Topic icon

जागतिक दिवस

0

सूर्यदिन दरवर्षी 3 मे रोजी साजरा केला जातो.

हा दिवस सौर ऊर्जेच्या (Solar energy) महत्‍वाबद्दल जागरूकता निर्माण करण्‍यासाठी समर्पित आहे.

उद्देश:

  • सौरऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे.
  • पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी करणे.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
1

जागतिक पर्यावरण दिन 






पर्यावरण हा शब्द परि आणि आवरण या दोन शब्दांनी बनलेला आहे ज्यामध्ये परि म्हणजे आपल्या अवतीभवती किंवा आपल्या सभोवताली.आवरण म्हणजे आपल्या सभोवताल जे व्यापले आहे.

पर्यावरण हे वातावरण,हवामान,स्वच्छता,प्रदूषण आणि झाडांपासून बनलेले आहे.सर्व गोष्टी म्हणजेच पर्यावरणाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंध आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो.  

मनुष्य आणि पर्यावरण एकमेकांवर अवलंबून आहे. प्रदूषण किंवा झाडांची कमतरता या पर्यावरणीय प्रदूषणाचा थेट परिणाम मानवी शरीरावर आणि आरोग्यावर होतो.मानवाच्या चांगल्या सवयी जसे की झाडांची जोपासना करणे. प्रदूषण रोखणे,स्वच्छता राखणे या साऱ्या गोष्टी पर्यावरणाला प्रभावित करतात.मानवाच्या वाईट सवयी जसे की  

पाणी घाण करणे,पाण्याचे अपव्यय करणे,झाडे कापणे,या गोष्टी पर्यावरणाला प्रभावित करतात.याचा परिणाम म्हणजे नैसर्गिक आपत्तींना सामोरी जावे लागते.

संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेला हा दिवस जागतिक पातळीवर पर्यावरणा विषयी जागरूकता आणण्यासाठी साजरा केला जातो. याची सुरुवात 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 5 जून ते 16 जून या कालावधीत आयोजित जागतिक पर्यावरण परिषदेत केली. पहिला जागतिक पर्यावरण दिन 5 जून 1973 रोजी साजरा करण्यात आला.
पर्यावरणाच्या जैविक घटकांमध्ये सूक्ष्मजीवांपासून कीटक, प्राणी आणि वनस्पती आणि सर्व जैविक क्रियाकलाप आणि त्यांच्याशी संबंधित प्रक्रियांचा समावेश आहे.

वातावरणाच्या अजैविक घटकांमध्ये निर्जीव घटक आणि त्यांच्याशी संबंधित प्रक्रिया असतात, जसे की पर्वत, खडके,नदी,वारं आणि हवामान घटक.सर्वसाधारणपणे,हे सर्व जैविक आणि अजैविक घटक, तथ्य, प्रक्रिया आपल्या जीवनावर परिणाम पाडणाऱ्या घटनांचा समावेश असलेले एक घटक आहे. हे आपल्या सभोवताली व्यापलेले आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक प्रसंग या पर्यावरणावर अवलंबून आहे आणि तसेच ते संपादित केले जाते. मानवांनी केलेल्या सर्व कृतींचा पर्यावरणावर थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम होतो. अशा प्रकारे, जीव आणि पर्यावरणामध्ये देखील एक संबंध आहे,जो परस्पर अवलंबून आहे. 

मानवी हस्तक्षेपाच्या आधारे, पर्यावरणाची दोन भागात विभागणी केली जाऊ शकते, पहिली नैसर्गिक किंवा नैसर्गिक वातावरण आणि मानवनिर्मित वातावरण. ही विभागणी नैसर्गिक प्रक्रिया आणि परिस्थितीत मानवी हस्तक्षेपाच्या अत्यधिक प्रमाणात आणि कमतरतेनुसार आहे.

प्रदूषण, हवामान बदल इत्यादी पर्यावरणीय समस्या मानवाला त्यांच्या जीवनशैलीबद्दल पुनर्विचार करण्यास प्रवृत्त करत आहे आणि आता पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरण व्यवस्थापन करणेआवश्यक आहे.आज आपल्याला सर्वात जास्त गरज आहे ती म्हणजे सर्वसामान्यांना आणि सुशिक्षित वाचकांना पर्यावरणाच्या संकटाची जाणीव करुन देण्याची आणि पर्यावरणाच्या रक्षणाची प्रतिज्ञा घेण्याची.आपण आपल्या पर्यावरणाचा सांभाळ करू.अशी प्रतिज्ञा घेऊ या.आणि आपल्या पर्यावरणाचे रक्षण करू या.
 
