Topic icon

पोटाचे विकार

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
जेवणानंतर पोटफुगी व पोटात गॅस होत असल्यास रोज जेवल्यानंतर ओवा आणि सैंधव मीठ खावे. एक चमचा आल्याचा आणि एक चमचा लिंबू रस एकत्रित करून पिण्यामुळे पोटातील गॅस निघून जाण्यास मदत होते. यामुळे घेतलेल्या आहाराचे पचनही व्यवस्थित होते व पोटफुगी दूर होते.
पोटफुगीमध्ये पोट हे वायू व गॅसमुळे गच्च होते. त्यामुळे पोटात दुखणे, पोट गच्च होणे, ढेकर येणे, गॅस होणे, अस्वस्थ वाटणे, मळमळ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी पोटफुगीची लक्षणे जाणवू लागतात. पोट फुगणे या त्रासाला  मध्ये  असेही म्हणतात.

पोटफुगी होण्याची कारणे – 

जड पदार्थ, तेलकट, खारट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे गॅसेस झाल्यामुळे पोटफुगी होऊ शकते तसेच,
• एकाचवेळी भरपेट जेवल्यामुळे,
• घाईघाईत जेवण जेवल्यामुळे,
• सिगारेटच्या स्मोकिंगमुळे,
• याशिवाय जठराला सूज आल्यामुळे किंवा अल्सर, छातीत जळजळणे, बद्धकोष्ठता, यकृत आजार, मानसिक ताण अशा अनेक कारणांमुळेही पोटफुगी होऊ शकते.

पोटफुगी वर हे आहेत घरगुती उपाय :

पोट फुगणे यावरील उपायांची माहिती खाली दिली आहे. त्या उपायांमुळे पोटफुगीची समस्या दूर होण्यास मदत होईल.


 
लसूण –
पोटफुगीचा त्रास होत असल्यास दोन लसूण पाकळ्या चावून खाव्यात. यामुळे पोटफुगीची समस्या दूर होते.

ओवा आणि सैंधव मीठ –
एक चमचा ओवा आणि चिमुटभर सैंधव मीठ खावे यामुळे पोटातील गॅस निघून जाण्यास मदत होते. जेवणानंतर पोटफुगी व पोटात गॅस होत असल्यास रोज जेवल्यानंतर ओवा आणि सैंधव मीठ खावे.

आले आणि लिंबू रस –
एक चमचा आल्याचा आणि एक चमचा लिंबू रस एकत्रित करून पिण्यामुळे पोटातील गॅस निघून जाण्यास मदत होते. यामुळे घेतलेल्या आहाराचे पचनही व्यवस्थित होते व पोटफुगी दूर होते.


 
आले व सैंधव मीठ –
आल्याचा तुकड्यास थोडेसे सैंधव मीठ लावून खाल्यास पोटातील गॅस निघून जाण्यास मदत होते.

वज्रासन –
पोटफुगीचा त्रास होत असल्यास वज्रासनमध्ये बसावे यामुळे ढेकर येऊन पोटातील गॅस निघून जातो. पोटातील गॅस कमी झाल्यामुळे हलके वाटून पोटफुगीची समस्या दूर होते.


 
पोटफुगीमुळे पोट गच्च होऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी :

नियमित व्यायाम करावा –
‎बैठी कामे असलेल्या लोकांनी रोज कमीत कमी अर्ध्या तासासाठी चालणे, पायऱ्या चढणे-उतरणे, सायकलिंग यासारखे व्यायाम केल्याने पोटाच्या स्नायूंचा व्यायाम होतो. त्यामुळे घेतलेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते व पोटफुगी सारख्या तक्रारी दूर होतात. व्यायामात योगासने, प्राणायाम यांचाही समावेश करू शकता.

पचनास जड पदार्थ खाणे टाळावे –
तळलेले पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, खारट पदार्थ, मसालेदार पदार्थ, मांसाहार, हरबरा, वाटाणा, बटाटा, केळी, कोबी, शिळे आणि बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे. यामुळे पोट साफ होत नाही, अपचन होते त्यामुळे पोटफुगीच्या तक्रारी होतात. यासाठी असे पदार्थ सतत खाणे टाळावे. तसेच सोडा किंवा कार्बोनेटेड कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे.


