Topic icon

प्रक्रिया केलेले अन्न

1




गव्हाचे पीठ आणि मैदा रोटी बनवण्यासाठी वापरले जाते. तुम्हाला हे माहीत आहे का ? की मैदा हा देखील गव्हापासूनच बनविला जातो , तरीही मैदा आरोग्यासाठी हानिकारक का आहे ? तर आज आपण जाणून घेणार आहोत मैदा की गव्हाचे पीठ आरोग्यासाठी काय स्वास्थवर्धक आहे. सर्वात प्रथम आपण जाणून घेणार आहे , गव्हाचे पीठ कसे बनविले जाते. गव्हाचे पीठ बनविताना गहू थेट दळला जातो आणि त्याची पिठी बनविली जाते. परंतु मैदा बनविताना वेगळी पद्धत वापरली जाते. मैदा बनविण्यासाठी गहुच वापरला जातो पण जेव्हा गहू वापरला जातो तेव्हा सर्वप्रथम गव्हावरील सर्व साल काढली जाते. त्या नंतर त्या सालीच्या आतमध्ये जो पांढरा भाग असतो तो अगदी बारीक दळला जातो. अशा प्रकारे मैदा बनविला जातो. गव्हाच्या सालीमध्ये फॉलिक अॅसिड , विटामीन ई , विटामीन बी 6 आणि बी कॉम्प्लेक्स जसे की मैग्नीशियम, मैग्नीज़, जिंक आधी मोठ्या प्रमाणात असतात. हे सर्व आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. मैदा बनविताना नेमके हे सर्व गुणधर्म नाहीसे होतात ,त्यामुळे मैदा आरोग्यासाठी हानिकारक आहे.

गव्हाचे पीठ खूप जास्त बारीक केले जात नाही ,त्यामुळे त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात ,जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. फायबर असल्यामुळे चपाती पचण्यासाठी खूप सोप्पी असते. मैदा बनविताना 97 % फायबर वेगळे केले जातात म्हणजेच ते नाहीसे होतात. त्यामुळे मैदा पचण्यासाठी खूप जड असतो. मैदा अधिक पांढरा शुभ्र व्हावा म्हणून त्यामध्ये ऍलॉक्झनला हे अर्क वापरतात. हा अर्क देखील आपल्या शरीरासाठी हानिकारक असतो. रुमाली रोटी , केक , पेस्ट्री , पाव आधी पदार्थ हे आपण मोठ्या प्रमाणात खातो पण हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात. नूडल्स , बर्गर हे पदार्थ आपण जेव्हा खतो तेव्हा आपल्या शरीरातील शरीरातील चरबी आणि शुद्ध कार्बोन्स प्रमाण वाढते. यामुळे अन्न पचनास बाधा येते. या बरोबरच सूज येणे, मधुमेह, हृदयरोग, संधिवात, अलझायमर व कर्करोग देखील होण्याची शक्यता असते. जास्त प्रमाणात मैदाचे सेवन केले असतात लठ्ठपणा वाढतो. कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले की ट्रायग्लिसराइड वाढतात .

ज्याना वजन कमी करायचे आहे अशा लोकानी शक्यतो मैदाचे सेवन टाळावे. मैदा पोटासाठी देखील खूप हानिकारक आहे कारण त्यामध्ये फायबर नसतात आणि त्यामुळे त्याचे लवकर पचन होत नाही. या बरोबरच मल देखील घट्ट होते. मैदयात ग्लूटन असतात त्यामुळे पदार्थ चिकट पण मऊ आणि चिवट बनतात. अनेकांना मैदयाची फूड अॅलर्जी देखील होते, या उलट गव्हाच्या पिठामध्ये प्रोटीन फायबर असतात जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. मैदा हाडांना ठीसुळ बनवीतो म्हणजेच काय तर हाडांसाठी कॅलशियम कमी करते. त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी मैदा खाऊ नये. मैदा खाल्यामुळे प्रतिकार शक्ति कमी होते आणि वारंवार आजारी पडण्याची शक्यता वाढते. मैदयामध्ये मोठ्या प्रमाणात ग्लिसमिक असते त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते आणि मधूमेह होण्याचा शक्यता अधिक होते. जेव्हा रक्तातील साखर वाढते ,तेव्हा शरीरातील ग्लुकोज गोठण्यास सुरवात होते आणि शरीरात रासायनिक प्रक्रिया होते आणि मग संधिवात आणि हृदयरोग होतो.
उत्तर लिहिले · 30/5/2022
कर्म · 53720
1
अजिनोमोटोचे वैज्ञानिक नाव - मोनो सोडियम ग्लुटामेट (MSG) आहे. अजिनोमोटो हे त्या कंपनीचे नाव आहे, जिने सर्व प्रथम MSG चा शोध लावला.

