व्हॅलेंटाईन जागतिक दिवस इतिहास

व्हॅलेंटाईन डे चा काही इतिहास आहे का?

3 उत्तरे
3 answers

व्हॅलेंटाईन डे चा काही इतिहास आहे का?

9
  • *👩‍❤‍👩का साजरा केला जातो व्हॅलेंटाइन डे ?🤔*
*🌹🌹*

*❤_व्हॅलेंटाइन डे जसजसा जवळ येतो तसतसं तरूणाईमध्ये प्रेमाचा अंकुर फुलत जातो. या दिवशी प्रियकर आपल्या प्रेयसीसमोर प्रेम व्यक्त करतो. युवक हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करतात. मात्र, व्हेलेंटाइन दिवस केव्हापासून आणि का साजरा केला जातोय? याबाबतीत अनेक विसंगती आहेत._*

💁🏻‍♂संत व्हेलेंटाइन यांना इसवी सन 270 च्या फेब्रुवारी महिन्याच्या मध्यास दफन करण्यात आले होते, असे काही ठिकाणी म्हटले जाते. त्यावेळी रोममध्ये सम्राट क्वॉलिडियसचे राज्य होते. लग्न केल्यामुळे पुरूषांची शक्ती आणि बुद्धी कमी होते, असे क्वॉलिडियसला वाटत असत. त्यामुळे त्याने कोणत्याही सैनिकाने आणि अधिका-याने लग्न करू नये, असा मुलूखावेगळा नियम बनवला होता. संत व्हॅलेंटाइनने सम्राटाच्या या आदेशाला विरोध केला. तेव्हापासून त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रेम दिवस म्हणजेच व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो.

💁🏻प्राचीन रोममध्ये फेब्रुवारीला सफाई करण्याचा महिना देखील म्हणतात. तेथील लोक यावेळी घराची रंगरंगोटी करतात. काही इतर दंतकथांप्रमाणे रोमनच्या तुरूंगात कैद असलेल्या ख्रिश्‍चन लोकांचा छळ करण्यात येत होता. त्यांना तुरूंगातून पळण्यास व्हॅलेंटाइन यांनी मदत केली होती. त्यामुळे सम्राटाने त्यांना मारले, असे म्हटले जाते. तर काही ठिकाणी, व्हॅलेंटाइन स्वत: तुरूंगात होते. त्यावेळी व्हॅलेंटाइन आणि जेलरच्या मुलीबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले. जेलरची मुलगी रोज व्हॅलेंटाइन यांना भेटायला यायची. पहिल्यांदा व्हॅलेंटाइन यांनी स्वत:लाच व्हॅलेंटाइन ग्रिटिंग कार्ड पाठवले होते. त्या ग्रिटिंग्जच्या खाली 'तु माझी व्हॅलेंटाइन बनशील काय ?', असे लिहिले होते. तेव्हापासून ही परंपरा अस्तिवात आली. त्यामुळे संत व्हॅलेंटाइन यांच्या स्मृतीनिमित्त आजही व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो.
उत्तर लिहिले · 14/2/2019
कर्म · 569225
3
व्हॅलेंटाइन डेचा इतिहास

रोम राज्यातून व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो.

रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असं मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्‍यांचाही त्याला राग यायचा.

संत व्हॅलेंटाइनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला. केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाइनला तुरुंगात डांबलं.

तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाइनचा जीव जेलरच्या मुलीवर आला. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली होती.

फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने प्रेयसीला पत्र लिहिले आणि पत्राचा शेवट 'युअर व्हॅलेंटाइन' असा केला. तेव्हापासूनच १४ फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो, अशी अख्यायिका आहे.

व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची सुरुवात कधीपासून झाली?

सर्वात पहिल्यांदा व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची सुरूवात झाली ४९६मध्ये.

प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी एक विशिष्ट असा दिवस असण्याची प्रथा फार पूर्वीपासून होती. रोमन फेस्टिवलमधून याची खरी सुरुवात झाली.

रोमनमध्ये मध्य फेब्रुवारीमध्ये ल्युपर्सिया नावाचा सण साजरा केला जातो. म्हणजेच वसंत ऋतुची सुरुवात.


सेलिब्रेशनचा भाग म्हणून, मुलं मुलींच्या नावाची चिठ्ठी एका बॉक्समधून काढतात. त्यानंतर या फेस्टिवलदरम्यान, ते दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात, आणि नंतर त्यांना वाटलं तर ते एकमेकांशी लग्न देखील करू शकतात.

त्यानंतर चर्चने हा फेस्टिवल संत व्हॅलेंटाइन यांच्या स्मृतीत ख्रिचन धर्मात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला.

पण कालांतराने, संत व्हॅलेंटाइनच्या नावाने लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तींजवळ आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली.

मग आता तुम्ही कसली वाट पाहताय? घ्या संत व्हॅलेंटाइनचं नाव आणि करा आपल्या भावना व्यक्त. :)


चला आता पाहूयात भारतातील इतिहास


वसंतपंचमीला विठ्ठल- रखुमाईचं लग्न झालं असं मानतात. पंढरपुरात वसंत पंचमीला हा देवाचा लग्नसोहळा रंगतो. यंदाही विठ्ठल- रखुमाईचा लग्नसोहळा पंढरपुरात रंगला. पांढऱ्याशुभ्र पोषाखात अलंकारानं नटलेला विठोबा आणि सालंकृत रखुमाईची मूर्ती यांच्यामध्ये आंतरपाट धरून लग्न लावलं जातं. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत विठ्ठलाला शुभ्र पोषाख करून गुलाल उधळण्याची प्रथा आहे, असं म्हणतात.

