2 उत्तरे
2
answers
जागतिक वसुंधरा दिन म्हणजे काय? तो कशासाठी साजरा करतात?
2
Answer link
वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. आहे. ‘माणसाची प्रत्येक गरज पृथ्वी पूर्ण करू ष्टे पण हाव नाही’ अशा अर्थाचे महात्मा गांधींचे एक वचन आहे. हवा, पाणी, जंगले यांसारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा भसाभस अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदुषणाचे परिणाम दिसतच आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवाचेच भविष्य अंध:कारमय आहे हे निश्चित ! याबाबत प्रबोधन करण्यासाठी २२ एप्रिल हा वसुंधरा दिन मानला जाऊ लागला.
मूळ संकल्पना व सुरुवात
वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी मांडली. त्यांनी अमेरिकेतील २ कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. प्रदूषण आणि वन्यजीवांचा –हास या मुद्यावर तेथील समाजाच्या सर्व थरांतील लोकांनी आवाज उठवला. हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग यांच्या संरक्षणासाठी तेथे मोठा राजकीय दबाव निर्माण झाला अशा प्रकारे १९७० सालापासून हा ‘अर्थ डे’ जगभर साजरा केला जात आहे.
अधिक माहिती
पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात सर्वात मोठी भूमिका आहे जंगलांची. अगदी शहरी भागातही भरपूर झाडे त्यानुसार सर्व प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष मार्गांनी जंगलतोड कमी करणे, अधिक झाडे लावणे, प्रदूषण घटवणे, योग्य जीवनशैली राखणे अशा मुद्यांवर सर्वांगीण जागृती व प्रसार करणे आवश्यक आहे. या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्ती आणि संस्थांना विविध बक्षीसेही दिली जातात.
आपण काय करू शकतो
सर्व प्रसारमाध्यमांतून समाजात जागृती करणे व माहिती पुरवणे
पर्यावरण मित्र गटांच्या (इको क्लब) सदस्यांना या विषयांवरील चित्रपट इ. दाखवणे.
प्रदर्शने, स्पर्धा, चर्चा इ. चे आयोजन
स्वत:ची जीवनशैली तपासून पर्यावरणास हानिकारक बाबींचा वापर टाळणे.
स्थानिक प्रजातींची झाडे वापरून वृक्षारोपण
अपारंपरिक योग्य उर्जास्रोतांचा वापर
पर्यावरण- संरक्षणासंबंधी विविध अभ्यासक्रमांची माहिती नेटवरून मिळवणे. भावी छंद तसेच करिअर जोपासण्यासाठी देखील याचा उपयोग होईल..
0
Answer link
जागतिक वसुंधरा दिन (World Earth Day) हा दरवर्षी २२ एप्रिल रोजी साजरा केला जातो.
हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश:
- पृथ्वी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे.
- पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे.
- नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे.
- प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे.
या दिवशी अनेक सामाजिक संस्था, सरकारी संस्था आणि नागरिक एकत्र येऊन पृथ्वीला वाचवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करतात.
अधिक माहितीसाठी: Earthday.org