शेती कृषी पर्यावरणीय परिणाम

हरितक्रांतीमुळे शेतीवर झालेले प्रतिकूल परिणाम कसे स्पष्ट कराल?

2 उत्तरे
2 answers

हरितक्रांतीमुळे शेतीवर झालेले प्रतिकूल परिणाम कसे स्पष्ट कराल?

1
 हरित क्रांतीचे यश आणि अपयश व दुसऱ्या हरीत क्रांतीची गरज 

कृषी क्षेत्रात आवड आसणारे अमेरिकन शास्त्रज्ञ नॉर्मन बोरलॉग यांनी जगात हरितक्रांतीची सुरूवात केली सन १९४० मध्ये मॅक्सीको येथे प्रथम गव्हाच्या उच्च पैदास देणान्या बियाणाचा शोध लागला. मॅक्सीको मध्ये नॉरमन बोरलॉग यांनी शोधलेल्या उच्च पैदास गव्हाचे बियाणे आणि तेथील यांत्रिकीकरणाची प्रगती यामुळे लोकांच्या गरजेपेक्षा अधिक उत्पादन या देशात उत्पादित झाले, तर १९६० मध्ये मेक्सीको

गव्हाचा निर्यातदार देश बनला यापूर्वी हा देश गच्च आयात करीत होता.

हरितक्रांती म्हणजे उच्च पैदास बी-बियाणांचा वापर, खतांचा वाढता वापर व जलसिंचन यामुळे शेती उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढ होणे होय. हरितक्रांतीमुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला. भारतात प्रथम १९६५ साली उच्च पैदास बियाणांचा वापर केला. याचे सर्व श्रेय डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे आहे. त्यांना भारतीय हरितक्रांतीचे जनक असे म्हणतात. हरितक्रांतीमुळे नविन तंत्रज्ञानाचा वापर, संकरित बियाणे उच्चपैदास बियाणे आदीचा वापर कातून उत्पादकता दुप्पटीपेक्षा अधिक वाढली. हरितक्रांती कालावधीत रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे माती व शेती उत्पादकतेवर पर्यावरणीय विद्यातक परिणाम दिसू लागले.

अन्नधान्य उत्पादनातील वाद जागतिक हरितक्रांतीचे जनक नॉरमन बोरलॉग यांच्या प्रयत्नांमुळे झालो. हरितक्रांतीही सिंचन विस्तार, पायाभूत सुविधात वाढ, व्यवस्थापन तंत्रातील आधुनिकीकरण, संकरितांचे वितरण, रासायनिक खते, किटकनाशके व तणनाशकांचा वापर आदानांचा विस्तार व वृद्धी झाल्यामुळे पडून आली आहे. याचा परिणाम जगातील अब्जावधी लोकांना उपासमारीपासून वाचविले आहे.

हरितक्रांतीची वैशिष्ट्ये (
भारतात घडून आलेल्या हरितक्रांतीची विविध वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील.

अ. नवीन आदानांचा पुरवठा

१. उच्च पैदास बियाणांचा वापर :

सन १९६६ पासुन उच्च पैदास बी-बियाणांचा वापर वाढल्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. अन्नधान्यामध्ये प्रामुख्याने गहू व तांदळाच्या उत्पादनात पुरेशा प्रमाणात बाढ झाली. तांदळाच्या तुलनेत गहु उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढले. याचा परिणाम म्हणून अनेक शेतकरी उच्च पैदास देणाऱ्या संकरित बी-बियाणांचा वापर करू लागले,

२. रासायनिक खतांचा वापर

उच्च पैदास बी-बियाणांबरोबरच रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे भारतातील हरितक्रांतीला वेग आला. उच्च पैदास बियाणांच्या पिकांची वाढ योग्य पद्धतीने होण्यासाठी रासायनिक खतांचा वापर सातत्याने करावा लागतो. यामुळे जमिनीची सुपिकता व पिकाचा पोत सुधारतो. भारतात सन २००८-०९ मध्ये २४.९०९ हजार टनांचा रासायनिक खतांचा उपभोग होता.