 

उत्तर लिहिले · 25/6/2022
कर्म · 53715
1
पृथ्वी दिन हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर पाळण्यात येतो. अमेरिकेत २२ एप्रिल रोजी हा दिन पाळला जातो, तर संयुक्त राष्ट्रे २० मार्च रोजी, म्हणजे सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थेट समोर असण्याच्या दोन बिंदूपैकी एका बिंदूशी पोचण्याच्या दिवशी, संपातबिंदू पॄथ्वी दिन पाळतात.




पृथ्वी दिन हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर पाळण्यात येतो. अमेरिकेत २२ एप्रिल रोजी हा दिन पाळला जातो, तर संयुक्त राष्ट्रे २० मार्च रोजी, म्हणजे सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थेट समोर असण्याच्या दोन बिंदूपैकी एका बिंदूशी पोचण्याच्या दिवशी, संपातबिंदू पॄथ्वी दिन पाळतात.


पृथ्वी दिनासाठी जॉन मक्डॉनेल याने बनवलेला अनधिकृत ध्वज
पर्यावरणरक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचा सिनेटर गेलॉर्ड नेल्सन याने २२ एप्रिल, इ.स. १९७० रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिनाचे आयोजन केले. पहिला पृथ्वी दिन अमेरिकेत पाळला गेला, तरीही त्या कार्यक्रमाचा राष्ट्रीय समन्वयक असलेला डेनिस हेस याने स्थापलेल्या संस्थेने इ.स. १९९० साली १४१ देशांमध्ये या दिवसाचे आयोजन करून पृथ्वी दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. सध्या अर्थ डे नेटवर्क या संस्थेच्या समन्वयाने १७५ देशांमधून हा दिवस साजरा केला जातो. इ.स. २००९ साली संयुक्त राष्ट्रांनी २२ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय धरणीमाता दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली.


उत्तर लिहिले · 19/11/2021
कर्म · 121765
0
२२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. अमेरिकन सिनेटर गेलोर्ड नेल्सन यांनी एका मोठ्या पर्यावरण- रक्षणाच्या आंदोलनाची हाक दिली. निमित्त होतं अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधील सांता बार्बरा इथल्या तेलगळतीमुळे निर्माण झालेल्या प्रदुषणाचं! २२ एप्रिल १९७० साली अमेरिकेत दोन कोटी नागरिकांच्या उपस्थितीत पहिला वसुंधरा दिवस साजरा झाला.

युनायटेड नेशन्सच्या हवामान बदलासंबंधीच्या (UNFCC) एका रिपोर्टनुसार, येत्या काही दशकांमध्ये, विशेषत: विकसनशील राष्ट्रांमधील लाखो लोक हवामान बदलामुळे उद्भवलेल्या अन्नपाण्याच्या कमतरतेमुळे आणि आरोग्याच्या समस्येमुळे मृत्युमुखी पडतील असा अंदाज आहे. ऊन, वारा, थंडी, पावसाची अनिश्चितता, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ, त्यामुळे येणारे पूर, भूकंप हे हवामान बदलाचेच परिणाम आहेत.
वसुंधरेला वाळवंट होण्यापासून वाचवायचे असेल तर आतापासूनच पर्यावरण संरक्षण करणे आवश्यक आहे. वृक्षारोपणासोबतच प्रदुषण कमी करण्याची नितांत आवश्यकता आहे.
 🌴🌿🌴
2
वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. आहे. ‘माणसाची प्रत्येक गरज पृथ्वी पूर्ण करू ष्टे पण हाव नाही’ अशा अर्थाचे महात्मा गांधींचे एक वचन आहे. हवा, पाणी, जंगले यांसारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा भसाभस अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदुषणाचे परिणाम दिसतच आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवाचेच भविष्य अंध:कारमय आहे हे निश्चित ! याबाबत प्रबोधन करण्यासाठी २२ एप्रिल हा वसुंधरा दिन मानला जाऊ लागला.

मूळ संकल्पना व सुरुवात
वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी मांडली. त्यांनी अमेरिकेतील २ कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. प्रदूषण आणि वन्यजीवांचा –हास या मुद्यावर तेथील समाजाच्या सर्व थरांतील लोकांनी आवाज उठवला. हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग यांच्या संरक्षणासाठी तेथे मोठा राजकीय दबाव निर्माण झाला अशा प्रकारे १९७० सालापासून हा ‘अर्थ डे’ जगभर साजरा केला जात आहे.

