औषधे आणि आरोग्य
अन्न
शरीर
प्रक्रिया केलेले अन्न
आरोग्य
मिठाईवरील सिल्व्हर वर्ख हे नक्की काय असतं? खाद्यपदार्थ कि केमिकल? त्याचे शरीराला काही फायदे/तोटे?
2 उत्तरे
2
answers
मिठाईवरील सिल्व्हर वर्ख हे नक्की काय असतं? खाद्यपदार्थ कि केमिकल? त्याचे शरीराला काही फायदे/तोटे?
15
Answer link
चांदीचा वर्ख लावलेली मिठाई कितीही आकर्षक दिसत असली, तरी मिठाईवर लावल्या जाणाऱ्या वर्खाच्या शुद्धतेबद्दल खात्री देता येत नसल्यामुळे शक्यतो चांदीचा वर्ख असलेली मिठाई टाळाच, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
दिवाळी आल्यामुळे मिठाई बाजारात भेट देण्यासाठीचे मिठाई बॉक्स बनवण्याच्या कामांना सुरूवात होते आहे. विविधरंगी मिठाईवर लावला जाणारा चांदीचा वर्ख ग्राहकाचे लक्ष वेधून घेत असल्यामुळे हा वर्ख या दिवसांत मोठय़ा प्रमाणावर वापरला जातो.
चांदीच्या वर्खात आयुर्वेदानुसार शरीरासाठी काही औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते. योग्य प्रमाणात चांदीचा अंश पोटात गेल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, तसेच अॅलर्जीकारक घटक व प्रदूषणापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी, तसेच हाडे आणि सांधे निरोगी राहण्यासाठी ती उपयुक्त ठरु शकते. अनेक औषधांमध्येही रौप्यभस्म वापरले जाते. असे असूनही या वर्खाच्या शुद्धतेबद्दल खात्री देता येत नसल्यामुळे तो शक्यतो मिठाईवर वापरुच नये, असे मत डॉ. संजीवनी राजवाडे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या,‘चांदीचा वर्ख उत्कृष्ट चांदीपासून योग्य पद्धतीने बनवला गेला असेल तर तो मिठाईबरोबर पोटात गेल्यावर शरीरात सहजपणे शोषला जातो. परंतु हल्ली या वर्खात शुद्ध चांदी न वापरता अॅल्युमिनियम, कॅडमियम, क्रोमियम अशा धातूंची भेसळ झालेली असू शकते. असा भेसळयुक्त वर्ख खाल्ला गेला तर त्यापासून फायदे तर मिळत नाहीतच, पण मूत्रपिंडावर ताण येण्याची शक्यता असते. भेसळ झालेले धातूही अशुद्ध स्वरुपात असू शकतात व त्यांचे कर्करोगकारक परिणाम असू शकतात. त्यामुळे चांदीच्या वर्खाच्या शुद्धतेची खात्री असेल तर तो मिठाईवर वापरला जाऊ शकतो, पण तसे नसल्यास मात्र वर्ख शक्यतो टाळावा, अथवा कमीत- कमी वापरावा.’

0
Answer link
मिठाईवरील सिल्व्हर वर्ख (Silver leaf) म्हणजे काय आणि त्याचे फायदे/तोटे:
सिल्व्हर वर्ख म्हणजे काय?
- सिल्व्हर वर्ख म्हणजे चांदीचा अत्यंत पातळ थर असतो, जो मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांवर सजावटीसाठी वापरला जातो.
- हा वर्ख शुद्ध चांदीपासून बनवलेला असतो आणि तो खाण्यासाठी सुरक्षित मानला जातो.
सिल्व्हर वर्ख: खाद्यपदार्थ की केमिकल?
- सिल्व्हर वर्ख हा एक खाद्यपदार्थ आहे, केमिकल नाही.
- तो शुद्ध चांदीपासून बनलेला असल्यामुळे तो खाण्यासाठी योग्य असतो.
सिल्व्हर वर्खचे फायदे:
- आयुर्वेदानुसार, चांदीमध्ये अँटी-माइक्रोबियल (anti-microbial) गुणधर्म असतात, त्यामुळे ते शरीरासाठी फायदेशीर मानले जाते.
- चांदी पचनास मदत करते आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
- सिल्व्हर वर्ख अन्नपदार्थांना आकर्षक बनवते, ज्यामुळे ते अधिक रुचकर दिसतात.
सिल्व्हर वर्खचे तोटे:
- सिल्व्हर वर्ख बनवताना काही वेळा अशुद्ध चांदी वापरली जाते, ज्यामुळे ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
- ज्या लोकांना चांदीची एलर्जी (allergy) आहे, त्यांना यामुळे त्रास होऊ शकतो.
निष्कर्ष:
- सिल्व्हर वर्ख योग्य गुणवत्तेचा असेल तर तो खाण्यासाठी सुरक्षित आहे. त्याचे काही आरोग्यदायी फायदेही आहेत.
- परंतु, तो बनवताना वापरल्या जाणाऱ्या चांदीची गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी काही उपयुक्त लिंक्स: