3 उत्तरे
3
answers
साबुदाणा कशापासून बनवतात?
19
Answer link
साबूदाण्याविषयीं लोकांमध्यें अजून पुष्कळ कल्पना आहेत व सर्वसाधारण समजूत अशी आहे कीं, (१) तो झाडाच्या ढोलींतून दाण्याच्या रूपानें (२) किंवा बुंध्यांतून चिकाच्या रूपानें निघतो. कांहींहि असो; तो फार सात्त्विक व दमदार आहे असें आढळून आल्यानंतरच मग त्याचा प्रवेश आपल्या वैद्यकशास्त्रांत व नंतर धर्मशास्त्रांत झाला.
या झाडाच्या पोटजाती ६ असून त्या फक्त मलाया बेटें, नोव्हागिनी व फिजी येथपर्यंतच फक्त सांपडतील व त्यांचीं झाडें विषुववृत्तापासून १० अंश उत्तरेकडे व दक्षिणेकडे आढळून येतील. ६ पोट जातींपैकीं फक्त दोहोंची लागवड (मे. रुंफी व मे. सागुस) मोठ्या प्रमाणावर करतात; पैकीं पहिला कांटेरी व दुसरा बिनकांटेरी आहे. दुसर्याला मलाया लोक ''सागुप्रेमपुवान'' (स्त्री साबुदाण्याचें झाड) असें म्हणतात. मलयामध्यें ओलसर जंगलांत (बेट फॉरेस्ट रीजनमध्यें) यांची लागवड दृष्टोत्पत्तीस येते. ही झाडें उत्तम येण्याचें ठिकाण म्हणजे अगदीं दलदलीची, खोलगट, नदी व खाडीकांठची सपाट व ज्या ठिकाणीं मांडीइतका चिखल असल्याकारणानें ओसाड पडलेल्या जागा असतात, ह्यामध्यें या झाडाची लागवड उत्तम होते. झाडांची लागवड बीं किंवा खुंटापासून करतात. बी लावल्यापासून १२ ते १८ महिन्यांनीं रोप शेतांत लावतात तें लहान असतांना त्याच्या बुंधावर कांटे असतात. पण जसजसें तें स्वरंक्षण करण्याला योग्य होतें तसतसें बुंधावरील कांटे गळून पडतात. झाड लावल्यापासून त्याची पूर्ण वाढ होण्यास ९/१० वर्षे लागतात व तें पीठ काढण्यास योग्य होतें. ह्या वेळीं त्याची सरासरी उंची ३०-३५ फूट असून घेर ३१/२ फुटांपर्यंत असतो. कांहीं बेटांमध्यें ह्यापेक्षां सुद्धां जास्त उंची व घेर आढळून येईल.
साबुदाण्याच्या झाडाच्या लागवडीचा खर्च फारच थोडा असतो. झाडाला पुष्कळ पिल्लें फुटतात व एकदां लागवड केली म्हणजे ती पुन्हां करण्याचें कारण पडत नाहीं. झाडें तयार झालीं किंवा नाहीं हें मात्र बरोबर ओळखलें पाहिजे. नाहीं तर बीं आल्यामुळें झाडाचें सबंध खोड पोकळ झालेलें आढळून येईल.
साबूदाण्याचें पीठ व दाणे तयार करण्याची रीत — झाड तयार झालें किंवा नाहीं हें चिनी मलाया लोकांनां चांगलें कळतें. सर्व पाहून ठरल्यावर एके ठिकाणीं पीठ तयार करण्याची जागा व एक झोपडें तयार करतात. नंतर रस्ते पाडतात. झाड तोडल्यावर बुंधाचे ३/४ फूट लांब इतके ओंडके तयार करतात.

हे ओंडे गडगडत किंवा मोठा पाण्याचा पाट असला तर त्यांतून वाहून नेतात. अलीकडे फॅक्टरीमध्यें यांत्रिक साधनें आल्यामुळें ओंडे तोडून मोनोरेलवर घालून तिकडे नेतात. चिनी लोक यंत्राचा उपयोग करीत नाहींत. ओंडे ह्या जागेवर आणल्यानंतर प्रथम त्यांची साधारण जाड साल काढतात. व तें ओंडे एका ३/४ फूट उंचीच्या घडवंचीवर ठेवून किसतात. ही किसणी ८/९ इंच रुंद; ३/४ फूट लांब व १ इंच जाड अशा फळीला ३/४ इंची खिळे मारून केलेली असते. म्हणजे ते खिळे दुसर्या बाजूनें फक्त टोंकानें पुढें येतील. हा किसलेला भुसा खालीं जमिनीवर पडतो. घडवंची नजीक एक पाण्याचें डबकें व त्यांतील पाणी काढण्याकरितां ''पिकोटा'' व पाण्यापासून २/३ फूट उंचीची घडवंची असून तीवर एक वेताची चटई पसरलेली असते. चटईवर प्रत्येक वेळीं ३/४ टोपल्या किसलेला भुसा टाकतात व त्यावर डबक्यांतील गढूळ सांचलेलें व पाटामधून वहात आलेलें पाणी पिकोट्यानें ओतून वर नाचतात व समोरासमोरचीं चटईचीं दोन टोकें धरून भुसा हालवितात. ह्या कामाला दोन मनुष्यें लागतात. पाणी घालण्याचें व हालवण्याचें मधून मधून चालूच असतें. असें ६/७ दां केल्यानंतर तो भुसा फेकून देतात. भुश्यांतील निघालेलें पाणी पिष्टमय पांढुरकें होऊन चटईंतून खाली पडून मग पन्हाळानें वहात वहात निवळण्याकरितां केलेल्या हौदांत जातें.

