराने रक्तदान करू शकतात.

म्हणजे एकदा रक्तदान केल्यानंतर, पुढचे रक्तदान करण्यासाठी कमीत कमी 90 दिवसांचा कालावधी असणे आवश्यक आहे.

पुरुषांसाठी हे अंतर 3 महिन्यांचे आहे, तर स्त्रियांसाठी ते 4 महिन्यांचे असते.

तसेच, काही विशिष्ट परिस्थितीत, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तादान करण्याच्या वेळेत बदल होऊ शकतो.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980

Related Questions

महिला रक्तदान करतात का?
रक्तदान विनंती पत्र लेखन कसे करावे?
माणूस आयुष्यात किती वेळा रक्तदान करू शकतो?
आपण रक्ताचे किती दान करू शकतो?
माझे वय ३० रनींग आहे, वजन ५२ आहे, तब्येत एकदम स्लीम आहे. तर मी रक्तदान करू शकतो का?
रक्तदान करून काय फायदा मिळतो?
जागतिक रक्तदान दिनाविषयी सविस्तर माहिती सांगा?