अन्न प्रक्रिया केलेले अन्न

मैदा कसा बनवतात, हे जाणून तुम्ही कधीच मैद्याचे पदार्थ खाणार नाहीत?

2 उत्तरे
2 answers

मैदा कसा बनवतात, हे जाणून तुम्ही कधीच मैद्याचे पदार्थ खाणार नाहीत?

1




गव्हाचे पीठ आणि मैदा रोटी बनवण्यासाठी वापरले जाते. तुम्हाला हे माहीत आहे का ? की मैदा हा देखील गव्हापासूनच बनविला जातो , तरीही मैदा आरोग्यासाठी हानिकारक का आहे ? तर आज आपण जाणून घेणार आहोत मैदा की गव्हाचे पीठ आरोग्यासाठी काय स्वास्थवर्धक आहे. सर्वात प्रथम आपण जाणून घेणार आहे , गव्हाचे पीठ कसे बनविले जाते. गव्हाचे पीठ बनविताना गहू थेट दळला जातो आणि त्याची पिठी बनविली जाते. परंतु मैदा बनविताना वेगळी पद्धत वापरली जाते. मैदा बनविण्यासाठी गहुच वापरला जातो पण जेव्हा गहू वापरला जातो तेव्हा सर्वप्रथम गव्हावरील सर्व साल काढली जाते. त्या नंतर त्या सालीच्या आतमध्ये जो पांढरा भाग असतो तो अगदी बारीक दळला जातो. अशा प्रकारे मैदा बनविला जातो. गव्हाच्या सालीमध्ये फॉलिक अॅसिड , विटामीन ई , विटामीन बी 6 आणि बी कॉम्प्लेक्स जसे की मैग्नीशियम, मैग्नीज़, जिंक आधी मोठ्या प्रमाणात असतात. हे सर्व आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. मैदा बनविताना नेमके हे सर्व गुणधर्म नाहीसे होतात ,त्यामुळे मैदा आरोग्यासाठी हानिकारक आहे.

गव्हाचे पीठ खूप जास्त बारीक केले जात नाही ,त्यामुळे त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात ,जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. फायबर असल्यामुळे चपाती पचण्यासाठी खूप सोप्पी असते. मैदा बनविताना 97 % फायबर वेगळे केले जातात म्हणजेच ते नाहीसे होतात. त्यामुळे मैदा पचण्यासाठी खूप जड असतो. मैदा अधिक पांढरा शुभ्र व्हावा म्हणून त्यामध्ये ऍलॉक्झनला हे अर्क वापरतात. हा अर्क देखील आपल्या शरीरासाठी हानिकारक असतो. रुमाली रोटी , केक , पेस्ट्री , पाव आधी पदार्थ हे आपण मोठ्या प्रमाणात खातो पण हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात. नूडल्स , बर्गर हे पदार्थ आपण जेव्हा खतो तेव्हा आपल्या शरीरातील शरीरातील चरबी आणि शुद्ध कार्बोन्स प्रमाण वाढते. यामुळे अन्न पचनास बाधा येते. या बरोबरच सूज येणे, मधुमेह, हृदयरोग, संधिवात, अलझायमर व कर्करोग देखील होण्याची शक्यता असते. जास्त प्रमाणात मैदाचे सेवन केले असतात लठ्ठपणा वाढतो. कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले की ट्रायग्लिसराइड वाढतात .

ज्याना वजन कमी करायचे आहे अशा लोकानी शक्यतो मैदाचे सेवन टाळावे. मैदा पोटासाठी देखील खूप हानिकारक आहे कारण त्यामध्ये फायबर नसतात आणि त्यामुळे त्याचे लवकर पचन होत नाही. या बरोबरच मल देखील घट्ट होते. मैदयात ग्लूटन असतात त्यामुळे पदार्थ चिकट पण मऊ आणि चिवट बनतात. अनेकांना मैदयाची फूड अॅलर्जी देखील होते, या उलट गव्हाच्या पिठामध्ये प्रोटीन फायबर असतात जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. मैदा हाडांना ठीसुळ बनवीतो म्हणजेच काय तर हाडांसाठी कॅलशियम कमी करते. त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी मैदा खाऊ नये. मैदा खाल्यामुळे प्रतिकार शक्ति कमी होते आणि वारंवार आजारी पडण्याची शक्यता वाढते. मैदयामध्ये मोठ्या प्रमाणात ग्लिसमिक असते त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते आणि मधूमेह होण्याचा शक्यता अधिक होते. जेव्हा रक्तातील साखर वाढते ,तेव्हा शरीरातील ग्लुकोज गोठण्यास सुरवात होते आणि शरीरात रासायनिक प्रक्रिया होते आणि मग संधिवात आणि हृदयरोग होतो.
उत्तर लिहिले · 30/5/2022
कर्म · 53720
0

मैदा बनवण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  1. गहू निवडणे: चांगल्या प्रतीचा गहू निवडला जातो.
  2. स्वच्छता: निवडलेला गहू स्वच्छ केला जातो.
  3. दळणे: गव्हाचे बाहेरील आवरण काढले जाते आणि आतील भाग बारीक दळला जातो.
  4. चाळणे: दळलेला भाग चाळला जातो, ज्यामुळे कोंडा आणि जाडसर भाग वेगळा होतो.
  5. bleaching (विरंजन): मैद्याला पांढरा रंग येण्यासाठी Benzoyl peroxide किंवा Chlorine gas वापरले जाते.

मैद्यामध्ये फायबर (fiber) आणि पोषक तत्वे कमी असल्यामुळे तो आरोग्यासाठी फारसा चांगला मानला जात नाही. काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की मैद्याच्या अतिसेवनाने रक्तातील साखर वाढू शकते आणि पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1020

Related Questions

अजिनोमोटो कशापासून बनवतात?
पीनट बटर' नक्की काय असते? ते कसे तयार केले जाते?
मैदा कशापासून बनवतात?
दुधाच्या भुकटीप्रमाणे पिकलेल्या केळीची भुकटी बाजारात मिळते काय? ती खाण्यासाठी योग्य आहे काय?
मिठाईवरील सिल्व्हर वर्ख हे नक्की काय असतं? खाद्यपदार्थ कि केमिकल? त्याचे शरीराला काही फायदे/तोटे?
साबुदाणा कशापासून बनवतात?