3 उत्तरे
3
answers
15 डिसेंबर: जागतिक चहा दिना विषयी सविस्तर माहिती द्या?
4
Answer link
*🍵 आज जागतिक चहा दिन 🍵*
‼ उत्साहवर्धक ‘चहा’ ‼*_
भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांगलादेश, इंडोनेशिया, केनिया, मलेशिया, युगांडा, टांझानिया, दक्षिण आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला हे सांगणं कठीण असलं तरी चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळते. चहा हा शब्द चिनी भाषेतील ‘चा’ या शब्दापासून रूढ झाला आहे. चिनी भाषेतून जपान, भारत, इराण आणि रशिया या देशांत हा अथवा तशा प्रकारचे शब्द रूढ झाले आहेत. इंग्रजी भाषेतील टी या शब्दाचा उगम चीनमधील मॉय प्रांतातील बोली भाषेतील ‘टे’ या शब्दात आहे. डच लोकांनी जावामार्गे हा शब्द युरोपात नेला. इंग्रजी भाषेत अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत चहाला ‘टे’ हा शब्द रूढ होता. त्यानंतर त्याचा उच्चार ‘टी’ असा करण्यात येऊ लागला.
जगातील एकूण 26 देशांत चहाची लागवड करण्यात येते. यामध्ये चीन, जपान, भारत, बांगलादेश, श्रीलंका, तैवान, इंडोनेशिया, मलेशिया, पूर्व आफ्रिका (केनिया, मालावी, युगांडा आणि मोझांबिक), तुर्कस्तान, ब्राझील, अर्जेंटिना आणि रशिया यांचा समावेश आहे. चीन आणि जपानमध्ये मुख्यत: छोटे शेतकरी चहाची लागवड करतात. याउलट भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया, श्रीलंका, रशिया आणि पू. आफ्रिकेतील देश या देशांत ती मोठ्या मळ्यांत करण्यात येते. अर्थात, यांतील काही देशांत चहाची लागवड करणार्या लहान जमीनधारकांचे क्षेत्रही मोठे आहे. भारतातील चहाची लागवड मुख्यत्वेकरून उत्तर व दक्षिण भारतातील डोंगराळ भागांत आहे. आसाम हा चहाच्या लागवडीमध्ये प्रथमपासून अग्रेसर प्रदेश आहे. त्या राज्यातील ब्रह्मपुत्रा आणि सुरमा या नद्यांच्या खोर्यांतील प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग, जलपैगुरी, कुचबिहार आणि तराई हे उत्तर भारतातील चहाच्या लागवडीचे प्रमुख प्रदेश आहेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,कांग्रा, कुमाऊँ आणि डेहराडून जिल्ह्यांतही चहाची लागवड लहान प्रमाणात होते. आसाममधील चहाचे क्षेत्र सर्वात जास्त असले, तरी त्याची विभागणी फक्त 750 मळ्यांत आहे. याउलट, तामिळनाडूमध्ये फक्त 34,646 हेक्टर क्षेत्रात 6,450 मळे आहेत. केरळमधील मळ्यांची संख्या 3,032 आहे. आसाममधील ब्रह्मपुत्रेच्या खोर्यात (याला ‘आसाम व्हॅली’ असेही नाव आहे) चहाच्या लागवडीसाठी सर्वात अनुकूल परिस्थिती असल्यामुळे जगातील सर्वात मोठे सलग चहाचे क्षेत्र या भागात आहे. चहाच्या लागवडीसाठी सुरमा खोर्यांतील हवामान ब्रह्मपुत्रेच्या खोर्याइतके चांगले नाही. भारताच्या ईशान्य भागात तयार होणार्या चहामध्ये दार्जिलिंग चहा विशेष स्वादयुक्त असतो. दुसर्या महायुद्धानंतर सी.टी.सी. पद्धतीने उत्तर भारतातील मळ्यांत फार मोठ्या प्रमाणावर चहा तयार होऊ लागला आहे. या भागात जवळजवळ पन्नास टक्के चहा या पद्धतीने होतो, असा अंदाज आहे. दक्षिण भारतात ही पद्धत फारशी उपयोगात आणली जात नाही. अलीकडे या यंत्रात आणखी सुधारणा करण्यात आल्या आहेत. या पद्धतीने तयार केलेला चहा सी. टी. सी. चहा या नावाने बाजारात विकला जातो व तो काळ्या चहाचाच प्रकार आहे.
