2 उत्तरे
2
answers
एका बाजूने मान दुखत आहे, कोणता उपाय करावा?
2
Answer link
मिनिटाभरात मोकळी करा जखडलेली मान
रात्री चुकीच्या स्थितीत झोपल्याने किंवा चुकीची उशी वापरल्याने अनेकदा सकाळी उठल्यावर मान दुखते. काही वेळेस मान गोलाकार फिरवणेदेखील कठीण होते. तीव्र वेदनांमुळे मानेचे दुखणे अधिकच त्रासदायक होते. मग अशावेळी नेमके काय करावे यासाठी फिजियोथेरपिस्ट मीनल पांडे यांनी दिलेला हा खास सल्ला नक्कीच फायदेशीर ठरेल. (नक्की वाचा : मानेचे दुखणे वाढवतात या '7' चुकीच्या सवयी)
मानेच्या ज्या भागावर वेदना जाणवत आहे. ती जागा ओळखून त्यावर हात ठेवा. जर दुखणारी जागा उजव्या बाजूला किंवा पाठीमागच्या बाजूला असेल तर उजवा आणि डाव्या दिशेला असेल तर डावा हात ठेवा. जर तुमचा हात पोहचत नसेल तर टेनिसबॉल सारख्या एखाद्या वस्तूचा वापर करा.
त्या जागेवर हातांच्या बोटांनी विशिष्ट प्रेशरने दाबा. सुरवातीला थोड्या प्रमाणात वेदना जाणवतील. मात्र फार जोरात दाबू नका.
दुखणार्या भागाच्या विरुद्ध दिशेने तुमची मान वळवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तिरक्या बाजूने डोके झुकवून हाताला हनुवटी चिटकवण्याचा प्रयत्न करा. हळूहळू जखडलेला भाग मोकळा होण्यास आणि वेदना कमी होण्यास सुरवात होईल.
असा प्रकार सतत किमान 20 वेळा करण्याचा प्रयत्न करा. मान आणि पाठीच्या वरच्या भागाला स्ट्रेचिंग द्या. असे केल्याने स्नायू हळूहळू मोकळे होण्यास मदत होईल. आरामदायी झोपेसाठी कशी कराल उशीची निवड ? हेदेखील जाणून घ्या
याचप्रमाणे हाता-पायात आलेला गोळा अवघ्या काही सेकंदांमध्ये मोकळा करण्यासाठी खास टीप्स
0
Answer link
एका बाजूने मान दुखत असल्यास खालील उपाय करून बघा:
- गरम किंवा थंड शेक: दुखणाऱ्या भागावर 15-20 मिनिटे गरम किंवा थंड पाण्याचा शेक द्या.
- मान ताठ ठेवा: मान ताठ ठेवल्याने आराम मिळतो.
- मान आणि खांद्यांचे व्यायाम: मान आणि खांद्यांचे व्यायाम केल्याने स्नायू मोकळे होतात.
- पुरेशी झोप घ्या: योग्यposition मध्ये झोप घ्या.
- वेदना कमी करणारी औषधे: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेदना कमी करणारी औषधे घ्या.
जर आराम नाही मिळाला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप: हा उपाय केवळ प्राथमिक माहितीवर आधारित आहे. गंभीर दुखत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.