तोंडाचे आरोग्य
0
Answer link
तोंडात आणि जिभेवर फोड येणे (Mouth ulcers) ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येवर काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
- पुरेशी झोप घ्या: दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.
- तणाव कमी करा: तणाव कमी करण्यासाठी योगा, ध्यान, किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम करा.
- आहार:
- व्हिटॅमिन बी 12, फोलेट आणि लोहयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
- हिरव्या पालेभाज्या, फळे आणि धान्यांचा आहारात समावेश करा.
- जंक फूड आणि मसालेदार पदार्थ टाळा.
- तोंड स्वच्छ ठेवा:
- दिवसातून दोन वेळा ब्रश करा.
- अँटीसेप्टिक माउथवॉश वापरा.
- घरगुती उपाय:
- मध लावा: मधामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.
- नारळ तेल: खोबरेल तेल लावल्याने आराम मिळतो.
- तुळशीची पाने: तुळशीची पाने चघळल्याने फायदा होतो.
जर फोड गंभीर असतील आणि घरगुती उपायांनी आराम मिळत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप: हा लेख केवळ माहितीसाठी आहे. उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
1
Answer link
तोंडात फोड आल्याने काही सुचेनासं होतं.तोंडात फोड आल्याने काही सुचेनासं होतं. खाणं दूरच पाणी पिणंही कठिण होऊन बसतं. यावर नेमका काय उपाय करावा हे मात्र अनेकांना माहितीच नसतं. पण यावरील उपाय तुमच्या आसपासच असतात. तोंड आलं की, तोंडाच्या आत आणि जिभेवरही फोड येतात. असंतुलित आहार, पोट खराब असणे, पान-मसाल्यांचं सेवन यामुळे तोंड येतं. याचा त्रासही खूप होतो.
खाणं दूरच पाणी पिणंही कठिण होऊन बसतं. यावर नेमका काय उपाय करावा हे मात्र अनेकांना माहितीच नसतं. पण यावरील उपाय तुमच्या आसपासच असतात. तोंड आलं की, तोंडाच्या आत आणि जिभेवरही फोड येतात. असंतुलित आहार, पोट खराब असणे, पान-मसाल्यांचं सेवन यामुळे तोंड येतं. याचा त्रासही खूप होतो.
दूधपित्या मुलांमध्ये ब-याच वेळा एका प्रकारच्या बुरशीमुळे तोंड येते. शाईसारखे एक औषध (जेंशन) यावर गुणकारी आहे. याचा एक थेंब जिभेवर टाकला, की आपोआप तोंडभर पसरतो. या औषधाचा उपयोग तीन-चार दिवस होतो. हे औषध पोटात गेले तरी चालते.
तोंड येणे : नंतरच्या वयात
'ब' जीवनसत्त्वाच्या अभावाने काही जणांना तोंड येते. जिभेचा किंवा इतर भाग लाल होतो व तिथे झोंबते. हळूहळू तिथे जखम तयार होते व ती खूप दुखते. हा आजार 8-10 दिवस चालतो व नंतर बरा होतो.
जेवणात पालेभाज्या असल्या, की बहुधा हा आजार होत नाही.
सतत चहा-कॉफी, तंबाखू, धूम्रपान, दारू, इत्यादी व्यसनांनीही तोंड येते.
पोटात जंत, आमांश वगैरे जुने आजार असले तर तोंड येते. अशा वेळी मूळ आजारावर उपचार करावा.
काही जणांना विशिष्ट पदार्थामुळे किंवा औषधाने वावडे म्हणून तोंड येते. उदा. काही जणांना 'मसाला' गरम पडून तोंड येते.
दातांमध्ये गालाचा किंवा जिभेचा भाग चावला गेल्याने तोंड येते.
एड्स या आजारात तोंडात बुरशीने व्रण येतात.
हिरडयांचा आजार
काही वेळा हिरडयांना सूज आल्यामुळे तोंड येते. अशा वेळी दिवसातून तीन-चार वेळा मिठाच्या पाण्याने चुळा भरून टाकाव्यात. जेंशनचे एक-दोन थेंब औषध हिरडयांवर लावावे. लिंबू, पेरू किंवा आवळा अशी 'क' जीवनसत्त्वयुक्त फळे खाण्यात असल्यास हिरडया मजबूत व निरोगी राहण्यास मदत होते.
कर्करोगाची सुरुवात ?
तोंडात किंवा जिभेवर दीर्घकाळ बरी न होणारी जखम किंवा पांढरट चट्टा असल्यास कर्करोगाची भीती असते. यासाठी वेळीच तज्ज्ञाला दाखवा. तसेच आत कोठेही चट्टा खरखरीत भाग, गाठ आल्यास वेळ न घालवता तज्ज्ञाला दाखवा.
एड्सची शंका
वारंवार तोंड येणे, बुरशी होणे हे एड्सच्या आजाराच्या लक्षणांपैकी एक आहे. मात्र याबद्दल डॉक्टरच तपासणी करु शकतील.
उपचार
मूळ कारण माहीत असल्यास त्यावर उपचार व्हावेत. 'ब' जीवनसत्त्वाच्या गोळया रोज एक याप्रमाणे पाच दिवस घेतल्यावर उपयोग होईल. याबरोबरच मेडिकल स्टोअरमध्ये'लॅक्टोबॅसिलस' (पचनसंस्थेतील जिवाणूंच्या गोळया) मिळतात. अशी रोज एक गोळी पाच दिवस द्यावी. या जिवाणूंमुळे पचनसंस्थेतील समतोल साधला जातो. दही खाल्ल्याने देखील हे जंतू आपोआप मिळतात. म्हणून अशा रुग्णांनी दही खावे.
तोंड येण्यावर आयुर्वेदिक उपचार
खालीलपैकी काही घरगुती उपचार करून पाहा
तोंड येण्यावर जाईची पाने चघळणे हा चांगला उपाय आहे. यासाठी जाईची 5-6 पाने स्वच्छ धुवून चघळावीत. चघळताना रस जीभ व गालाच्या अंतर्भागाशी चांगला लागेल अशी काळजी घेणे आवश्यक आहे. रस गिळण्याने काहीही अपाय होत नाही. असे दिवसातून 3-4 वेळा,या प्रमाणे 4-5 दिवस करायला सांगावे.
दुसरा एक उपाय म्हणजे सहाणेवर तुपाचा थेंब टाकून त्यावर ज्येष्ठमध उगाळून गंध तयार करावे. तोंडातील अंतर्भागात हे गंध सगळीकडे झोपताना लावावे (चूळ भरू नये). असे 4-5 रात्री करावे.
सोनकाव सायीत मिसळून व्रणावर लावल्यास वेदना कमी होते.
तुरटीच्या पाण्याने किंवा मिठाच्या कोमट पाण्याने चूळ भरल्यास वेदना काही काळ कमी होते.
हळद लावण्याने व्रण लवकर भरुन येतो.
तोंड आलेल्या ठिकाणी जात्यादि तेलाने गुळणी करावी.
इरिमेदादी तेल लावल्याने तोंडातला व्रण सौम्य होतो.
वारंवार तोंड येण्याचा त्रास असल्यास त्यामागे (काही जणांच्या बाबतीत) बध्दकोष्ठाचा त्रास असण्याची शक्यता असते, अशांना संध्याकाळच्या जेवणानंतर दोन-तीन तासांनी तेल किंवा तूप (पाच-सहा चमचे) द्यावे. त्यानंतर लगेच एक कप गरम पाण्याबरोबर गंधर्वहरीतकी किंवा बहाव्याचा मगज (दीड ग्रॅम) घेण्याचा सल्ला द्यावा. यामुळे पहाटे पोट साफ होते. असे दर 2-3 दिवसांनी चार-पाच वेळा करावे. याबरोबरच तोंड येणा-या व्यक्तींनी तिखट, अतिखारट व आंबलेले अन्नपदार्थ टाळावेत.
पेरूच्या झाडाची पाने उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्याने घसा आणि जीभ स्वच्छ होते आणि छाले बरे होतात.
४) हळद पाण्यात घोळून ठेवावी. या पाण्याला गाळून याने गुळण्या कराव्या.
५) मधाला पाण्यात मिसळून गुळण्या कराव्यात.
