Topic icon

रक्त दान

0
हो करतात.
महिलांचे रक्त आणि पुरुषांचे रक्त सारखेच असते. त्यामुळे पुरुषांप्रमाणे महिलादेखील रक्तदान करतात.
मासिक पाळीच्या वेळेस स्त्रियांच्या रक्तातील लोह कमी झालेले असते, त्यामुळे त्या वेळेदरम्यान महिला रक्तदान करू शकत नाही किंवा ते टाळले जाते. याव्यतिरिक्त कोणत्याही वेळी महिला रक्तदान करू शकतात.
उत्तर लिहिले · 3/4/2021
कर्म · 33910
0

रक्तदान विनंती पत्र लिहिताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात:

  1. शीर्षक: पत्राच्या शीर्षस्थानी 'रक्तदान विनंती पत्र' किंवा तत्सम शीर्षक लिहा.
  2. संबोधन: आदरपूर्वक 'प्रिय नागरिक,' किंवा 'आदरणीय रक्तदाता,' असे संबोधन वापरा.
  3. परिचय: आपल्या संस्थेचा किंवा संघटनेचा थोडक्यात परिचय द्या.
  4. गरज: रक्ताची गरज का आहे, कोणत्या रुग्णांसाठी आहे, आणि कोणत्या रक्तगटाची आवश्यकता आहे, हे स्पष्ट करा.
  5. स्थळ आणि वेळ: रक्तदान शिबिराचे स्थळ, तारीख आणि वेळ स्पष्टपणे नमूद करा.
  6. प्रोत्साहन: रक्तदान करण्याचे फायदे सांगा आणि दात्यांना प्रोत्साहित करा.
  7. संपर्क: अधिक माहितीसाठी संपर्क करण्याची माहिती द्या (फोन नंबर, ईमेल आयडी).
  8. आभार: संभाव्य रक्तदात्यांचे आभार माना.
  9. समाप्ती: 'आपला नम्र,' किंवा तत्सम वाक्य वापरून सही करा.

उदाहरण:

रक्तदान विनंती पत्र

प्रिय नागरिक,

आम्ही 'जीवनधारा रक्तपेढी' आपल्या शहरात गेली १० वर्षे कार्यरत आहोत. आमच्या संस्थेमार्फत गरीब व गरजू रुग्णांना रक्तपुरवठा केला जातो.

सध्या, आमच्या रक्तपेढीत रक्ताचा साठा कमी आहे. त्यामुळे तातडीने काही रुग्णांना रक्ताची गरज आहे, विशेषतः 'ओ पॉझिटिव्ह' रक्तगटाच्या रक्ताची जास्त आवश्यकता आहे.

यासाठी, आम्ही रविवार, दिनांक २० मे २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत, 'shii विद्यालय' येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

आपण केलेले रक्तदान एका व्यक्तीचे जीवन वाचवू शकते. त्यामुळे, कृपया या उदात्त कार्यात सहभागी व्हा आणि आपले अमूल्य रक्त दान करा.

अधिक माहितीसाठी, कृपया 9876543210 या क्रमांकावर संपर्क साधा.

आपल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

आपला नम्र,
(सही)
अध्यक्ष, जीवनधारा रक्तपेढी

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980
6
आपण दर तीन महिन्यांनी रक्तदान करु श‌कतो.
याविषयी थोडी माहिती
रक्तदान कोणी, केव्हा व कुठे करावे::::::::

वयाच्या १८ वर्षानंतर (६५ वर्षापर्यंत)

वजन ४५ कि.ग्रॅ. च्या वर असल्यास..

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी १२.५ ग्रॅम असल्यास

रक्तदाता पूर्णपणे निरोगी असल्यास

दर ३ महिन्यांनी आपण रक्तदान करता येते.

जवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करता येते.

रक्तदानाचे फायदे :::::::::::::

रक्ताची तपासणी होते (एच.आय.व्ही., गुप्त रोग, कावीळ-ब, क प्रकारची, मलेरिया) वजन, तापमान, रक्तदाब व नाडी परीक्षण होते.