 
हलका आहार घ्यावा –
सहजतेने पचणारा, हलका आहार घ्यावा. तूप घालून वरणभात खाऊ शकता. आयुर्वेदिक ‘हिंग्वाष्टक चूर्ण’ हे औषध पोट फुगण्याच्या समस्येवर खूप उपयुक्त ठरते. जेवताना चमचाभर चूर्ण सुरवातीच्या गरम भातात मिसळावे व ते खावे, त्यामुळे पचन व्यवस्थित होते.

याशिवाय आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, फळभाज्या, दही यांचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये, फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असून ते पोट साफ होण्यास मदत करते त्यामुळे पोटफुगीची समस्या होत नाही. पाणी पिताना कोमट पाणी प्यावे. दह्यामध्ये Probiotics असतात त्यामुळे पोटफुगी समस्या दूर होण्यास मदत होते.

सवयी बदला –
एकाचवेळी भरपेट जेवणे टाळावे. त्यापेक्षा दिवसातून तीन ते चार वेळा थोडे थोडे खावे. जेवताना सावकाश व प्रत्येक घास चावून खावावा. गडबडीत, पटपट खाणे टाळावे. जेवणानंतर लगेच झोपू नये. दिवसा झोपू नये आणि रात्री जागरण करू नये. तंबाखू, सिगारेट, मद्यपान अशी सर्व प्रकारची व्यसनेही टाळावीत.

पोटफुगीमध्ये डॉक्टरांकडे कधी जाणे गरजेचे असते..?

पोटफुगी हा एक सामान्य त्रास असला तरी काहीवेळा गंभीर आजारामुळेही पोटफुगी होऊ शकते. यासाठी पोटफुगी बरोबरच खालील लक्षणेसुद्धा असल्यास आपल्या डॉक्टरांकडून निदान व उपचार करून घ्यावेत.
• पोटफुगीबरोबरच पोटात प्रचंड दुखणे,
• अचानक पोट फुगणे,
• पोटफुगीबरोबरच संडासमधून रक्त पडणे,
• जुलाब व अतिसार होणे,
• उलट्या होणे,
• छातीत जळजळ होणे,
• वारंवार पोटफुगीचा त्रास होणे,
• वजन कमी होत जाणे अशी लक्षणे असल्यास पोटफुगीकडे दुर्लक्ष न करता आपल्या डॉक्टरांकडून तपासणी व योग्य उपचार करून घ्यावेत.



 



उत्तर लिहिले · 2/1/2022
कर्म · 121705
2
चक्कर येण्यामागची अनेक कारणे डॉक्टरांनीच हाताळणे आवश्यक आहे. म्हणून तात्पुरती मदत केल्यानंतर रुग्णास योग्य ठिकाणी तपासणीसाठी पाठवणे आवश्यक आहे. यापैकी 'प्रवास लागणे', उपवास, अपचन, पोटातील गॅस, उष्माघात ही कारणे असतील तर उपचार तुम्ही स्वतः करू शकाल.



चक्कर किंवा घेरी येणे हे आपल्या सर्वांच्या पाहण्यात असते. चक्कर येऊन पडल्यानंतर तात्पुरती बेशुध्दीही येऊ शकते. पण ब-याच वेळा आपोआप बरे वाटते. चक्कर येणे हा शब्द मोघमपणे वारंवार वापरला जात असतो. आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे त्याचे दोन भेद लक्षात घेणे आवश्यक आहे चक्कर येणे ' म्हणजे घेरी किंवा गरगरणे. म्हणजे त्या व्यक्तीस स्वतः किंवा आजूबाजूचे जग गरगर फिरत आहे अशी भावना होणे. काही आजारांमध्ये असे गरगरणे किंवा चक्कर येणे एवढयापुरताच त्रास मर्यादित असतो. पण काही आजारांमध्ये मात्र डोळयासमोर अंधारी येणे, उभे असेल तर खाली पडणे, बेशुध्दी इथपर्यंत घटनाक्रम जातो. नुसती गरगरण्याची भावना असेल (केवळ चक्कर) तर अंतर्कर्ण किंवा त्याच्याशी संबंधित मेंदूचा भाग यांचे आजार असतात. प्रवास 'लागणे' हा प्रकार यातच येतो. कारण बस किंवा बोट लागण्याचा त्रास हा अंतर्कर्णाच्या संवेदनशीलतेमुळेच निर्माण होतो.
डोळयासमोर अंधारी
चक्कर'पेक्षा वेगळा प्रकार म्हणजे डोळयापुढे अंधारी येऊन खाली पडणे किंवा जागच्या जागी बेशुध्द होणे. याचे मुख्य कारण म्हणजे मेंदूचा रक्तपुरवठा अचानक कमी पडणे. ही घटना अनेक कारणांमुळे घडते.