अधिक माहिती
पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात सर्वात मोठी भूमिका आहे जंगलांची. अगदी शहरी भागातही भरपूर झाडे त्यानुसार सर्व प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष मार्गांनी जंगलतोड कमी करणे, अधिक झाडे लावणे, प्रदूषण घटवणे, योग्य जीवनशैली राखणे अशा मुद्यांवर सर्वांगीण जागृती व प्रसार करणे आवश्यक आहे. या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्ती आणि संस्थांना विविध बक्षीसेही दिली जातात.

आपण काय करू शकतो
सर्व प्रसारमाध्यमांतून समाजात जागृती करणे व माहिती पुरवणे
पर्यावरण मित्र गटांच्या (इको क्लब) सदस्यांना या विषयांवरील चित्रपट इ. दाखवणे.
प्रदर्शने, स्पर्धा, चर्चा इ. चे आयोजन
स्वत:ची जीवनशैली तपासून पर्यावरणास हानिकारक बाबींचा वापर टाळणे.
स्थानिक प्रजातींची झाडे वापरून वृक्षारोपण
अपारंपरिक योग्य उर्जास्रोतांचा वापर
पर्यावरण- संरक्षणासंबंधी विविध अभ्यासक्रमांची माहिती नेटवरून मिळवणे. भावी छंद तसेच करिअर जोपासण्यासाठी देखील याचा उपयोग होईल..
उत्तर लिहिले · 14/11/2020
कर्म · 39105
4
*🍵 आज जागतिक चहा दिन 🍵*
‼ उत्साहवर्धक ‘चहा’  ‼*_

        भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांगलादेश, इंडोनेशिया, केनिया, मलेशिया, युगांडा, टांझानिया, दक्षिण आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला हे सांगणं कठीण असलं तरी चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळते. चहा हा शब्द चिनी भाषेतील ‘चा’ या शब्दापासून रूढ झाला आहे. चिनी भाषेतून जपान, भारत, इराण आणि रशिया या देशांत हा अथवा तशा प्रकारचे शब्द रूढ झाले आहेत. इंग्रजी भाषेतील टी या शब्दाचा उगम चीनमधील मॉय प्रांतातील बोली भाषेतील ‘टे’ या शब्दात आहे. डच लोकांनी जावामार्गे हा शब्द युरोपात नेला. इंग्रजी भाषेत अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत चहाला ‘टे’ हा शब्द रूढ होता. त्यानंतर त्याचा उच्चार ‘टी’ असा करण्यात येऊ लागला.