चहा हे शरीराला हितकारक आणि उत्साहवर्धक पेय आहे, याबद्दल दुमत नाही. मेंदूपेक्षाही स्नायूंना हे पेय जास्त उत्साहवर्धक आहे. माफक प्रमाणात चहाचे सेवन केल्यास शारीरिक थकवा कमी होतो. शरीराला आणि मनाला तरतरी आणणार्या या पेयामध्ये आरोग्याला उपकारक ठरतील, असे अनेक गुणधर्म आढळून येतात. आपले आरोग्य राखण्याकरिता चहाचे असलेले महत्त्व वैद्यकीय संशोधनातून आढळून आले आहे. जगभरातील संशोधकांनी आपले आरोग्य निरामय राखण्यात चहाची भूमिका महत्त्वाची असते असा निर्वाळा दिला आहे. नियमित चहा घेतल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, असा दावा काही संशोधकांनी केला आहे. चहामध्ये असलेले विशिष्ट गुणधर्म शरीरातील कोलेस्टरॉलच्या वाढीस प्रतिबंध करतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. याचबरोबरच ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, अशा व्यक्तींचा रक्तदाब नियंत्रित राखण्यात चहाची मदत होते, असेही संशोधकांचे म्हणणे आहे.
ग्रीन टीचे महत्त्व या पूर्वीच संशोधनातून सिद्ध झाले आहे; मात्र ग्रीन टीबरोबरच आपण जो चहा पितो त्यामध्येही अनेक औषधी गुणधर्म आहेत, असे संशोधकांचे म्हणणे आहे. चहामध्ये फ्लॅवोनाईड नावाचे अँटिऑक्सिडंट असतात. हे अँटिऑक्सिडंट हृदयविकार, रक्तदाब, कर्करोग यासारख्या गंभीर आजारांना प्रतिबंध करण्याची भूमिका पार पाडतात, असा संशोधकांचा दावा आहे.
चहामधील अनेक घटकांमुळे आपल्या शरीराला वेगवेगळे फायदे होतात. त्यामुळे दिवसातून किमान एकदा ग्रीन, ब्लॅक टीचा एक कप घेतला पाहिजे. ग्रीन टीबरोबरच ब्लॅक टीमध्येही शरीरातील चरबी जाळण्याची क्षमता असते, असे संशोधनात आढळले. वजन कमी करण्याकरिता आपण अनेक जण आहारावर निर्बंध आणतो. वजन कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा यासाठीचा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो; मात्र आपण सकाळी उठल्या उठल्या घेत असलेल्या चहामध्येही वजन नियंत्रणात आणण्याची क्षमता आहे, हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नाही. चहामधील कॅटेचिन या घटकात आपल्या शरीरातील उष्मांक (कॅलरी) जाळण्याची मोठी क्षमता आहे, असेही संशोधकांना आढळून आले आहे.
हाडे मजबूत बनविण्याकरिता आणि हाडांची ताकद वाढविण्याकरिता चहाचे सेवन उपयुक्त ठरते. वयोमानानुसार हाडे ठिसूळ होऊ लागतात. हाडे ठिसूळ होऊ लागल्याने सांधेदुखीसारख्या अनेक व्याधी आपल्या मागे लागतात; मात्र नियमित चहा प्यायल्याने हाडे मजबूत होतात. ज्यांना उच्च रक्तदाबाच्या व्याधीचा त्रास आहे, अशा रुग्णांकरिता चहा उपयुक्त ठरतो. नियमित चहा घेण्याने उच्च रक्तदाब कमी होतो. शरीराला ऊर्जा पुरविण्याचे कामही या पेयाद्वारे होत असते.
____________________________

2
Answer link
☕ _*WorldTeaDay :तुम्ही चहाचा इतिहास वाचलाय का?*_
💬 *MAHA DIGI | DAY-SPECIAL*
_15 डिसेंबर_
चहा हा आज, भारतीय जीवनशैलीचा एक भाग बनलाय. चहा शिवाय दिवसाची सुरुवात होत नाही आणि संध्याकाळी थकल्यानंतरही अंगात एनर्जी येण्यासाठी पुन्हा चहाचीच आठवण होते.
☕भारतीयांसाठी चहा हे एक नुसतं पेय नसून ते त्यांचं प्रेम आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ… दिवसातील कोणत्याही वेळी चहा घेणार का असं विचारल्यानंतर ‘हो’ उत्तर देणारे आपल्यापैकी अनेकजण आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की या चहाचा शोध कसा लागला?
🤔 *चहाचा शोध लागला कसा?*
*💁जाणून घ्या चहाच्या शोधाचा रंजक इतिहास :*
☕चहा हे ब्रिटिशांचं पेय मानलं जात असलं तरी तसं नाही. त्याचं मूळ प्राचीन चीनशी जोडलं जातं. असं सांगितलं जातं की ख्रिस्तपूर्व ३० वं शतक ते ख्रिस्तपूर्व २१ वं शतक या काळात कधीतरी चीनमध्ये चहाचा शोध लागला. ख्रिस्तपूर्व २७३७ मध्ये शेन नुंग हा तेव्हाचा सम्राट सत्तेवरून हाकलला गेला. त्याला दक्षिण चीनच्या दुर्गम भागात एकांतवासात ठेवलं गेलं. तो अतिशय कफल्लक अवस्थेत होता.
▪ चहा मुळात चीनमधला शोध असल्याची इतिहासात नोंद आहे. इ.स. पूर्व काळात चीनी राजा शेन नुंगच्या बागेत चहाचा शोध लागल्याची चीनच्या इतिहासात नोंद आहे. एकदा तो एका झाडाखाली बसून गरम पाणी पीत असताना त्याच्या कपातील गरम पाण्यात त्या झाडाची काही पानं पडली. त्यामुळे पाण्याचा रंग बदलला, चवही बदलली. सम्राटाला त्या पाण्यामुळे एकदम तरतरी आली. त्याला ती चवही इतकी आवडली की त्या काळात त्याने गरम पाण्यात ती पाने घालून ते पाणी प्यायचा सपाटाच लावला. त्याने त्या परिसरात म्हणजे सिचुआन आणि युनानच्या डोंगररांगांच्या त्या परिसरात चहाच्या रोपांचा शोध घेतला. सातत्याने चहा प्यायल्याने त्याचा पोटदुखीचा आजार बरा झाला असा प्रचार करत तो देशभर फिरू लागला. त्यातून आजच्या चहाचा जन्म झाला असं मानलं जातं. नंतर चीनमधून चहाची लोकप्रियता जगभर पसरत गेली.
नुंग एकदा बागेत गरम पाणी पीत असताना त्याच्या पेल्यात एक झाडाचे पान पडले. त्यानंतर त्या पाण्याचा रंग बदलला आणि सुंगंध आला. राजानं त्या पाण्याची चव घेतली आणि त्याला ती आवडली, अशा रंजक पद्धतीनं चहाचा शोध लागल्याचं सांगितलं जातं.
__________________________
*जाहिरातीसाठी संपर्क :-* 9168390345
__________________________
▪ चहा विषयी एक आणखी कथा सांगितली जाते ती म्हणजे, चीनच्या हुनान प्रांतात आठव्या शतकात बौद्ध भिक्कू ध्यान साधना करायचे. त्यासाठी ते जागरण करायचे. ध्यान धारणेसाठी जागरण करताना ते चहाची पाने चघळायचे. पुढं याच पानांचा चहा तयार झाला.
💫 *भारतात चहा कसा आला?*
☕चहाच्या क्षेत्रातली चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची लागवड सुरू केली आणि भारतीयांना खऱ्या अर्थाने चहाचा परिचय झाला. असं असलं तरी भारतात चहा अगदीच माहीत नव्हता असं नाही. काही भागात त्याचा फक्त औषधी वापर होत होता इतकंच. ब्रिटिशांनी आसामच्या खोऱ्यात आणि दार्जिलिंगच्या डोंगरांमध्ये चहाची लागवड सुरू केली. १४ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर भारतात चहाचं उत्पादन जोर धरू लागलं. हळूहळू चीन इतकाच चहा भारतात तयार होऊ लागला. आज भारत चीननंतरचा म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे.
1824मध्ये मान्यमार (त्यावेळचा बर्मा) आणि आसाममध्ये चहाची रोपं सापडल्याची नोंद आहे. त्यामुळं चहा भारतात होताच. फक्त त्याचं व्यवसायिक उत्पादन सुरू करण्यात इंग्रजांनी मोठा वाटा उचलला आहे. भारतात 1836मध्ये आणि श्रीलंकेत 1867मध्ये इंग्रजांनी चहाचं उत्पादन सुरू केलं. इंग्लंडमधील चहाची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशानं त्यांनी भारतात चहाचं उत्पादन सुरू केलं होतं.
📍 आज, भारतच चहाची मोठी बाजारपेठ बनला आहे. भारतात कोपऱ्या कोपऱ्यांवर चहाच्या टपऱ्या पहायला मिळतील. आज, इंग्रज चहाला विसरले आणि भारतीयांनी त्या चहाला आपलंसं करून ठेवलंय.
___________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर न्यूज,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6

0
Answer link
जागतिक चहा दिवस (आंतरराष्ट्रीय चहा दिवस) दरवर्षी 15 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
उद्देश:
- चहा उत्पादक देशांमध्ये चहाच्या व्यापाराला प्रोत्साहन देणे.
- चहा कामगारांचे हित जपणे.
- चहाच्या सेवनाचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवणे.
सुरुवात:
2005 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चहा परिषदेत 15 डिसेंबर हा दिवस 'जागतिक चहा दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर 2019 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) देखील याला मान्यता दिली.
महत्व:
- चहा हा जगातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे.
- भारत, चीन, श्रीलंका, केनिया, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम हे प्रमुख चहा उत्पादक देश आहेत.
- चहाच्या उत्पादनात अनेक लोकांचा रोजगार अवलंबून आहे.
- चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स (antioxidants) असल्याने तो आरोग्यासाठी चांगला असतो.
15 डिसेंबरच का?
15 डिसेंबर हा दिवस निवडण्यामागे कोणताही विशिष्ट ऐतिहासिक संदर्भ नाही, परंतु चहा उत्पादक देशांमध्ये या दिवसाचे महत्त्व आहे.
जागतिक चहा दिवस कसा साजरा केला जातो?
- चहा उत्पादक देशांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
- चहाच्या सेवनाचे फायदे सांगितले जातात.
- चहा कामगारांच्या समस्यांवर चर्चा केली जाते.