दिनविशेष दारू उत्सव जागतिक दिवस

जागतिक व्हिस्की दिन केव्हा असतो?

2 उत्तरे
2 answers

जागतिक व्हिस्की दिन केव्हा असतो?

1
*🍾 जागतिक व्हिस्की दिन: जाणून घ्या 'व्हिस्की'बद्दल काही रंजक गोष्टी*
 

_आज जगभरात ‘जागतिक व्हिस्की दिन’ साजरा केला जात आहे. 2012 मध्ये ब्लेअर बोमन यांनी मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी व्हिस्की दिन साजरा करण्यास सुरुवात केली. स्कॉटलंडचे राष्ट्रीय पेय असणारी व्हिस्की 15व्या शतकानंतर संपूर्ण जगात लोकप्रिय झाली. इंग्लंडचा राजा हेन्री तिसरा याने व्हिस्कीचे उत्पादन वाढवून ती सर्वांसाठी खुली केली. तर आज व्हिस्की दिनानिमित्त जाणून घ्या या मद्याबद्दल काही रंजक गोष्टी._

💁‍♂ व्हिस्की बनवण्यासाठी मका, बार्ली, रे आणि गहू या  धान्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सर्वात जास्त व्हिस्कीचे उत्पादन करणारा देश म्हणून स्कॉटलँडकडे पहिले जाते. या देशात व्हिस्कीचे 70 कोटी लिटर एवढे उत्पादन केले जाते.

💁‍♂ युरोपमधील मोलडोवा आणि बेलरुस या देशांमध्ये सर्वात जास्त व्हिस्की प्यायली जाते. लिबिया या देशात व्हिस्की पिण्याचे प्रमाण शून्य टक्के आहे. त्यानंतर पाकिस्तान आणि कुवेत या देशांचा नंबर लागतो.

💁‍♂ 1508 मधे एका डॉक्टरने एका पेशंटला व्हिस्की एक औषध म्हणून लिहून दिले होते. त्यानंतर करन्सी म्हणूनही व्हिस्कीचा वापर झाल्याचे आढळते.

💁‍♂ मॅकडोवेल नं 1, ऑफिसर्स चॉइस, बॅगपाइपर, रॉयल स्टॅग, ओरिजिनल चॉइस, ओल्ड टेवर्न, इम्पीरियल ब्लू, ह्यावर्ड्स फाइन, डायरेक्टर्स स्पेशल हे व्हिस्कीचे काही भारतातील महत्वाचे प्रकार समजले जातात.

💁‍♂ प्रमाणात घेतलेली व्हिस्की आरोग्यदायी मानली आहे. सर्दी-खोकला, उत्तम झोप, वाढत्या वजनाला आवर घालण्यासाठी, पचनासाठी, मधुमेह, तर काही ठिकाणी कर्करोग बरा करण्यासाठी व्हिस्कीचा वापर झाला आहे.

💁‍♂ ग्लेनव्हॉन स्पेशल लिकर व्हिस्कीची 400 मिलीची बाटली जगातील सर्वात जुनी व्हिस्की म्हणून ओळखली जाते. 1851 ते 1858 च्या दरम्यान या बाटलीचे पॅकेजींग झाले असावे असे सांगण्यात येते. लंडनमधील बोनहॅम यांच्याकडे ती लिलावामधून येईपर्यंत, एका आयरीशियन कुटुंबाकडे याची मालकी होती. 14,850 पौंड इतकी इतक्या किमतीला या बाटलीचा लिलाव झाला.

💁‍♂ 1797 मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांनी त्यांच्या व्हर्जिनियाच्या मालमत्तेपासून तीन मैलांवर व्हिस्की डिस्टिलरी उघडली होती.1799 मध्ये त्यामध्ये 11,000 गॅलन व्हिस्की तयार केली आणि 18 व्या शतकात वॉशिंग्टनला सर्वात मोठे व्हिस्की उत्पादक बनविले.
उत्तर लिहिले · 18/5/2019
कर्म · 569225
0

जागतिक व्हिस्की दिन दरवर्षी १८ मे रोजी साजरा केला जातो.

हा दिवस व्हिस्कीचा आनंद घेण्यासाठी आणि तिच्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे.

सुरुवात: हा दिवस 2012 मध्ये सुरू झाला.

उद्देश: व्हिस्कीच्या विविध प्रकारांबद्दल लोकांना माहिती देणे आणि तिचा आदर करणे.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

सूर्यदिन केव्हा साजरा केला जातो?
जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो?
जागतिक वसुंधरा दिन म्हणजे काय?
जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा करतात?
जागतिक वसुंधरा दिन म्हणजे काय? तो कशासाठी साजरा करतात?
15 डिसेंबर: जागतिक चहा दिना विषयी सविस्तर माहिती द्या?
जागतिक सूर्य दिन कधी साजरा केला जातो?