स्वयंपाक पाककृती आहार

मिसळपावची रेसिपी काय आहे?

1 उत्तर
1 answers

मिसळपावची रेसिपी काय आहे?

4
साहित्य- पाव किलो मोड आणून शिजवलेली मटकी, दोन उकळलेले बटाटे, तीन कांदे, दोन टोमॅटो, मिरची- आले-लसूण पेस्ट, दालचिनीपूड, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड, धणेपूड, एक वाटी खवलेला ओला नारळ, कोथिंबीर, तिखट,  गरम मसाला, हिंग, लिंबू, मोहरी, हळद, कढीपत्ता,  मीठ, तेल, फरसाण.

कृती- मोड आलेली मटकी भाजून घ्या.  कढईत तेल तापवून मोहरी, कढीपत्ता, मिरची- आले-लसूण पेस्ट, दालचिनीपूड, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड, धणेपूड, हळद, तिखट टाका. अता चिरलेले बटाटे, टोमॅटो टाका. खवलेले नारळ घालून परता. त्यानंतर धान्य टाका. गरम पाणी टाकून गरम मसाला घाला. वरून कोथिंबीर, कांदा, लिंबू व फरसाण टाकून पावसोबत सर्व्ह करा.
उत्तर लिहिले · 30/1/2020
कर्म · 18365

Related Questions

स्वयंपाक म्हणजे काय?
ओट्स म्हणजे काय, त्याचे फायदे आणि नुकसान कोणते आहे?
पोहे कशापासून तयार करतात?
आहार व पोषण या शाखेचा अभ्यास केलेली गृहिणी कोणता स्वयं रोजगार करू शकते?
पितळेच्या भांड्यात स्वयंपाक कसा करावा? कढी किंवा टोमॅटो असलेल्या भाज्या केल्याने पितळी भांडी खराब होतात का?
स्वयंपाकातील क्रियांशी संबंधित असणारे मराठीतील काही शब्दप्रयोग कोणते आहे?
स्वयंपाक करण्यासाठी कोणती भांडी वापरणे फायदेशीर आहे, स्टील का लोखंडी?