६) एक ग्लास कोमट पाणी करून त्यात अर्धा चमचा मीठ घाला. हे पाणी थोडा वेळ तोंडात ठेवून नंतर गुळण्या करा. हा उपाय दिवसातून तीन वेळा केल्याने तोंड लवकर बरे होते.
५) तुळसीच्या दोन ते तीन पाने चावून त्याचा रस प्या. खाण्याच्या पानाचा रस काढून त्यात साजूक तूप टाकून हे मिश्रण तोंड आलेल्या ठिकाणी लावा.
६) खाण्याच्या पानाचे चूर्ण तयार करुन त्यात थोडा मध मिसळा. हे चाटण लावल्याने फोड लवकर बरे होतात. तसेच लिंबाच्या रसात मध मिसळून त्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो.
७) सुक्या खोबऱ्याचे तुकडे चावून खा.शरीरातील उष्णता वाढल्यामुळे किंवा गोड पदार्थांचे जास्त सेवन केल्यामुळे अनेकांचे तोंड येते. म्हणजे तोंडामध्ये फोड येतात. यामुळे आपल्याला काही खाता येत नाही आणि पिताही येत नाही. तुमचे तोंड आले असेल तर खालील उपाय करून तुम्ही तुमचे तोंड बरे करू शकता.
१) तोंडातील छाले बरे करण्यासाठी कोथिंबीर वाटून तिचा रस काढून लावा. धणे पाण्यात उकळून त्या पाण्याला गाळून गार करा. याने
गुळण्या केल्याने छाले बरे होतात.
२) वेलचीचे चूर्ण मधात मिसळून लावा आणि लाळ गळू द्या. तसेच जाईच्या झाडाची पाने चावल्याने छाले बरे होतात.
0
Answer link
तोंड उघडण्यास त्रास होणे (तोंड न उघडणे) या समस्येसाठी काही संभाव्य पर्याय आणि गुटख्याच्या सेवनाने होणाऱ्या परिणामांबद्दल माहिती खालीलप्रमाणे आहे:
तोंड न उघडण्याची कारणे:
- गुटखा आणि तंबाखू: गुटखा आणि तंबाखूच्या सेवनाने तोंडाच्या स्नायूंची लवचिकता कमी होते, ज्यामुळे जबडा कडक होतो आणि तोंड उघडण्यास त्रास होतो.
- सबम्युकस फायब्रोसिस (Oral Submucous Fibrosis): दीर्घकाळ गुटखा खाल्ल्याने ओएसएमएफ (OSMF) नावाचा आजार होऊ शकतो, ज्यामुळे तोंडाच्या आतील भाग आणि जबड्याच्या स्नायूंमध्ये फायब्रोसिस (Fibrosis) होते आणि तोंड उघडणे अधिकाधिक कठीण होते.
- इतर कारणे: जबड्याला मार लागणे, तोंडाचा कर्करोग, संसर्ग, किंवा संधिवात (Arthritis) यांसारख्या इतर वैद्यकीय स्थितींमुळे देखील तोंड उघडण्यास त्रास होऊ शकतो.
उपचार आणि पर्याय:
- डॉक्टरांचा सल्ला: सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते तुमच्या समस्येचे निदान करतील आणि योग्य उपचार देतील.
- 物理治疗 (Physiotherapy): जबड्याच्या स्नायूंना आराम देण्यासाठी आणि जबडा पूर्ववत करण्यासाठी फिजिओथेरपी उपयुक्त ठरू शकते.
- औषधोपचार: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, दाह कमी करणारी औषधे (Anti-inflammatory medicines) आणि स्नायूंना आराम देणारी औषधे (Muscle relaxants) घेता येतील.
- तोंड उघडण्याचे व्यायाम: डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्ट तुम्हाला जबड्याचे व्यायाम शिकवतील, ज्यामुळे जबड्याची हालचाल सुधारण्यास मदत होईल.
- गुटखा बंद करणे: गुटखा खाणे पूर्णपणे बंद करणे हा या समस्येवरील सर्वात महत्त्वाचा उपाय आहे.
- शस्त्रक्रिया: गंभीर प्रकरणांमध्ये, फायब्रोसिस कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक भासू शकते.
