स्वयंपाक
पाककला
भारतीय पाककला
साहित्य
मला पावभाजी करायची आहे, त्यासाठी लागणारे साहित्य व कृती सांगा?
2 उत्तरे
2
answers
मला पावभाजी करायची आहे, त्यासाठी लागणारे साहित्य व कृती सांगा?
3
Answer link
साहित्य:
२ ते ३ मध्यम आकाराचे बटाटे
१ कप फ्लॉवरचे तुरे
१ छोटे गाजर तुकडे करून
१/२ भोपळी मिरची चौकोनी तुकडे करून
३-४ फरजबी तुकडे करून
१/४ कप मटार
१ १/२ टोमॅटो बारीक चिरून
१ टेबलस्पून कोथिंबीर
१/२ टीस्पून हळद
१ १/४ टीस्पून लाल तिखट
१ टेबलस्पून लसूण बारीक चिरून
१ १/२ कप बारीक चिरलेला कांदा
२ ते ३ टीस्पून पावभाजी मसाला (मी एव्हरेस्ट किंवा बादशाहचा वापरते)
मीठ चवीप्रमाणे
बटर
लादी पाव किंवा स्लाइस ब्रेड
कृती:
१. कांदा,मटार आणि टोमॅटो सोडून इतर सगळ्या भाज्या १ कप पाणी घालून कुकरमध्ये उकडून घ्या.कुकर थंड झाल्यावर उकडलेल्या भाज्या मॅश करून घ्या.
२. पातेल्यात २ टेबलस्पून बटर गरम करा त्यात लसूण घाला. खमंग वास सुटला कि १ कप बारीक चिरलेला कांदा २ ते ३ मिनिटे परतून घ्या. मग हळद,तिखट, १ टीस्पून पावभाजी मसाला आणि टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परता.
३. मॅश केलेल्या भाज्या घालून परता.मटार घाला. मीठ आणि पाव भाजी मसाला घालून मिक्स करा. झाकण ठेवून वाफ आणा. आंबटपणा कमी वाटला तर किंचित आमचूर घाला किंवा लिंबू पिळा.
४. पाव बटर लावून भाजून घ्या.गरम भाजी, पावा बरोबर आणि कांद्या बरोबर सर्व्ह करा.
भाजीबरोबर पाव आणि चिरलेला कांदा आणि निंबू सर्व्ह करा , सजावटीसाठी कोथम्बीर चा वापर करू शकतात.

0
Answer link
नमस्कार! पावभाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे:
साहित्य:
कृती:
टीप:
साहित्य:
- पाव - 8 नग
- बटाटे - 2 मध्यम आकारचे
- फ्लॉवर - 1/2 कप
- मटार - 1/2 कप
- सिमला मिरची - 1/2 कप (बारीक चिरलेली)
- कांदा - 2 मध्यम आकारचे (बारीक चिरलेला)
- टोमॅटो - 3 मध्यम आकारचे (बारीक चिरलेले)
- आले-लसूण पेस्ट - 1 चमचा
- लाल मिरची पावडर - 2 चमचे
- पावभाजी मसाला - 3 चमचे
- हळद - 1/2 चमचा
- बटर - 2 चमचे
- तेल - 2 चमचे
- कोथिंबीर - 2 चमचे (बारीक चिरलेली)
- लिंबू - 1 (रस काढण्यासाठी)
- मीठ - चवीनुसार
- प्रथम बटाटे, फ्लॉवर आणि मटर उकडून घ्या.
- उकडलेल्या भाज्या चांगल्या मॅश करून घ्या.
- एका कढईत तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.
- आले-लसूण पेस्ट टाकून एक मिनिट परतून घ्या.
- बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत परतून घ्या.
- लाल मिरची पावडर, हळद आणि पावभाजी मसाला घालून चांगले मिक्स करा आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
- मॅश केलेल्या भाज्या आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. आवश्यक असल्यास थोडे पाणी घाला.
- सिमला मिरची घालून मिक्स करा आणि भाजीला उकळी येऊ द्या.
- वरून बटर आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
- गरम भाजी पावबरोबर सर्व्ह करा. लिंबूचा रस पिळून घ्या.
- तुम्ही आपल्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता.
- भाजी जास्त मसालेदार हवी असल्यास लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला जास्त वापरा.