व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) चे तरुणांमध्ये फॅड आहे. त्याची कथा काय आहे आणि हा सण ख्रिश्चन देशांमध्ये साजरा होतो का?
व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) चे तरुणांमध्ये फॅड आहे. त्याची कथा काय आहे आणि हा सण ख्रिश्चन देशांमध्ये साजरा होतो का?
धन्यवाद
व्हॅलेंटाईन डे चा काही इतिहास आहे का?https://www.uttar.co/question/5c5f027848ba5a00019d7ae6
🤔कसा सुरू झाला हा दिवस?
या दिनाचा संदर्भ शोधायचा झाला तर, माणसामाणसांनी परस्पर प्रेमबंधनात एकमेकांना गुंतवावे, असा प्रचार करणारे ख्रिश्चन धर्मगुरू सेंट व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा डे साजरा केला जात असल्याचा दाखला मिळतो. या व्यतिरिक्तही अनेक मिस्ट्री व्हॅलेंटाईन डे च्या बाबतीती वाचायला आणि ऐकायला मिळतात. व्हॅलेंटाईन च समर्थन करणाऱ्यांकडून आपले संदर्भ तर विरोध दर्शविणाऱ्यांकडून सामाजिक आणि सांस्कृतिक कारणं दरवर्षी पुढे केल्या जातात. वाद रंगतो, वादविवाद होतात, राढे होतात. आणि व्हॅलेंटाईन साजरा देखील होतो. तरुणाईला धमाल मस्ती करायला हवे असलेले निमित्य यामुळे मिळते, तर विरोधाचे निमित्य करून वेगळ्या प्रकारचा धिंगाणा घालण्यासाठी आसुसलेल्यांचा मनसुबाही याच निमित्ताने पूर्ण होतो. यंदाही नेहमीसारखेच वातावरण बघायला मिळतेय.. तरुणाई प्रेमात चिंब भिजण्यासाठी सज्ज आहे, तर विरोधक संस्कृतीचे डोस पाजण्यासाठी…अर्थात, या सगळ्या कल्लोळात ज्यासाठी हा दिन साजरा केला जातो ती ‘प्रेमभावना’ जपल्या जातेय का? हा खरा प्रश्न आहे.
🙆नाती उथळ झालीय का?
आजच्या सोशल मिडीयाच्या काळात नाती फार उथळ झाली आहे. कुणालाही संस्कृतीची चाड उरली नाही. प्रेमामध्ये एकमेकांसोबत असतानाही एक भिंत जोडप्यांमध्ये दिसून येते. त्यामुळेच प्रेमप्रकरणातून होणारे गुन्हेही वाढलेले आहेत. ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो त्या व्यक्तीलाच ऑनलाईन फसविणे, अश्लील एमएमएस बनवून ब्लॅकमेलिंग करणे, अशा गंभीर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढलेले आहे. जोडीदाराचा आपल्या जोडीदारावर किती विश्वास आहे हा संशोधनाचा विषय बनला आहे. या व्हॅलेन्टाईन्स ला सोबत असलेला साथीदार पुढच्या व्हॅलेन्टाईन्सला सोबत असेलच याची शास्वती देता येत नाही. त्यामुळे आजचं प्रेम हे प्रेम आहे कि..आकर्षण आहे, कि वासना आहे हेच मुळी समजत नाही. आज तरुणाईला फेसबुक वर ‘इन अ रिलेशनशिप’ अस स्टेटस ठेवणं प्रतिष्ठेचं वाटू लागल आहे. नात्यात आणि प्रेमात समजदारीचे प्रमाण कमी झाल्याने आजची नाती टिकावू राहिली नाही. आपल्याला अजून प्रेम समजलाच नाही याचे हि उदाहरणं म्हणावी का?
😍प्रेम वाढवणारा दिवस
‘व्हॅलेन्टाईन्स डे’ हा आपल्या संस्कृतीतला नसला..तो पाश्चात्त्यांचा जरी असला तरी प्रेम वाढविणारा दिवस आहे. त्यामुळे ज्या गोष्टीतून द्वेष कमी होत असेल आणि प्रेम वाढत असेल त्या गोष्टीचा विरोधही प्रेमानेच करावा, म्हणजे विरोधातूनही प्रेमभावना वाढीस लागेल.प्रेमदिनाच्या निमित्ताने प्रेम दिन
व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) विषयी माहिती:
व्हॅलेंटाईन डे, ज्याला आपण 'प्रेम दिवस' म्हणून ओळखतो, तो दरवर्षी 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवसाच्याorigina संदर्भात अनेक कथा आहेत. त्यापैकी एक प्रसिद्ध कथेनुसार, तिसऱ्या शतकात रोममध्ये सेंट व्हॅलेंटाईन नावाचे एक ख्रिश्चन धर्मगुरू होते. त्यावेळी क्लॉडियस दुसरा नावाचा एक राजा होता, ज्याला सैन्यासाठी जास्त सैनिक हवे होते. त्याचे मत असे होते की विवाह केल्यामुळे पुरुष कमजोर होतात आणि सैनिक म्हणून चांगले काम करू शकत नाहीत. त्यामुळे त्याने रोममध्ये विवाह करण्यास बंदी घातली.
परंतु सेंट व्हॅलेंटाईन यांनी राजाच्या या आदेशाचे उल्लंघन केले आणि त्यांनी अनेक प्रेमी युगुलांचे गुप्तपणे विवाह लावून दिले. जेव्हा राजाला हे समजले, तेव्हा त्याने सेंट व्हॅलेंटाईन यांना कैद केले आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. असे मानले जाते की व्हॅलेंटाईन यांनी तुरुंगात असताना जेलरच्या मुलीला एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये त्यांनी 'तुमचा व्हॅलेंटाईन' असे लिहिले होते. त्यामुळे, व्हॅलेंटाईन डे हा त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
ख्रिश्चन देशांमध्ये व्हॅलेंटाईन डे:
- व्हॅलेंटाईन डे हा अनेक ख्रिश्चन देशांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
- युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये हा दिवस विशेषतः लोकप्रिय आहे.
- या दिवशी लोक आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देतात, प्रेमळ संदेश पाठवतात आणि एकत्र वेळ घालवतात.
इतर देशांमधील व्हॅलेंटाईन डे:
- केवळ ख्रिश्चन देशांमध्येच नव्हे, तर जपान, कोरिया आणि चीन यांसारख्या गैर-ख्रिश्चन देशांमध्येही व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो.
- प्रत्येक देशात तो साजरा करण्याची पद्धत वेगळी असू शकते, परंतु मूळ भावना प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्याचीच असते.