घरगुती उपाय:
- गरम पाण्याचे शेक: तोंडाला गरम पाण्याचे शेक द्या, ज्यामुळे स्नायूंना आराम मिळेल.
- हळदीचे पाणी: हळदीमध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात. हळदीचे पाणी (गरम पाण्यात हळद) प्यायल्याने आराम मिळतो.
गुटख्याचे दुष्परिणाम:
- तोंडाचा कर्करोग
- दातांचे आणि हिरड्यांचे आजार
- हृदयविकार
- ओरल सबम्युकस फायब्रोसिस (OSMF)
अतिरिक्त माहिती:
तुम्ही टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या वेबसाइटवर (Tata Memorial Hospital website)https://tmc.gov.in/ अधिक माहिती मिळवू शकता.
4
Answer link
सामान्यपणे तोंडात फोडी येणे एक शारीरिक अवस्था आहे,ज्यात तोंडात हलके दुखते आणि सोबतच हलकी सूज आणि वेदना उद्भवते. मुख्यतः तोंडाच्या आतील त्वचेला इजा झाल्यामुळे हे होते,कारण ही त्वचा अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असते. सामन्यतः,तोंडात किंवा तोंडावाटे अल्सर होणे वेगवेगळ्या वयोगटातील लोकांमध्ये आढळते आणि अनेक कारणांमधे दुखापत, पौष्टिक आहाराची कमतरता आणि तोंडाची अस्वच्छता या कारणांमुळे हे होऊ शकते.वैद्यकीय चाचण्यांमध्ये याचे निदान करणे सोपे आहे आणि रक्त तपासणीची गरज नाही. तथापि, वारंवार होणाऱ्या तोंडातील फोडींच्या कारणांचा शोध घेण्यासाठी रक्त तपासणी केली जाऊ शकते. सामान्यत: अल्सरचा उपचार करण्यासाठी डॉक्टर औषधोपचार करतील. असे अनेक घरगुती उपाय आहेत,जे तोंडाच्या अल्सरला बरे करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तोंडाच्या अल्सरचा उपचार प्रामुख्याने जुना आहे आणि त्यात तोंड धुण्यासाठीचे प्रतिजंतुकीय द्रव्ये, पूरक व्हिटॅमिन बी कॉंप्लेक्स आणि स्थानिक वेदनाशामक जेलचा समावेश आहे. प्रतिबंधांमध्ये, व्हिटॅमिन बी 12 आणि प्रचुर फॉलिक अॅसिड असलेले खाद्यपदार्थ घेणें समाविष्ट आहे.
तोंडातील अल्सरमुळे 20-30 टक्के लोकसंख्या प्रभावित आहे, अशी स्थिती आहे. यामध्ये तोंडाच्या आतील त्वचेला(म्युकस मेंब्रैन)इजा झालेली असते. ती प्राणघातक नव्हे, आणि त्याची कारणे तसेच त्यावर व्यवस्थित उपचार उपलब्ध आहे. प्रौढांना आणि लहान मुलांना देखील तोंडातील अल्सरचा त्रास होऊ शकतो,जे वेदनादायक असते. गाल किंवा ओठांच्या आत त्रास होऊ शकतो आणि दोन दिवस किंवा एका आठवड्यांपर्यंत टिकू शकतो.
तोंडाच्या अल्सरची समस्या १ -२ वेळा सगळयांनाच उद्भवते. काहीजणांना ३ ते ४ दिवस तर काहींना १५ दिवस या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे खायला प्यायला त्रास होऊन शरीरातील अशक्तपणा वाढत जातो. शरीरातील पित्त वाढल्यामुळे अशी समस्या उद्भवते. तोंडाचा अल्सर दूर करण्याचे काही सोपे घरगुती उपाय...
तुम्ही धूम्रपान आणि मद्यपान करत असाल तर तुम्हाला तुम्हाला देखील अल्सर होण्याची शक्यता अधिक आहे. धूम्रपान म्हणजे तंबाखू आणि त्यातही तुम्ही तो जाळून शरीरात घेता त्यामुळे तुम्हाला धूम्रपान आणि मद्यपान केल्यानंतर तुम्हाला अल्सरचा त्रास होऊ शकतो.
