Topic icon

रक्त गट

0

रक्तातील यूरिक ऍसिड वाढल्यास खालील समस्या उद्भवू शकतात:

  • सांधेदुखी (Gout): यूरिक ऍसिडचे स्फटिक सांध्यांमध्ये जमा होतात, ज्यामुळे सांधेदुखी आणि सूज येते.
  • किडनी स्टोन (Kidney Stones): यूरिक ऍसिडचे स्फटिक किडनीमध्ये जमा होऊन खडे तयार करतात.
  • किडनीचे आजार: जास्त यूरिक ऍसिडमुळे किडनीला नुकसान होऊ शकते.
  • हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग: काही अभ्यासांनुसार, उच्च यूरिक ऍसिड पातळी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांच्या वाढत्या धोक्याशी संबंधित आहे.

यूरिक ऍसिडची पातळी वाढण्याची अनेक कारणे असू शकतात, ज्यात आहार, आनुवंशिकता आणि काही वैद्यकीय परिस्थितींचा समावेश होतो.

जर तुम्हाला तुमच्या रक्तातील यूरिक ऍसिडची पातळी जास्त आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक तपासण्या करा.

टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे आणि वैद्यकीय सल्ला म्हणून याचा वापर करू नये.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
4
प्लेटलेट्स कमी करण्यासाठी पदार्थ:
डार्क चॉकलेट, कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ, लसूण, आले, ओमेगा -3 पीयूएफए, कांदा, जांभळ्या द्राक्षाचा रस, टोमॅटो आणि वाइन सर्व प्लेटलेट कमी करतात.

पांढऱ्या रक्तपेशी कमी करण्यासाठी:
आपल्या पांढर्‍या रक्त पेशींची संख्या कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारात पुढील गोष्टींचा समावेश केला पाहिजे: लिंबू, संत्री  यासारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि तसेच पपई, बेरी, पेरू आणि अननस हे पदार्थही मदत करतात.

महत्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घ्या. जीवाशी खेळू नका
.

उत्तर लिहिले · 19/3/2021
कर्म · 61495
7
रक्तदाब हा हातातील धमनीद्वारे (ब्रेकियल आर्टरी) किंवा पायातील धमनीद्वारे (फिमोरल आर्टरी) तपासला जातो.
उत्तर लिहिले · 29/12/2020
कर्म · 283280
6
आपण दर तीन महिन्यांनी रक्तदान करु श‌कतो.
याविषयी थोडी माहिती
रक्तदान कोणी, केव्हा व कुठे करावे::::::::

वयाच्या १८ वर्षानंतर (६५ वर्षापर्यंत)

वजन ४५ कि.ग्रॅ. च्या वर असल्यास..

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी १२.५ ग्रॅम असल्यास

रक्तदाता पूर्णपणे निरोगी असल्यास

दर ३ महिन्यांनी आपण रक्तदान करता येते.

जवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करता येते.

रक्तदानाचे फायदे :::::::::::::

रक्ताची तपासणी होते (एच.आय.व्ही., गुप्त रोग, कावीळ-ब, क प्रकारची, मलेरिया) वजन, तापमान, रक्तदाब व नाडी परीक्षण होते.

रक्तगट व हिमोग्लोबिनच्या प्रमाणाबाबत माहिती मिळते.

बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.

नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते.

नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत नाही. त्यामुळे हृदय-यकृतासारखे अवयव निरोगी राहतात..
लाईक करा, फॉलो करा
उत्तर लिहिले · 27/12/2020
कर्म · 2910
4
रक्तगटाच्या विज्ञानानुसार काही अडचण येणार नाही. जर आईच्या रक्तात Rh- असेल आणि वडिलांच्या रक्तात Rh+ हा घटक असेल, तर होणाऱ्या अपत्याला ॲनिमिया होण्याची संभाव्यता असते. तुमच्या बाबतीत तसे दिसत नाही. फार शंका येत असेल, तर इतर वैद्यकीय चाचण्या करून डॉक्टरांकडून पडताळणी करून घ्या.
उत्तर लिहिले · 17/9/2020
कर्म · 283280
1
एखाद्या विशिष्ट रक्तगटाच्या माणसाला डास अधिक चावतात हे तुम्हाला माहिती आहे का? तसे संशोधकांचे मत आहे! ‘ओ’ हा रक्तगट असलेल्या लोकांना डास अधिक चावतात, असे संशोधकांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनाही डास चावण्याचे प्रमाण अधिक असते._*    

‘ओ’ रक्तगट असलेल्या लोकांच्या रक्तात काही विशिष्ट प्रकारचे तरल पदार्थ असतात व त्यामुळे डास त्यांच्याकडे अधिक आकर्षित होतात. ‘ए’ रक्तगटाच्या माणसांकडे ते जास्त आकर्षित होत नाहीत. त्यांच्या रक्तात या तरल पदार्थांचे प्रमाण सर्वात कमी असते. गर्भवती महिलांच्या श्वासोच्छ्वासात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 21 टक्के अधिक असते. त्यामुळे त्यांचे तापमान तुलनेने अधिक असते. अशा स्थितीत डास त्यांच्याकडे अधिक आकर्षित होतात. गडद रंगाचा पोषाख करणार्या लोकांकडेही डास अधिक आकर्षित होतात, असे दिसून आले आहे. याबाबत फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी संशोधन केले आहे.🕷🕷*
http://anilpatilmahitiseva.blogspot.com/2020/07/blog-post_527.html
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
_*माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव*_
*╰──────•◈•──────╯*

7
रक्ताचे चार प्रमुख गट आहेत. (ए, बी, एबी आणि ओ) हे गट रक्तात असलेल्या विशिष्ट घटकांप्रमाणे केलेले आहेत. या ए, बी घटकांशिवाय 'आर-एच' नावाचा एक घटकही सुमारे 85 टक्के व्यक्तींत असतो. अशा व्यक्तींच्या रक्तगटाला + (पॉझिटिव्ह) म्हणतात. ज्या व्यक्तींत हा घटक नसतो त्याला - (निगेटिव्ह) म्हणतात. मराठीत धन (+) व ऋण (-) असे शब्द वापरता येतील.एखाद्याचे रक्त चालणे किंवा न चालणे म्हणजे काय हे आता समजावून घेऊ या. रक्तात एखादा पदार्थ गेला की त्यावर प्रथिनांच्या कणांचा हल्ला होतो हे आपण शिकलो आहोत. या न्यायाने A गटाच्या व्यक्तीस B गटाचे रक्त दिल्यास B पदार्थावर हल्ला होईल. कारण निसर्गतः A गटाच्या व्यक्तीत B घटक सापडत नाही. सुरुवातीस हे काही प्रमाणात खपून जाते. नंतर मात्र अशी चूक झाल्यास वरीलप्रमाणे मोठा घोटाळा होतो. म्हणून सर्वसाधारणपणे रक्त द्यायचे झाल्यास त्याच एका गटाचे रक्त चालते. उदा. ए + (पॉझिटिव्ह) व्यक्तीला रक्त द्यायचे असल्यास ए + लागते. B+ve व्यक्तीला B+ve रक्त चालते. दुसरे रक्त दिल्यास रक्तात गाठी होऊन मृत्यू येऊ शकतो.
ओ - रक्तात कोठलाच घटक नसतो. त्यामुळे हे रक्त कोणालाही दिले तर चालते.
उत्तर लिहिले · 24/4/2020
कर्म · 210095