Topic icon

नैसर्गिक उपचार

0
दिवसभरच्या कामानंतर थकवा जाणवणे স্বাভাবিক आहे. ऊर्जा कमी वाटत असल्यास, काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही त्वरित ताजेतवाने होऊ शकता: 1. पाणी प्या: * थकवा जाणवण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता असणे. त्यामुळे, कामावरून आल्यावर लगेच एक ग्लास पाणी प्या. लिंबू पाणी किंवा नारळ पाणी घेतल्यास अधिक फायदा होतो. 2. हलका आहार घ्या: * energy लवकर मिळवण्यासाठी फळे (उदा. केळी, सफरचंद) किंवा सुका मेवा (dried fruits) खा. यामुळे शरीराला नैसर्गिक साखर (natural sugar) मिळते आणि ऊर्जा वाढते. 3. शारीरिक हालचाल करा: * जास्त वेळ बसून राहिल्याने थकवा येतो. त्यामुळे, थोडा वेळ घरातच फिरा किंवा काही साधे व्यायाम करा. 4. श्वासावर लक्ष केंद्रित करा: * दीर्घ श्वास (deep breath) घेतल्याने शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, ज्यामुळे त्वरित ताजेतवाने वाटते. काही मिनिटे शांत बसून दीर्घ श्वास घ्या. 5. आंघोळ करा: * गरम पाण्याने आंघोळ केल्याने स्नायू शिथिल होतात आणि आराम मिळतो. थंड पाण्याने आंघोळ केल्यास refresh वाटते. 6. चहा किंवा कॉफी: * चहा किंवा कॉफी प्यायल्याने तात्पुरती ऊर्जा मिळते. पण याचे जास्त सेवन करणे टाळा. 7. पुरेशी झोप घ्या: * रात्रीची झोप पूर्ण न झाल्यास दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो. त्यामुळे, दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे. हे काही सोपे उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही कामावरून थकून आल्यावर देखील energy मिळवू शकता.
उत्तर लिहिले · 14/6/2025
कर्म · 2380
0
उंबराच्या पाल्याचा रस प्यायल्याने काही हि होत नाही. कारण औषधी गुणधर्म असलेला उंबर वृक्ष आहे
औदुंबर वृक्ष दैवी गुणाबरोबरच औषधी उपयोग
दाह शमन करणारा दैवी वृक्ष: औदुंबर अर्थात उंबर. नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो. उदुम्बराच्या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते. किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो. या वृक्षाचे काही अदभूत उपयोग पाहूया;

१. उंबराच्या सालीचा काढा करून तो थंड करावा. त्यात खडीसाखर-वेलची टाकून गुलाबी रंगाचे सरबत करावे. कॅन्सर झाल्यावर जी केमोथेरपी देतात त्यात शरीराची भयानक आग होते. त्यात हे सरबत उत्तम आहे. दिवसातून तीनदा घ्यावे.
२. अतिसार होऊन त्यातून रक्त पडत आसेल तर सालीचा काढा द्यावा.
३. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी डेटोल- सेव्लोन च्या ऐवजी सालीच्या काढ्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते.
४. तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो.
५. गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी, रक्तप्रदर, श्वेतप्रदर, मासिक पाळीच्या अति प्रमाणात रक्तस्त्राव होईत असेल तर सालीचा काढा पोटात घ्यायला देतात सोबत योनिमार्गाद्वारे त्याच काढ्याचा उत्तरबस्ती दिला तर उत्तम गुण येतो ...
६. गर्भाचे पोषण व्हावे म्हणून काढा देतात. सातत्याने गर्भपात होत असेल तर गर्भ धारणेनंतर सालीचे सरबत करून प्यावे.
७. लहान मुलांना दात येताना जुलाब होतात त्यावेळी उंबराचा चिक बत्ताशासोबत देतात. भस्मक नावाचा एक व्याधी आहे ज्यात व्यक्ती सारखे काही न काही खात असते. पण त्या व्यक्तीचे पोट भरत नाही काही वेळाने परत भूक लागते. या आजारात उंबराची साल स्त्रीच्या दुधात वाटून दिली असता ही विचित्र लक्षणे कमी होतात.
८. उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा.
९. काविळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात.
१०. तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे.औदुंबर वृक्ष दैवी गुणाबरोबरच औषधी उपयोग आहे





औषधी उपयोग

या झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते. या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात.

इतर उपयोग

उंबराची फळे खाता येतात. याची पाने शेळी बकरी आवडीने खातात. पक्षी या झाडाची फळे खातात.


धार्मिक महत्त्व

या झाडाच्या सुकलेल्या काड्या होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात. या झाडाची पूजा केली जाते.

उत्तर लिहिले · 24/11/2022
कर्म · 53750
0

मान, कंबर आणि गुडघेदुखी थांबवण्यासाठी बाभळीच्या शेंगांची पावडर वापरली जाते. बाभळीच्या शेंगांमध्ये दाहक-विरोधी (anti-inflammatory) गुणधर्म असतात, ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.

कशी वापरावी:

  • पावडर: बाभळीच्या शेंगांची पावडर गरम पाण्यात मिसळून चहासारखी प्यावी.
  • लेप: बाभळीच्या शेंगांची पावडर पाण्यात मिसळून लेप तयार करा आणि तो वेदना होत असलेल्या भागावर लावा.

शेवग्याच्या शेंगा: शेवग्याच्या शेंगांमध्येही पोषक तत्वे भरपूर असतात आणि त्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि आवश्यक Amino ऍसिड असतात. शेवग्याच्या शेंगा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2380
2
नाभी तेल थेरपी हे एक आयुर्वेदिक तंत्र आहे, जे नियमितपणे केल्यास आपल्याला अंतर्गतरित्या निरोगी ठेवते. तथापि, त्याच्या आरोग्यदायक फायद्यांव्यतिरिक्त, नाभी तेल थेरपी विविध प्रकारचे सौंदर्यदायी फायदेही प्रदान करू शकते, जसे की चांगली त्वचा आणि केस.

1. इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) म्हणजेच बद्धकोष्ठता, पोट फुगणे, अपचन आणि अस्वस्थ पोट या सर्वांवर मोहरीच्या तेलाने पोटाच्या बेंबीची मालिश केल्याने आराम मिळू शकतो. हे आपल्या यकृतातील जठरनिगडीत आणि पित्त रस उत्सर्जिक करते. तसंच मळमळ आणि आतडे दुखी कमी करून पचनास मदत करते.

2. निरोगी, सुंदर त्वचेसाठी दररोज ऑलिव्ह ऑइलने तुमच्या नाभीला मसाज करा. हे कोणत्याही प्रकारची जळजळ कमी करेल, सर्व फ्री रॅडिकल्स काढून टाकेल, त्वचेचे संक्रमण बरे करेल आणि त्वचेला खोलवर आर्द्रता देईल.

3. लांबसडक आणि निरोगी केसांसाठी नारळाचे तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा जोजोबा तेलाने तुमच्या पोटाच्या नाभीवर नियमितपणे मसाज करा.

4. तुमचे पुनरुत्पादव आरोग्य सुधारण्यासाठी नियमितपणे कडुलिंबाच्या तेलाने, गुलाबाच्या तेलाने किंवा खोबरेल तेलाने तुमच्या पोटाच्या नाभीची मालिश करा. हे प्रजनन क्षमता सुधारते, पीरियड क्रॅम्प्स शांत करते आणि शुक्राणूंची संख्या वाढवून पुनरुत्पादनासंबंधित होणारे रोग टाळते.
उत्तर लिहिले · 30/11/2021
कर्म · 121765
0
कडुनिंबाची फुले अनेक उपचारांमध्ये लाभदायक असतात. खाली काही मुख्य उपयोग दिले आहेत:
  • त्वचा संक्रमण (Skin Infections): कडुनिंबाच्या फुलांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे ते त्वचेच्या संक्रमणांवर प्रभावी ठरतात.
    • उपाय: कडुलिंबाची फुले पाण्यात उकळून त्या पाण्याने त्वचा धुवावी.
  • पोटाचे विकार (Stomach Problems): कडुनिंबाची फुले पोटातील जंतू नष्ट करण्यास मदत करतात आणि पचनक्रिया सुधारतात.
    • उपाय: कडुनिंबाच्या फुलांचा रस प्यावा किंवा त्यांची भाजी खावी.
  • रक्त शुद्धीकरण (Blood Purification): कडुनिंबाची फुले रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात.
    • उपाय: नियमितपणे कडुनिंबाच्या फुलांचे सेवन करावे.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवणे (Boosting Immunity): या फुलांमध्ये अँटीऑक्सिडंट्स (antioxidants) भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
    • उपाय: कडुनिंबाच्या फुलांचा चहा प्यावा.
  • डोळ्यांसाठी (For Eyes): कडुनिंबाच्या फुलांचा लेप डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला असतो.
    • उपाय: कडुनिंबाच्या फुलांचा लेप डोळ्यांवर लावावा.
टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2380
1
बेलाची पाने औषधी असून खोकल्यावर व नेत्रविकारावर उपयुक्त आहेत. फुलांपासून अत्तर बनवितात. कच्चे फळ पाचक व भूक वाढविणारे असल्याने अतिसारावर ते गुणकारी असते. कच्च्या फळाच्या सालीपासून काढलेला रंग कापड रंगविण्यासाठी वापरतात.
 
 


बेल किंवा बेल वृक्षाला फार महत्व आहे. प्रत्येक शुभकार्याच्या प्रसंगी पूजनात बेल पत्रांचा उपयोग केला जातो. वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊनच ही परंपरा सुरू करण्यात आली आहे. बेलपत्र शिवलिंगावर वाहतांना बोटांच्या आणि तळहाताच्या पृष्टभागावर, विषाणूंना मारक तत्व आणि सुगंध पसरला जातो. वेळोवेळी अंगाला स्पर्श करण्यामुळे शरीरावर आक्रमण करणारे विषाणू मरण पावतात. शेकडो रोगांना नष्ट करण्याची क्षमता असणाऱ्या ह्या दिव्य वृक्षाची प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून, त्याला पुजेतही स्थान देऊन त्याचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून केला गेला.

बेल हा पानझडी वृक्ष रूटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ईगल मार्मेलॉस आहे. लिंबू व संत्रे या वनस्पतीही रूटेसी कुलातील आहेत. बेल हा वृक्ष मूळचा उत्तर भारतातील असून नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान, बांगला देश, कंबोडिया, थायलंड इत्यादी देशांत निसर्गत: आढळतो. भारत, श्रीलंका, जावा, फिलिपीन्स व फिजी या देशांत बेलाची लागवड करतात. ईगल प्रजातीत बेलाची ईगल मार्मेलॉस ही एकमेव जाती आहे. भारतात तो रुक्ष ठिकाणी, जेथे अन्य वृक्ष वाढत नाहीत अशा जागी, कमी पावसाच्या प्रदेशात वाढलेला दिसतो.

बेल (ईगल मार्मेलॉस) : (१) पाने, (२) फूल, (३) फळ (शेजारी छेद घेतलेले फळ) बेल वृक्ष ८–१४ मी. उंच वाढत असून त्यावर काटे असतात. खोडाचा घेर १–१·५ मी. असून राखाडी रंगाचा असतो. साल मऊ असून तिचे खवले निघतात. पाने संयुक्त, हिरवी, त्रिपर्णी व एकाआड एक असून पानांच्या बगलेत सरळ व मोठे काटे असतात. पानांवर तेलाचे ठिपके दिसतात. मार्च–एप्रिल महिन्यांत पाने गळून पडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी पुन्हा पालवी येते. फुले लहान, हिरवट-पांढरी व सुगंधी असून ती गुच्छात येतात. मृदुफळ जाड सालीचे, गोलसर, पिवळे व कठीण असून पावसाळ्यात येते. फळ पिकायला साधारणपणे ११ महिने लागतात. त्यात घट्ट, गोड, सुवासिक, नारिंगी व श्लेष्मल गर असतो. गरामध्ये लोकरीसारखी लव असलेल्या चपट्या बिया असतात. फळाचे कवच एवढे कठीण असते.

बेलाचे औषधी गुणधर्म 

बेलाची पाने औषधी असून खोकल्यावर व नेत्रविकारावर उपयुक्त आहेत. फुलांपासून अत्तर बनवितात. कच्चे फळ पाचक व भूक वाढविणारे असल्याने अतिसारावर ते गुणकारी असते. कच्च्या फळाच्या सालीपासून काढलेला रंग कापड रंगविण्यासाठी वापरतात. बेलाच्या पिकलेल्या फळातील गर सुगंधी, शीतल व सारक असतो. त्यात मार्मेलोसीन हा घटक असून तो सारक व मूत्रल आहे. फळांपासून सरबत करतात. मलावरोध व बद्धकोष्ठता यावर हे सरबत उपयोगी आहे. बेलाच्या झाडाचा डिंक उपयुक्त असतो. फळे कठीण आणि जाड असल्यामुळे झाडाला लागलेली फळे अंगावर पडून एखाद्याला इजा होण्याचा धोका असतो.

 


फळीतील मगज सुगंधी, शीतकर (थंडावा देणारा) व सारफ असतो; त्याचे सरबत जुनाट मलावरोध व अग्निमांद्य यावर देतात. अपक्व फह स्तंभक (आकुंचन पावणारे), पाचक, दीपक, (भूक वाढविणारे) असल्याने अतिसार व आमांशात गुणकारी असते. बेलफळाचा मुरंबा त्यादृष्टीने उपयुक्त असतो. कोवळ्या फळांचे लोणचे घालतात. उत्तर बिहारातील पगडा विभागातील बेलफळे पातळ सालीची असून त्यांचा मगज स्वादिष्ट असतो. पंजाबात फळांच्या मगजामध्ये दूध, साखर व कधी चिंचही घालून सरबत करतात. धातूपुष्टतेस गाईच्या दुधात बेलाच्या सालीचा रस जिऱ्याची पूड टाकून घेतात.  

धातू पडत असल्यास पुष्कळशी पाने पाण्यात वाटून त्यात जिरे, खडीसाखर टाकून घेतात. बहिरेपणावर गोमूत्रात बेलफळ वाटून घेतात कढवितात व कानात घालतात. फळांच्या कवचापासून पिवळे रंगद्रव्य मिळते. कच्च्या फळांचे कवच त्रिफळा चूर्णाबरोबर कफलिको छपाईत उपयुक्त असते. कवचापासून `मार्मेले' हे बाष्पनशील तेल काढतात. कोवळ्या फळांत मगजाबरोबर श्लेष्मल द्रव्य असते. त्याचा उपयोग डिंकासारखा होतो. पाण्यात बनविलेल्या रंगांत हे द्रव्य मिसळून चकाकी आणता येते. इमारतीच्या चुन्यात मगज मिसळून तो चिकट व चिवट करतात आणि विहीरीकरिता वापरतात. खोडापासून उत्तम डिंक मिळतो. फांद्या व पाने गुरांना खाऊ घालतात. फुलांपासून सुगंधी द्रव्य मिळते.

फळांमध्ये `मार्मेलोसीन' हे क्रियाशील घटकद्रव्य असून ते सारक व मूत्रल (लघवी साफ करणारे) असते; त्यामुळे थोडा निद्रानाश होतो व घाम कमी येतो; अधिक प्रमाणात घेतल्यास हृदयक्रिया मंदावते. बेलफळात ४-६ टक्के साखर; मगजात ९ टक्के व सालीत २० टक्के टॅनीन असते. बियातून ११.९ टक्के कडूतेल मिळते, ते रेचक असते. मुळाची साल व कधी खोडावरचीही साल पाळीच्या तापात देतात, तिच्या `अंबेलिफेरॉन' हे द्रवय असते. मुहाची साल मत्स्य विष आहे. पानांत बाष्पनशील तेल असते. फळातील मगज काढून टाकून कवचाचा उपयोग डबीप्रमाणे करतात. कोवळी लहान फळे रूद्राक्षाबरोबर माळांमध्ये घालतात.



 


उत्तर लिहिले · 27/10/2021
कर्म · 121765