
मसाले
0
Answer link
जगातील सर्वात महाग मिरची 'भूत जोलोकिया' (Bhut Jolokia) आहे, जी सुमारे ७,००० रुपये प्रति किलो दराने विकली जाते. ही मिरची तिच्या तीव्र तिखटपणासाठी ओळखली जाते आणि तिची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आहे. भूत जोलोकिया प्रामुख्याने भारतातच उगवली जाते, विशेषत: नागालँडच्या डोंगराळ भागात.
येथे काही अतिरिक्त माहिती दिली आहे:
- किंमत: सुमारे ₹7,000 प्रति किलो
- उत्पादन: मुख्यतः भारत (नागालँड)
- वैशिष्ट्य: जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून ओळखली जाते.
0
Answer link
मिसळपाव मसाला


असा करा मिसळ मसाला होईल स्वादिष्ट आणि चटकदार
रुचकर आणि झणझणीत मिसळ मसाला वापर इतर कोणत्याही भाजीसाठी
घरच्या घरी करा तर्रीदार मिसळ पावचा बेत
साहित्य :
15-16 लवंगी मिरची
2 बेडगी मिरची
3 कश्मीरी मिरची
1 कप धणे
2 टीस्पून जिरे
1 टीस्पून सफेद तीळ
1 टीस्पून बडीशोप
1/2 टीस्पून खसखस
1 टीस्पून सुंठ पावडर
1 चक्रफुल
1 दालचिनी एक इंच
12 काळी मिरी
12 लवंग
1 हिरवी वेलची
1 काली वेलची
2 कांदे
1 टीस्पून मीठ
1/2 इंच आलं
7-8 लसूण पाकळ्या
कृती
मंद आचेवर कढई गरम करा त्यात 15-16 लवंगी मिरची, 2 बेडगी मिरची, 3 कश्मीरी मिरची, 1 कप धणे, 2 टीस्पून जिरे, 1 टीस्पून सफेद तीळ, 1 टीस्पून बडीशोप, 1/2 टीस्पून खसखस, 1 टीस्पून सुंठ पावडर, 1 चक्रफुल, 1 दालचिनी एक इंच, 12 काळी मिरी, 12 लवंग, 1 हिरवी वेलची, 1 काली वेलची हे सगळे कोरडे साहित्य एकत्र करून भाजून घ्या. त्याचा रंग बदलू नये. मसाले बाजूला काढून थंड करून घ्या. मिक्सरला बारीक करून घ्या. त्यात अर्धी वाटी सुकं खोबरं, 2 कांदे उभे चिरून घातलेले. पॅन मध्ये वेगळे गरम केलेले आलं लसूण देखील त्यात टाका आणि वाटून घ्या. मसाला डब्यात काढून ठेवा.
8
Answer link
वेलदोडे हा एक मसाल्याचा पदार्थ आहे.
वेलदोडे पूड भाजी, मिठाईत किंवा इतर अन्नपदार्थात टाकल्यास त्याला एक छान सुगंध आणि अनोखी चव येते.

