पेय तोंडाचे आरोग्य आरोग्य आहार

चहा पिल्याने तोंड येते का?

2 उत्तरे
2 answers

चहा पिल्याने तोंड येते का?

1
तस निश्चितपणे सांगता येणार नाही,
कारण तोंड येण्याची कारणं अनेक आहेत. जीवनसत्त्व ब (व्हिटॅमिन बी) च्या कमतरतेमुळे देखील असं होतं.
पण शक्यता नाकारता येत नाही..
कारण चहामुळे पित्त व उष्णतेचा त्रास होऊ शकतो, पित्ताचा अधिक त्रास वाढल्यास, अपचन झाल्यास व उष्णतेमुळे तोंड येण्याची अधिक शक्यता असते. जागरणामुळे देखील बर्‍याच जणांना हा त्रास होतो.


धन्यवाद😊
उत्तर लिहिले · 30/3/2020
कर्म · 55350
0

गरम चहा प्यायल्याने तोंड येऊ शकते. जास्त गरम चहामुळे तोंडातील नाजूक त्वचेला भाजल्यामुळे फोड येऊ शकतात, ज्यामुळे तोंड येण्याची शक्यता वाढते.

तोंड येण्याची इतर कारणे:

  • व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता
  • ॲसिडिटी
  • पोट साफ न होणे
  • मानसिक ताण

उपाय:

  • पुरेशी झोप घ्या.
  • आहार संतुलित ठेवा.
  • तणाव कमी करा.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1080

Related Questions

तोंडामध्ये आणि जिभेवर फोड येतात, दर 15 दिवसांनी तर काय उपाय?
तोंड आल्यावर काय उपाय करावा?
माझं तोंड उघडत नाहीये, काही पर्याय आहे का? बहुतेक गुटक्याने झालं असावं?
तोंडातील अल्सर का होतात आणि होऊ नये म्हणून काय करावे?
कायम तोंड आल्यास काय करावे?
जिभेवर बुरशी आली आहे, काही खाता किंवा पिता येत नाही, काय करू?
तोंडातील नेहमी येणारे फोड कसे कमी करावे?