संस्कृती व्हॅलेंटाईन उत्सव

व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कधी झाली?

2 उत्तरे
2 answers

व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कधी झाली?

1
व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कधी झाली


असं म्हणतात, प्रेम, एक अशी भावना जी व्यक्त होताच चेहरा खुलतो, बहर येतो. तसं बघितलं तर प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी कुठल्याही ठराविक वेळेची, जागेची, गरज नसते. 365 दिवस हे प्रेमाचेच असतात पण व्हॅलेंटाइन डे की बात ही कुछ और है!

प्रेमाच्या या दिवसाने तरुणाईला वेड लावलं, असंही म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अगदी ठरवून या दिवशी कुणी प्रेमात पडत नाही, मात्र तरीही वर्षभर याची तयारी सुरू असते. पण इतिहास काय हे जाणून घेणंही गरजेचं आहे.





१४७७ मध्ये इंग्रजी भाषेत लिहिलेला व्हॅलेंटाईन मेसेज.

व्हॅलेंटाइन डेचा इतिहास
रोम राज्यातून व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो.

रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असं मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्‍यांचाही त्याला राग यायचा.

लग्नानंतर व्यक्तिमत्वात खरंच बदल होतो का?
याच वयात 'याड' का लागतं?
संत व्हॅलेंटाइनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला. केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाइनला तुरुंगात डांबलं.

तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाइनचा जीव जेलरच्या मुलीवर आला. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली होती.

फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने प्रेयसीला पत्र लिहिले आणि पत्राचा शेवट 'युअर व्हॅलेंटाइन' असा केला. तेव्हापासूनच 14 फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो, अशी अख्यायिका आहे.

व्हॅलेंटाइन डे

व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची सुरुवात कधीपासून झाली?
सर्वात पहिल्यांदा व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची सुरूवात झाली 496मध्ये.

प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी एक विशिष्ट असा दिवस असण्याची प्रथा फार पूर्वीपासून होती. रोमन फेस्टिवलमधून याची खरी सुरुवात झाली.

रोमनमध्ये मध्य फेब्रुवारीमध्ये ल्युपर्सिया नावाचा सण साजरा केला जातो. म्हणजेच वसंत ऋतुची सुरुवात.

लाँग डिस्टन्स रिलेशनशिप टिकू शकतं का?
वसंत पंचमी हा भारतीय व्हॅलेंटाईन डे आहे का?
सेलिब्रेशनचा भाग म्हणून, मुलं मुलींच्या नावाची चिठ्ठी एका बॉक्समधून काढतात. त्यानंतर या फेस्टिवलदरम्यान, ते दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात, आणि नंतर त्यांना वाटलं तर ते एकमेकांशी लग्न देखील करू शकतात.

त्यानंतर चर्चने हा फेस्टिवल संत व्हॅलेंटाइन यांच्या स्मृतीत ख्रिचन धर्मात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला.

पण कालांतराने, संत व्हॅलेंटाइनच्या नावाने लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तींजवळ आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली.


उत्तर लिहिले · 14/2/2023
कर्म · 53715
0

व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) हा दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस 'प्रेमाचा दिवस' म्हणून ओळखला जातो.

सुरुवात:

  • व्हॅलेंटाईन डेची सुरुवात नेमकी कधी झाली याबद्दल अनेक कथा आहेत.
  • सर्वात प्रचलित कथेनुसार, तिसऱ्या शतकात रोममध्ये सेंट व्हॅलेंटाईन (Saint Valentine) नावाचे एक धर्मगुरू होते.
  • त्यावेळचा राजा क्लॉडियस (Claudius) याला सैनिकांचे लग्न होऊ नये असे वाटत होते, कारण विवाहित पुरुष चांगले सैनिक बनू शकत नाहीत असे त्याचे मत होते.
  • सेंट व्हॅलेंटाईन यांनी राजाच्या या आदेशाला विरोध करत अनेक प्रेमी युगलांचे गुप्तपणे विवाह लावून दिले.
  • जेव्हा राजाला हे समजले, तेव्हा त्याने सेंट व्हॅलेंटाईन यांना तुरुंगात टाकले आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.
  • असे मानले जाते की व्हॅलेंटाईनने तुरुंगातून आपल्या मैत्रिणीला एक पत्र पाठवले, ज्यामध्ये त्याने 'तुमचा व्हॅलेंटाईन' (Your Valentine) असे लिहिले होते.
  • त्यानंतर, सेंट व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणार्थ हा दिवस 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जाऊ लागला.

आजकाल व्हॅलेंटाईन डे केवळ प्रेमी युगुलांसाठीच नाही, तर मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसाठीही प्रेम व्यक्त करण्याचा दिवस बनला आहे.

टीप: या माहितीची अचूकता पडताळण्यासाठी, आपण अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊ शकता.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

वनातील महान उत्सव कोणता?
आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो?
पितृदिन म्हणजे काय?
जागतिक ग्राहक दिन कधी असतो?
थर्टी फर्स्ट म्हणजे काय?
चॉकलेट डे कब मनाया जाता है?
राष्ट्रीय स्फोटक दिवस कधी साजरा केला जातो?