वेलदोड्याला काही लोक इलायची असेही म्हणतात.
3
Answer link
चहा मसाला पाउडर रेसिपी | चहा मसाला कसा बनवायचा |
आवश्यक साहित्य:
100 ग्राम कोरडी आले पावडर
10 ग्राम (2 चमचे) वेलची
5 ग्राम (1 टीस्पून) लवंगा
15 ग्राम (3 चमचे मिरपूड)
½ जायफळ
1. चहा मसाला पाउडर रेसिपी बनवण्यासाठी प्रथम काळी मिरी, लवंग, वेलची जायफळ
आणि दालचिनी एका पेनमध्ये घ्या आणि चमच्याने सतत ढवळत असताना मंद आचेवर भाजून घ्या
2. प्लेटमध्ये भाजलेले साहित्य काढा आणि थंड होऊ द्या.
3. एकदा थंड झाल्यावर त्यांना मिक्सरच्या जारमध्ये बारीक वाटून घ्या.
4. पावडर मसाल्यांच्या आत कोरडे आले पावडर आणि गांठोडा पावडर घाला आणि पुन्हा एकदा बारीक करा.
5. आमचा चहाचा मसाला पाउडर रेसिपी तयार आहे.
आपण ते एका वर्षासाठी हवाबंद कंटेनरमध्ये ठेवू शकता.
हा असा चहा मसाला बनवला जातो स्वादिष्ट असतोच मग कुठच्याही ब्रॅण्ड चा घ्या जसे आपले लाल तिखट मसाले ओळखले जातात तसेच चहा मसाले हि ओळखले जातात आपल्या तिखट मसाल्यांमध्ये फरक असतो भरपूर प्रमाणात असतो पण चहा मसाल्यात फरक नसतो बनवण्याची प्रक्रिया एकच असते एवरेस्ट चहा मसाला, बादशहा चहा मसाला रूची चहा मसाला अशी अनेक नावांनी चहा मसाले मिळतात असे भरपूर प्रकार आहेत.बाजारात किराणा दुकान माॅल , चहा पावडर दुकानात मसाला दुकानात हि चहा मसाला मिळतो आता जास्त खप असणारा चहा मसाला एवरेस्ट चहा मसाला बादशहा चहा मसाला यांना जास्त खप आहे स्वादा मध्ये फरक काही नाही
चहा मसाला बाजारात जसा मिळतो तसाच तो घरच्या घरी ही बनवू शकतो
1
Answer link

गरम मसाला
गरम मसाल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण घटक : काळी मिरी (मिरवेल), दालचिनी, लवंगा, काळी वेलची, जायफळ आणि हिरवी वेलची . इ,
घटक
भाजीत वा स्वयंपाकात वापरण्यात येणारे, अनेक मसाल्याचे पदार्थ वापरून तयार केलेले एक मिश्रण. याने खाद्यपदार्थाची चव वाढते. घटकः
सुके खोबरे
तेजपान
विलायची छोटी व मोठी
काळे मिरे
लवंग
कलमी
धने
जिरे
शहाजिरे
दगडफुल
सुकलेल्या लाल मिरच्या
नागकेशर
खसखस
तीळ
जायपत्री
चक्रफूल