जगातील एकूण 26 देशांत चहाची लागवड करण्यात येते. यामध्ये चीन, जपान, भारत, बांगलादेश, श्रीलंका, तैवान, इंडोनेशिया, मलेशिया, पूर्व आफ्रिका (केनिया, मालावी, युगांडा आणि मोझांबिक), तुर्कस्तान, ब्राझील, अर्जेंटिना आणि रशिया यांचा समावेश आहे. चीन आणि जपानमध्ये मुख्यत: छोटे शेतकरी चहाची लागवड करतात. याउलट भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया, श्रीलंका, रशिया आणि पू. आफ्रिकेतील देश या देशांत ती मोठ्या मळ्यांत करण्यात येते. अर्थात, यांतील काही देशांत चहाची लागवड करणार्‍या लहान जमीनधारकांचे क्षेत्रही मोठे आहे. भारतातील चहाची लागवड मुख्यत्वेकरून उत्तर व दक्षिण भारतातील डोंगराळ भागांत आहे. आसाम हा चहाच्या लागवडीमध्ये प्रथमपासून अग्रेसर प्रदेश आहे. त्या राज्यातील ब्रह्मपुत्रा आणि सुरमा या नद्यांच्या खोर्‍यांतील प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग, जलपैगुरी, कुचबिहार आणि तराई हे उत्तर भारतातील चहाच्या लागवडीचे प्रमुख प्रदेश आहेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,कांग्रा, कुमाऊँ आणि डेहराडून जिल्ह्यांतही चहाची लागवड लहान प्रमाणात होते. आसाममधील चहाचे क्षेत्र सर्वात जास्त असले, तरी त्याची विभागणी फक्त 750 मळ्यांत आहे. याउलट, तामिळनाडूमध्ये फक्त 34,646 हेक्टर क्षेत्रात 6,450 मळे आहेत. केरळमधील मळ्यांची संख्या 3,032 आहे. आसाममधील ब्रह्मपुत्रेच्या खोर्‍यात (याला ‘आसाम व्हॅली’ असेही नाव आहे) चहाच्या लागवडीसाठी सर्वात अनुकूल परिस्थिती असल्यामुळे जगातील सर्वात मोठे सलग चहाचे क्षेत्र या भागात आहे. चहाच्या लागवडीसाठी सुरमा खोर्‍यांतील हवामान ब्रह्मपुत्रेच्या खोर्‍याइतके चांगले नाही. भारताच्या ईशान्य भागात तयार होणार्‍या चहामध्ये दार्जिलिंग चहा विशेष स्वादयुक्त असतो. दुसर्‍या महायुद्धानंतर सी.टी.सी. पद्धतीने उत्तर भारतातील मळ्यांत फार मोठ्या प्रमाणावर चहा तयार होऊ लागला आहे. या भागात जवळजवळ पन्नास टक्के चहा या पद्धतीने होतो, असा अंदाज आहे. दक्षिण भारतात ही पद्धत फारशी उपयोगात आणली जात नाही. अलीकडे या यंत्रात आणखी सुधारणा करण्यात आल्या आहेत. या पद्धतीने तयार केलेला चहा सी. टी. सी. चहा या नावाने बाजारात विकला जातो व तो काळ्या चहाचाच प्रकार आहे.
चहा हे शरीराला हितकारक आणि उत्साहवर्धक पेय आहे, याबद्दल दुमत नाही. मेंदूपेक्षाही स्नायूंना हे पेय जास्त उत्साहवर्धक आहे. माफक प्रमाणात चहाचे सेवन केल्यास शारीरिक थकवा कमी होतो. शरीराला आणि मनाला तरतरी आणणार्‍या या पेयामध्ये आरोग्याला उपकारक ठरतील, असे अनेक गुणधर्म आढळून येतात. आपले आरोग्य राखण्याकरिता चहाचे असलेले महत्त्व वैद्यकीय संशोधनातून आढळून आले आहे. जगभरातील संशोधकांनी आपले आरोग्य निरामय राखण्यात चहाची भूमिका महत्त्वाची असते असा निर्वाळा दिला आहे. नियमित चहा घेतल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, असा दावा काही संशोधकांनी केला आहे. चहामध्ये असलेले विशिष्ट गुणधर्म शरीरातील कोलेस्टरॉलच्या वाढीस प्रतिबंध करतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. याचबरोबरच ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, अशा व्यक्तींचा रक्तदाब नियंत्रित राखण्यात चहाची मदत होते, असेही संशोधकांचे म्हणणे आहे.
ग्रीन टीचे महत्त्व या पूर्वीच संशोधनातून सिद्ध झाले आहे; मात्र ग्रीन टीबरोबरच आपण जो चहा पितो त्यामध्येही अनेक औषधी गुणधर्म आहेत, असे संशोधकांचे म्हणणे आहे. चहामध्ये फ्लॅवोनाईड नावाचे अँटिऑक्सिडंट असतात. हे अँटिऑक्सिडंट हृदयविकार, रक्तदाब, कर्करोग यासारख्या गंभीर आजारांना प्रतिबंध करण्याची भूमिका पार पाडतात, असा संशोधकांचा दावा आहे.
चहामधील अनेक घटकांमुळे आपल्या शरीराला वेगवेगळे फायदे होतात. त्यामुळे दिवसातून किमान एकदा ग्रीन, ब्लॅक टीचा एक कप घेतला पाहिजे. ग्रीन टीबरोबरच ब्लॅक टीमध्येही शरीरातील चरबी जाळण्याची क्षमता असते, असे संशोधनात आढळले. वजन कमी करण्याकरिता आपण अनेक जण आहारावर निर्बंध आणतो. वजन कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा यासाठीचा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो; मात्र आपण सकाळी उठल्या उठल्या घेत असलेल्या चहामध्येही वजन नियंत्रणात आणण्याची क्षमता आहे, हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नाही. चहामधील कॅटेचिन या घटकात आपल्या शरीरातील उष्मांक (कॅलरी) जाळण्याची मोठी क्षमता आहे, असेही संशोधकांना आढळून आले आहे.
हाडे मजबूत बनविण्याकरिता आणि हाडांची ताकद वाढविण्याकरिता चहाचे सेवन उपयुक्त ठरते. वयोमानानुसार हाडे ठिसूळ होऊ लागतात. हाडे ठिसूळ होऊ लागल्याने सांधेदुखीसारख्या अनेक व्याधी आपल्या मागे लागतात; मात्र नियमित चहा प्यायल्याने हाडे मजबूत होतात. ज्यांना उच्च रक्तदाबाच्या व्याधीचा त्रास आहे, अशा रुग्णांकरिता चहा उपयुक्त ठरतो. नियमित चहा घेण्याने उच्च रक्तदाब कमी होतो. शरीराला ऊर्जा पुरविण्याचे कामही या पेयाद्वारे होत असते. 
____________________________


6
५ मे जागतिक सूर्य दिन साजरा केला जातो...
            
उत्तर लिहिले · 10/8/2019
कर्म · 458560