अतिरक्तदाब असताना अचानक उभे राहणे.
अल्परक्तदाब. यामुळे मेंदूत रक्तपुरवठा कमी होतो.
पोटातील चलनवलन एकदम (वायू, विकार, कळ) बदलून रक्तप्रवाहात घट येणे.
अतिवेदनेमुळे चेतासंस्थेवर तात्पुरता परिणाम होऊन त्यामुळे रक्तदाब अचानक कमी पडणे.
यापैकी कारणे असतील तर उभी असलेली व्यक्ती खाली पडते. पण खाली पडल्यावर हृदय व मेंदू एकाच पातळीवर येऊन मेंदूचा रक्तप्रवाह लगेच सुधारतो. यामुळे ती व्यक्ती तात्पुरती बेशुध्दी संपून लगेच सावध होते. काहीवेळा अचानक खाली पडलेल्या व्यक्ती काही क्षणानंतर आपोआप सावध कशा होतात हे यातून समजते. अशी व्यक्ती चक्कर येताना खाली पडत असल्यास तिला उभे धरून ठेवणे चुकीचे आहे. कारण यामुळे मेंदूस रक्त पोहोचणार नाही. याऐवजी या व्यक्तीस हलकेच सुरक्षित आडवे होऊ देणे महत्त्वाचे आहे. हा महत्त्वाचा प्रथमोपचार आहे.

पण काही आजारांमध्ये केवळ आडवे झाल्यामुळे रक्तप्रवाह सुधारण्याची फारशी शक्यता नसते. रक्तस्राव, हृदयविकाराचा झटका, शोष (शरीरातले पाणी कमी होणे), मेंदूत रक्तस्राव होऊन किंवा रक्तवाहिनी अरुंद होऊन रक्तप्रवाह थांबणे. या आजारांमध्ये मेंदूचा रक्तपुरवठा कमी राहिल्याने ही स्थिती दीर्घकाळ राहते.

इतर काही आजारांमुळे चक्कर येण्यासारखी भावना दिसते. रक्तपांढरी, खूप ताप,दृष्टिदोष, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे (उपास, मधुमेहात जादा इन्शुलिन दिल्याने किंवा इतर कारणाने), इत्यादींमुळे चक्कर येणे किंवा त्यासारखी भावना होते.

चक्कर किंवा अंधारी : रोगनिदान
सोबतच्या रोगनिदान तक्त्याचा आणि मार्गदर्शकाचा आधार घेऊन रोगाविषयी अंदाज बांधता येईल. चक्कर येण्यामागची अनेक कारणे डॉक्टरांनीच हाताळणे आवश्यक आहे. म्हणून तात्पुरती मदत केल्यानंतर रुग्णास योग्य ठिकाणी तपासणीसाठी पाठवणे आवश्यक आहे.

यापैकी 'प्रवास लागणे', उपवास, अपचन, पोटातील गॅस, उष्माघात ही कारणे असतील तर उपचार तुम्ही स्वतः करू शकाल.

रक्तपांढरी (जास्त प्रमाणात), हृदयविकार, अंतर्कर्णाचे आजार, मेंदूचे आजार, मानसिक आजार, क्षयरोगविरोधी औषधांचा दुष्परिणाम, काचबिंदू, मधुमेह, इत्यादी कारणांसाठी योग्य तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.



