औषधे आणि आरोग्य घरगुती उपाय तोंडाचे आरोग्य आरोग्य

तोंडातील अल्सर का होतात आणि होऊ नये म्हणून काय करावे?

2 उत्तरे
2 answers

तोंडातील अल्सर का होतात आणि होऊ नये म्हणून काय करावे?

4
सामान्यपणे तोंडात फोडी येणे एक शारीरिक अवस्था आहे,ज्यात तोंडात हलके दुखते आणि सोबतच हलकी सूज आणि वेदना उद्भवते. मुख्यतः तोंडाच्या आतील त्वचेला इजा झाल्यामुळे हे होते,कारण ही त्वचा अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असते. सामन्यतः,तोंडात किंवा तोंडावाटे अल्सर होणे वेगवेगळ्या वयोगटातील लोकांमध्ये आढळते आणि अनेक कारणांमधे दुखापत, पौष्टिक आहाराची कमतरता आणि तोंडाची अस्वच्छता या कारणांमुळे हे होऊ शकते.वैद्यकीय चाचण्यांमध्ये याचे निदान करणे सोपे आहे आणि रक्त तपासणीची गरज नाही. तथापि, वारंवार होणाऱ्या तोंडातील फोडींच्या कारणांचा शोध घेण्यासाठी रक्त तपासणी केली जाऊ शकते. सामान्यत: अल्सरचा उपचार करण्यासाठी डॉक्टर औषधोपचार करतील. असे अनेक घरगुती उपाय आहेत,जे तोंडाच्या अल्सरला बरे करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तोंडाच्या अल्सरचा उपचार प्रामुख्याने जुना आहे आणि त्यात तोंड धुण्यासाठीचे प्रतिजंतुकीय द्रव्ये, पूरक व्हिटॅमिन बी कॉंप्लेक्स आणि स्थानिक वेदनाशामक जेलचा समावेश आहे. प्रतिबंधांमध्ये, व्हिटॅमिन बी 12 आणि प्रचुर फॉलिक अॅसिड असलेले खाद्यपदार्थ घेणें समाविष्ट आहे.

       तोंडातील अल्सरमुळे 20-30 टक्के लोकसंख्या प्रभावित आहे, अशी स्थिती आहे. यामध्ये तोंडाच्या आतील त्वचेला(म्युकस मेंब्रैन)इजा झालेली असते. ती प्राणघातक नव्हे, आणि त्याची कारणे तसेच त्यावर व्यवस्थित उपचार उपलब्ध आहे. प्रौढांना आणि लहान मुलांना देखील तोंडातील अल्सरचा त्रास होऊ शकतो,जे वेदनादायक असते. गाल किंवा ओठांच्या आत त्रास होऊ शकतो आणि दोन दिवस किंवा एका आठवड्यांपर्यंत टिकू शकतो.

तोंडाच्या अल्सरची समस्या १ -२ वेळा सगळयांनाच उद्भवते. काहीजणांना ३ ते ४ दिवस तर काहींना १५ दिवस या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे खायला प्यायला त्रास होऊन शरीरातील अशक्तपणा वाढत जातो. शरीरातील पित्त वाढल्यामुळे अशी समस्या उद्भवते. तोंडाचा अल्सर दूर करण्याचे काही सोपे घरगुती उपाय...

तुम्ही धूम्रपान आणि मद्यपान करत असाल तर तुम्हाला तुम्हाला देखील अल्सर होण्याची शक्यता अधिक आहे. धूम्रपान म्हणजे तंबाखू आणि त्यातही तुम्ही तो जाळून शरीरात घेता त्यामुळे तुम्हाला धूम्रपान आणि मद्यपान केल्यानंतर तुम्हाला अल्सरचा त्रास होऊ शकतो.

तुलशीच्या पाण्याच्या गुळण्या करा





तोंडाच्या अल्सर पासून सुटका मिळवण्याासाठी तुळस फायदेशीर ठरते.  कारण तुळशीच्या पानात अँटीबॅक्टेरिअल, अँटीव्हायरल गुण असतात.  तुळशीच्या पाण्याच्या सेवनाने व्हायरस आणि बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. त्यासाठी २ ग्लास पाण्यात १० ते १२ तुलशीची पानं घाला आणि उकळून घ्या. त्यानंतर थंड करा. या पाण्यात २ चमचे मीठ घालून गुळण्या करा. सलग दोन दिवस हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल.

हळद





हळद अँटीसेप्टीक आहे. अल्सर ही एक प्रकारची जखमच आहे. त्यामुळे तुम्ही  दुधात हळद घालून पिऊ शकता.  तुम्हाला हळदीचे सेवन अशापद्धतीने करता येईल. परिणामी रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा वाढते आणि तोंडातील अल्सरपासून आराम मिळतो.
 
नारळ




सुकं खोबरं,  खोबर्‍याचं  तेल तसेच नारळाचं  पाणी हे  तीनही घटक  तोंडातील  अल्सरपासून आराम  मिळवण्यास मदत  करतात. त्यासाठी सुकं खोबरं चखळून खा. सतत दोन दिवस हा प्रयोग केल्यास समस्या कमी होईल. याशिवाय नारळाचं पाणी शरीरातील उष्णता कमी करून शरीर थंड ठेवतं. म्हणून तुम्ही नारळपाणी पिऊन अल्सरची समस्या दूर करू शकता.


मध


मधात औषधी गुणधर्म असल्याने डिहायड्रेशनच्या  त्रासापासून आराम  मिळण्यास मदत  होते. मधामुळे अल्सर कमी होण्यास  मदत  होते. मधातील  अ‍ॅन्टी-मायक्रोबियल  घटकांमुळे तोंडातील अल्सर लवकर बरा होण्यास मदत  होते.
उत्तर लिहिले · 7/5/2020
कर्म · 55350
0
तोंडातील अल्सर होण्याची अनेक कारणे असू शकतात आणि काही साध्या उपायांनी ते टाळता येऊ शकतात. खाली काही संभाव्य कारणे आणि प्रतिबंधक उपाय दिले आहेत:
तोंडातील अल्सर होण्याची कारणे:
  1. जखम किंवा आघात: दात घासताना किंवा काहीतरी खाताना चुकून जीभ किंवा तोंडाच्या आतील भागाला जखम झाल्यास अल्सर होऊ शकतात.
  2. व्हिटॅमिनची कमतरता: व्हिटॅमिन बी 12, फोलेट (folate) आणि लोह (iron) यांसारख्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे तोंडाला अल्सर येऊ शकतात.
  3. तणाव: मानसिक ताणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि तोंडाला अल्सर येऊ शकतात.
  4. हार्मोनल बदल: काही स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान किंवा गर्भधारणेदरम्यान तोंडाला अल्सर येतात.
  5. अन्नपदार्थ: काही विशिष्ट अन्नपदार्थ जसे की आंबट फळे, टोमॅटो, मसालेदार पदार्थ किंवा ऍलर्जी निर्माण करणारे पदार्थ खाल्ल्याने अल्सर होऊ शकतात.
  6. दात घासण्याची चुकीची पद्धत: जास्त जोर लावून दात घासल्याने हिरड्यांना इजा होते आणि अल्सर होऊ शकतात.
  7. धूम्रपान आणि तंबाखू: तंबाखूच्या सेवनाने तोंडाला अल्सर होण्याचा धोका वाढतो.
अल्सर होऊ नये म्हणून काय करावे:
  1. तोंड स्वच्छ ठेवा: नियमितपणे सौम्य टूथपेस्टने दात घासून तोंडाची स्वच्छता राखा.
  2. आहार संतुलित ठेवा: तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी 12, फोलेट आणि लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा. फळे, भाज्या आणि धान्यांचे सेवन करा.
  3. पुरेशी झोप घ्या: दररोज 7-8 तास झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे, ज्यामुळे तणाव कमी होतो.
  4. तणाव व्यवस्थापन: योग, ध्यान आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करून तणाव कमी करा.
  5. धूम्रपान टाळा: तंबाखू आणि सिगारेट ओढणे टाळा.
  6. नियमित दंत तपासणी: वर्षातून दोन वेळा दंत तपासणी करा.
  7. तीव्र पदार्थांचे सेवन टाळा: जास्त मसालेदार, आंबट आणि खारट पदार्थ टाळा.
  8. पुरेसे पाणी प्या: दिवसभर पुरेसे पाणी प्या, ज्यामुळे तोंडात ओलावा टिकून राहतो.
जर तोंडातील अल्सर गंभीर असतील किंवा वारंवार येत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1080

Related Questions

तोंडामध्ये आणि जिभेवर फोड येतात, दर 15 दिवसांनी तर काय उपाय?
तोंड आल्यावर काय उपाय करावा?
माझं तोंड उघडत नाहीये, काही पर्याय आहे का? बहुतेक गुटक्याने झालं असावं?
चहा पिल्याने तोंड येते का?
कायम तोंड आल्यास काय करावे?
जिभेवर बुरशी आली आहे, काही खाता किंवा पिता येत नाही, काय करू?
तोंडातील नेहमी येणारे फोड कसे कमी करावे?