मसाल्याचे पदार्थ
विविध कोकणी व्यंजनांची लज्जत वाढवणारे मसाल्याचे पदार्थ हे खास कोकणाचे वैशिष्ट्य. मिरी, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, जायपत्री, लवंगा, वेलची, दगडफूल हे कोकणी मसाल्यातील खास पदार्थ शाकाहारी वा मांसाहारी पदार्थ लज्जतदार आणि चविष्ट बनवतात. कोकणातील सुगरणींच्या स्वयंपाकघरांत हे मसाल्याचे पदार्थ हमखास सापडतात. कोकणी वाड्यांतून नारळी पोफळींच्या आधाराने वर चढलेले मिरीचे वेल बघायला मिळतात.
जायफळाच्या आतील कठीण कवचातील बी म्हणजेच सुवासिक वासाचे जायफळ असते व बी भोवती असणारे आवरण वाळल्यावर जायपत्री बनते. दालाचिनीच्या झाडाच्या सालीला सुगंध असतो व तीच दालचिनी पदार्थांना सुगंधित बनवते. तमालपत्राचे पान हातावर नुसते कुस्करले तरी त्याचा घमघमाट सुटतो. अशा सुवासिक व उत्तम पदार्थांमुळे कोकणी पदार्थ चवदार बनले नाहीत तरच नवल! त्यातून रत्नागिरीत अशा पदार्थांची रेलचेल असते. त्यामुळे परसातील झाडांवरून खुडून बनविलेल्या मसाल्याचे ताजे वाटण घातलेले पदार्थ आपल्यालाही ताजेतवाने बनवून जातात.
1
Answer link
आपल्या भारतात १३६ (+) प्रकारचे मसाले वापरले जातात. त्यातले आपण मोजकेच मसाले रोज वापरतो. आणि या प्रत्येक मसाल्याचा आपल्या वेदांमध्ये खासकरून आयुर्वेदात त्यांच्या गुणधर्मांसकट उल्लेख आढळतो. यातले अनेक मसाले आत दुर्मिळ किंवा नामशेष झाले आहेत कारण याचा उत्पादन करणारे वातावरण राहिले नाही. त्याच प्रमाणे काही मसाले असे आहेत कि ते पचवण्याची क्षमता कमी झाली आहे.
पूर्वी हे सगळे मसाले वैद्यांच्या साल्या प्रमाणे आचारी वापर करायचे कारण प्रत्येक मसाल्याचा गुणधर्म हवामानानुसार/ वातावरणानुसार बदलतो त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो त्या दृष्टीने प्रमाण असायचे. आज तसे नाही.. बहुत करून मसाले महाग झाल्यामुळे त्याचा वापर कमी होतो आहे आणि कालांतरानी कदाचित अजून कमी होईल.
काही कमी वापर होणारे/ न वापरले जाणारे मसाले:-
केसर
गुच्ची
सुवर्ण भस्म
चांदी भस्म
मोती भस्म
कमल गट्टा
सफेद मुसली
आतिष
नगरमोथा
रतनजोत
काबाबचिनी
कलोंजी
असे अजूनही अनेक मसाले आहेत जे पूर्वी वापरात होते.. काटा याचा वापर कमी झाला आहे ..कारण पाचन क्षमता तेवढी नाही.

1
Answer link
मीठ आणि साखर यात जेवढा फरक आहे तेवढाच फरक गोड मसाला, काळा मसाला, गरम मसाला या सगळ्यात आहे.
गोडा मसाला - याचा रंग काळा असला तरी याला गोडा मसाला म्हणतात कारण याला खोबरे आणि कांदा यामुळे आलेली गोडसर चव. कांदा, खोबरे किसून छान उन्हात वाळवून नंतर तेलात गडद लालसर किंवा बऱ्यापैकी काळपट भाजून घेतले जातात. नंतर सगळा खडा मसाला, भाजलेले धणे असं सगळं घालून हा मसाला बनवतात. नागपूर भागात हा मसाला जास्त वापरला जातो. लाल तिखट वेगळा भाजीत टाकला जातो.
वापर: साधारण थोडी वाटण लागणारी. रप थपित अश्या भाज्या जसे की वांग बटाटा रस्सा, उसळ, फ्लॉवर, वाटाणा, मसाले भात
काळा मसाला - नाव काळा मसाला असलं तरी याचा रंग मात्र छान लाल असतो. सोलापूरी मटण रस्याला लालसर तवंग येतो तो या काळ्या मसाल्यामुळे. साधारण गोड मसाल्याचे जिन्नस आणि मग त्यात तिखट किंवा कमी तिखट मिरची, ब्याडगी मिरची रंगासाठी वापरून हा मसाला बनवला जातो. या मसाल्याला इसूर असे देखील म्हणतात.
वापर: तर्रिदर अशा रस्सा भाज्या जसे की भरलेलं वांग, बटाटा, मटण, मासे, अंडी, शेवगा अश्या भाज्यांमध्ये वापरला जातो.
गरम मसाला- बाजारात मिळणारे खडे मसाले आपल्या आवडीच्या प्रमाणात घेऊन छान खमंग भाजून घेऊन हा मसाला बनवला जातो.
वापर: मसाले भात, पुलाव, सुक्के मटण, चिकन, वांगे बटाटा, बिर्याणी, इतर सुक्या किंवा पंजाबी भाज्यांमध्ये वापरला जातो
