2 उत्तरे
2 answers

पोट गॅस धरते काही उपाय सांगा?

16
गॅसची समस्या निर्माण होण्याचे खास लक्षणं –
१. मळमळ
२. उलटी
३. वारंवार उचकी
४. पोटदुःखी आणि सूज
१ हळद –
हळदीमध्ये अँटीइंफ्लामेंट्री आणि अँटीफंगल तत्व आढळून येतात. हळद अनेक आजारांमध्ये औषधीचे काम करते. विशेषतः पोटाच्या आजारांमध्ये. थोडीशी हळद थंड पाण्यातून घेतल्यानंतर दही किंवा केळ खा.
२ नारळ पाणी –
नारळ पाणी गॅस, अ‍ॅसिडिटीच्या त्रासामध्ये औषधीचे काम करते. हे व्हिटॅमिन आणि पोषक तंत्वानी भरलेले असते. नारळ पाण्याच्या सेवनाने पोटाचे आजार दूर होतात.
३ अद्रक –
गॅस, अ‍ॅसिडिटीमध्ये अद्रक रामबाण औषधीचे काम करते. थोडेसे वाळलेले अद्रक चहामध्ये टाकून घेतल्यास गॅस, अ‍ॅसिडिटीमध्ये लगेच आराम मिळेल. अद्रकामध्ये अँटीबैक्टिरियल आणि अँटीइंफ्लामेंट्री तत्व आढळून येतात. यामध्ये पोटदुखीची समस्या त्वरित दूर करण्याची क्षमता आहे. अद्रकाच्या सेवनाने गॅस, अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण करणारे विषाणू नष्ट होतात. वाळलेल्या अद्रकाचा काढा करून पिल्यास गॅस, अ‍ॅसिडिटीचा त्रास दूर होतो.
४ ताक –
थोडेसे मेथीदाणे, हळद आणि हिंग, जिरे एकत्र करून चूर्ण तयार करून ठेवा. जेवण झाल्यानंतर हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्या. गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या मुळापासून दूर होईल.
५ जिरे –
जिरे खाल्ल्याने पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. तुम्हाला केव्हाही गॅस, अ‍ॅसिडिटीचा त्रास सुरु झाल्यानंतर एक चमचा जिरे पावडर थंड पाण्यातून घेतल्यास आराम मिळेल.
६ बटाटा –
कदाचित तुम्हाला गॅस, अ‍ॅसिडिटी दूर करण्याचा हा विचित्र उपाय वाटेल, परंतु बटाट्याचे ज्यूस प्यायल्यास गॅस, अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होते. बटाटा एल्कलाइनचा उत्तम स्रोत आहे. ज्यूस तयार करण्यासाठी कच्चे बटाटे साल काढून पाणी मिसळून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर या ज्यूसमध्ये थोडेसे गरम पाणी मिसळून हे ज्यूस प्या. गॅस, अ‍ॅसिडिटी दूर होईल तसेच लिव्हर स्वच्छ होते.
७ लवंग –
हा एक असा मसाला आहे, जो गॅस, अ‍ॅसिडिटीची समस्या असणार्या लोकांसाठी एक रामबाण औषध आहे. लवंग चंगळल्याने किंवा लवंग मधासोबत खाल्ल्याने अ‍ॅसिड रिफ्लक्स आणि गॅसची समस्या दूर होते.
८ पपई –
हे एक चवदार, गोड आणि आरोग्यदायी फळ आहे. पपईत बीटा-कॅरोटिन, ए, बी, डी जीवनसत्वे आणि कॅल्शियम, प्रोटीन आदी तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. पपई खाल्याने पोटाचे रोग, हृदयरोग, आतड्यांचे रोग दूर होतात. पचनसंस्थेचे कार्य सुधारते.
९ तुळस –
तुळस विविध आजारांमध्ये रामबाण औषधीचे काम करते. दाररोज तुळशीची पानं खाल्ल्यास गॅस, अ‍ॅसिडिटीच्या समस्येसोबतच पोटाचे इतर आजार नष्ट होतील. अ‍ॅसिडिटीचा खूप त्रास असल्यास तुळशीचा चहा घ्या किंवा या पानांचा काढा पिल्यास त्वरित आराम मिळेल.
१० पाणी प्यावे –
पाणी न पिणे किंवा शरीरात पाण्याची कमतरता हे या आजाराचे मोठे कारण आहे. गॅस, अ‍ॅसिडिटीचा त्रास असो किंवा नसो दिवसातून कमीतकमी ८ ग्लास पाणी अवश्य प्यावे. केव्हाही गॅस, अ‍ॅसिडिटीचा त्रास सुरु झाल्यास जास्त प्रमाणात पाणी प्यावे.
११ पुदिना –
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक, पाचक व वातानुलोमन करणारी आहे. पोटदुखीवर उपयोगी आहे. पुदिना खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते.
Advertisements
0
पोटात गॅस धरण्याची समस्या सामान्य आहे आणि त्यावर आराम मिळवण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:

घरगुती उपाय:

  • हिंग: हिंगामध्ये अँटी-फ्लॅटुलेंट गुणधर्म असतात. कोमट पाण्यात चिमूटभर हिंग मिसळून प्यायल्याने आराम मिळतो.
  • आले: आल्यामध्ये पाचक गुणधर्म असतात. आले चघळल्याने किंवा आल्याचा चहा प्यायल्याने गॅस कमी होतो.
  • ओवा: ओवा पोटातील वायू कमी करण्यास मदत करतो. एक चमचा ओवा गरम पाण्यात मिसळून प्या.
  • लिंबू पाणी: लिंबू पाणी प्यायल्याने अन्न पचनास मदत होते आणि गॅस कमी होतो.
  • पुदिना: पुदिनाचे काही पाने चघळल्याने किंवा पुदिन्याचा चहा प्यायल्याने आराम मिळतो.

आहार बदल:

  • गॅस निर्माण करणारे पदार्थ टाळा: काही पदार्थ जसे की बीन्स, कोबी, फुलकोबी, आणि कार्बोनेटेड पेये टाळा.
  • हळू हळू खा: अन्न हळू हळू आणि चावून खा.
  • प्रocessed फूड टाळा: जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा.

इतर उपाय:

  • व्यायाम: नियमित व्यायाम केल्याने पचनक्रिया सुधारते.
  • पुरेशी झोप: दररोज रात्री 7-8 तास झोप घ्या.

डॉक्टरांचा सल्ला:

जर समस्या गंभीर असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हे उपाय तात्पुरते आराम देण्यासाठी आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 2360

Related Questions

पित्त (ऍसिडीटी) कशी कमी होईल?
पचनशक्ती वाढविण्यासाठी काय करता येईल?
चहा पिल्यावर व थोडेसे गोड पदार्थ खाल्ल्यावर लगेच पोट दुखत आहे, असे का होत आहे?
मी दिवसभरात फक्त १ वेळा शौचास जातो म्हणजे माझी पचनक्रिया सुरळीत व चांगली आहे असे म्हणता येईल का?
पोळी भाकरीचा घास तोंडाच्या चावात राहिल्याने गोड का लागतो?
मी थोडेसे जरी मसालेदार खाल्ले की खूप ऍसिडिटी होते, काय करावे?
नमस्कार, माझे वय २१ आहे. मी काहीतरी नॉनव्हेज किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले तर माझ्या पोटात डाव्या बाजूला खूप दुखते व डायजेशन ही वीक आहे. कृपया यावर काही घरगुती उपाय असतील तर सुचवा.