अन्न पाककला भारतीय पाककला

डोसा, इडली, उपमा व त्याची चटणी कशी तयार करतात, पूर्ण माहिती मिळेल का?

3 उत्तरे
3 answers

डोसा, इडली, उपमा व त्याची चटणी कशी तयार करतात, पूर्ण माहिती मिळेल का?

3
डोसा ,इडली, उत्तप्पा व त्यांची चटणी



खोबऱ्याची चटणी 
दक्षिण भारतीय जेवणातील प्रमुख घटक म्हणजे त्यांच्या चटण्या आणि त्यातही विशेष म्हणजे खोबऱ्याची चटणी. त्यांच्या जेवणात इडली डोसा उत्तप्पा वडे यांसोबत आवर्जून खाल्ली जाणारी खोबऱ्याची चटणी कशी करायची चला तर मग पाहूया त्याची रेसिपी.

अधिक
 पंधरा मिनिट
घटक
 दोन जणांसाठी
1 कप ओला नारळाचे तुकडे
1 इंच आले
1/4 कप कोथिंबीर
चमचा लिंबू रस
1/2 चमचा उडीद डाळ
10-12 कडीपत्ता पाने
1/2 चमचा मोहरी
1/2 चमचा जीरे
1 चिमूट हिंग
1/2 चमचा मीठ
1/4 चमचा साखर
1 लाल मिरची
1 चमचा खोबरे तेल
2-3 हिरव्या मिरच्या
पायर्‍या
सगळ्यात अगोदर लागणारे साहित्य जमवून घेणे.
खोबऱ्याची चटणी 
खोबऱ्याची चटणी (
आता मिक्सर मध्ये नारळ हिरव्या मिरच्या कोथंबीर आले लिंबूरस साखर घालून मिक्सरला वाटून घेणे. सर्व वाटण थोडे बारीक झाले की त्यात पाणी घालून परत एकदा छान वाटून घेणे.
खोबऱ्याची चटणी (
 




आता फोडणी पात्रात खोबर्‍याचे तेल घेऊन मोहरी जीरे तडतडले कि मग कडी पत्ता उडीद डाळ घालून उडीद डाळ चा कलर चेंज होईपर्यंत परत नाही आता त्यात हिंग व लाल मिरची टाकून हा तडका चटणीवर घालून मिक्स करणे तयार आहे आपली ओल्या खोबऱ्याची चटणी.ही आपण इडली डोसा उडीद वडा या सोबत खाऊ शकतो.




१)लाल चटणी
१ टोमॅटो, भिजत घातलेल्या लाल तिखट मिरच्या, एक वाटी खोवलेले खोबरे,मीठ चवीप्रमाणे
तडका सामान: खोबरेल तेल, हिंग,उडीद डाळ, कडीपत्ता

२)कडीपत्ता चटणी
२ वाट्या धूवून निवडून सुकवलेला कडीपत्ता, ३ मोठे चमचा सुकी चणाडाळ,१ चमचा जुना तांदूळ, १ चमचा तूरडाळ, २ चमचा उडीद डाळ, ४-५ तिखट लाल मिरच्या, हिंग, १ लहान चमचा काळंमिरी, १ लहान चमचा धणे, पाव चमचा जीरं, १ लहान चमचा राईची डाळ, सुके खोबरे २ चमचे,मीठ चवीप्रमाणे
तडका नाही लागत इथे.

३)लाल चटणी (टमाटर -कांदा घालून)
२ टोमॅटो, आवडत असतील तितक्या लाल तिखट भिजत घातलेल्या मिरच्या, एक वाटी खोवलेले खोबरे, तीन चमचे भिजलेली हरभरा डाळ, पाव वाटी चिरलेला कांदा, १ लहान चमचा धणे,नखाएवढी भिजलेली चिंचेचा कोळ,
तडका सामान: खोबरेल तेल, हिंग,उडीद डाळ, कडीपत्ता

४) शेंगदाणे घालून चटणी
१ वाटी शेंगदाणा भिजत घालून, मूठभर ओले खोबरे, २ चमचे डाळ्या(पंढरपुरी डाळ), कडीपत्ता आवडेल तितकाच, लाल मिरच्या ४-५,चवीला मीठ
तडका सामानः १ चमचा उडीद डाळ, फोडणीला खोबरेल तेल, हिंग, राई, कडीपत्ता

५)उडीद डाळ भिजत घालून
पाव वाटी उडीद डाळ भिजलेली, ३ चमचा खोबलेले खोबरे, ४-५ हिरव्या तिखट मिरच्या, खिसलेलं आलं,कडीपत्ता लागेल तसा, नखाएवढा चिंचेचा कोळ, मीठ चवीला.
तडका सामान: देसी घी लागेल तसे, हिंग, लाल मिरच्या (तिखट नसलेल्या) फक्त शोभेला फोडणीला.

