संस्कृती अंधश्रद्धा वैद्यकीयशास्त्र रूढी परंपरा शारीरिक समस्या आरोग्य विज्ञान

जेव्हा आपली डावी किंवा उजवी पापणी फडफडते, तेव्हा काही लोक शुभ-अशुभ शकुन मानतात, त्यात काही तथ्य असेल असं वाटत नाही, पण त्याचं शास्त्रीय कारण काय असेल?

4 उत्तरे
4 answers

जेव्हा आपली डावी किंवा उजवी पापणी फडफडते, तेव्हा काही लोक शुभ-अशुभ शकुन मानतात, त्यात काही तथ्य असेल असं वाटत नाही, पण त्याचं शास्त्रीय कारण काय असेल?

3
पापण्या फडफडल्या की काही तरी शुभ किवा अशुभ होणार, असा अनेकांचा समज होतो. मात्र, पापण्या फडफडणे हे शुभ किवा अशुभाशी संबंधित नसून, ही प्रक्रिया मांसपेशींशी संबंधित आहे. ही प्रक्रिया आपल्या आरोग्यासंदर्भात भरपूर काही सांगून जाते. काही वेळा ही प्रक्रिया काही सेकंद होत असली, तरी ती बंद होण्यासाठी प्रसंगी एक ते दीड दिवस लागतो. ही एक सामान्य प्रक्रिया असली, तरी ती काही स्थितीत गंभीर बनू शकते.

पापण्या फडफडण्याला वैद्यकीय भाषेत 'म्योक्यामिया' असे म्हणतात. या स्थितीत डोळ्याचे स्नायू आकुंचन पावतात आणि पापण्या फडफडू लागतात. ज्या लोकांना नजरेसंबंधीची समस्या असते, त्यावेळी त्यांच्या डोळ्यांवर जास्त ताण पडतो.

अशावेळी नकळत पापण्या फडफडतात. मद्यपानामुळेही पापण्या फडफडतात, असे म्हटले जाते. असे असेल तर मद्यापासून लांब राहिलेलेच योग्य ठरते.
चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स आणि चॉकलेटमध्येही 'कॅफिन' हा घटक असतो. या पदार्थांच्या जास्त सेवनाने काहीवेळा डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. असे जर होत असेल तर या पदार्थांपासून दूर राहणेच लाभदायी ठरते. काही संशोधनांमध्ये मॅग्नेेशियमसारख्या पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळेही डोळे फडफडतात. काहीवेळा संगणक, मोबाईल अथवा टॅबलेटची स्क्रीन जास्त वेळ पाहिल्यानेही पापण्या फडफडू लागतात. अशावेळी ब्रेक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. संशोधकांच्या मते, पापण्या फडफडणे ही प्रक्रिया शुभ किवा अशुभामुळे होत नाही, हे मात्र निश्‍चित.
उत्तर लिहिले · 3/9/2018
कर्म · 123540
2
तुम्हीही पापणी फडफडल्याचे अनुभवले असेल. पापणी डावी की उजवी फडफडली यावरुन काही शुभ-अशुभ संकेत अनेकजण लावतात. मात्र पापणी का फडफडते? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला याच्या मागचे खरे कारण सांगतो. जाणून घ्या...

थकवा - कमी झोपेमुळे शरीर लगेचच थकते. तुम्ही वेळेत जेवण केले, काम कमी केले, तरी थकवा जाणवत राहतो. डोळ्यात जळजळ होते. खूप वेळ हा त्रास होत असेल, तर डोळे फडफडतात. अशा वेळी झोपेला प्राधान्य देणे गरजेचे असते. डोळ्यांना शक्य तितकी विश्रांती दिली पाहिजे.


कोरडेपणा - बाईकवरून लांबचा प्रवास, खूप गर्दीच्या ठिकाणी जास्त वेळ थांबणे, कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर यामुळे डोळे कोरडे होतात आणि डोळ्यांची फडफड होऊ शकते.

चष्मा - काही लोक दीर्घकाळ एकच चष्मा न बदलता वापरत असतात. ठराविक वेळेनंतर चष्म्याच्या काचा योग्य काम करत नाहीत. यामुळे डोळ्यांवर ताण येऊन समस्या निर्माण होऊ शकते.

ताण - विवाहीत नोकरदार महिलांवर मोठा ताण असतो. घरची कामे, मुलांची जबाबदारी आणि व्यावसायिक काम यात त्या खूपच नेहमी व्यस्त असतात. अशा स्थितीत झोपेसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. याचा परिणाम डोळ्यांवर  होतो.
उत्तर लिहिले · 20/3/2017
कर्म · 3745
0

पापणी फडफडण्याची (Eyelid twitching) अनेक कारणं असू शकतात आणि यात शुभ-अशुभ मानण्यासारखं काही नाही.

पापणी फडफडण्याची काही सामान्य कारणं:

  • तणाव (Stress): जास्त ताण घेतल्याने पापण्या फडफडण्याची समस्या उद्भवू शकते. Mayo Clinic - Blepharospasm.
  • थकवा (Fatigue): अपुरी झोप किंवा जास्त थकवा हे देखील पापणी फडफडण्याचं कारण असू शकतं.
  • डोळ्यांवर ताण (Eye strain): जास्त वेळ कॉम्प्युटरवर काम केल्याने किंवा इतर कारणांमुळे डोळ्यांवर ताण येतो आणि त्यामुळे पापण्या फडफडतात. American Academy of Ophthalmology - Computer Eye Strain.
  • कॅफिन आणि अल्कोहोल (Caffeine and Alcohol): जास्त प्रमाणात चहा, कॉफी किंवा अल्कोहोल घेतल्याने देखील पापण्या फडफडण्याची शक्यता असते.
  • पोषक तत्वांची कमतरता (Nutritional deficiencies): मॅग्नेशियम (Magnesium) सारख्या काही पोषक तत्वांची कमतरता असल्यास पापण्या फडफडू शकतात.
  • डोळ्यांची एलर्जी (Eye allergies): डोळ्यांना ऍलर्जी झाल्यास डोळे चोळल्याने पापण्यांना त्रास होतो आणि त्या फडफडतात.
  • कोरडे डोळे (Dry eyes): डोळे कोरडे झाल्यास देखील पापण्या फडफडण्याची समस्या निर्माण होऊ शकते. Mayo Clinic - Dry eyes.

जर पापणी फडफडण्याची समस्या वारंवार होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित आहे.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 2200

Related Questions

हातपाय व पाठ कंबर दुखण्याचे काय कारण असू शकते?
शरीराची थरथर का होते?
हातपाय गळणे म्हणजे काय?
मेडिटेशन करताना पायाला खूप मुंग्या येतात?
पायाचे पंजे जड होतात, याचे कारण काय असेल?
उचकी कशामुळे लागते?
एका बाजूने मान दुखत आहे, कोणता उपाय करावा?