अन्न पोषण

अळंबी शाकाहारी आहे की मांसाहारी?

2 उत्तरे
2 answers

अळंबी शाकाहारी आहे की मांसाहारी?

0
अळंबी शाकाहारी की मांसाहारी
अळंबी किंवा मशरुम म्हंटले की शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारच्या खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते.
पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या अळंबीचा आस्वाद घेतात.
अळंबी ही बुरशी गटातील वनस्पती आहे. अळंबीला इंग्रजीमध्ये मशरुम असे म्हणतात. पावसाळ्यात निसर्गात अळंबी आढळते. तसेच व्यापारी स्वरुपात लागवडही केली जाते. अळंबीमध्ये जास्त प्रथिने, लोह, तांबे, तंतुमय पदार्थ व कमी ऊर्जा असते. अशा प्रकारच्या अन्नाची गरज मधुमेही व लठ्ठ व्यक्तींना असते. जीवाणू आणि विषाणूंना प्रतिकार करणारी प्रथिने अळंबीमध्ये असतात. रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करणारे घटक असतात. अळंबीतील प्रथिनांमध्ये शरीरवाढीसाठी आवश्यक त्या सर्व अमिनो आम्लांचा समावेश असून ती भाजीपाल्यांतील प्रथिनांपेक्षा उच्च प्रतीचे व पचनास हलकी असतात. ‘क’ जीवनसत्व अधिक असल्यामुळे अळंबीचे नियमीत सेवन केल्यास रोगापासून बचाव होऊ शकतो. ब-2 जीवनसत्वसुध्दा अधिक असते. यामुळे शर्करायुक्त पदार्थाचे पचन, रक्तवाहिन्यांचे आकुंचन कमी होणे व लहान मुलांना ‘बेरीबेरी’ हा रोग निवारण्यास मदत होते. तसेच पचनक्रिया सुरुळीत ठेवणारे अन्न म्हणून अळंबी उत्तम आहे.
उत्तर लिहिले · 29/7/2023
कर्म · 53720
0
उत्तर:

अळंबी (Mushroom) हे शाकाहारी आहे. ते बुरशीच्या प्रजातीतील असून ते वनस्पतीजन्य असल्याने मांसाहारी नाही.

हे प्रथिने आणि पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

मराठी जेवण खातक्षणी तुम्हाला इतर पदार्थांपेक्षा किती वेगळे वाटते?
एका किल्ल्यावर 12000 सैनिकांना 60 दिवस पुरेल इतके अन्न आहे. जर 30 दिवसांनी 300 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले, तर ते अन्न किती दिवस पुरेल?
दारिद्र्य विषयक दृष्टीकोन अन्न, वस्त्र, निवारा यावर लक्ष केंद्रित करते का?
चार अक्षर का मेरा नाम, पाणी पीकर करता काम, पाणी मेरा आधा नाम, खाने की चीज हूं, बताओ मेरा पुरा नाम?
दही वळण्यामुळे काही विघटन होते का?
श्रावण महिन्यात कढी खाण्यास मनाई का आहे?
एका माणसासाठी एका महिन्याला रेशन किती मिळते?