2 उत्तरे
2
answers
जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा करतात?
0
Answer link
२२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. अमेरिकन सिनेटर गेलोर्ड नेल्सन यांनी एका मोठ्या पर्यावरण- रक्षणाच्या आंदोलनाची हाक दिली. निमित्त होतं अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधील सांता बार्बरा इथल्या तेलगळतीमुळे निर्माण झालेल्या प्रदुषणाचं! २२ एप्रिल १९७० साली अमेरिकेत दोन कोटी नागरिकांच्या उपस्थितीत पहिला वसुंधरा दिवस साजरा झाला.

युनायटेड नेशन्सच्या हवामान बदलासंबंधीच्या (UNFCC) एका रिपोर्टनुसार, येत्या काही दशकांमध्ये, विशेषत: विकसनशील राष्ट्रांमधील लाखो लोक हवामान बदलामुळे उद्भवलेल्या अन्नपाण्याच्या कमतरतेमुळे आणि आरोग्याच्या समस्येमुळे मृत्युमुखी पडतील असा अंदाज आहे. ऊन, वारा, थंडी, पावसाची अनिश्चितता, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ, त्यामुळे येणारे पूर, भूकंप हे हवामान बदलाचेच परिणाम आहेत.
वसुंधरेला वाळवंट होण्यापासून वाचवायचे असेल तर आतापासूनच पर्यावरण संरक्षण करणे आवश्यक आहे. वृक्षारोपणासोबतच प्रदुषण कमी करण्याची नितांत आवश्यकता आहे.
🌴🌿🌴
0
Answer link
जागतिक वसुंधरा दिन दरवर्षी 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो.
हा दिवस पृथ्वी आणि तिच्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी समर्पित आहे.
1970 मध्ये याची सुरुवात झाली.
2009 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने 22 एप्रिल हा 'आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस' म्हणून घोषित केला.