2 उत्तरे
2 answers

पुरुषांसाठी गर्भनिरोधक औषध आहे का?

3
*⭕ आता पुरुषांसाठीही आली गर्भनिरोधक 💊गोळी! ⭕*
          
*❏ 💊अमेरिकेत वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी आता चक्क पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळीविकसित केली आहे. शंभर पुरुषांवर या गोळीची यशस्वी चाचणीही करण्यात आली असून ही  गोळी पूर्णपणे सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे त्यांनीम्हटले आहे. ही गोळी महिलांकरिता असलेल्या गर्भनिरोधक गोळीप्रमाणेच आहे. आता पुरुषही रोज एक गोळी खाऊन गर्भनिरोध करू शकतील, असेत्यांनी म्हटले आहे.💊
💊खास पुरुषांसाठी तयार करण्यात आलेल्या या तोंडावाटे खाण्याच्या गर्भनिरोधक गोळीचे नाव *‘डिमेथॅनड्रोलोन अनडिकॅनोट’ (डीएमएयू)* असे आहे. या गोळीत टेस्टॉस्टेरॉनप्रमकाणेच पुरुष हार्मोन अँड्रोजन आणि प्रोजेस्टाईनची एकत्र क्रियाअसते. वॉशिंग्टन विद्यापीठातील स्टेफनी पेज यांनी हे संशोधन केले आहे. शिकागो येथे झालेल्या एंडोक्राईन सोसायटीच्या वार्षिक सभेत प्रा. पेज यांनी हे संशोधन मांडले. 18 ते 50 वर्षे वयोगटातल्या पुरुषांवर या गोळीची चाचणी घेण्यात आली. पेज यांनी सांगितले, ‘पुरुषांसाठी याआधी अनेक प्रकारचे इंजेक्शन तसेच जेल विकसित केले गेले; पण त्यापेक्षा ही गोळी एक चांगला पर्याय असल्याचे बहुतांश पुरुषांचे म्हणणे आहे.’ गर्भनिरोधकांच्या क्षेत्रात ही गोळी म्हणजे एक मोठे पाऊल ठरू शकते, असेही म्हटले जात आहे.

0

पुरुषांसाठी गर्भनिरोधक औषधं विकसित करण्यावर संशोधन चालू आहे, पण सध्या बाजारात फक्त दोन पर्याय उपलब्ध आहेत:

  1. कंडोम (Condom): हे सर्वात सोपे आणि स्वस्त साधन आहे.
  2. पुरुष नसबंदी (Vasectomy): ही एक शस्त्रक्रिया आहे, ज्यामध्ये शुक्राणूंचे वहन रोखले जाते.

संशोधनानुसार, लवकरच पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या आणि जेल (gel) बाजारात येऊ शकतात. या गोळ्या टेस्टोस्टेरॉन (testosterone) आणि प्रोजेस्टिन (progestin) यांसारख्या हार्मोन्सवर आधारित असतील, जे शुक्राणूंची निर्मिती कमी करतील.

अधिक माहितीसाठी तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

Disclaimer: गर्भनिरोधक औषधांविषयी अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1620

Related Questions

कुटुंब नियोजनाचे फायदे कोणते?
दोन मुले झाली आहेत, तिसरे मुल नको आहे, त्यासाठी कशी काळजी घ्यावी?
गर्भ न राहण्यासाठी मासिक पाळीनंतर किती दिवसांनी संभोग करावा?
संतती नियमनाची साधने कोणती?
मला कुटुंब नियोजन करायचे आहे, म्हणजे एका बाळानंतर दुसरे बाळ होण्यासाठी ५ वर्षांचे अंतर ठेवायचे आहे. ऑपरेशन किंवा कॉपर टी न बसवता काही ठोस म्हणजे खात्रीशीर उपाय आहे का? मी एका इंजेक्शनबद्दल ऐकले आहे, पण माहिती अपुरी आहे. तरी कृपया मार्गदर्शन करावे.
आम्हाला ३/४ वर्ष गर्भधारणा नको आहे त्यासाठी काय करावे? अनुभव सांगा. मेडिकल ट्रीटमेंट नको पाहिजे.
मला माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत?