पचन आरोग्य विज्ञान

पचनशक्ती वाढविण्यासाठी काय करता येईल?

2 उत्तरे
2 answers

पचनशक्ती वाढविण्यासाठी काय करता येईल?

2
पचनशक्ती वाढवण्याचे साधे आणि सरळ उपाय सांगतो, (१) सकाळी उठल्यावर नुसता चहा घेऊ नये।त्या सोबत तुमची जी काही न्याहारी असेल ती सोबत खाऊन मगच चहा घ्यावा।(२) दुपारचे जेवण आणि न्याहारी यात किमान४तासांचे अंतर असावे.मध्ये काहीही खाऊ नये।(३) दुपारचे भोजन झाल्यावर ज्यांना शक्य असेल त्यांनी डाव्या कुशीवर २० मिनिट झोपावे।(४)सर्वात महत्त्वाचे, जे जेवताना थोडे थोडे पाणी पिणे चालेल,परंतु एकदा जेवण झाले की फक्त घसा ओला करण्यासाठी अगदी एक घोट पाणी घ्यावे। मग मात्र कमीत कमी ४०मिनीट आणि जास्तीतजास्त १तास पाणी पिऊ नये।कारण मग पचनासाठी लागणारा अग्नि विझून जातो,आणि अन्न पचन होत नाही।म्हणजे बघा पेटलेल्या अग्नीवर जर आपण एकदम पाणी ओतले तर कसा क्षणार्धात अग्नी विझतो तसेच आपल्या पोटात होते,वागभट्टांंनी म्हटले आहे की 'भोजनांंते विषमवारी' म्हणजे भोजन झाल्यावर पाणी पिणे विषसमान असते.मगअन्न पचनासाठी लागणारी उष्णता पोटाला न मिळाल्याने अन्न कुजते आणि पचन न झालेल्या अन्नाचे रस तसेच रक्तात मिसळून अनेक व्याधी निर्माण होतात। (४)संध्याकाळी काहीतरी म्हणजेच ४तास झाल्यानंतर काहीतरी पोहे उपमा असे काहीतरी खाणे।नाहीतर दुपारचे जेवण ४तासात पचवून पित्त घशाशी यायला सुरुवात होते।आणि आपल्याला वाटते की आपल्याला आम्लपित्त झाले आहे,आणि मग आपण उगाच आम्लपित्तावर औषधे घेत राहतो।एकदा दुपारचे जेवण होऊन ४तास झाले की काही ना काही खाणे आवश्यक आहे।(५)रात्रीचे जेवण झाल्यानंतर सुद्धा लगेच पाणी न पिता ४०मिनिटे थांबून पाणी प्यावे,वर सांगितल्या प्रमाणे। तुम्ही जेवण झाल्यानंतर ताक प्यालात तर ते मात्र फायदेशीर असते। ते तुम्ही पिऊ शकतात।असे जर जेवणानंतर नियम कायम पाळलेत तर अन्न पचन उत्तम होते। मी स्वतः वरील नियम पाळतो। त्यामुळे मला कित्येक वर्षे आम्लपित्ताचा त्रास कधीच होत नाही।आणि खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होऊन अंगी लागते।आणि शरीर निरोगी राहते। 
उत्तर लिहिले · 21/12/2021
कर्म · 121765
0
पचनशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:

आहार:

  • fiberयुक्त ( फायबरयुक्त ) आहार घ्या: फळे, भाज्या आणि धान्य आपल्या आहारात भरपूर प्रमाणात असावे. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.
  • प्रोबायोटिक्स (probiotics) घ्या: दही, ताक, चीज (cheese) यांसारख्या पदार्थांमध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांतील चांगले बॅक्टेरिया वाढवतात आणि पचनक्रिया सुधारतात.
  • गरम पाणी प्या: सकाळी उठल्यावर आणि जेवणानंतर गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
  • आहारात बदल करा: जंक फूड (junk food) आणि तेलकट पदार्थ टाळा.

जीवनशैली:

  • नियमित व्यायाम करा: नियमित योगा केल्याने पचनक्रिया सुधारते.
  • पुरेशी झोप घ्या: दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.
  • तणाव कमी करा: तणावामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो, त्यामुळे तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.

इतर उपाय:

  • जेवण हळू हळू खा आणि चांगले चावून खा.
  • धुम्रपान आणि मद्यपान टाळा.
  • डॉक्टरांचा सल्ला घ्या: जर तुमची पचनशक्ती खूपच कमजोर असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करा.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

इलायचीचे फायदे काय?
इलायचीचे फायदे काय आहेत?
शिर्डीमध्ये मोफत उपचार केले जातात का, काही माहिती मिळणार का?
कुत्रा चावल्यावर काय खावे?
शरीरातील साखर वाढल्यास कोणती लक्षणे दिसतात?
ब्रह्मचर्य पालन केल्यास किती दिवसात फरक दिसतो व कशाप्रकारे हालचाली दिसतात?
मन शांत कसे करायचं?