2 उत्तरे
2
answers
गरम मसाल्याच्या पदार्थांची नावे कोणती आहेत?
1
Answer link

गरम मसाला
गरम मसाल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण घटक : काळी मिरी (मिरवेल), दालचिनी, लवंगा, काळी वेलची, जायफळ आणि हिरवी वेलची . इ,
घटक
भाजीत वा स्वयंपाकात वापरण्यात येणारे, अनेक मसाल्याचे पदार्थ वापरून तयार केलेले एक मिश्रण. याने खाद्यपदार्थाची चव वाढते. घटकः
सुके खोबरे
तेजपान
विलायची छोटी व मोठी
काळे मिरे
लवंग
कलमी
धने
जिरे
शहाजिरे
दगडफुल
सुकलेल्या लाल मिरच्या
नागकेशर
खसखस
तीळ
जायपत्री
चक्रफूल

मसाल्याचे पदार्थ
विविध कोकणी व्यंजनांची लज्जत वाढवणारे मसाल्याचे पदार्थ हे खास कोकणाचे वैशिष्ट्य. मिरी, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, जायपत्री, लवंगा, वेलची, दगडफूल हे कोकणी मसाल्यातील खास पदार्थ शाकाहारी वा मांसाहारी पदार्थ लज्जतदार आणि चविष्ट बनवतात. कोकणातील सुगरणींच्या स्वयंपाकघरांत हे मसाल्याचे पदार्थ हमखास सापडतात. कोकणी वाड्यांतून नारळी पोफळींच्या आधाराने वर चढलेले मिरीचे वेल बघायला मिळतात.
जायफळाच्या आतील कठीण कवचातील बी म्हणजेच सुवासिक वासाचे जायफळ असते व बी भोवती असणारे आवरण वाळल्यावर जायपत्री बनते. दालाचिनीच्या झाडाच्या सालीला सुगंध असतो व तीच दालचिनी पदार्थांना सुगंधित बनवते. तमालपत्राचे पान हातावर नुसते कुस्करले तरी त्याचा घमघमाट सुटतो. अशा सुवासिक व उत्तम पदार्थांमुळे कोकणी पदार्थ चवदार बनले नाहीत तरच नवल! त्यातून रत्नागिरीत अशा पदार्थांची रेलचेल असते. त्यामुळे परसातील झाडांवरून खुडून बनविलेल्या मसाल्याचे ताजे वाटण घातलेले पदार्थ आपल्यालाही ताजेतवाने बनवून जातात.
0
Answer link
गरम मसाल्यामध्ये अनेक पदार्थांचा वापर केला जातो, त्यापैकी काही प्रमुख पदार्थ खालीलप्रमाणे:
- काळी मिरी: चवीला तिखट आणि मसालेदार.
- लवंग:Strong आणि सुगंधी.
- दालचिनी: गोडसर आणि सुगंधी.
- वेलची: दोन प्रकार- हिरवी वेलची (सुगंधी) आणि काळी वेलची (strong सुगंध).
- जिरे: earthy आणि सुगंधी.
- धणे: सौम्य आणि लिंबूवर्गीय चव.
- बडीशेप: गोड आणि liquorice सारखी चव.
- तमालपत्र (Bay leaf): सुगंधी.
- जाईपत्री (Mace): लवंगासारखी चव.
- शहाजिरे: सामान्य जिऱ्यापेक्षा अधिक सुगंधी.
- सुंठ (Dry ginger): उष्ण आणि मसालेदार.
हे सर्व पदार्थ गरम मसाल्याला एक विशिष्ट चव आणि सुगंध देतात.