नैसर्गिक उपचार
आरोग्य
विज्ञान
आता कसं पण आपण उंबर खातो शेतामध्ये, मग उंबराच्या पाल्याचा रस पिल्याने चालतो का?
2 उत्तरे
2
answers
आता कसं पण आपण उंबर खातो शेतामध्ये, मग उंबराच्या पाल्याचा रस पिल्याने चालतो का?
0
Answer link
उंबराच्या पाल्याचा रस प्यायल्याने काही हि होत नाही. कारण औषधी गुणधर्म असलेला उंबर वृक्ष आहे
औदुंबर वृक्ष दैवी गुणाबरोबरच औषधी उपयोग
दाह शमन करणारा दैवी वृक्ष: औदुंबर अर्थात उंबर. नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो. उदुम्बराच्या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते. किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो. या वृक्षाचे काही अदभूत उपयोग पाहूया;
१. उंबराच्या सालीचा काढा करून तो थंड करावा. त्यात खडीसाखर-वेलची टाकून गुलाबी रंगाचे सरबत करावे. कॅन्सर झाल्यावर जी केमोथेरपी देतात त्यात शरीराची भयानक आग होते. त्यात हे सरबत उत्तम आहे. दिवसातून तीनदा घ्यावे.
२. अतिसार होऊन त्यातून रक्त पडत आसेल तर सालीचा काढा द्यावा.
३. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी डेटोल- सेव्लोन च्या ऐवजी सालीच्या काढ्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते.
४. तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो.
५. गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी, रक्तप्रदर, श्वेतप्रदर, मासिक पाळीच्या अति प्रमाणात रक्तस्त्राव होईत असेल तर सालीचा काढा पोटात घ्यायला देतात सोबत योनिमार्गाद्वारे त्याच काढ्याचा उत्तरबस्ती दिला तर उत्तम गुण येतो ...
६. गर्भाचे पोषण व्हावे म्हणून काढा देतात. सातत्याने गर्भपात होत असेल तर गर्भ धारणेनंतर सालीचे सरबत करून प्यावे.
७. लहान मुलांना दात येताना जुलाब होतात त्यावेळी उंबराचा चिक बत्ताशासोबत देतात. भस्मक नावाचा एक व्याधी आहे ज्यात व्यक्ती सारखे काही न काही खात असते. पण त्या व्यक्तीचे पोट भरत नाही काही वेळाने परत भूक लागते. या आजारात उंबराची साल स्त्रीच्या दुधात वाटून दिली असता ही विचित्र लक्षणे कमी होतात.
८. उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा.
९. काविळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात.
१०. तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे.औदुंबर वृक्ष दैवी गुणाबरोबरच औषधी उपयोग आहे
औषधी उपयोग
या झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते. या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात.
इतर उपयोग
उंबराची फळे खाता येतात. याची पाने शेळी बकरी आवडीने खातात. पक्षी या झाडाची फळे खातात.
धार्मिक महत्त्व
या झाडाच्या सुकलेल्या काड्या होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात. या झाडाची पूजा केली जाते.
0
Answer link
उंबराच्या पाल्याचा रस पिणे आरोग्यासाठी कितपत सुरक्षित आहे याबद्दल निश्चित माहिती देणे कठीण आहे. उंबराच्या फळांचे औषधी गुणधर्म आहेत आणि ते खाल्ले जातात, पण पाल्याच्या रसाचे सेवन करण्यापूर्वी काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे:
- संभाव्य दुष्परिणाम: काही वनस्पतींच्या पाल्यामध्ये विषारी घटक असू शकतात. त्यामुळे, उंबराच्या पाल्याचा रस घेण्यापूर्वी तो सुरक्षित आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे.
- वैद्यकीय सल्ला: तुमच्या डॉक्टरांचा किंवा qualified health professional चा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. ते तुमच्या आरोग्याच्या स्थितीनुसार योग्य मार्गदर्शन करू शकतील.
- ऍलर्जी: काही लोकांना विशिष्ट वनस्पतींची ऍलर्जी असू शकते. त्यामुळे, रस पिल्याने ऍलर्जीची प्रतिक्रिया (allergic reaction) आल्यास, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
टीप: कोणतीही नवीन गोष्ट आहारात समाविष्ट करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच सुरक्षित असते.
तुम्ही अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
या संकेतस्थळांवर तुम्हाला आरोग्य आणि औषधोपचार संबंधी उपयुक्त माहिती मिळू शकेल.