मोनो सोडियम ग्लुटामेट - हे रासायनिक द्रव्य एक चव वर्धक म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जाते. याचा वापर चिनी नूडल्स, रामेन इत्यादी मध्ये केला जातो. याच्या वापरामुळे खाद्य पदार्थांना एक विशिष्ट चव येते - त्याला "उमामी" चव असे म्हणतात.

MSG च्या नावावरून कळते की हे द्रव्य एक अमीनो अॅसिड (amino acid) आहे. "ग्लुटामेट" किवा "ग्लूटामिक अॅसिड" —हा निसर्गात सापडणाऱ्या 21 अमीनो अॅसिड (acid) पैकी एक महत्त्वाचा अॅसिड आहे. याला आपण रासायनिक पद्धतीने सोडियमचा एक अणू जोडला, तर MSG मिळेल.

मोठ्या कंपन्यांमध्ये, आधी हा ग्लुटामेट अमीनो अॅसिड (acid) बनवला जातो.

तो कसा?

प्रत्येक प्रोटीन याच 21 amino acid च्या वेगवेगळ्या संयोजनाने बनतो. एखाद्या प्रोटीनला या विविध अमीनो अॅसिड्स ची साखळी असे म्हणता येईल.

बर्‍याच वर्षापूर्वी कंपन्यांमध्ये असा एक प्रोटीन घेतला जायचा जो ग्लुटामेट मध्ये समृद्ध असेल, व त्याला रासायनिक पद्धतीने मोडून त्याचे amino acids बनवले जायचे. या सर्व amino acids मधून glutamate ला वेगळे केले जात असे.

आज तंत्रज्ञानाचा भरपूर विकास झाला आहे. यामुळे सध्या ही वरील पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जात नाही. आज glutamate किण्वन (fermentation) प्रक्रियेच्या द्वारे जिवाणू (bacteria) बनवतो.

एक ठराविक जिवाणू या प्रक्रियेत वापरला जातो. त्याला —"corynebacterium" असे म्हणतात.

याला अमोनिया व कार्बोहायड्रेट च्या (उसाची साखर इत्यादी.) माध्यमात वाढवले, की तो त्या कार्बोहायड्रेट व अमोनिया चे glutamate मध्ये रुपांतर करतो.

Glutamate मिळाल्यावर त्याला सोडियम सोबत एकत्र केले जाते.


डावीकडे आहे glutamate व उजवीकडे आहे MSG
उत्तर लिहिले · 26/5/2022
कर्म · 53720
0
काही नाही हो .

मिक्सर मध्ये शेंगदाण्याची चटणी करताना, चुकून मिक्सर २ मिनिटे जास्त चालू राहिला तर जे होते त्याला पीनट बटर म्हणतात.

पूर्वी जस एखादी गृहिणी शंकरपाळे बनवताना साखर टाकायला विसरली आणि खारे शंकरपाळे तयार झाले, त्याचंच अमेरिकन version आहे.

खरं तर हा पदार्थ थोर अमेरिकन शास्त्रज्ञ George वॉशिंग्टन कार्व्हर यांनी अमेरिकन गरीब लोकांना स्वस्त दरात पौष्टिक अन्न मिळावे म्हणून तयार केला होता. माझ्या माहिती प्रमाणे एकदा त्यांनी घरी पार्टी ठेवली आणि जवळ जवळ शेंगदाण्यापासून बनवलेले दोन डझन पदार्थ लोकांना दिले. त्यातले एक हे पीनट बटर. बहुतेक अमेरिकन कंपन्यांना शेल्फ लाईफ मुळे हा पदार्थ जास्त विकण्यायोग्य वाटला असावा (शेंगदाण्याच्या इतर पदार्थापेक्षा ). त्यांच्या साठी हे ठीक आहे. पण म्हणून महाराष्ट्रात हे आम्हाला सांगायला लागले कि शेंगदाण्याच्या किंवा लसणीच्या चटणी पेक्षा हे भारी आहे तर आपण थोडच ऐकून घेऊ


 



उत्तर लिहिले · 6/5/2022
कर्म · 53720
1
गव्हाच्या पिठाचा कस काढून तयार केलेले पांढरेशुभ्र पीठ म्हणजे मैदा. मदा बनवताना गव्हाचे साल काढून टाकले जाते. गव्हामधील सर्व कोंडा बाजूला काढून टाकला जातो. या कोंडय़ातच सर्व प्रकारचे खनिजद्रव्ये असल्याने मदा हा निसत्व होतो
» चतुरंग » आहारवेद : मैदा
आहारवेद : मैदा
आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक पदार्थ हा चोथायुक्तच असला पाहिजे यावर भर दिला जातो. गव्हाच्या पिठाचा कस काढून तयार केलेले पांढरेशुभ्र पीठ म्हणजे मैदा.

आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक पदार्थ हा चोथायुक्तच असला पाहिजे यावर भर दिला जातो. गव्हाच्या पिठाचा कस काढून तयार केलेले पांढरेशुभ्र पीठ म्हणजे मैदा.
 मदा बनवताना गव्हाचे साल काढून टाकले जाते. गव्हामधील सर्व कोंडा बाजूला काढून टाकला जातो. या कोंडय़ातच सर्व प्रकारचे खनिजद्रव्ये असल्याने मदा हा निसत्व होतो. त्याचा आरोग्यासाठी काहीही उपयोग होत नाही. परंतु मद्यापासून पदार्थ बनविण्यास सोपे व झटपट करता येत असल्यामुळे हॉटेलपासून ते स्वयंपाक घरापर्यंत सर्वच ठिकाणी मद्याने प्रवेश केलेला आहे. त्याचे गुणधर्म जाणून न घेता सर्वचजण रोजच्या आहारामध्ये मदा वापरतात. उदा – बिस्किट्स नानकटाई, पाव, खारी, ब्रेड, टोस्ट, समोसा, पॅटीस, शंकरपाळे, करंज्या, रोटी, नान, नूडल्स, केक हे सर्वच पदार्थ मद्यापासून बनविले जातात आणि हे पदार्थ लहान मुलांपासून गृहिणी ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच आवडतात.
मदा बनविण्याची प्रक्रिया : गव्हाला थोडे पाणी लावून दळल्यावर त्यातील चोथा बाजूला करून अगदी मऊ असे पीठ शिल्लक राहते त्यालाच मदा असे म्हणतात. हा मदा अगदी पांढरा शुभ्र दिसण्यासाठी रासायनिक पदार्थाचा वापर केला जातो. तो मदा जास्त दिवस टिकण्यासाठी परिरक्षकांचा (वापर केला जातो. त्यामुळे तो आरोग्यास हानिकारक होतो. या सर्व प्रक्रियांमुळे गव्हाच्या सालीमधील ‘ड’ जीवनसत्व, खनिज द्रव्ये, स्निग्ध पदार्थ काढून टाकले जातात. गव्हामधील सर्व ९८ टक्के पौष्टिक सत्वयुक्त घटक नष्ट होतात व उरलेले पांढरे पीठ म्हणजेच मदा होय.
गुणधर्म खनिजद्रव्ये, ‘ड’, ‘ई’ जीवनसत्वे, क्षार यांचा अभाव मद्यामध्ये असतो. मद्यांमध्ये फक्त काबरेहायड्रेट्स, जास्त प्रमाणात असतात व त्यातून शरीराला फक्त उष्मांक (कॅलरिज) अधिक प्रमाणात मिळतात. त्यामुळे जास्त प्रमाणात मद्यापासून बनविलेले पदार्थ खाल्ल्यास शरीर अनेक आजारांचे माहेर घर होते. कारण शरीराचे पोषण न होता फक्त वजन वाढत राहते. सध्या त्यामुळे लहान मुलांमध्येही लठ्ठपणा हा आजार आढळून येतो. कारण, नूडल्स, केक, बिस्किट्स अशा प्रकारचे पदार्थ मुलांना फार आवडतात. सध्याच्या काळात आईलाही घरगुती पदार्थ बनविण्यास वेळ न मिळाल्यामुळे तीही मुलांना आवडीने हे पदार्थ खाऊ घालते.
मदा हा अतिशय चिवट पदार्थ असतो. त्यामुळे पचनासदेखील जड असतो. आतडय़ामधून तो लवकर पुढे सरकत नाही. त्यामुळे आम्लपित्त, अपचन, मळमळ, मलावष्टंभ, वायू असे पोटाचे विकार सुरू होतात. त्याचबरोबर शरीराला फक्त उष्मांक मिळाल्यामुळे लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह हेही आजार वाढीस लागतात. मद्यामध्ये शरीराला पोषक अशी नसíगक मूलद्रव्ये, जीवनसत्त्वे, प्रथिने, चोथा नसल्याने त्याच्या अतिसेवनाने आरोग्य धोक्यात येते. उदा- त्वचाविकार (तोंडावर पांढरट चट्टे येणे), डोळ्याचे विकार (रातांधळेपणा), मुखपाक (तोंड येणे) असे विकार निर्माण होतात.
आधुनिक काळातदेखील मदा हा आरोग्यास घातक आहे हे सिद्ध झाले आहे. मदा करण्याच्या क्रियेत क्रोमियम, िझक, तांबे व मॉलीबिडीनम यांसारखी शरीरवाढीस उपयोगी नसíगक मूलद्रव्ये नष्ट होतात, म्हणून तो कमी प्रमाणात खावा. कारण, आरोग्य चांगले राहण्यासाठी ही सर्व नसíगक मूलद्रव्ये आवश्यक आहेत; परंतु समाजातील उच्चभ्रू सुशिक्षित वर्गापासून ते औद्योगिक क्षेत्रात काम करणारे शहरातील कामगारवर्ग, शाळकरी मुले मद्याच्या पदार्थाना गरसमजुतीने प्रतिष्ठा मिळाल्याने चविष्ट असल्याने अति प्रमाणात खातात, ही अत्यंत खेदाची बाब आहे.
पर्यायी पदार्थ- सर्व पदार्थ बनविण्यासाठी मद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करावा. पाश्चात्त्य देशांमध्येसुद्धा मद्याचे दुष्परिणाम लक्षात आल्यामुळे व्हाइट ब्रेडऐवजी गव्हाच्या कोंडय़ासह तयार केलेला ब्राऊन ब्रेड वापरतात. या ब्रेडमध्ये सर्व जीवनसत्त्वे असतात.
मुलांना पालेभाज्या व डाळींचे थालिपीठ, नारळाची चटणी, मोड आलेले पदार्थ घालून केलेला पुलाव अशा प्रकारच्या सकस पदार्थाचा वापर करावा. गव्हाच्या पिठाचे गूळ घालून केलेले गुलगुले, पुरणपोळी, कापण्या, जाडसर गव्हाच्या भरडय़ाची लापशी, मुगाच्या डाळीचे धिरडे, गोड-तिखट पुऱ्या अशा विविध पदार्थाचा वापर करावा. कारण हे पदार्थ गव्हापासून बनविल्यामुळे त्यातील सर्व नसíगक मूलद्रव्यांमुळे आरोग्य चांगले राहते. घरातील प्रत्येक गृहिणीने कौशल्यपूर्वक चौकस बुद्धीने जर घरगुती विविध पदार्थ बनविले, तर नक्कीच लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वाचेच आरोग्य अबाधित राहील यात शंका नाही.

उत्तर लिहिले · 12/8/2021
कर्म · 121765
8
हो मिळते.
परंतु कितीपत योग्य आहे हे सांगणे योग्य नाही.
कारण केळ हे फळ आहे, जर ताजे खाल्ले तर योग्य परिणाम मिळतो.
आणि भुकटी ही मानवनिर्मित प्रक्रिया आहे. त्यामुळे खाण्यास योग्य, मात्र ताज्या केळ्यापेक्षा कमी योग्य आहे.
उत्तर लिहिले · 7/11/2020
कर्म · 1265
15
चांदीचा वर्ख लावलेली मिठाई कितीही आकर्षक दिसत असली, तरी मिठाईवर लावल्या जाणाऱ्या वर्खाच्या शुद्धतेबद्दल खात्री देता येत नसल्यामुळे शक्यतो चांदीचा वर्ख असलेली मिठाई टाळाच, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
दिवाळी आल्यामुळे मिठाई बाजारात भेट देण्यासाठीचे मिठाई बॉक्स बनवण्याच्या कामांना सुरूवात होते आहे. विविधरंगी मिठाईवर लावला जाणारा चांदीचा वर्ख ग्राहकाचे लक्ष वेधून घेत असल्यामुळे हा वर्ख या दिवसांत मोठय़ा प्रमाणावर वापरला जातो.
चांदीच्या वर्खात आयुर्वेदानुसार शरीरासाठी काही औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते. योग्य प्रमाणात चांदीचा अंश पोटात गेल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, तसेच अ‍ॅलर्जीकारक घटक व प्रदूषणापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी, तसेच हाडे आणि सांधे निरोगी राहण्यासाठी ती उपयुक्त ठरु शकते. अनेक औषधांमध्येही रौप्यभस्म वापरले जाते. असे असूनही या वर्खाच्या शुद्धतेबद्दल खात्री देता येत नसल्यामुळे तो शक्यतो मिठाईवर वापरुच नये, असे मत डॉ. संजीवनी राजवाडे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या,‘चांदीचा वर्ख उत्कृष्ट चांदीपासून योग्य पद्धतीने बनवला गेला असेल तर तो मिठाईबरोबर पोटात गेल्यावर शरीरात सहजपणे शोषला जातो. परंतु हल्ली या वर्खात शुद्ध चांदी न वापरता अ‍ॅल्युमिनियम, कॅडमियम, क्रोमियम अशा धातूंची भेसळ झालेली असू शकते. असा भेसळयुक्त वर्ख खाल्ला गेला तर त्यापासून फायदे तर मिळत नाहीतच, पण मूत्रपिंडावर ताण येण्याची शक्यता असते. भेसळ झालेले धातूही अशुद्ध स्वरुपात असू शकतात व त्यांचे कर्करोगकारक परिणाम असू शकतात. त्यामुळे चांदीच्या वर्खाच्या शुद्धतेची खात्री असेल तर तो मिठाईवर वापरला जाऊ शकतो, पण तसे नसल्यास मात्र वर्ख शक्यतो टाळावा, अथवा कमीत- कमी वापरावा.’

उत्तर लिहिले · 13/11/2018
कर्म · 458560
19
साबूदाण्याविषयीं लोकांमध्यें अजून पुष्कळ कल्पना आहेत व सर्वसाधारण समजूत अशी आहे कीं, (१) तो झाडाच्या ढोलींतून दाण्याच्या रूपानें (२) किंवा बुंध्यांतून चिकाच्या रूपानें निघतो. कांहींहि असो; तो फार सात्त्विक व दमदार आहे असें आढळून आल्यानंतरच मग त्याचा प्रवेश आपल्या वैद्यकशास्त्रांत व नंतर धर्मशास्त्रांत झाला.

या झाडाच्या पोटजाती ६ असून त्या फक्त मलाया बेटें, नोव्हागिनी व फिजी येथपर्यंतच फक्त सांपडतील व त्यांचीं झाडें विषुववृत्तापासून १० अंश उत्तरेकडे व दक्षिणेकडे आढळून येतील. ६ पोट जातींपैकीं फक्त दोहोंची लागवड (मे. रुंफी व मे. सागुस) मोठ्या प्रमाणावर करतात; पैकीं पहिला कांटेरी व दुसरा बिनकांटेरी आहे. दुसर्याला मलाया लोक ''सागुप्रेमपुवान'' (स्त्री साबुदाण्याचें झाड) असें म्हणतात. मलयामध्यें ओलसर जंगलांत (बेट फॉरेस्ट रीजनमध्यें) यांची लागवड दृष्टोत्पत्तीस येते. ही झाडें उत्तम येण्याचें ठिकाण म्हणजे अगदीं दलदलीची, खोलगट, नदी व खाडीकांठची सपाट व ज्या ठिकाणीं मांडीइतका चिखल असल्याकारणानें ओसाड पडलेल्या जागा असतात, ह्यामध्यें या झाडाची लागवड उत्तम होते. झाडांची लागवड बीं किंवा खुंटापासून करतात. बी लावल्यापासून १२ ते १८ महिन्यांनीं रोप शेतांत लावतात तें लहान असतांना त्याच्या बुंधावर कांटे असतात. पण जसजसें तें स्वरंक्षण करण्याला योग्य होतें तसतसें बुंधावरील कांटे गळून पडतात. झाड लावल्यापासून त्याची पूर्ण वाढ होण्यास ९/१० वर्षे लागतात व तें पीठ काढण्यास योग्य होतें. ह्या वेळीं त्याची सरासरी उंची ३०-३५ फूट असून घेर ३१/२ फुटांपर्यंत असतो. कांहीं बेटांमध्यें ह्यापेक्षां सुद्धां जास्त उंची व घेर आढळून येईल.

साबुदाण्याच्या झाडाच्या लागवडीचा खर्च फारच थोडा असतो. झाडाला पुष्कळ पिल्लें फुटतात व एकदां लागवड केली म्हणजे ती पुन्हां करण्याचें कारण पडत नाहीं. झाडें तयार झालीं किंवा नाहीं हें मात्र बरोबर ओळखलें पाहिजे. नाहीं तर बीं आल्यामुळें झाडाचें सबंध खोड पोकळ झालेलें आढळून येईल.

साबूदाण्याचें पीठ व दाणे तयार करण्याची रीत — झाड तयार झालें किंवा नाहीं हें चिनी मलाया लोकांनां चांगलें कळतें. सर्व पाहून ठरल्यावर एके ठिकाणीं पीठ तयार करण्याची जागा व एक झोपडें तयार करतात. नंतर रस्ते पाडतात. झाड तोडल्यावर बुंधाचे ३/४ फूट लांब इतके ओंडके तयार करतात. 


