जागतिक रक्तदान दिनाविषयी सविस्तर माहिती सांगा?
*LetsUp | Special*
दरवर्षी 14 जून रोजी जगभरातील अनेक देशांमध्ये जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो.
🎯 *यंदाची थीम काय?* : "Blood donation and universal access to safe blood transfusion"
🧐 *रक्तदान दिवस आणि इतिहास* :
▪ जगातील रक्तसंक्रमणाची गरज आणि आवश्यक असलेल्या व्यक्तीस रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो.
▪ 14 जून 1868 रोजी कार्ल लँडस्टीनरच्या (Karl Landsteiner) वाढदिवसाच्या दिवशी दरवर्षी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो.
▪ सन 2004 मध्ये "World Health Organization, रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट सोसायटीजचे आंतरराष्ट्रीय फेडरेशन" यांनी 14 जून रोजी सर्वप्रथम साजरा केला गेला.
👍 *लक्षात ठेवा!*
▪ रक्तदानामुळे काहीही त्रास होत नाही.
▪ सुदृढ, सशक्त, रोग न झालेला कोणताही व्यक्ती रक्तदान करू शकतो.
▪ वयाच्या 18 व्या वर्षापासून 60 व्या वर्षापर्यंत रक्तदान करता येते.
▪ रक्तदानानंतर कोणतेही कष्टाचे काम करू शकतो.
▪ रक्तदाताचे वजन साधारणतः 45 किलोच्या वर असावे.
▪ रक्तदाताच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण 12.5 असावे. नाडीचे ठोके 80 ते 100 असावेत.
▪ एकावेळी कोणाच्याही शरीरातून 471 एमएलपेक्षा जास्त रक्त घेतले जात नाही.
▪ रक्तदान करण्याच्या एकदिवस आधी धुम्रपान करु नये. तसेच 48 तासांपूर्वी मद्यपान करु नये.
▪ रक्तदान केल्यानंतर ज्यूस, चिप्स, फळं यांसारखा आहार करावा.
🤔 *रक्ताविषयी तुम्हाला माहित आहे का?*
▪ जगातील पहिली रक्तपेढी 1937 साली स्थापन झाली.
▪ मांजर या प्राण्यात रक्ताचे 11, कुत्र्यात 10 तर गाईमध्ये रक्ताचे 800 प्रकारचे रक्तगट असतात.
▪ नवजात बाळाच्या शरीरात 250० मिली रक्त असते तर वृद्ध व्यक्तीच्या शरीरात 5 लिटर रक्त असते. हे प्रमाण शरीराच्या एकूण वजनाच्या 3 टक्के असते.
▪ साधारणतः भारतात दर 3 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. जगात दररोज 40 हजार युनिट रक्त लागते.
▪ आपल्या धमन्यातून वाहणारे रक्त सरासरी तशी 400 किमी वेगाने वाहते म्हणजे एका दिवसात रक्त शरीरात 9,500 किमीचा प्रवास करत असते.
▪ रक्ताच्या एका थेंबात 10 हजार पांढऱ्या पेशी असतात आणि 1,50,000 प्लेटलेट असतात.
🤝 *संकल्प करूया* : अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसर्याचा जीव वाचवू शकते. म्हणूच रक्तदान सर्वश्रेष्ठ दान म्हटले जाते. चला तर मग, आजच्या दिनी कोणतीही अपेक्षा न करता दर तीन महिन्यास मी रक्तदान करेन, असा संकल्प करूया.
जागतिक रक्तदान दिन दरवर्षी 14 जून रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांना रक्तदान करण्याचे महत्त्व पटवून देणे आणि रक्तदानाबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे.
या दिवसाची सुरुवात: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2004 मध्ये जागतिक रक्तदान दिनाची सुरुवात केली.
उद्देश:
- सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांची गरज लोकांना समजावून सांगणे.
- स्वैच्छिक रक्तदात्यांचे आभार मानणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे.
- रक्तदान करण्याबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करणे.
महत्व: रक्तदानामुळे अनेक लोकांचे प्राण वाचवता येतात. शस्त्रक्रिया, अपघात, प्रसूती आणि इतर वैद्यकीय उपचारांमध्ये रक्ताची गरज भासते.
थीम (Theme): जागतिक रक्तदान दिनाची थीम दरवर्षी बदलते. या वर्षीची थीम आहे "रक्तदान करा, जीवनदान करा" (Give blood, save lives).
रक्तदान कोण करू शकतं: १८ ते ६५ वर्षे वयोगटातील कोणताही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकतो. रक्तदानापूर्वी काही वैद्यकीय तपासण्या केल्या जातात.
त्यामुळे, जागतिक रक्तदान दिनाचे महत्त्व ओळखून आपणही रक्तदान केले पाहिजे आणि इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.
अधिक माहितीसाठी: