औषधे आणि आरोग्य
अन्न
घरगुती उपाय
आरोग्य व उपाय
नैसर्गिक उपचार
आरोग्य
आहार
कडु लिंबाचा रस पिल्याने कोणते फायदे होतात?
2 उत्तरे
2
answers
कडु लिंबाचा रस पिल्याने कोणते फायदे होतात?
7
Answer link
कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे.याची पाने, काड्या वाटून, त्याचा रस उन्हाळात प्रशान केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. काही लोक हा पेलाभर रस रोज पितात. त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो,; सडसडीत माणसे सडसडीतच राहतात. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत. दाताना बळकटी येते. तसेच मुळव्याध व पोटातील कृमींवर उपयोगी आहे. कडुलिंबाची वाळलेली पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन, पेस्ट यामध्ये पण कडुलिंबाचा वापर करतात.
कडुलिंबाची झाडे जिथे जास्त प्रमाणात असतात तेथील हवा शुद्ध राहते. या झाडाच्या फळांचा रस काढून, त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात. मधुमेह या रोगा मध्ये नीम अतिशय ऊपयुक्त आहे.यक्रुत विकारांमधे नीम त्याच्या कडू रसाने काम करते. रोज अर्धा कप नीम रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो.
*** धन्यवाद ****

0
Answer link
कडु लिंबाचा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
- रक्त शुद्धीकरण: कडु लिंबाचा रस रक्त शुद्ध करतो आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो.
- त्वचेसाठी फायदेशीर: कडु लिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे ते त्वचेच्या समस्यांसाठी उपयुक्त आहे. पुरळ, पिंपल्स आणि त्वचेच्या इतर समस्या कमी होतात.
- रोगप्रतिकारशक्ती वाढवते: कडु लिंबाचा रस रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो, ज्यामुळे शरीर अनेक रोगांशी लढण्यास सक्षम होते.
- पचन सुधारते: कडु लिंबाचा रस पचनक्रिया सुधारतो आणि बद्धकोष्ठता कमी करतो.
- मधुमेहावर नियंत्रण: कडु लिंबाचा रस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो.
- जंत आणि कृमी नष्ट करते: कडु लिंबाच्या रसामध्ये जंतनाशक गुणधर्म असतात, त्यामुळे तो पोटातील जंत आणि कृमी नष्ट करतो.
- यकृतासाठी उत्तम: कडु लिंबाचा रस यकृताला निरोगी ठेवतो आणि त्याचे कार्य सुधारतो.
इशारा: कडु लिंबाचा रस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण तो काही लोकांसाठी हानिकारक असू शकतो.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: