स्वभाव मानसशास्त्र सामाजिक चिंता मानसिक स्वास्थ्य

मला नवीन ठिकाणी नवीन लोकांशी बोलता येत नाही. नवीन वातावरणात (नवीन जॉबच्या ठिकाणी, समारंभाला) अनेक प्रसंगी भीती वाटते, मनात भीती उत्पन्न होते, अडखळल्यासारखे होते, दडपण येते, नवीन माहौलमध्ये comfortable वाटत नाही, खूप थकवा येतो. हे प्रॉब्लेम दूर होण्यासाठी काय करू?

5 उत्तरे
5 answers

मला नवीन ठिकाणी नवीन लोकांशी बोलता येत नाही. नवीन वातावरणात (नवीन जॉबच्या ठिकाणी, समारंभाला) अनेक प्रसंगी भीती वाटते, मनात भीती उत्पन्न होते, अडखळल्यासारखे होते, दडपण येते, नवीन माहौलमध्ये comfortable वाटत नाही, खूप थकवा येतो. हे प्रॉब्लेम दूर होण्यासाठी काय करू?

23
मी या आधीही हे उत्तर लिहिले आहे...
तेच उत्तर तुम्ही वाचावे...
म्हणजे तुम्हाला यातून काही नाविन्य समजेल...

संबंधित प्रश्न पाहता असे ध्यानात येते की तुमच्यामधील आत्मविश्वास कमी झाला आहे... कोणत्या तरी गोष्टीची प्रत्येक वेळी भीति वाटत राहते... 

सध्याच कुठेतरी एक छान वीडियो पाहिली होती... 
एक कैदी असतो... 
त्याला फाशीची शिक्षा ठोठावली गेली असते... 
पण अचानक मेजरच्या डोक्यात एक कल्पना येते... 
आणि त्या कैदीवर एक प्रयोग करुन पहावा असे सुचते... 
प्रशासनाची परवानगी घेऊन त्या कैदिवर प्रयोग होतो... 
त्या कैदीला सांगितले जाते की "तुला आम्ही फाशीची शिक्षा देण्या ऐवजी साप समोर ठेवून सापाच्या चावाने तुझे मृत्यु ठरविणार..." 
थोड्याच वेळात कैदीला डोळ्यांवर पट्टी बांधून एका खुर्चीवर बसविले जाते.. समोर टेबलावर एक साप ठेवला जातो... 
आणि तो साप त्या कैदीला दाखवून पुन्हा त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते... 
साप बाजूला सारून पोलिस दोन सुईदार पिनटाचणीने त्याच्या हातावर टोचतात... जसे की सापच त्याला चावला आहे अशी जाणिवासह त्याला पिन टोचले जाते... 
आणि कैदी क्षणार्धातच मृत्यु पावतो... 
कैदीचे पोस्टमोटर्न केले जाते... 
तपासणीनुसार त्याच्या शरीरात विष आढळले जाते... 
हे विष आले कोठुन...? याचा प्रश्न वैज्ञानिक, पोलिस यांना पडतो... कारण कैदिस तर काहीच केले गेले नव्हते... म्हणजे साप फक्त दाखवला गेला होता... आणि पिनाने फक्त हातावर टोचले गेले होते... 
बऱ्याच तर्कवितर्क नंतर निदर्शनास आले की हे विष त्याच्या डोक्यात निर्माण होत होते... 
कैदीला जेव्हा सांगण्यात आले की तुझा मृत्यु हां सापाने होणार... तर त्या वेळेपासून कैदी सापाच्या चावाने मरण होणार याच कल्पनेने सतत होता... आणि साप दाखवल्यावर आपण मेलो आणि आपल्या शरीरात विषप्रवेशाने मृत्यु होत आहे, याची पूर्वतयारीच तो स्वतः कडून तयार करत होता... 
आणि अश्या प्रकारे मस्तकात नाना विचार करुन विष तयार केले... आणि कैदी मरण पावला... 

सांगण्याचा उद्देश असा आहे की, आपण मनात एक आपले जग तयार करुन ठेवतो... सद्यपरिस्थिति काय असेल... कशी असेल याची कल्पना नसते पण भीतिच्या वावरात राहून विचारात नकारात्मक विचाराना जन्म देत असतो... 
आणि एक वाइट गोष्ट घडते... 
दुसऱ्यांदा देखील वाईट गोष्ट घडते... 
तीसऱ्यांदा देखील वाइट घडते... 
आणि मन खचुन जाते... 
साध्या साध्या गोष्टींची ही भीति वाटत राहते... 
कोणतेच कार्य, निर्णय घेण्यास असक्षम होतो... 
अश्याने मेंदू देखील कमकुवत बनते... 
म्हणूनच तो कैदी नकारात्मक लोकांचे प्रतिनिधित्व करत होता... 