प्रत्येक दिवशीं सध्याकाळीं हौदांतील निव्वळ काढून टाकून मग पीठ वर काढतात व दुसरीकडे उथळ व रुंद हौदांत पसरून वाळवितात. ह्या पिठामध्यें त्याचें वजन वाढविण्याकरितां कधीं कधीं शिजवलेला भात सुद्धां टाकलेला आढळेल. पण हे सर्व प्रकार हातांनीं केलेल्या पिठामध्यें सांपडतात. यंत्राच्या साहाय्यानें केलेलें पीठ निव्वळ व शुद्ध झाडापासून काढलेलें असतें.
पीठ दोनदां धुतल्यावर तें उन्हांत किंवा यंत्राच्या साहाय्यानें वाळवितात. हेंच साबुदाण्याचें पीठ म्हणून बाजारांत विकण्याकरितां पाठवितात. पिठाचा पुष्कळ खप कापडाच्या गिरण्यांत होतो व कांहीं प्रमाणांत चाकोलेट, बिस्किटें यांकडे होतो; तसेंच मलया, जावा, सुमात्रा वगैरे बेटांतील लोक त्याच्या भाकरी, बिस्किटें, केक्स, कांजी वगैरे करून खातात. हाच त्यांचा नेहमींचा खाण्याचा पदार्थ होय.
साबूदाणा करण्याची तर्हा.— वर सांगितलेलें पीठ दाणा करण्याकरितां फॅक्टरीमध्यें आणतात. तेथें तें ८/१० वेळां स्वच्छ चांगलें धुवून मग दाणे करण्याच्या जागी नेतात. दाणे तयार करण्याची तर्हा अद्याप आहे तशींच आहे. कारण दाण्याला पिठासारखा खप नाहीं. दाणा तयार करण्याची जागा एका बाजूला असून तेथें एका लांब व अरुंद चुलाणावर लोखंडाचा पत्रा टाकलेला असतो. व २/३ फूट उंचीवर धोतरासारखें लांब पण विरळपोताचें (ज्याप्रमाणें दाणा बारीक मोठा पाहिजे असेल त्याप्रमाणें) कापड टांगलेलें असतें. ह्या कापडावर थोडथोडें ओलसर पीठ पसरून दाबतात. म्हणजे बारीक मोठे दाणे खाली चुलाणावर असलेल्या पत्र्यावर पडतात. पत्र्याला गोळे चिकटूं नयेत म्हणून त्यास कांहीं स्निग्ध पदार्थ लावतात. दाणे पत्र्यावर पडल्यानंतर थोडक्याच वेळांत वाळून काढले जातात. अशा रीतीनें तयार झालेला दाणा आपल्या उपवासाचा ''साबुदाणा'' होय.

2
Answer link
साबुदाणा एक खाद्य पदार्थ आहे. तो छोट्या मोत्यांप्रमाणे पांढरा आणि गोल असतो. तो सॅगो पाम (Sago) नावाच्या झाडाच्या खोडातून निघणार्या चिकापासून बनतो.मुख्य मेनू उघडा
साबूदाणा
साबुदाणा एक खाद्य पदार्थ आहे. तो छोट्या मोत्यांप्रमाणे पांढरा आणि गोल असतो. तो सॅगो पाम (Sago) नावाच्या झाडाच्या खोडातून निघणार्या चिकापासून बनतो. शिजवल्यावर तो थोडा पारदर्शक व नरम बनतो. भारतात याचा वापर साबुदाण्याची खीर आणि खिचडी बनवण्यासाठी करतात.
साबुदाणा
भारतात साबुदाण्याचे उत्पादन प्रथम तमिळनाडूमधील सेलम येथे झाले आणि इ.स. १९४३-इ.स. १९४४ च्या आसपास भारतात याचे उत्पादन कुटीर उद्योगाच्या स्वरुपात सुरु झाले. यात प्रथम कसावा या वनस्पतीच्या मुळांपासून दूध काढतात त्याला टॅपिओका (Tapioca) म्हणतात ते घट्ट झाल्यावर त्यापासून छोट्या छोट्या गोळ्या बनवतात. यामुळे त्यात असणारी प्रथिने, खनिजद्रव्ये, क्षार, जीवनसत्त्वे व कॅल्शियम नष्ट होतात. उरतात ती फक्त कर्बोदके (कार्बोहायड्रेटस). त्यातून शरीरास फक्त उष्मांक मिळतात.