हे ओंडे गडगडत किंवा मोठा पाण्याचा पाट असला तर त्यांतून वाहून नेतात. अलीकडे फॅक्टरीमध्यें यांत्रिक साधनें आल्यामुळें ओंडे तोडून मोनोरेलवर घालून तिकडे नेतात. चिनी लोक यंत्राचा उपयोग करीत नाहींत. ओंडे ह्या जागेवर आणल्यानंतर प्रथम त्यांची साधारण जाड साल काढतात. व तें ओंडे एका ३/४ फूट उंचीच्या घडवंचीवर ठेवून किसतात. ही किसणी ८/९ इंच रुंद; ३/४ फूट लांब व १ इंच जाड अशा फळीला ३/४ इंची खिळे मारून केलेली असते. म्हणजे ते खिळे दुसर्या बाजूनें फक्त टोंकानें पुढें येतील. हा किसलेला भुसा खालीं जमिनीवर पडतो. घडवंची नजीक एक पाण्याचें डबकें व त्यांतील पाणी काढण्याकरितां ''पिकोटा'' व पाण्यापासून २/३ फूट उंचीची घडवंची असून तीवर एक वेताची चटई पसरलेली असते. चटईवर प्रत्येक वेळीं ३/४ टोपल्या किसलेला भुसा टाकतात व त्यावर डबक्यांतील गढूळ सांचलेलें व पाटामधून वहात आलेलें पाणी पिकोट्यानें ओतून वर नाचतात व समोरासमोरचीं चटईचीं दोन टोकें धरून भुसा हालवितात. ह्या कामाला दोन मनुष्यें लागतात. पाणी घालण्याचें व हालवण्याचें मधून मधून चालूच असतें. असें ६/७ दां केल्यानंतर तो भुसा फेकून देतात. भुश्यांतील निघालेलें पाणी पिष्टमय पांढुरकें होऊन चटईंतून खाली पडून मग पन्हाळानें वहात वहात निवळण्याकरितां केलेल्या हौदांत जातें. 


प्रत्येक दिवशीं सध्याकाळीं हौदांतील निव्वळ काढून टाकून मग पीठ वर काढतात व दुसरीकडे उथळ व रुंद हौदांत पसरून वाळवितात. ह्या पिठामध्यें त्याचें वजन वाढविण्याकरितां कधीं कधीं शिजवलेला भात सुद्धां टाकलेला आढळेल. पण हे सर्व प्रकार हातांनीं केलेल्या पिठामध्यें सांपडतात. यंत्राच्या साहाय्यानें केलेलें पीठ निव्वळ व शुद्ध झाडापासून काढलेलें असतें.

पीठ दोनदां धुतल्यावर तें उन्हांत किंवा यंत्राच्या साहाय्यानें वाळवितात. हेंच साबुदाण्याचें पीठ म्हणून बाजारांत विकण्याकरितां पाठवितात. पिठाचा पुष्कळ खप कापडाच्या गिरण्यांत होतो व कांहीं प्रमाणांत चाकोलेट, बिस्किटें यांकडे होतो; तसेंच मलया, जावा, सुमात्रा वगैरे बेटांतील लोक त्याच्या भाकरी, बिस्किटें, केक्स, कांजी वगैरे करून खातात. हाच त्यांचा नेहमींचा खाण्याचा पदार्थ होय.

साबूदाणा करण्याची तर्हा.— वर सांगितलेलें पीठ दाणा करण्याकरितां फॅक्टरीमध्यें आणतात. तेथें तें ८/१० वेळां स्वच्छ चांगलें धुवून मग दाणे करण्याच्या जागी नेतात. दाणे तयार करण्याची तर्हा अद्याप आहे तशींच आहे. कारण दाण्याला पिठासारखा खप नाहीं. दाणा तयार करण्याची जागा एका बाजूला असून तेथें एका लांब व अरुंद चुलाणावर लोखंडाचा पत्रा टाकलेला असतो. व २/३ फूट उंचीवर धोतरासारखें लांब पण विरळपोताचें (ज्याप्रमाणें दाणा बारीक मोठा पाहिजे असेल त्याप्रमाणें) कापड टांगलेलें असतें. ह्या कापडावर थोडथोडें ओलसर पीठ पसरून दाबतात. म्हणजे बारीक मोठे दाणे खाली चुलाणावर असलेल्या पत्र्यावर पडतात. पत्र्याला गोळे चिकटूं नयेत म्हणून त्यास कांहीं स्निग्ध पदार्थ लावतात. दाणे पत्र्यावर पडल्यानंतर थोडक्याच वेळांत वाळून काढले जातात. अशा रीतीनें तयार झालेला दाणा आपल्या उपवासाचा ''साबुदाणा'' होय.

उत्तर लिहिले · 18/2/2017
कर्म · 283280