६) कांदा, खोबरे चटणी
१ वाटी बारीक चिरलेला कांदा(सांबारच कांदे घ्या), ४-५ हिरव्या मिरच्या, मूठभर खोवलेले खोबरे, आलं, १ चमचा डाळ्या
तडका सामानः खोबरेल तेल, हिंग्,कडीपत्ता

७) हॉटेलची चवीची इडली डोसा चटणी
२ वाटी खोवलेलं खोबरे, एकच सांबार कांदा, ३ चमचे डाळ्या, ४ हिरव्या मिरच्या, नखाएवढं आलं किसून, नखाएवढी चिंचेचा कोळ, ३-४ पानं कडीपत्ता, आवडीप्रमाणे साखर,चवीला मीठ.
तडका सामानःखोबरेल तेल, हिंग, राई,उडीद डाळ,कडीपत्ता, लाल मिरच्या(तिखट नसलेल्या ,फक्त शोभेला)

८) कोथींबीर, खोबरे मराठी चटणी- आमच्या घरी ह्याला मराठी चटणी म्हणतो कारण आई जेव्हा बुचकाभर कोथींबीर टाकते आणि चटणी फोडणीत शिजवते. नुसती फोडणी वरून घालून नाही करत तेव्हा.
साधारण दक्षिणेतील लोकं खूपच कमी वेळा शिजवलेली चटणी करतात इडली-डोस्याला. आणि कोथींबीर सुद्धा कमीच घालतात चटणी मध्ये असे माझे मत आहे. Happy
तर सामान :
२ वाटी खोवलेले खोबरे, ४-५ हिरव्या मिरच्या, बुचकाभर कोथींबीर,पेरभर खिसलेलं आलं, चवीला मीठ
तडका सामानः कुठलेही तेल, हिंग, कडीपत्ता, राई,लाल मिरच्या.

दही चटणी:
सामानः खोबरे, हिरवी मिरची, कडीपत्ता,आलं,सांबार मसाला, दही लागेल तसे
तडका नाही.

कैरीची चटणी
पेरभर आलं, हिरव्या मिरच्या आवडतील तितक्या, १ मध्यम कैरी कीसून, २ चमचे खोवलेलं खोबरं, ३-४ काजू, चिमटीभर गूळ.
तडका सामानः
खोबरेल तेल, हिंग, राई,३-४ लाल मिरच्या कडीपत्त, भिजवलेली चणाडाळ्च फक्त(उडीद डाळ नाही)
अतिशय मस्त लागते हि चटणी.

क्रमवार पाककृती: 
आता पद्धत,

१) लाल चटणी:
१ चमचा तेलात टोमॅटो ,खोबरे आणि लाल मिरच्या परतून घ्यायचे. मीठ टाकावे मग टोमॅटो लवकर गळतो. बारीक वाटून वाटीत काढून घेवून मग कडकडीत फोडणी वरील दिलेल्या सामानाची करून खोबरेल तेलाचा चटणीला वरून तडका द्यावा.

२) कडीपत्ता चटणी:
कडीपत्ता धूवून वाळवून घ्यावा. सर्व डाळी खरपूस भाजून घ्याव्या. मग उरलेले सामान(खोबरे वगैरे)२) कडीपत्ता चटणी:
कडीपत्ता धूवून वाळवून घ्यावा. सर्व डाळी खरपूस भाजून घ्याव्या. मग उरलेले सामान(खोबरे वगैरे) सुद्धा वेगळे भाजावे. एकत्रित करून बारीक वाटावे. हवाबंद डब्यात ठेवावे.

वाढणी/प्रमाण: 
आवडेल तशी
उत्तर लिहिले · 17/8/2022
कर्म · 53710
2
सुरुवातीला तांदूळ एक रात्र भिजवून ठेवावे. दुसऱ्या दिवशी मिक्सरला किंवा ग्राइंडर वरती तांदूळ वाटून घ्यावे. त्यात गरजेपुरता सोडा व चवीपुरते मीठ टाकावे व इडली, डोसा, उत्तप्पा बनवणाऱ्या तव्यावरती बनवावे.
चटणी बनवत असताना खोबरे बारीक कापून मिक्सर वरती हव्या त्या प्रमाणात बारीक करावे. त्यात कोथिंबीर, मीठ, हवे असल्यास शेंगदाण्याचे बारीक कूट मिसळून घ्यावे. त्याला थोडेसे तेल जिऱ्याची फोडणी द्यावी. चविष्ट चटणी तयार होईल.
उत्तर लिहिले · 1/9/2022
कर्म · 105
0

नमस्कार! डोसा, इडली, उपमा आणि चटणी बनवण्याची रेसिपी खालीलप्रमाणे:

1. डोसा रेसिपी:

साहित्य:

  • तांदूळ - 2 कप
  • उडीद डाळ - 1 कप
  • मेथी दाणे - 1 टीस्पून
  • तेल - आवश्यकतेनुसार
  • मीठ - चवीनुसार

कृती:

  1. तांदूळ, उडीद डाळ आणि मेथी दाणे एकत्र धुवून घ्या आणि 4-5 तास पाण्यात भिजत ठेवा.
  2. भिजवलेले मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आवश्यक असल्यास पाणी घाला.
  3. तयार झालेले मिश्रण रात्रभर fermentation साठी ठेवा.
  4. fermentation झाल्यावर चवीनुसार मीठ घाला.
  5. नॉन-स्टिक तवा गरम करा आणि त्यावर तेल लावा.
  6. तव्यावर डोसाचे पीठ गोलाकार आकारात पसरवा.
  7. मध्यम आचेवर डोसा सोनेरी होईपर्यंत शिजवा.
  8. गरम डोसा चटणी आणि सांबारसोबत सर्व्ह करा.

2. इडली रेसिपी:

साहित्य:

  • उडीद डाळ - 1 कप
  • इडली रवा - 2 कप
  • मीठ - चवीनुसार
  • तेल - आवश्यकतेनुसार

कृती:

  1. उडीद डाळ 4-5 तास पाण्यात भिजत ठेवा.
  2. भिजलेली डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
  3. इडली रव्यामध्ये डाळीचे मिश्रण आणि मीठ मिसळा.
  4. हे मिश्रण रात्रभर fermentation साठी ठेवा.
  5. इडली पात्राला तेल लावा आणि त्यात मिश्रण टाका.
  6. 10-12 मिनिटे वाफवून घ्या.
  7. गरम इडली चटणी आणि सांबारसोबत सर्व्ह करा.

3. उपमा रेसिपी:

साहित्य:

  • रवा - 1 कप
  • कांदा - 1 बारीक चिरलेला
  • हिरवी मिरची - 1-2 बारीक चिरलेली
  • rai - 1 टीस्पून
  • उडीद डाळ - 1 टीस्पून
  • कढीपत्ता - 8-10 पाने
  • तेल - 2 tablespoons
  • मीठ - चवीनुसार
  • पाणी - 2 कप

कृती:

  1. रवा थोडासा भाजून घ्या.
  2. कढईत तेल गरम करा आणि त्यात rai आणि उडीद डाळ टाका.
  3. rai तडतडल्यावर कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कांदा घालून परता.
  4. कांदा golden brown झाल्यावर त्यात पाणी आणि मीठ घाला.
  5. उकळी आल्यावर भाजलेला रवा हळू हळू टाका आणि ढवळत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
  6. पाणी आटेपर्यंत आणि उपमा घट्ट होईपर्यंत शिजवा.
  7. गरम उपमा serve करा.

4. चटणी रेसिपी:

नारळाची चटणी

साहित्य:

  • ओले नारळ - 1 कप (खवलेला)
  • हिरवी मिरची - 2-3
  • आले - 1 इंच
  • rai - 1 teaspoon
  • उडीद डाळ - 1 teaspoon
  • कढीपत्ता - 5-6 पाने
  • तेल - 1 teaspoon
  • मीठ - चवीनुसार

कृती:

  1. नारळ, हिरवी मिरची आणि आले मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
  2. चवीनुसार मीठ घाला.
  3. एका लहान कढईत तेल गरम करा. त्यात rai, उडीद डाळ आणि कढीपत्ता टाका.
  4. rai तडतडल्यावर चटणीवर टाका.
  5. चटणी serve करा.

हे सर्व पदार्थ तयार करण्याची सोपी रेसिपी आहे. Try करा आणि आनंद घ्या!

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440

Related Questions

जेली कशी तयार करतात?
स्वयंपाकघरातील क्रियासाठी वापरले जाणारे शब्दप्रयोग?
घुगऱ्या हा काय खाद्य प्रकार आहे?
मुंगी भजी कशी करावी? मटेरियल काय?
फुलचंद रिमझिम पान कसे बनवायचे व त्यात कोणते मटेरियल वापरायचे?
घरगुती चटणी बनवायचा फॉर्मुला सांगा?
कांदे पोहे गोड का झाले?