सकारात्मक विचार करा... 
समस्येला सामोरे जा... 
तुम्हाला कोणाशी तरी बोलायचे आहे... 
पण भीति वाटत आहे... 
तुमची भीती ही व्यर्थ आहे.., 
घडून घडून काय घडेल... 
चांगले किंवा वाइट... 
पण आपण चांगले करतो आहोत अर्थात चांगलेच होणार या विचाराने सकारात्मक राहिलेत तर नक्कीच पराभवात सुद्धा विजय असतो... 

BE POSITIVE....
उत्तर लिहिले · 18/9/2018
कर्म · 458580
8
प्रश्नात उल्लेख केलेल्या सर्व गोष्टींची तुमच्या शरीराला सवय जळलेली आहे. माझा अंदाजानुसार तुम्ही एकटे जास्त राहता. कदाचित तुम्ही मोबाईल , tv, कॉम्पुटर, इंटरनेट यामध्ये जास्त वेळ घालवता. म्हणून तुम्हाला लोकांत सावरण्याची सवय नाही किंवा तुम्ही अडखळता . तुमचा आत्मविश्वास कमी पडतो. यावर उपाय म्हणजे,
तुम्ही घराच्या बाहेर पडा, चार लोकांत राहा, बोला, चर्चा करा, स्वतःचे विचार मांडा, इतरांचे म्हणणे ऐका, भाजी बाजारात जा तुमचे व्यावहारिक ज्ञान वाढेल, आत्मविश्वास येईल, बाहेरच्या जगाची ओळख होईल. व्यायाम करा तुमच्या शरीरात जोश येईल अणी मानसिक संतुलन पण राहील...
.
उत्तर लिहिले · 18/9/2018
कर्म · 3860
0
नवीन ठिकाणी नवीन लोकांशी बोलताना येणारी भीती, अडखळणे, दडपण आणि uncomfortable वाटणे या समस्यांवर मात करण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
  • तयारी करा: नवीन ठिकाणी जाण्यापूर्वी त्या ठिकाणाबद्दल आणि तेथील लोकांThe New York Times बद्दल माहिती मिळवा.
  • सकारात्मक दृष्टिकोन ठेवा: सकारात्मक विचार करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.
  • छोटे संवाद सुरू करा: प्रथम लहान आणि सोपे संभाषण सुरू करा. हळू हळू लोकांबरोबर बोलायला सुरुवात करा. NHS
  • शारीरिक हावभाव सुधारा: आत्मविश्वासाने चाला आणि लोकांकडे बघून स्मितहास्य करा.
  • श्वासावर लक्ष केंद्रित करा: जेव्हा तुम्हाला भीती वाटेल तेव्हा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा.
  • तणाव कमी करा: नियमित व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या.
  • मदत मागा: गरज वाटल्यास मित्र, कुटुंब किंवा व्यावसायिक सल्लागाराची मदत घ्या.

हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही नवीन लोकांशी बोलताना येणारी भीती आणि दडपण कमी करू शकता.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2220

Related Questions

माझं वय 23 आहे. मी अभ्यासात हुशार आहे, पण मला गप्पा मारता येत नाहीत. म्हणून मला लहानपणापासून खूप कमीपणा वाटतो. म्हणून मी मित्रांमध्ये मिसळत सुद्धा नाही. मला त्यांच्याशी बोलल्यावर ते माझ्याबद्दल नकारात्मक मत बनवतील आणि मला बोलणं सोडून देतील, याची नेहमी भीती वाटते. कृपया मार्गदर्शन करा.
मी एक मुलगा आहे. मला पब्लिक वॉशरूममध्ये खूप कसं तरी वाटतं, जर आसपास कोणी असेल तर आणि लघवी पण अजिबात होत नाही, पोट कितीही फुगलं असेल तरीही. असं का? उपाय सुचवा.
मी मैत्रिणींमध्ये गेली की मला एकटे एकटे वाटते, माझ्यात न्यूनगंड निर्माण झाला आहे, तो कसा कमी करू?
मी 20 वर्षांचा आहे पण मला माझ्यापेक्षा मोठ्या माणसांशी संवाद साधता येत नाही, म्हणजे मी घाबरतो, तर यावर उपाय काय?
माझ्याकडे काही कार्यक्रम असल्यास मला खूप भीती वाटते. घाम फुटतो, धडधड वाढते, हात थरथरू लागतात. घशात आवंढा येतो, तिथे थांबूच नये, लांब जावे असे वाटते. यावर काय उपाय आहे?
मुली सोबत बोलण्याची भीती वाटते?
माझ्या मित्राला लोकांची भीती वाटते, त्याच्या तोंडातून शब्दच निघत नाहीत. त्याला शब्द सुचत नाहीत, काही उपाय सांगावे?