रक्तगट व हिमोग्लोबिनच्या प्रमाणाबाबत माहिती मिळते.

बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.

नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते.

नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत नाही. त्यामुळे हृदय-यकृतासारखे अवयव निरोगी राहतात..
लाईक करा, फॉलो करा
उत्तर लिहिले · 27/12/2020
कर्म · 2910
4
अठरा ते साठ वर्ष वयोगटातील व्यक्ती दर तीन महिन्यात ३५० मिलिलिटर याप्रमाणे रक्तदान करू शकतो.
असा हिशोब केल्यास एक वर्षात ४ वेळेस आणि ४२ वर्षात सुमारे १६८ वेळेस एक माणूस रक्तदान करू शकतो.
उत्तर लिहिले · 12/12/2020
कर्म · 283280
2

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं; पण त्या बाबतीत अनेक समज-अपसमज आहेत. जेव्हा आपल्या कोणातरी अतिशय जवळच्या आप्तावर शस्त्रक्रिया होणार असेल तेव्हा डॉक्टर काही बाटल्या रक्ताची सोय करायला आपल्याला सांगतात. त्या वेळी आपण आपल्या मित्रांना, ओळखीच्या व्यक्तींना, काही वेळा अनोळखी व्यक्तींनाही रक्तदानासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यांनी विचारलेल्या प्रश्नांमधून हे समज, बहुतांशी अपसमज उघड होतात.

जखमेमुळे रक्तस्राव होणं शरीरस्वास्थ्याला धोकादायक आहे, ही समजूत तशी बरोबर आहे. त्यात चूक नाही. मात्र, किती रक्त शरीरातून वाहून गेलं तरी शरीर ते सहन करू शकतं, याची माहिती अनेकांना नसते. शरीरातून वाहून गेलेल्या रक्तामुळे झालेलं नुकसान कायमस्वरूपी नसतं. शरीर त्याची भरपाई करतच असतं. मात्र, या भरपाईचा वेग मर्यादित असल्यामुळे एका वेळी आपण किती रक्ताचा र्‍हास सहन करू शकतो, यावर मर्यादा पडतात. साधारणपणे एकूण रक्ताच्या १० ते १५ टक्के रक्तस्राव झाल्यास स्वास्थ्याला फारसा धोका नसतो. त्या स्रावाच्या नंतर ताबडतोब काही रक्त देता आल्यास उत्तमच; पण तसं देणं शक्य झालं नाही तर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शरीर त्या रक्ताची भरपाई करतच राहतं. निरोगी आणि सुदृढ़ अशा तरुणाच्या शरीरात सरासरीनं साडेपाच लिटर रक्त असतं. त्याच्या दहा टक्के म्हणजे साधारण अर्धा लिटर रक्त; तेवढ्या रक्ताचा र्‍हासही शरीर सहन करू शकतं. उलट रक्तदानाच्या वेळी दात्याच्या शरीरातून पाव लिटर एवढंच रक्त काढून घेतलं जातं. त्यामुळे त्याची भरपाई होण्यास वेळ लागत नाही. साधारण २४ तासांत ही भरपाई होत असते. तरीही एकदा रक्तदान केल्यानंतर दोन महिने परत रक्तदान करू दिलं जात नाही. त्यामुळे पाव लिटर रक्त देण्यानं कोणतंही नुकसान होत नाही. अर्थात, ही झाली संपूर्ण रक्तदानाची प्रक्रिया. काही वेळा रूग्णासाठी केवळ प्लेटलेट्सची गरज असते. अशा वेळी डॉक्टर संपूर्ण रक्त काढून न घेता 'अफेरेसिस' नावाच्या प्रक्रियेचा वापर करून फक्त प्लेटलेट्स काढून घेतात. त्यांची भरपाई तर त्याहीपेक्षा जलद गतीनं होते. त्यामुळे एकदा प्लेटलेट्सचं दान केल्यानंतर तीनच दिवसांनी परत त्यांचं दान करता येतं..

