मसाले पाककला

गरम मसाल्यांमधील कोणत्या मसाल्यांचा वापर सर्वात कमी केला जातो? का?

2 उत्तरे
2 answers

गरम मसाल्यांमधील कोणत्या मसाल्यांचा वापर सर्वात कमी केला जातो? का?

1
आपल्या भारतात १३६ (+) प्रकारचे मसाले वापरले जातात. त्यातले आपण मोजकेच मसाले रोज वापरतो. आणि या प्रत्येक मसाल्याचा आपल्या वेदांमध्ये खासकरून आयुर्वेदात त्यांच्या गुणधर्मांसकट उल्लेख आढळतो. यातले अनेक मसाले आत दुर्मिळ किंवा नामशेष झाले आहेत कारण याचा उत्पादन करणारे वातावरण राहिले नाही. त्याच प्रमाणे काही मसाले असे आहेत कि ते पचवण्याची क्षमता कमी झाली आहे.

पूर्वी हे सगळे मसाले वैद्यांच्या साल्या प्रमाणे आचारी वापर करायचे कारण प्रत्येक मसाल्याचा गुणधर्म हवामानानुसार/ वातावरणानुसार बदलतो त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो त्या दृष्टीने प्रमाण असायचे. आज तसे नाही.. बहुत करून मसाले महाग झाल्यामुळे त्याचा वापर कमी होतो आहे आणि कालांतरानी कदाचित अजून कमी होईल.

काही कमी वापर होणारे/ न वापरले जाणारे मसाले:-

केसर

गुच्ची

सुवर्ण भस्म

चांदी भस्म

मोती भस्म

कमल गट्टा

सफेद मुसली

आतिष

नगरमोथा

रतनजोत

काबाबचिनी

कलोंजी

असे अजूनही अनेक मसाले आहेत जे पूर्वी वापरात होते.. काटा याचा वापर कमी झाला आहे ..कारण पाचन क्षमता तेवढी नाही.


उत्तर लिहिले · 30/5/2022
कर्म · 53720
0
गरम मसाल्यामध्ये अनेक मसाले वापरले जातात, त्यापैकी काही मसाले तीव्र चवीचे असल्यामुळे त्यांचा वापर कमी प्रमाणात केला जातो.

उदाहरणार्थ:
  • लवंग: लवंग हे चवीला अतिशय तीव्र असते. त्यामुळे ते जास्त प्रमाणात वापरल्यास पदार्थाची चव बिघडण्याची शक्यता असते.
  • दालचिनी: दालचिन्नीचा वास तीव्र असतो आणि जास्त वापरल्यास मसाले जास्त प्रभावी होऊ शकतात.
  • काळी मिरी: काळी मिरी तिखट असते, म्हणून ती बेतानेच वापरली जाते.
  • जावित्री: ही मसाल्यातील एक अतिशयStrong चव असणारी गोष्ट आहे, त्यामुळे ती कमी प्रमाणात वापरली जाते.

हे मसाले कमी प्रमाणात वापरण्याचे कारण म्हणजे त्यांची चव आणि सुगंध खूप तीव्र असतो. ते जास्त प्रमाणात वापरल्यास पदार्थाची चव बिघडू शकते आणि तोSubtle न राहता खूपBold बनू शकतो.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040

Related Questions

जेली कशी तयार करतात?
स्वयंपाकघरातील क्रियासाठी वापरले जाणारे शब्दप्रयोग?
घुगऱ्या हा काय खाद्य प्रकार आहे?
मुंगी भजी कशी करावी? मटेरियल काय?
फुलचंद रिमझिम पान कसे बनवायचे व त्यात कोणते मटेरियल वापरायचे?
घरगुती चटणी बनवायचा फॉर्मुला सांगा?
कांदे पोहे गोड का झाले?