सोबतचा रोगनिदान मार्गदर्शक वापरताना पुढील काही मुद्दे लक्षात घ्यावेत :

दम लागणे : म्हणजे श्वास वेगाने चालणे, लवकर थकवा येणे.
पोटात वायू, गुबारा : विशेषतः उतारवयात हा प्रकार आढळतो. ब-याच वेळा गुबा-यामुळे हृदयविकाराच्या झटक्यासारखे परिणाम दिसतात. मात्र अपचन, गुबा-याची माहिती रुग्णाकडून सहज मिळू शकते.
जास्त रक्तस्राव : जास्त रक्तस्रावामुळे रक्ताभिसरण कमी पडून अंधारी येते. बाहेर दिसणारा रक्तस्राव असेल तर कारण स्पष्ट असते. पण शरीराच्या आत झालेले रक्तस्राव कळण्यासाठी तपासणी करावीच लागते. असे मोठे रक्तस्राव उदरपोकळी,छाती, मांडी या तीन भागांत होऊ शकतात. (मेंदूतल्या रक्तस्रावानेही चक्कर येईल. पण त्याचे कारण मेंदूच्या कामकाजात असते.)
मांडीच्या हाडाचा अस्थिभंग असेल तर वरवर मांडी फार न सुजता आत एक-दोन लिटर रक्तस्राव होऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अस्थिभंगाच्या इतर खाणाखुणा (हालचाल न करणे, वेदना, इ.) दिसतील.

छातीतला रक्तस्राव असेल तर दम लागणे, छातीच्या त्या बाजूच्या भागाची श्वसनाबरोबर हालचाल न होणे ह्या खुणा दिसतात. याबरोबरच क्वचित खोकल्यातून रक्तस्राव असेल.

उदरपोकळीतील रक्तस्राव असेल तर पोटात वेदना, दुखरेपणा, कडकपणा जाणवेल, (पोटाचा आकार वाढण्याची अपेक्षा चूक आहे)

गरोदरपण - मग ते दोन-तीन महिन्यांचे का असेना- असेल तर अंतर्गत रक्तस्रावाची शक्यता लक्षात घेतली पाहिजे. हा रक्तस्राव योनिमार्गे दिसेलच असे नाही.

अतीव वेदना : कोणतीही अतीव वेदना अंधारी येण्यास कारणीभूत ठरू शकते. हृदयविकाराची वेदना, अस्थिभंग, पोटातील कळ (जास्त असेल तर), इत्यादी उदाहरणे सांगता येतील.
खूप ताप : खूप ताप असेल तर तापाचे कारण असलेल्या रोगप्रक्रियेमुळे अशक्तता येऊन अंधारी येऊ शकते.
उष्मा : उष्माघातात शोष व उष्णतेमुळे अंधारी येते.
शोष : जुलाब-उलटयांमुळे शोष पडून अंधारी येते.
रक्तातील साखर कमी होणे : मधुमेहावर 'इन्शुलिन' उपचार चालू असेल तर (अ) इन्शुलिन जास्त होऊन किंवा (ब)जास्त व्यायाम व (क) उपवास यांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण उतरून अंधारी येते. थोडी साखर खायला दिल्यास ही अंधारी लगेच थांबते.
मानसिक धक्का : मानसिक धक्क्यामुळे रक्तप्रवाहात तात्पुरते बदल होऊन अंधारी येते. कधीकधी बेशुध्दीही येते. मात्र खाली पडल्यावर रक्तप्रवाह सुधारून आपोआप बरे वाटते.
मानेतील मणक्याचा आजार : मानेतील मणक्याची कुर्चा सरकणे किंवा हाडाचे कण तयार होणे, किंवा मणक्यातले अंतर कमी होणे, यामुळे चेतासंस्थेवर दबाव येतो. यामुळे चक्कर येऊ शकते.
औषधांचा परिणाम : क्षयरोगाच्या औषधांचा (स्ट्रेप्टोमायसिन) अंतर्कर्ण व त्याच्याशी संबंधित नसेवर दुष्परिणाम होऊ शकतो. अशा वेळी चक्कर येणे,कानात बारीक आवाज होत रहाणे हा त्रास जाणवतो. अंतर्कर्णाचे अनेक आजार चक्कर येण्यास कारणीभूत ठरतात.
दृष्टीदोष : दिसायला त्रास होणे, खूप डोकेदुखी व चक्कर असेल तर काचबिंदू असण्याची शक्यता असते.
प्रवास : प्रवास आणि चक्कर येणे यांचा संबंध सर्वांना माहीत आहे. असाच त्रास झोक्यावरही होऊ शकतो.
 


उत्तर लिहिले · 3/12/2021
कर्म · 121705