पचन
साबुदाणा हा अतिशय चिकट असल्यामुळे आमाशयामध्ये त्याचे लवकर पचन होत नाही. साबुदाणा पचविण्यासाठी शरीरातील इन्सुलिन हार्मोन तयार करणार्या ग्रंथीवर जास्त ताण पडतो. पर्यायाने ज्या व्यक्ती कायम उपवास करतात, अशा व्यक्तीमध्ये बर्याच वेळेला मधुमेह हा विकार बळावतो. भारतात साबूदाणा उपवासाचे अन्न म्हणून खाण्याची पद्धत आहे. साबुदाणा पचनास अतिशय जड असल्यामुळे आम्लपित्त, वात, मलावष्टंभ, लठ्ठपणा हे विकार होतात. म्हणून साबुदाणा हा उपवासाच्या पदार्थातूनच पूर्णपणे वर्ज्य करणे आवश्यक आहे.
सांस्कृतिक महत्त्व
महाराष्ट्रातील बहुसंख्य भागात साबुदाण्यापासून बनविलेले खाद्यपदार्थ उपवासासाठी मान्य आहेत. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असल्या कारणाने तेथे साबुदाण्याची मागणी जास्त असते.
लागवडीची पद्धत
टॅपिओका हा एक प्रकारचा कंद असतो.तो साबुदाण्याचे झाडास खाली जमिनीत लागतो. साबुदाण्याच्या झाडाच्या लागवडीस जास्त भारी नसलेली पण नरम व भुसभुशीत, हलकी मुरमाड, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन हवी. साबुदाण्याच्या झाडाच्या दांडीचे सुमारे ६-६ इंच लांबीचे तुकडे करून व ते ३-३ इंच जमिनीत व तेवढेच वर ठेवून याची लागवड केली जाते. या झाडास मग कंद धरतात.
साबुदाण्याची लागवड साधारणतः जून-जुलै महिन्यात करतात. दोन झाडांमधील अंतर ९० सें.मीटर ठेवतात.
साब

भारतात साबुदाणा बनवण्याची पद्धत.
शेतातून आणलेल्या कंदांना पाण्यात उकळूले जाते.
धुतलेल्या कंदांचे ६ते ८ इंच तुकडे केले जातात.
पिलिंग मशीनचा वापर करून त्याचं टरफल काढतात.
या तुकड्यांना कृशिंग मशीनने पाण्यासोबत क्रश केले जाते. हे द्रव दुधासारखं दिसतं.
याला द्रव्याला पुन्हा फिल्टर करून त्यातले तंतुमय पदार्थ वेगळे काढले जातात त्याचा पशु खाद्यासाठी उपयोग होतो.
फिल्टर केलेलं द्रव स्थिर ठेऊन त्यातलं पाणी काढाल जात व उरलेला पांढरा पदार्थ pressure वापरून सुकवला जातो
याच पांढऱ्या भुकटी पासून मशीन मध्ये गोल गोल दाणे बनवले जातात.
हे साबुदाण्याचे दाणे गरम भट्टीच्या तव्यावर थोडस नारळ तेलं टाकून भाजले जातात किंवा काही कारखान्यामध्ये रोस्टर ड्रायर ने सुकवले जातात.
नायालन साबुदाणा कच्च्या दाण्यांना मेटल च्या भांड्यामध्ये वाफेवर शिजवले जातात नंतर हवेने थंड केले जातात.
पुन्हा हा साबुदाणा उन्हात वळवला जातो. अश्याप्रकार साबुदाणा बनवला जोतो आणि तो पूर्णपणे शाकाहारी आहे. साबुदाणा कसा तयार होतो किंवा बनतो या तुमचा प्रश्नाचे उत्तर
0
Answer link
साबुदाणा खालील प्रमाणे बनवला जातो:
- कच्चा माल: साबुदाणा 'टॅपिओका' नावाच्या मुळांपासून बनवला जातो. या मुळांमध्ये स्टार्च भरपूर प्रमाणात असते.
- मुळांची प्रक्रिया: टॅपिओका मुळे स्वच्छ करून बारीक केली जातात.
- स्टार्च काढणे: बारीक केलेल्या मुळांमधून स्टार्च काढला जातो.
- गोल आकार देणे: स्टार्चला मशीनच्या साहाय्याने लहान गोल आकार दिला जातो.
- शिजवणे आणि वाळवणे: या गोळ्या वाफवून वाळवल्या जातात. त्यामुळे ते पांढरे आणि पारदर्शक दिसतात.
अधिक माहितीसाठी: साबुदाणा कसा बनवतात व्हिडिओ