व्यायाम घरगुती उपाय वजन-उंची वय वजन व्यवस्थापन आरोग्य

माझे वय 17 आहे आणि उंची 175 सेमी आहे व वजन 69 आहे, तर मग मी वजन वाढवू की कमी करू?

5 उत्तरे
5 answers

माझे वय 17 आहे आणि उंची 175 सेमी आहे व वजन 69 आहे, तर मग मी वजन वाढवू की कमी करू?

2
मास्क इंडेक्सचा विचार करता अजून तुम्ही 06kg वजन वाढवू शकता.
उत्तर लिहिले · 8/5/2018
कर्म · 0
1
वयाच्या मानाने तुमचे वजन जास्त आहे. तुम्हाला वजन कमी करावे लागेल. तुमच्यासाठी काही माहिती देत आहे.

योग्य वजन म्हणजे काय?
वजन बरोबर असणे याचा अर्थ शरीर ठीक आहे, असा नाही. जवळजवळ सर्वांच्या शरीराचा फिटनेस बदलत असतो. त्यामुळे योग्य वजनाच्या व्याख्येत तुमचे वय, लिंग व उंची या आधारावर तुमचे वजन ठरवले जाते. डॉक्टर वेगळ्या आधारावर तुमच्या जाडेपणाचा निष्कर्ष ठरवतात.

कोणत्याही वयासाठी बीएमआय 18.5 ते 25च्या दरम्यान असल्यास योग्य समजले जाते. जर 30 च्या वर असेल तर वजन जास्त आहे, असे ठरवले जाते. आणि त्याहीपेक्षा जास्त वजन असल्यास त्यास अतिलठ्ठ या सदरात तुम्ही गणले जातात.

वजन कमी करण्यासाठी बीएमआय कायम योग्य असेलच असे नाही. कारण बॉडी बिल्डरांच्या मांसपेशींचे वजन चरबीपेक्षा जास्त असते. त्यामुळे व्यायाम करणाऱ्यांचा बीएमआय नेहमी जास्त येत असतो. याचप्रमाणे वयस्करांसाठी 25 ते 27 च्या दरम्यान बीएमआय असणे योग्य आहे. कारण जर तुमचे वय 65 च्यावर आहे. तर हाडांच्या ठिसूळपणापासून संरक्षण मिळेल ते या शरीरावरील अतिरिक्त चरबीमुळेच

महिलांसाठी योग्य वजन-
आदर्श वजन पुरूष व स्त्री यांत वेगवेगळे असते. तसेच आशियाई व कॉकशियन वंशाच्या स्त्रियांतही फरक आठळतो. पाच फूट उंची असणार्‍या स्त्रीसाठी 45.5 किलोग्रॅम हे आदर्श वजन आहे. जर उंची पाच फुटापेक्षा कमी आहे तर प्रत्येक इंज उंचीवर 2.7 किलोग्रॅम वजन कमी असे मोजावे. आता तुमच्या शरीराची ठेवण छोटी, मध्यम व मोठी आहे का? हे ठरवण्याची सोपी पद्धत म्हणजे तुमच्या मनगटाचे माप जर सहा इंच असेल तर तुमच्या आदर्श वजनात 10 टक्के घट करावी. जर ते माप सहा इंचापेक्षा जास्त असेल तर आदर्श वजनात 10 टक्क्यांनी वाढ करावी.

पुरुषांसाठी योग्य वजन-
पाच फूट उंचीच्या पुरषांचे योग्य वजन 48.2 किग्रॅ असावे. जर मनगटाचे माप सात इंच असेल तर मध्यम ठेवण आहे. जर कमी असेल तर तुमची चण लहान आहे तर योग्य वजनाच्या 10 टक्के वजन कमी समजावे. ते माप सात इंचापेक्षा जास्त असेल तर तुम्ही मोठ्या चणीचे आहात व तुमच्या योग्य वजनात 10 टक्के वजन वाढ करावी.

यातही शरीरसौष्ठवपटूंच्या आदर्श वजनात फरक पडू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे वजन कमी करण्याची आवश्यकता सर्वांनाच नसते. तेव्हा शेजारी, मित्रमंडळी किंवा नातेवाईक यांच्या सल्ल्याने वजन कमी करण्याचे उपाय न ऐकता संबंधित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

उत्तर लिहिले · 8/5/2018
कर्म · 5375
0

तुमचे वय १७ वर्षे आहे, उंची १७५ सेमी (अंदाजे ५ फूट ९ इंच) आणि वजन ६९ किलो आहे. या माहितीच्या आधारावर वजन वाढवायचे की कमी करायचे हे ठरवण्यासाठी काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे:

  1. BMI (Body Mass Index): BMI कॅल्क्युलेटर वापरून तुम्ही तुमचा BMI तपासू शकता. BMI १८.५ ते २४.९ च्या दरम्यान असणे सामान्य मानले जाते. तुमचा BMI 22.5 आहे, जो सामान्य श्रेणीत आहे.
  2. शारीरिक रचना: BMI केवळ एक आकडा आहे. तुमच्या शरीरात चरबी (fat) आणि स्नायूंचे (muscle) प्रमाण किती आहे हे महत्त्वाचे आहे. जर तुमच्या शरीरात स्नायूंचे प्रमाण चांगले असेल तर तुमचे वजन सामान्य असले तरी ते योग्य असू शकते.
  3. ध्येय (Goals): तुम्हाला ॲथलीट (athlete) व्हायचे आहे की फक्त तंदुरुस्त (fit) राहायचे आहे, यावर तुमचे वजन अवलंबून असेल.

वजन वाढवण्यासंबंधी विचार:

  • जर तुम्हाला स्नायूंचे प्रमाण वाढवायचे असेल, तर तुम्ही वजन वाढवण्याचा विचार करू शकता. त्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम महत्त्वाचा आहे.
  • वजन वाढवण्यासाठी प्रथिने (proteins) युक्त आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा.

वजन कमी करण्यासंबंधी विचार:

  • जर तुमच्या शरीरात चरबीचे प्रमाण जास्त असेल, तर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करू शकता.
  • वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा.

डॉक्टरांचा सल्ला:

  • तुमच्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा (dietitian) सल्ला घेणे सर्वोत्तम राहील. ते तुमच्या शारीरिक गरजेनुसार योग्य मार्गदर्शन करू शकतील.

सारांश:

तुमचे वजन तुमच्या उंचीनुसार सामान्य आहे, परंतु तुमचे ध्येय आणि शारीरिक रचना यानुसार तुम्ही वजन वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेऊ शकता.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1960

Related Questions

माझं वजन 70 kg आहे, मी जर रोज 4 किलोमीटर धावलो तर माझं वजन किती दिवसात 60 किलो होईल?
माझं वजन 68 किलो आहे, मला शरीराची चरबी कमी करायची आहे, तर मग मी दिवसातून किती कॅलरी घेतली पाहिजे?
वजन वाढवण्यासाठी उपाय व वय ३८ वर्ष?
वजन कमी करण्यासाठी योग्य व्यायाम कोणता?
वजन आपोआप कमी होण्याची कारणे काय असू शकतात?
माझे वजन मी 79 वरून 72 पर्यंत मागील तीन महिन्यात कमी केले. आता 28 दिवस झाले तरी वजन कमी होत नाही आहे, मी दररोज रनिंग करतो तरीसुद्धा?
वजन कमी करण्यासाठी कोणते उपाय करता येतील?