देशातल्या काही भागात वसंत पंचमीला सरस्वतीची पूजा करण्याची पद्धत आहे. त्याच बरोबर अनेक ठिकाणी आजच्या दिवशी कामदेव आणि रती यांचं पूजन करण्याचीही प्रथा आहे.

याविषयी पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले, "भारतीय संस्कृतीत प्रेमाचं वेगळं महत्त्व आहे. आजचा दिवस प्रेमात, आनंदात घालवतात. भारतात अनेक ठिकाणी रती आणि कामदेव यांचं पूजन करण्याची प्रथा आहे. हा भारतीयांचा व्हॅलेनटाईन डे आहे असं म्हटलं तरी हरकत नाही."
पुराणाचे अभ्यासक आणि प्रसिद्ध लेखक देवदत्त पटनाईक सांगतात, "कालिदासाच्या काळात वसंत पंचमीला 'मदनोत्सव' असं म्हटलं जात असे. या दिवशी मदनदेवता म्हणजे कामदेवतेची पूजा करण्याची प्रथा होती. आपण आपल्या शरीराची पूजा करायचो. रतिक्रीडेची पूजा व्हायची. रस, भाव, शृंगार यांचा हा उत्सव आहे."

पुराणांमध्ये उल्लेख

पुराणांपेक्षा संस्कृत नाटकांमध्ये मदनोत्सवाचा उल्लेख आहे. 'मृच्छकटिक' किंवा कालिदासाच्या 'मालविकाग्निमित्र' या नाटकांत राजे-रजवाडे आपल्या राजवाड्यात मदनोत्सव साजरा करतात, असे उल्लेख आहेत. हळूहळू ही परंपरा लोप पावली, असं मुंबईत राहणारे पटनाईक सांगतात.

बंगालमध्ये अजूनही वसंत पंचमीला प्रेमाच्या उत्सवाचं रूप आहे. या दिवशी मुलं-मुली एकमेकांना प्रपोज करतात.

"पश्चिम बंगालमध्ये वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीची पूजा करतात. हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्याची परंपराही इथे जुनी आहे, पण गेल्या काही वर्षांत लोक दिवस प्रेमाचा दिवस 'व्हॅलेनटाईन डे'सारखाच साजरा करू लागले आहेत. आपल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडबरोबर वेळ घालवतात", असं कोलकत्यातले पत्रकार शुभम बोस सांगतात.

"पूर्वीच्या काळी सरस्वती पूजेच्या दिवशी मुली पहिल्यांदा साडी नेसत," अशी माहितीही शुभम बोस यांनी दिली.

वसंत पंचमी येते तो वसंत ऋतू प्रसन्न वातावरणाचा असतो. हवामान छान असतं. गुलाबी थंडी पडलेली असते. योगायोगाने व्हॅलेंटाईन डेही याच सुमारास येतो.

वसंत पंचमीला प्रेमासाठीचा शुभमुहूर्त आहे, असं अनेक जण मानतात.





उत्तर लिहिले · 9/2/2019
कर्म · 55350
0

होय, व्हॅलेंटाईन डे चा इतिहास आहे. व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) हा दिवस दरवर्षी 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवसाला 'प्रेमाचा दिवस' म्हणूनही ओळखले जाते.

व्हॅलेंटाईन डे चा इतिहास:

  • रोमन उत्सव: व्हॅलेंटाईन डे ची सुरुवात रोमन काळात झाली. त्यावेळी 'लुपरकॅलिया' नावाचा एक उत्सव फेब्रुवारी महिन्यात साजरा केला जात असे. हा उत्सव प्रजनन आणि शुद्धतेचे प्रतीक म्हणून साजरा केला जाई.
  • सेंट व्हॅलेंटाईन: असे मानले जाते की तिसऱ्या शतकात रोममध्ये सेंट व्हॅलेंटाईन नावाचे एक पाद्री होते. त्यावेळी सम्राट क्लॉडियसने सैनिकांना लग्न करण्यास मनाई केली होती, कारण विवाहित पुरुष चांगले सैनिक बनू शकत नाहीत असे त्याचे मत होते. सेंट व्हॅलेंटाईनने मात्र अनेक सैनिकांचे गुप्तपणे विवाह लावून दिले. त्यामुळे त्याला कैद करण्यात आले आणि 14 फेब्रुवारीला त्याची फाशी देण्यात आली. त्याच्या स्मरणार्थ हा दिवस 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातो.
  • प्रेमाचा दिवस: मध्ययुगात, 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेम आणि रोमान्सशी जोडला गेला. लोक एकमेकांना प्रेमपत्रे आणि भेटवस्तू देऊ लागले.

आजकाल व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लोक आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देतात, त्यांच्यासोबत वेळ घालवतात आणि आपल्या भावना व्यक्त करतात.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

सूर्यदिन केव्हा साजरा केला जातो?
जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो?
जागतिक वसुंधरा दिन म्हणजे काय?
जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा करतात?
जागतिक वसुंधरा दिन म्हणजे काय? तो कशासाठी साजरा करतात?
15 डिसेंबर: जागतिक चहा दिना विषयी सविस्तर माहिती द्या?
जागतिक सूर्य दिन कधी साजरा केला जातो?