2 उत्तरे
2
answers
पीनट बटर' नक्की काय असते? ते कसे तयार केले जाते?
0
Answer link
काही नाही हो .


मिक्सर मध्ये शेंगदाण्याची चटणी करताना, चुकून मिक्सर २ मिनिटे जास्त चालू राहिला तर जे होते त्याला पीनट बटर म्हणतात.
पूर्वी जस एखादी गृहिणी शंकरपाळे बनवताना साखर टाकायला विसरली आणि खारे शंकरपाळे तयार झाले, त्याचंच अमेरिकन version आहे.
खरं तर हा पदार्थ थोर अमेरिकन शास्त्रज्ञ George वॉशिंग्टन कार्व्हर यांनी अमेरिकन गरीब लोकांना स्वस्त दरात पौष्टिक अन्न मिळावे म्हणून तयार केला होता. माझ्या माहिती प्रमाणे एकदा त्यांनी घरी पार्टी ठेवली आणि जवळ जवळ शेंगदाण्यापासून बनवलेले दोन डझन पदार्थ लोकांना दिले. त्यातले एक हे पीनट बटर. बहुतेक अमेरिकन कंपन्यांना शेल्फ लाईफ मुळे हा पदार्थ जास्त विकण्यायोग्य वाटला असावा (शेंगदाण्याच्या इतर पदार्थापेक्षा ). त्यांच्या साठी हे ठीक आहे. पण म्हणून महाराष्ट्रात हे आम्हाला सांगायला लागले कि शेंगदाण्याच्या किंवा लसणीच्या चटणी पेक्षा हे भारी आहे तर आपण थोडच ऐकून घेऊ


0
Answer link
'पीनट बटर' म्हणजे काय?
'पीनट बटर' हे शेंगदाण्यांपासून बनवलेले एक खाद्य आहे. हे बटर म्हणजे शेंगदाणे भाजून, मिक्सरमध्ये बारीक करून तयार केलेला एक प्रकारचा लेप असतो. 'पीनट बटर' प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सचा चांगला स्रोत आहे.
'पीनट बटर' कसे तयार केले जाते?
- सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घ्या.
- भाजलेले शेंगदाणे थंड झाल्यावर त्याचे साल काढून टाका.
- शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करा.
- चवीनुसार मीठ, साखर आणि तेल टाका.
- मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करा.
अशाप्रकारे घरी 'पीनट बटर' तयार करता येते.