३. जलसिंचन सुविधांचा विस्तार :

भारतातील हरितक्रांतीसाठी सिंचन सुविधांच्या विस्ताराचे महत्वाचे योगदान आहे. उच्च पैदास बियाणासाठी रासायनिक खतांचा वापर आवश्यक असतो, आणि रासायनिक खतांच्या वापरासाठी शेटीला सिंचन अत्यंत

गरजेचे असते. सन २००६-०७ पर्यंत भारतातील एकूण सिंचन क्षमता १०२.८ दशलक्ष हेक्टर्स पर्यंत वाढली तर सिंचन क्षमतेचा प्रत्यक्षातील वापर ८७.२ दशलक्ष हेक्टर्स पर्यंत वाढला. सिंचनामुळे पिकांची होणारी नुकसानी कमी होते, त्यामुळे अप्रत्यक्षपणे सिंचन विस्तारामुळे नविन बी-बियाणांच्या वापरासाठी प्रोत्साहन मिळते..

४. पिक संरक्षण व कीड नियंत्रण :

उच्च पैदास बी-बियाणांमुळे विविध पिकांची दर हेक्टरी उत्पादकता मोठ्या प्रमाणावर वाढली. परंतु दृष्ट्या पिक उत्पादकता वाढीबरोबर पिकांवरील रोगांचे प्रमाणही वाढले. खतांच्या वापरामुळे विविध रोगांचे, किडीचे प्रमाण वाढले. त्यामुळे पिक संरक्षणाचे विविध उपाय करून नविन बियाणापासून महत्तम उत्पादकता मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

५. पायाभूत सुविधांचा विकास :

भारतात पहिल्या व दुसऱ्या पंचवार्षिक योजना कालावधीत ग्रामीण पायाभूत सुविधांचा झालेला विकास हा हरितक्रांतीसाठी प्रेरक ठरता. पायाभूत सुविधांच्या घटकामध्ये वाहतूक व दळणवळण, नियंत्रित बाजारपेठा, साठागृहे, शेती शिक्षण व प्रशिक्षण शेती विस्तार व संशोधन आदी बाबींचा समावेश होतो. अशा पायाभूत सुविधा शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात पुरविल्यास नविन तांत्रिक लागवड पद्धतीच्या वापरास प्रोत्साहन मिळते. भारतात पायाभूत सुविधांचा विस्तार झाल्यामुळे हरितक्रांती घडून आली.

६. यंत्राचा वापर

:

शेती विकासासाठी नविन यंत्राचा वापर केल्यास श्रमीक बेकार होऊन बेरोजगारी वाढते. असे असले तरी नविन यंत्राचा वापर करणे शेती विकासासाठी आवश्यक असते. वर्षातून २-३ पिके घेण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो. भारतात हरितक्रांती कालावधीत ट्रॅक्टर, कापणीयंत्र, मळणीयंत्र विद्युत मोटार, ठिबक व तुषार सिंचन इत्यादी यंत्राचा वापर वाढला,

ब. बहुपिक पध्दतीचा कार्यक्रम :

देशातील उपलब्ध सिंचन सुविधांचा विस्तार व नविन सिंचन क्षमता विकास करून बहुपिक पद्धतीचा अवलंब करून जमिनीचा महत्तम वापर केला जातो. बहूषिक पद्धतीमुळे रोती उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते.

क. कृषी पतपुरवठ्याच्या सुविधा :

भारतातील हरितक्रांती व नवीन कृषीतंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी स्वस्त व पुरेशा कृषीपत पुरवठा सुविधांचा विस्तार जबाबदार आहे. शेतकन्यांना नवीन बी-बियाणांची खरेदी, खते, किटकनाशके, जमिनीच्या

कायमस्वरूपी सुधारणा आदी आदानांच्या खरेदीसाठी अर्थपुरवठा गरजेचा असतो. भारतामध्ये संस्थात्मक शेती पतपुरवठा हा बिगर संस्थात्मक किंवा खाजगी पतपुरवठ्यापेक्षा अधिक प्रमाणात विस्तारल्यामुळे हरितक्रांती पडून आली.

ड. प्रेरक किंमती 

नविन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे फक्त शेती उत्पादनच वाढले नाही तर शेती आदानांच्या किंमतीही बावल्या कारण आदाने बाजारातून खरेदी करावी लागतात. यामुळे शेतकन्यांना उत्पादन खर्चाबरोबर विकासासाठी प्रेरणादायी ठरणारा आवश्यक नफा मिळाला पाहिजे. हरितक्रांती कालावधीत शेतमालाला प्रेरक किंमती मिळू लागल्या.

इ. लघु व सिमात शेतकन्यांसाठी विकास कार्यक्रम :

हरितक्रांतीमध्ये माध्यम व मोठ्या शेतकऱ्यांबरोबरच लघु व सिमांत शेतकन्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. शासनानेही विशेष योजनेअंतर्गत लघु व सिमांत शेतकऱ्यांना संस्थात्मक पतपुरवठा वाढीसाठी प्रयत्न केला. यामुळे हरितक्रांतीचा लाभ अधिक संख्येने असणान्या लघू व सिमांत शेतकऱ्यापर्यंत पोहचला

हरितक्रांतीचे यश व अपयश 
भारतातील हरितक्रांतीच्या यशापयशाची चर्चा करताना कृषीतज्ञांमध्ये मतमतांतर दिसून येते. हरितक्रांतीचे यश व अपयश आपणांस पुढीलप्रमाणे मांडता येईल..

अ. हरितक्रांतीचे यश:

१. अन्नधान्य उत्पादनात स्वयंपुर्णता :

भारतात हरितक्रांतीच्या कालावधीत लागवडीखालील क्षेत्रात बाट, सखोल लागवड, उच्चपैदास चौ- बियाणांचा वापर, सिक्न चाह आदी बाबीमुळे अन्नधान्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. हरितक्रांतीपूर्व कालावधीत भारतात अमेरिकेकडून पी. एल. ४८० नुसार अन्नधान्याची आयात केली जात होती. परंतु हरितक्रांतीने अन्नधान्य उत्पादनात भारताने १९७६-७७ मध्ये स्वावलंबन प्राप्त केले.

२. लागवडीखालील क्षेत्रात वाढ

भारतातील लागवडीखालील क्षेत्र सन १९४७ पासून वात होते. मात्र हरितक्रांतीकालावधीत लागवडीखालील क्षेत्रात अधिक वाढ झाली जलसिंचनाच्या सुविधातील वाढ, यांत्रिकीकरणातील वाढ यामुळे लागवड क्षेत्र बादले, याचा परिणाम म्हणून अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली. वाढत्या लोकसंख्येची धान्याची मागणी पूर्ण करता येते.
 शेती उत्पादन व उत्पादकता वाढली :

हरितक्रांतीमुळे भारतीय शेतीत नवीन तंत्र, संकरित बियाणे, जलसिंचन संशोधन इत्यादी कारणांनी दर एकरी उत्पादकता वाढली. गहू, तांदूळ, या पिकाची उत्पादकता वेगाने वाढली. हरितक्रांतीने ज्वारी, बाजरी, मका, या अन्नधान्याच्या पिकाबरोबर ऊस, कापूस, तेलबिया या नगदी पिकाच्या उत्पादनातही वाढ झाली. अन्नधान्य उत्पादन सन २०१०-२०११ मध्ये २३० दशलक्ष टनांपर्यंत वाढले. याच कालावधीत गव्हाचे उत्पादन ८७ दशलक्ष टनांपर्यंत वाढले.

४. शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनात बदल:

भारतीय शेतकरी शेतीकडे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहत होता. परंतु हरितक्रांतीमुळे प्रथमच भारतीय शेतकरी संकरित चौ-बियाणे, रासायनिक खते, यंत्रे वापरण्यास तयार झाला. शेतीला व्यावसायिक स्वरूपात येऊन शेतकरी बाजारभिमुख झाला. शेतकरी अन्नधान्याच्या पिकाबरोबरच नगदी पिके घेवू लागला. कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या नवीन जाती निर्माण झाल्याने शेतकयांच्या उत्पन्नात वाढ झाली. त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावला.

५. शेतकन्यांचा फायदा :

भारतातील फक्त ३८% लागवडीखालील क्षेत्रास सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे उर्वरित शेतकरी व त्यांची शेती मान्सूनच्या लहरी पावसावर अवलंबून आहे. हरितक्रांतीमुळे यांत्रिकीकरण, ठिबक व तुषार सिंचन पद्धती इत्यादीमुळे पिकांची उत्पादकता व उत्पादन वाढले. देशातील ५ एकरापर्यंत जमीन असणाऱ्या ७८% लघु व सिमांत शेतकन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यात हरितक्रांतीमुळे मदत झाली. आर्थिक स्थिती सुधारल्याने शेतकऱ्यांचा राहणीमान दर्जा सुधारला. त्यांचे समाजातील स्थान उंचावले. आधुनिक सुखसोयी साधने शेतकरी वापरू लागले.

६. रोजगार वाढ

हरितक्रांतीचा आणखी एक फायदा म्हणजे श्रमशक्तीला सामावून घेवून श्रमिकांचा परिणामकारक वापर करण्याच्या दृष्टीकोनातून शेती क्षेत्रात रोजगार निर्मिती करणे होय. हरितक्रांतीमुळे पुरोगामी व आधोगामी जोडण्या  ) तयार झाल्या परिणाम म्हणून शेतीतील अदृश्य, दृश्य च अर्धबेकारी नाहीशी होण्यास मदत झाली. हरितक्रांती ने वर्षातून २-३ पिके घेण्याचे प्रमाण वाढल्यामुळे ग्रामीण भारतातील बेरोजगारांना वर्षभर काम मिळू लागले. विविध दुय्यम व्यावसायात वाढ झाल्यामुळे शेतमजूरांच्या रोजगाराबरोबरच वेतनात वाढ होवून उत्पन्नात वाढ झाली. साहजिकच शेतमजूरांच्या राहणीमानात बाढ़ होवून सामाजिक आर्थिक दर्जात वाढ झाली.

७. शेतीमधील भांडवली गुंतवणुकीत वाढ

हरितक्रांतीमुळे व्यापारी पिके, वर्षातून २ ते ३ बेहा पिके उत्पादकता व उत्पादनात वाढ, किमतीतील स्थैर्य इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. शेतीतून उत्पन्न मिळू लागल्यामुळे भांडवली

गुंतवणूकीत वाढ होवून शेतीचा सर्वांगीण विकास झाला. शेतीत विहीर खणणे, वीज, पाईपलाईन, ट्रॅक्टर मणी कापणीयंत्राची खरेदी जमीन सपाटीकरण, बांधबंदिस्ती रोटी सल व्यवसायात वाढ इत्यादी बाबींमुळे शेतीत प्रचंड गुंतवणुक बादली,

८. औद्योगिक विकास :

शेती विकास व औद्योगिक विकास परस्परांवर अवलंबून असतात. हरितक्रांतीमुळे शेतीतील विविध प्रकारचा कच्चा माल मोठ्या प्रमाणात उत्पादित होवून औद्योगिक विकासाला चालना मिळाली. शेतीतील दर्जेदार व भरपूर कच्च्यामालामुळे उद्योगातील पक्क्या मालाचे उत्पादन व दर्जा उंचावला, ऊस, कापूस लाग या पिकांच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे त्यावर आधारित उद्योगांचा विस्तार झाला. त्याचबरोबर हरितक्रांतीने शेती आदानांची मागणी वाढली. ट्रॅक्टर शेती अवजारे रासायनिक खते, किटकनाशके, विद्यूतपंप, सिंचन आवजारे इत्यादी नवीन उद्योगांचा विकास हरितक्रांतीमुळे झाला.

९. शेतमाल किंमतीमध्ये स्थैर्य :

देशाच्या समतीत्त वृद्धीसाठी किंमत स्थैर्य आवश्यक असते. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने अन्नधान्याच्या व दैनंदिन वापराच्या वस्तूतील किंमत अस्थिरता असंतोष निर्माण करते. मात्र हरितक्रांतीमुळे धान्याचा पुरवठा वाढला व अर्थव्यवस्थेतील वाढत्या लोकसंख्येमुळे वाढती अन्नधान्याची गरज पूर्ण करता आली. अर्थव्यवस्थेत शेतमालाची मागणी आणि शेतमालाचा पुरवठा यामध्ये समतोल निर्माण होऊन किंमत स्थिरता येते. त्यामुळे शेतमालावर आधारित औद्योगिक वस्तूंच्या किंमत स्थिर राहतात. अलीकडे अन्नधान्याच्या किंमती वाढल्या आहेत. पण याचे कारण अन्नधान्याची कमतरता नसून पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्याने वाहतूक खर्च वाहून किंमती वाढतात.

१०. आर्थिक विकास :

देशाच्या आर्थिक विकासातील शेतीक्षेत्राचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचो का मानला जातो. आजही जवळपास ६४९% लोकसंख्या शेती व शेतीसंला व्यवसायावर अवलंबून आहे. हरितक्रांतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात बाद झाल्याने औद्योगिक व सेवाक्षेत्रातील वस्तुची मागणी वाढली.. औद्योगिक विकास गतिमान होवून आर्थिक विकास होण्यासाठी हरितक्रांतीचे महत्वपूर्ण योगदान आहे.

ब) हरितक्रांतीचे अपयश :

हरितक्रांतीची फळे सर्वदुर न पसरल्यामुळे तज्ञांकडून टिका केली जाते. हरितक्रांतीमुळे सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय प्रतिकूल परिणाम झाले. त्यातीलकाही प्रमुख दोषांचे विश्लेषण पुढीलप्रमाणे करता येईल.

१) जमिनीचा हास:



बी. ए. माग-१मारतीय अर्थव्य / ९क्रांतीमुळे पिकाच्या आकृतीबंधातील बदल, वर्षातुन दोन ते तीन पिके घेणे, रासायनिक वापर, किटकनाशके, सिंचन अतिरिक्त वापर इत्यादी सवयीमुळे उत्पादकता पटु लागली. पडीक जमिन लागवडीखाली आणल्यामुळे जंगलक्षेत्र कमी झाले, जमिनीची धूप पडुन आली, बोडक्यात हरितक्रांतीमुळे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली तरी जमिनीचा न्हास पडून आला.

२) ठराविक पिकांच्या उत्पादनात वाढ :

हरितक्रांतीचा प्रभाव गहू, तांदुळ, मका, बाजरी आदी पिकांच्या उत्पादनावर दिसून आला. मात्र तेलबिया, कापूस, ताग या व्यापारी पिकांमधील उत्पादनात फारशी वाढ झाली नाही. शेती संशोधनाने अत्रधान्याच्या काही पिकांच्या नवीन जाती निर्माण झाल्या परंतु कडधान्याच्या उत्पादनात वाढ झाली नाही. त्याचबरोबर भारतातील विविध राज्यातील पिकांची उत्पादकता भिन्न दिसून येते. थोडक्यात अनेक पिकाच्या उत्पादनात हरितक्रांतीचा प्रभाव दिसून आला नाही.

(३) प्रादेशिक विषमता वाढली :

हरितक्रांतीमुळे राज्याराज्यातील पिक उत्पादनातील विषमता वाढली. प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेशचा पश्चिम भाग, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र इत्यादी राज्यांमध्ये संकरित बियाणे, रासायनिक खते सिंचन पुरवठ्यामुळे हरितक्रांतीचा प्रभाव दिसून आला. मात्र उर्वरित राज्यांमध्ये हरितक्रांती दिसून आली नाही. देशाच्या भौगोलिक विस्ताराच्या मानाने हरितक्रांतीचा प्रभाव मर्यादित राहिला. आर्थिक विषमता वाढली.

४) बेरोजगार वाढला

हरितक्रांतीने वर्षातून २ ते ३ पिके घेण्यामुळे वाढतो असे समर्थन दिले जाते. मात्र यांत्रिकीकरण, ट्रॅक्टरचा वापर, मळणीयंत्र इत्यादीमुळे शेतमजुराचे काम कमी झाले. शेतमजुर बेकार होवून शहरी भागाता स्थालांतरीत होऊ लागले. शेतीसंबंधित विविध प्रक्रिया उद्योगात वाढ न झाल्यामुळे शेतमजुरांचे स्थलांतर वाढले.

(५) शेती उत्पादनात अस्थैर्य

भारतीय शेती हो मान्सून पावसावर आधारित असल्यामुळे हरितक्रांती कालावधीत ही शेती उत्पादनात चढ-उतार दिसून येतात. उदा. २००१-०२ मध्ये अन्नधान्याचे उत्पादन २९२ दशलक्ष झाले. ते २००२ ते ०३ मध्ये १८३ दशलक्षटन पर्यंत कमी झाले. सन २००९-१० मध्ये २०३ दशलक्ष टनापर्यंत वाढले. थोडक्यात हरितक्रांतीनंतर ही अन्नधान्य पिकाच्या उत्पादनात स्थिरता निर्माण होऊ शकली नाही.