तुलशीच्या पाण्याच्या गुळण्या करा

तोंडाच्या अल्सर पासून सुटका मिळवण्याासाठी तुळस फायदेशीर ठरते. कारण तुळशीच्या पानात अँटीबॅक्टेरिअल, अँटीव्हायरल गुण असतात. तुळशीच्या पाण्याच्या सेवनाने व्हायरस आणि बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. त्यासाठी २ ग्लास पाण्यात १० ते १२ तुलशीची पानं घाला आणि उकळून घ्या. त्यानंतर थंड करा. या पाण्यात २ चमचे मीठ घालून गुळण्या करा. सलग दोन दिवस हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल.
हळद

हळद अँटीसेप्टीक आहे. अल्सर ही एक प्रकारची जखमच आहे. त्यामुळे तुम्ही दुधात हळद घालून पिऊ शकता. तुम्हाला हळदीचे सेवन अशापद्धतीने करता येईल. परिणामी रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा वाढते आणि तोंडातील अल्सरपासून आराम मिळतो.
नारळ

सुकं खोबरं, खोबर्याचं तेल तसेच नारळाचं पाणी हे तीनही घटक तोंडातील अल्सरपासून आराम मिळवण्यास मदत करतात. त्यासाठी सुकं खोबरं चखळून खा. सतत दोन दिवस हा प्रयोग केल्यास समस्या कमी होईल. याशिवाय नारळाचं पाणी शरीरातील उष्णता कमी करून शरीर थंड ठेवतं. म्हणून तुम्ही नारळपाणी पिऊन अल्सरची समस्या दूर करू शकता.
मध

मधात औषधी गुणधर्म असल्याने डिहायड्रेशनच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते. मधामुळे अल्सर कमी होण्यास मदत होते. मधातील अॅन्टी-मायक्रोबियल घटकांमुळे तोंडातील अल्सर लवकर बरा होण्यास मदत होते.

तस निश्चितपणे सांगता येणार नाही,
कारण तोंड येण्याची कारणं अनेक आहेत. जीवनसत्त्व ब (व्हिटॅमिन बी) च्या कमतरतेमुळे देखील असं होतं.
पण शक्यता नाकारता येत नाही..
कारण चहामुळे पित्त व उष्णतेचा त्रास होऊ शकतो, पित्ताचा अधिक त्रास वाढल्यास, अपचन झाल्यास व उष्णतेमुळे तोंड येण्याची अधिक शक्यता असते. जागरणामुळे देखील बर्याच जणांना हा त्रास होतो.
धन्यवाद😊

6
Answer link
तुमचे नेहमी तोंडात अल्सर येत असेल, तर तुम्ही तंबाखू खात असाल तर ते खायचे सोडून द्या. जेव्हा तोंडात अल्सर येतो त्यावेळेस मध आणि बदाम चा बारीक मिश्रण करून जिभेला लावा लगेच कमी होईल. तरी पण होत नसेल तर मेडिकलला बी कॉम्प्लेक्स (B Complex) टॅबलेट मिळते त्याने पण कमी होते.
5
Answer link
⛔डॉक्टर तपासताना जीभ बघतात याचे कारण जिभेच्या रंगावरून बरीच माहिती मिळू शकते. मुख्यत्वे रक्तक्षय (ऍनिमिया) सहज कळतो. काहींची जीभ पांढरी असते, त्याचे प्रमुख कारण शरीरात पाण्याची कमतरता झालेली असते. या पांढऱ्या जिभेवर बुरशी वाढली तर ती काळी दिसते. काही व्यक्तींना पदार्थाची चव बदललेली वाटते. साखर नकोशी वाटते. पेपरमिट खारट लागू लागते. आहारात जस्ताचा अभाव होण्याने असे होते.
🔖उपाय --डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मल्टी व्हिटॅमिन आणि बी कॉम्प्लेक्सच्या सप्लीमेंट्स घ्याव्यात.
अॅन्टीबायोटिक्स, अॅन्टी फंगल औषधे डॉक्टरांकडून घ्यावीत. कोमट दुधात हळद घालून प्यावे. शुद्ध गेरूची पूड, हळद आणि मध यांचे मिश्रण तोंडातील जखमा आणि व्रणांवर लावावे.