साभार
 *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातुन*
उत्तर लिहिले · 15/11/2020
कर्म · 39105
3
हो.
तुम्ही निश्चितपणे रक्तदान करू शकता.
रक्तदान करण्यासाठी अटी :-
वय: १८ वर्षे पूर्ण
वजन: ५० kg
So तुम्ही रक्तदान करू शकता........
And great think 👍
उत्तर लिहिले · 31/3/2020
कर्म · 2695
6
 रक्तदान करण्याचे  फायदे पाहुन तुम्हाला वाटेल नेहमी रक्तदान करावे   ⭕*_

             *_रक्तदान श्रेष्ठदान असे म्हटल जाते. कारण तुमच्या रक्तदानाने कुठल्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकते. अनेक जण विचार करतात की आम्ही रक्तदान का करावे, त्याने आम्हाला काय फायदा होणार? रक्तदानाचे फायदे पाहता  तुम्ही स्वतःहून नियमितपणे रक्तदान कराल._*

*💉 रक्ताचा प्रवाह सुधारतो आणि हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो :*
रक्तदान केल्याने रक्ताचा प्रवाह सुधारतो. ह्यामुळे ब्लड वेसल्सच्या लायनिंग डॅमेज होत नाहीत. त्यामुळे शरीरातील आर्टरी ब्लॉकेज कमी होतो. त्यामुळे रक्तदान करणाऱ्यामध्ये हार्ट अटॅकचा धोका ८८ टक्क्यांनी कमी होऊन जातो.
*नियमित रक्तदान करणारे लोक खूप कमी प्रमाणात दवाखान्यात भर्ती होत असतात. राक्तदात्याला हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक आणि कॅन्सर सारखे आजार होण्याची शक्यता फार कमी असते.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ_* जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर ते तुम्ही रक्तदान करून देखील करू शकता. रक्तदान हे फिट राहण्यासाठी एक योग्य आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. एका वेळी रक्तदान केल्याने शरीरातील ६५० कॅलरीज कमी होतात, त्यामुळे जर तुम्ही दर तीन महिन्याला रक्तदान केले तर तुमच्या किती कॅलरीज कमी होतील पहा. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,रक्तदानाआधी तुमचे चेक-अप केल्या जाते. ज्यामध्ये तुमच्या शरीराचे तापमान, पल्स रेत, ब्लड प्रेशर आणि हिमोग्लोबिन इत्यादीची तपासणी केली जाते. त्यानंतर रक्त टेस्ट साठी पाठवले जाते, ज्यामध्ये तुमच्या रक्तावर १३ वेगेवेगळे टेस्ट केले जातात. त्यामुळे जर तुम्हाला कुठला आजार झाला असेल, किंवा तुमच्या शरीरात कशाची कमी असेल तर ते तुम्हाला लगेचच कळत ई तेही फ्री.M҈ a҈ h҈ i҈ t҈ i҈  S҈ e҈ v҈ a҈  g҈ r҈ o҈ u҈ p҈ ,҈  P҈ e҈ t҈ h҈ v҈ a҈ d҈ g҈ a҈ o҈ n҈  आपल्या शरीरात ५ ग्राम एवढे Iron असते. Iron जास्तकरून रेड ब्लड सेल्स आणि बोन मॅरोमध्ये असते. जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा १/४ एवढे Iron निघून जाते. पण ह्या Iron ची कमतरता एका आठवड्यात तुमच्या जेवणातून भरून निघते. त्यामुळे शरीरातील Iron चे संतुलन बनून राहते. तसेही शरीरात जास्त Iron ब्लड वेसल्स साठी हानिकारक असते.
एका व्यक्तीच्या रक्ताने तीन लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. मग आता जर आपले रक्त दान केल्याने इतरांना तसेच आपल्यालाही फायदा होत असेल तर रक्तदान का करू नये…
इनमराठी वरून साभार