(६) श्रीमंत व मोठ्या शेतकन्यांचा फायदा :

भारतातील २०% मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांना हा फायदा झाला. हरितक्रांती कालावधीत

यांत्रिकीकरण नवीन शेततंत्र नवीन अवजारे, खते, संकरित बियाणांचा वापर गासाठी लागणारे भांडवल फक्त श्रीमंत व मोठ्या शेतकन्यांकडे उपलब्ध होते. देशातील जवळपास ८०% शेतकरी अल्प व सिमांत भूधारक शेतकन्यांना हरितक्रांतीचा फायदा झाला नाही. ग्रामीण भागात वरच्या १०% श्रीमंत लोकांकडे संपत्तीचे केंद्रीकरण झाले.

७) पायाभूत सुविधात वाद नाही :

हरितक्रांतीमुळे शेती उत्पादनात वाढ झाली असली तरी वाढीचा वेग आंतरराष्ट्रीय उत्पादकतेच्या तुलनेत कमी राहिला. याचे प्रमुख कारण म्हणजे पायाभूत सुविधांचा अभाव होय. प्रक्रिया, वाहतूक, साठवणूक, गोदाम व्यवस्था, विपणन, पतपुरवठा इत्यादी शेती व्यवसायाशी संबंधित बाबीच्या कमतरतेमुळे हरितक्रांतीचा प्रभाव कमी राहीला,

८) सिंचन सुविधांचा अभाव :

भारतात एकूण लागवडीखाली क्षेत्राच्या ३८% चिनसुविधा उपलब्ध आहेत. उर्वरित लागवडीखालील क्षेत्र मान्सूनच्या लहरीपणावर अवलंबून आहे. सिंचन सुविधा उपन्या असल्यास संकरित बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके आदीच्या वापरावर मर्यादा येतात. जलव्यवस्थापनाच्या अभावामुळे भारतातील भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे.

९) जैविक विविधतेचा म्हास :

हरितक्रांतीच्या कालावधीत रासायनिक खते, किटकनाशके, तणनाशके आदींचा वापर वाढल्यामुळे विविध जैविक घटकांचा नाश झाला. संकरित बियाणांच्या वापरामुळे देशी व परंपरागत बियाणे संपुष्टात आले. संकरित अन्नधान्याच्या वापरामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम झाले..

१०) इतर परिणाम :

हरितक्रांतीमुळे नगदी पिकांचे उत्पादन वाढले, मात्र नगदी पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खते, किटकनाशके, तणनाशके वापरल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील भारतीय शेतमालाची मागणी घटली. हरितक्रांतीमुळे विविध पर्यावरणीय परिणाम दिसून आले.

* दुसऱ्या हरितक्रांतीची गरज

सन २०१०-११ मध्ये अन्नधान्याचे उत्पादन २३० दशलक्ष टन होते, तर दुसऱ्या हरित क्रांतीचे लक्ष्य ४०० दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन करणे आहे. एवढे उत्पन्न करणे सन २०२० मध्ये शक्य होईल असा तज्ञाचा अंदाज आहे. यासाठी पुढील ९-१० वर्षांच्या कालावधीत शेती क्षेत्राचा वृद्धीदर ५ ते ६१% असणे गरजेचे आहे. परंतु गेल्या १० वर्षातील या क्षेत्राचा वृद्धीदर २१% एवढा कमी राहिला आहे. देशातील अन्नधान्याचा साठा कमी झाल्याने सरकारला ५ दशलक्ष टन गव्हाची आयात करावी लागली. प्रत्यक्षात
अधिक जमीन लागवडीखाली आणणे शक्य नाही. तसेच अस्तित्वातील लागवडी लायक जमिनीचा पर्यावरणीय असमोल होता आहे. अशावेळी दुसऱ्या हरितक्रांतीसाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. उच्च पैदास बियाणे, खाजगी क्षेत्राचा सहभाग व सिंचन योजनांवरील दीर्घकालीन खर्च इत्यादींमुळे अधिक उत्पादन करता येणे शक्य होईल. पहिली हरितक्रांती गव्हाची संकरित बियाणे शेतीला वीज पुरवठा व भूसुधारणा यामुळे शक्य झाली. दुसऱ्या हरितक्रांतीची आवश्यकता खालीलप्रमाणे सांगता येईल.

१. कृषी वृद्धी :

दरभारतीय शेतीचा वृद्धीदर ५ ते ६% दरम्यान सातत्याने राहिला पाहिजे, शेती विकासासाठी दीर्घकालीन आवश्यक गुंतवणूक केंद्र व राज्य सरकारांनी केली पाहिजे. अजूनही कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी पाहिजे तेवढे प्रयत्न झाले नाहीत. कृषी वृद्धीदर ५ ते ६% होण्यासाठी दुसरी हरितक्रांती आवश्यक आहे.

२. अन्नधान्य उत्पादन स्वयंपूर्णता :

भारतीय लोकसंख्या वाढीचा दर प्रतिवर्ष १.८ ते २.२% आसपास राहिला आहे. मात्र कृषी वृद्धीदर तुलनेने अत्यल्प राहिला आहे. तेव्हा येत्या काहीवर्षात अन्नधान्याची समस्या निर्माण होईल. भारतात दुष्काळामुळे अन्न टंचाई निर्माण होणार नाही, मात्र अन्नधान्याचा तुटवडा हा वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होईल. यासाठी राष्ट्रांचा आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी दुसरी हरितक्रांती अपेक्षित आहे.

१. जनुकिय वियाणे

जैवतंत्रज्ञानाबरोबर अनुकिय तंत्रज्ञानाच्या वापराने शेतीची दर एकरी उत्पादकता दुप्पट होईल. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर, खाजगी क्षेत्राचा सहभाग, जनुकिय शेतमालाचा बाजार विस्तार इत्यादी बाबी आवश्यक आहेत. जनुकीय पिकांची लागवड सर्व देशभर झाल्यास अन्नधान्य उत्पादनात दुसरी हरित क्रांती घडून येईल.

२. कृषी व्यवसाय :

भारतीय शेतीमध्ये अल्प व सीमांत शेतकऱ्याचे प्रमाण ७८% आहे. लघु व सीमांत शेतकन्यांच्या शेतीला व्यवसायाचे स्वरूप निर्माण झाले पाहिजे, शेतीतून उत्पादित होणान्या शेतमालाला व्यापाराचा दर्जा मिळाला पाहिजे. शेतीकडे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून न पाहता व्यवसायाचे स्वरूप आले पाहिजे, शेती व्यवसायामध्ये नफ्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी भांडवली गुंतवणुक केली पाहिजे.

३. जमीनीच्या आकारमानाची पुनर्रचना

भारतीय शेती वारसाहक्काने वडिलानंतर अनेक मुलांमध्ये विभागली जाते. यामुळे जमिनीची आर्थिक कार्यक्षमता, उत्पादन क्षमता कमी राहते. शेतीच्या विकासासाठी या आकारमानाची पुर्नरचना करणे आवश्यक आहे. कमाल उत्पादन क्षमता राहील असे आकारमान असावे. त्याचबरोबर सरकारचा शेतमाल व्यापारातील सहभाग व नियंत्रण किमान असावे. यासाठी शेतकन्यांची भूमिका जबाबदार उद्योजकाची असणे आवश्यक आहे.

 जनुकिय अन्नधान्य

ग्राहकांनी जनुकीय अन्नधान्यांची सवय लावली पाहिजे. जनुकिय बदलाद्वारे निर्माण होणारे अन्नधान्य है भारतीय वाढत्या लोकसंख्येची भूक पुर्ण करणारे आहे. परंतु भारतात जूनकिय तंत्राने तयार केलेल्या अन्नधान्यासाठी होणारा विरोध हा राजकीय हेतूने प्रेरित झालेला आहे. पहिल्या हरितक्रांती कालावधीतही काही राजकीय मंडळींनी मॅक्सिको संकरित गव्हाच्या बियाणाच्या वापराबाबत भारतात विरोध केला होता. परंतु या संकरित गव्हाच्या उत्पादनात क्रांती झाल्यामुळे संपूर्ण भारत आश्चर्यचकित झाला. जुनकिय बदलाचे अन्नधान्य प्रचंड प्रमाणात होऊन सर्व जग याचा वापर करू लागेल असा आशावाद आहे.

