
व्हॅलेंटाईन
1
Answer link
व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कधी झाली
असं म्हणतात, प्रेम, एक अशी भावना जी व्यक्त होताच चेहरा खुलतो, बहर येतो. तसं बघितलं तर प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी कुठल्याही ठराविक वेळेची, जागेची, गरज नसते. 365 दिवस हे प्रेमाचेच असतात पण व्हॅलेंटाइन डे की बात ही कुछ और है!
प्रेमाच्या या दिवसाने तरुणाईला वेड लावलं, असंही म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अगदी ठरवून या दिवशी कुणी प्रेमात पडत नाही, मात्र तरीही वर्षभर याची तयारी सुरू असते. पण इतिहास काय हे जाणून घेणंही गरजेचं आहे.

१४७७ मध्ये इंग्रजी भाषेत लिहिलेला व्हॅलेंटाईन मेसेज.
व्हॅलेंटाइन डेचा इतिहास
रोम राज्यातून व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो.
रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असं मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्यांचाही त्याला राग यायचा.
लग्नानंतर व्यक्तिमत्वात खरंच बदल होतो का?
याच वयात 'याड' का लागतं?
संत व्हॅलेंटाइनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला. केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाइनला तुरुंगात डांबलं.
तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाइनचा जीव जेलरच्या मुलीवर आला. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली होती.
फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने प्रेयसीला पत्र लिहिले आणि पत्राचा शेवट 'युअर व्हॅलेंटाइन' असा केला. तेव्हापासूनच 14 फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो, अशी अख्यायिका आहे.
व्हॅलेंटाइन डे
व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची सुरुवात कधीपासून झाली?
सर्वात पहिल्यांदा व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची सुरूवात झाली 496मध्ये.
प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी एक विशिष्ट असा दिवस असण्याची प्रथा फार पूर्वीपासून होती. रोमन फेस्टिवलमधून याची खरी सुरुवात झाली.
रोमनमध्ये मध्य फेब्रुवारीमध्ये ल्युपर्सिया नावाचा सण साजरा केला जातो. म्हणजेच वसंत ऋतुची सुरुवात.
लाँग डिस्टन्स रिलेशनशिप टिकू शकतं का?
वसंत पंचमी हा भारतीय व्हॅलेंटाईन डे आहे का?
सेलिब्रेशनचा भाग म्हणून, मुलं मुलींच्या नावाची चिठ्ठी एका बॉक्समधून काढतात. त्यानंतर या फेस्टिवलदरम्यान, ते दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात, आणि नंतर त्यांना वाटलं तर ते एकमेकांशी लग्न देखील करू शकतात.
त्यानंतर चर्चने हा फेस्टिवल संत व्हॅलेंटाइन यांच्या स्मृतीत ख्रिचन धर्मात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला.
पण कालांतराने, संत व्हॅलेंटाइनच्या नावाने लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तींजवळ आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली.
2
Answer link
तुम्ही तुमच्या जीएफ (Girlfriend) यांना तुमच्या घरी घेऊन जा आणि तुमच्या आई-वडिलांना सांगा, "ही तुमची होणारी सून आहे," यापेक्षा मोठे गिफ्ट कोणतेच नसेल त्यांच्यासाठी.
6
Answer link
असाच प्रश्न मी विचारला होता, त्याचे उत्तर खाली आहे.
धन्यवाद
धन्यवाद
व्हॅलेंटाईन डे चा काही इतिहास आहे का?https://www.uttar.co/question/5c5f027848ba5a00019d7ae6
9
Answer link
*👩❤👩का साजरा केला जातो व्हॅलेंटाइन डे ?🤔*
*❤_व्हॅलेंटाइन डे जसजसा जवळ येतो तसतसं तरूणाईमध्ये प्रेमाचा अंकुर फुलत जातो. या दिवशी प्रियकर आपल्या प्रेयसीसमोर प्रेम व्यक्त करतो. युवक हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करतात. मात्र, व्हेलेंटाइन दिवस केव्हापासून आणि का साजरा केला जातोय? याबाबतीत अनेक विसंगती आहेत._*
💁🏻♂संत व्हेलेंटाइन यांना इसवी सन 270 च्या फेब्रुवारी महिन्याच्या मध्यास दफन करण्यात आले होते, असे काही ठिकाणी म्हटले जाते. त्यावेळी रोममध्ये सम्राट क्वॉलिडियसचे राज्य होते. लग्न केल्यामुळे पुरूषांची शक्ती आणि बुद्धी कमी होते, असे क्वॉलिडियसला वाटत असत. त्यामुळे त्याने कोणत्याही सैनिकाने आणि अधिका-याने लग्न करू नये, असा मुलूखावेगळा नियम बनवला होता. संत व्हॅलेंटाइनने सम्राटाच्या या आदेशाला विरोध केला. तेव्हापासून त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रेम दिवस म्हणजेच व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो.
💁🏻प्राचीन रोममध्ये फेब्रुवारीला सफाई करण्याचा महिना देखील म्हणतात. तेथील लोक यावेळी घराची रंगरंगोटी करतात. काही इतर दंतकथांप्रमाणे रोमनच्या तुरूंगात कैद असलेल्या ख्रिश्चन लोकांचा छळ करण्यात येत होता. त्यांना तुरूंगातून पळण्यास व्हॅलेंटाइन यांनी मदत केली होती. त्यामुळे सम्राटाने त्यांना मारले, असे म्हटले जाते. तर काही ठिकाणी, व्हॅलेंटाइन स्वत: तुरूंगात होते. त्यावेळी व्हॅलेंटाइन आणि जेलरच्या मुलीबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले. जेलरची मुलगी रोज व्हॅलेंटाइन यांना भेटायला यायची. पहिल्यांदा व्हॅलेंटाइन यांनी स्वत:लाच व्हॅलेंटाइन ग्रिटिंग कार्ड पाठवले होते. त्या ग्रिटिंग्जच्या खाली 'तु माझी व्हॅलेंटाइन बनशील काय ?', असे लिहिले होते. तेव्हापासून ही परंपरा अस्तिवात आली. त्यामुळे संत व्हॅलेंटाइन यांच्या स्मृतीनिमित्त आजही व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो.
1
Answer link
प्रेम करावं कुणीही कुणावरही
त्याला नसावं तारखेचं बंधन
प्रेम करावं
स्वतःवर
समाजावर
देशावर
सृष्टीवर
विचारांवर
प्रत्येकाने प्रेम करावं माणुसकीवर
इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से ! अगर मैं इश्क लिखना भी चाहूँ तो इंकलाब लिखा जाता है !
माफ करा मला, या प्रश्नाबद्दल एवढंच माहीत आहे.
रोजच हॅपी रोज डे
धन्यवाद!!!!
त्याला नसावं तारखेचं बंधन
प्रेम करावं
स्वतःवर
समाजावर
देशावर
सृष्टीवर
विचारांवर
प्रत्येकाने प्रेम करावं माणुसकीवर
इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से ! अगर मैं इश्क लिखना भी चाहूँ तो इंकलाब लिखा जाता है !
माफ करा मला, या प्रश्नाबद्दल एवढंच माहीत आहे.
रोजच हॅपी रोज डे
धन्यवाद!!!!