फरक मसाले पाककला

गोडा मसाला, काळा मसाला आणि गरम मसाला यातील फरक आणि ते कुठे वापरायचे हे सांगता येईल का?

2 उत्तरे
2 answers

गोडा मसाला, काळा मसाला आणि गरम मसाला यातील फरक आणि ते कुठे वापरायचे हे सांगता येईल का?

1
मीठ आणि साखर यात जेवढा फरक आहे तेवढाच फरक गोड मसाला, काळा मसाला, गरम मसाला या सगळ्यात आहे.

गोडा मसाला - याचा रंग काळा असला तरी याला गोडा मसाला म्हणतात कारण याला खोबरे आणि कांदा यामुळे आलेली गोडसर चव. कांदा, खोबरे किसून छान उन्हात वाळवून नंतर तेलात गडद लालसर किंवा बऱ्यापैकी काळपट भाजून घेतले जातात. नंतर सगळा खडा मसाला, भाजलेले धणे असं सगळं घालून हा मसाला बनवतात. नागपूर भागात हा मसाला जास्त वापरला जातो. लाल तिखट वेगळा भाजीत टाकला जातो.

वापर: साधारण थोडी वाटण लागणारी. रप थपित अश्या भाज्या जसे की वांग बटाटा रस्सा, उसळ, फ्लॉवर, वाटाणा, मसाले भात

काळा मसाला - नाव काळा मसाला असलं तरी याचा रंग मात्र छान लाल असतो. सोलापूरी मटण रस्याला लालसर तवंग येतो तो या काळ्या मसाल्यामुळे. साधारण गोड मसाल्याचे जिन्नस आणि मग त्यात तिखट किंवा कमी तिखट मिरची, ब्याडगी मिरची रंगासाठी वापरून हा मसाला बनवला जातो. या मसाल्याला इसूर असे देखील म्हणतात.

वापर: तर्रिदर अशा रस्सा भाज्या जसे की भरलेलं वांग, बटाटा, मटण, मासे, अंडी, शेवगा अश्या भाज्यांमध्ये वापरला जातो.

गरम मसाला- बाजारात मिळणारे खडे मसाले आपल्या आवडीच्या प्रमाणात घेऊन छान खमंग भाजून घेऊन हा मसाला बनवला जातो.

वापर: मसाले भात, पुलाव, सुक्के मटण, चिकन, वांगे बटाटा, बिर्याणी, इतर सुक्या किंवा पंजाबी भाज्यांमध्ये वापरला जातो


उत्तर लिहिले · 25/5/2022
कर्म · 53710
0
नक्कीच! गोडा मसाला, काळा मसाला आणि गरम मसाला यांच्यातील फरक आणि ते कुठे वापरायचे याची माहिती खालीलप्रमाणे आहे:

गोडा मसाला:

  • गोडा मसाला हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय मसाला आहे.
  • चव: गोडा मसाला चवीला गोडसर, मसालेदार आणि खमंग असतो.
  • घटक: धणे, जिरे, तीळ, लवंग, दालचिनी, शहाजिरे, बडीशेप, हिंग, मेथी, लाल मिरची आणि Dry Coconut (खोबरं) वापरले जातात.
  • उपयोग: आमटी, भाजी, मसाले भात, वाटाण्याची भाजी, डाळ इ. मध्ये वापरला जातो.

काळा मसाला:

  • काळा मसाला हा देखील महाराष्ट्रातील एक खास मसाला आहे.
  • चव: काळा मसाला चवीला तिखट आणि तीव्र असतो.
  • घटक: धणे, जिरे, लवंग, मिरी, दालचिनी, तीळ, बडीशेप, नागकेशर, दगडफूल, त्रिफळा, लाल मिरची आणि तेल वापरले जाते.
  • उपयोग: मटण, मसाले वांगी, पिठलं, रस्सा भाजी,Mix vegetable (मिक्स व्हेज) इ. मध्ये वापरला जातो.

गरम मसाला:

  • गरम मसाला हा उत्तर भारतात जास्त वापरला जातो.
  • चव: गरम मसाला चवीला उष्ण आणि तिखट असतो.
  • घटक: लवंग, मिरी, दालचिनी, वेलची, तमालपत्र, जिरे, धणे, बडीशेप आणि जायफळ वापरले जातात.
  • उपयोग: जवळपास सर्व भाज्या, पुलाव, बिर्याणी,chicken recipes (चिकन रेसिपी) इ. मध्ये वापरला जातो.
हे मसाले विविध पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरले जातात आणि प्रत्येक मसाल्याचा स्वतःचा असा वेगळा स्वाद असतो.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1780

Related Questions

जगातील सर्वात जास्त तिखट फळ किंवा पदार्थ कोणता?
सर्वात महाग मिरची कोणती?
मिसळपावचा मसाला कसा बनवता येईल?
वेलदोडे म्हणजे काय?
सर्वात खूप स्वादिष्ट चहा मसाला कोणता व त्याचे नाव काय आहे आणि ते कोणाकडे मिळतील व त्याचे किती प्रकार आहेत?
गरम मसाल्याच्या पदार्थांची नावे कोणती आहेत?
गरम मसाल्यांमधील कोणत्या मसाल्यांचा वापर सर्वात कमी केला जातो? का?