५. नद्यांची जोडणी :

 दशलक्ष हेक्टर्स जमीन लागवडी खाली आहे. त्यापैकी फक्त ४५ दशलक्ष हेक्टर्स जमीन सिंचीत आहे. ही सिचीत जमीन एकूण उत्पादनाच्या ५५१% उत्पादन करते. उर्वरित ९५ दशलक्ष हेक्टर्स जमिन पावसावर आधारित आहे. यातून फक्त ४५% उत्पादन होते. भारतातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी जनुकिंग तंत्राचा वापर सिंचीत जमीनीत केल्यास शेती उत्पादकता प्रचंड प्रमाणात वाढेल. लघु व मोठ्या सिंचन प्रकल्पाची बिगर सिंचन क्षेत्राची उत्पादकता वाढीसाठी निर्णायक भूमिका ठरणार आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी नद्या जोड प्रकल्प अतिरिक्त पाणी कोरडवाहू शेतीसाठी वापरून आर्थिकदृष्ट्या शक्य केला पाहिजे.

६. कोरडवाहू शेतीक्रांती) :

भारत हा खेड्यांचा देश आहे. देशात ६ लाखापेक्षा अधिक खेड्यांत ७०% लोक राहतात. यामधील महत्तम लोक कोरडवाहू प्रदेशात राहतात. भारतातील  जिल्ह्यांमध्ये (जवळपास ५६% भूभाग) कोरडवाहू शेती आहे तेव्हा देशाचा विकास करीत असताना या क्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भारतात राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तामिळनाडू राज्यातील कोरडवाहू शेतीतील उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे दुसऱ्या हरितक्रांतीचे उद्दिष्ट आहे. कोरडवाहू शेती क्रांती करत असताना पर्यावरणीय दक्षता घेतली पाहिजे.

७. खाजगी क्षेत्राचा सहभाग

दुसऱ्या हरितक्रांतीसाठी सरकारच्या नियंत्रणापेक्ष खाजगी क्षेत्राचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. भारतात शेतमाल विपणन व साठवणूक प्रक्रिया भारतील अन्नमहामंडळाच्या नियंत्रणाखाली आहे. तज्ञांच्या मते अन्नधान्य उत्पादकापासून उपभोक्त्यांपर्यंत वितरणामध्ये २० ते ३०% नासाडी किंवा नुकसान होते. यासाठी खाजगी क्षेत्राच्या सहभागाने शेतमाल उत्पादन, विपणन व वितरणामध्ये कार्यक्षमता निर्माण होईल. दुसऱ्या हरितक्रांतीमध्ये खाजगी क्षेत्राचे योगदान अत्यंत महत्वाचे राहणार आहे.


उत्तर लिहिले · 12/6/2022
कर्म · 53710
0
हरितक्रांतीमुळे शेतीवर झालेले काही प्रतिकूल परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
  • रासायनिक खतांचा अतिवापर: हरितक्रांतीमध्ये रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली आणि जमिनीतील नैसर्गिक सूक्ष्मजीवांसाठी धोका निर्माण झाला.
  • स्रोत: कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

  • पाण्याचा अतिरिक्त वापर: जास्त उत्पादन घेण्यासाठी पाण्याच्या पंपाचा वापर वाढला, ज्यामुळे भूजल पातळी घटली.
  • स्रोत: भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र शासन

  • जमिनीची धूप: रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची संरचना बिघडली आणि त्यामुळे जमिनीची धूप वाढली.
  • स्रोत: मृदा आणि जल संवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

  • जैवविविधतेचे नुकसान: पारंपरिक वाण कमी झाले आणि फक्त जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांवर भर दिला गेला, त्यामुळे जैवविविधता कमी झाली.
  • स्रोत: महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ

  • कीटकनाशकांचा वापर: पिकांवरील कीड आणि रोगांचे नियंत्रण करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर वाढला, ज्यामुळे मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम झाले.
  • स्रोत: आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1080

Related Questions

हरित क्रांती फायदेशीर कशी हे स्पष्ट करून त्याचे प्रतिकूल परिणाम ओळखा?
हरितक्रांती फायदेशीर कशी हे स्पष्ट करून त्याचे प्रतिकूल परिणाम ओळखा?
हरित क्रांतीचे प्रतिकूल परिणाम कोणते आहे?
एखाद्या निसर्गरम्य पर्यटन स्थळाला भेट द्या. लोक तेथे का जातात? दरवर्षी कोट्यवधी लोक या ठिकाणी येतात, या पर्यटनामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची नोंद करा.
हरित क्रांतीमुळे शेतीवर झालेले प्रतिकूल परिणाम काय?
हरित क्रांतीचे अनुकूल परिणाम कोणते आहेत?
हरित क्रांतीचे प्रतिकूल परिणाम कोणते आहेत?