Topic icon

सामाजिक चिंता

2
तुम्ही अभ्यासात हुशार आहात म्हणजे तुमची पुस्तकांशी छान मैत्री आहे. आणि पुस्तकं कधी आपल्याला सोडून जात नाहीत. उलट पुस्तकं वाचून आपलं ज्ञान वाढत आणि ज्याच्याकडे ज्ञान असतं लोक स्वतः त्यांच्याकडे येतात, मग अश्या negative मत बनवणाऱ्या लोकांची तुम्हाला काय गरज आहे. आणि अस चुकीचं मत बनवणारी किंवा मैत्रीचा दिखावा करणारी मित्र आपल्याला सोडून जातील याची भीती तरी आपण का बाळगावी.
You just 23years old...
अजून खूप जगायचय, जग बघायचं आहे आणि एन्जॉय करायचंय.
All the best...
उत्तर लिहिले · 18/12/2022
कर्म · 895
0

मला समजले की तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी लघवी करताना संकोच वाटतो आणि त्यामुळे तुम्हाला लघवी करण्यास त्रास होतो. या समस्येला 'पॅरोसिस' (Paruresis) किंवा 'शाय ब्लॅडर सिंड्रोम' (Shy Bladder Syndrome) म्हणतात. अनेक पुरुषांना हा अनुभव येतो आणि त्यावर उपाय आहेत.


पॅरोसिसची कारणे:

  • सामाजिक चिंता: सार्वजनिक ठिकाणी कोणीतरी बघत आहे किंवा ऐकत आहे, या भीतीने चिंता वाढणे.
  • नकारात्मक विचार: 'मी लघवी करू शकणार नाही' किंवा 'लोक काय विचार करतील' असे नकारात्मक विचार मनात येणे.
  • दबाव: लवकर लघवी करण्याची गरज आहे आणि वेळेचा दबाव आहे, असा विचार करणे.

उपाय:

पॅरोसिसवर मात करण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:

  1. मनोवैज्ञानिक उपचार:

  2. वर्तन तंत्र (Behavioral Techniques):

    • श्वासावर नियंत्रण: दीर्घ श्वास घेतल्याने चिंता कमी होते आणि आराम मिळतो.
    • स्नायू शिथिल करणे: शरीर आणि स्नायू rilax केल्याने आराम मिळतो.
    • कल्पना करणे: मनात शांत आणि आरामदायक ठिकाणाची कल्पना करा.
  3. वैयक्तिक उपाय:

    • वेळेचे व्यवस्थापन: सार्वजनिक ठिकाणी जाण्यापूर्वी पुरेसा वेळ द्या, घाई करू नका.
    • हाइड्रेटेड रहा: पुरेसे पाणी प्या, पण सार्वजनिक ठिकाणी जाण्यापूर्वी जास्त पाणी पिणे टाळा.
    • एकांताचा शोध: शक्य असल्यास, कमी गर्दीचे किंवा एकांत असलेले शौचालय वापरा.
  4. समर्थन गट (Support Groups):

    • पॅरोसिस असलेल्या लोकांशी बोलल्याने तुम्हाला एकटे वाटणार नाही आणि मदतीसाठी नवीन मार्ग सापडतील. https://paruresis.org/
  5. डॉक्टरांची मदत:

    • जर तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल, तर मानसोपचारतज्ज्ञाचा (Psychiatrist) सल्ला घ्या. ते तुम्हाला योग्य उपचार आणि मार्गदर्शन करू शकतील.

हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही सार्वजनिक ठिकाणी लघवी करताना येणाऱ्या अडचणींवर मात करू शकता. कोणता उपाय तुमच्यासाठी सर्वोत्तम काम करतो हे शोधण्यासाठी प्रयोग करा आणि संयम ठेवा.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1440
7
सोप्पं आहे,
रोज सकाळी उठल्यावर स्वतःला एक गोष्ट दररोज सांगा ती म्हणजे, की तुम्ही खूप खास आणि युनिक आहात व तुमच्या सारखे या जगात कोणीच नाहीये, न्यूनगंड हळूहळू निघून जाईल.

२. स्वतःच्या मनात स्वतः ला कधीच कमी लेखू नये.

३. तसेच जे तुमच्या शब्दाला वजन देतात त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवा.

४. घरात आजी आजोबा, बाबा निश्चित सांगतील की तुम्ही किती स्पेशल आहात ते.

जाता जाता एक अति महत्वाचं आणि शेवटचं सांगतो की,
तुम्ही स्वतःची इतरांसोबत तुलना कधीच करू नका, कारण मला माहित आहे तुम्ही खूप स्पेशल (खास) आणि युनिक आहात.

तुम्हाला शुभेच्छा..
उत्तर लिहिले · 23/5/2019
कर्म · 2920
6
याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे मोठे लोक काय बोलत आहेत, कोणत्या विषयावर ते बोलत आहे ते समजून घ्या. त्या विषयावरती तुम्ही अभ्यास करा आणि जेव्हा पुन्हा लोक त्या विषयावरती बोलत असतील तेव्हा तुम्ही सुद्धा त्यांच्यामध्ये बोलू शकता. त्यामुळे तुम्हाला भीती वाटणार नाही आणि संवादही योग्य प्रकारे साधता येईल.
उत्तर लिहिले · 13/5/2019
कर्म · 17995
8
असं म्हटलं जातं की,
     "अति काळजी करणारा आणि अजिबात काळजी न करणारा जीवनात कधीही यशस्वी होत नाही"

     तुमच्या बाबत नेमकं हेच होतंय. तुम्ही तुमच्याकडे एखादा कार्यक्रम असेल तर त्याविषयी खूप काळजी करता. त्यामुळेच तुमच्या प्रश्नात जेवढे लक्षणं तुम्ही सांगितलेत ते तुमच्या बाबत दिसून येतात.

     तुमच्यासाठी बेस्ट सोल्युशन हेच की तुम्ही अति काळजी करणं सोडा.
उत्तर लिहिले · 13/2/2019
कर्म · 3005
14
आपण कधीच मुली सोबत बोललेलो नसतो त्यामुळे भिती वाटत असते .. ( खरतर यात घाबरण्याचे काही कारण नसते , फक्त आपल्यात धाडस होत नाही )
        त्यासाठी अगोदर जवळच्या किंवा ओळखीच्या मुलीशी चर्चा करा ,बोला ..मग हळूहळू सवय होईलच...!!
उत्तर लिहिले · 23/1/2019
कर्म · 7230
10
माझा मते तुमचा मित्राला नवीन नवीन गोष्टी शिकायला सांगा..त्याना स्वतःची कामे स्वतः करायला सांगा यामुळे त्यांचा स्वतःबद्दल आत्मविश्वास हळू हळू वाढत जाईल..प्रत्येक गोष्टीमध्ये त्याना जबाबदारी देण्याचा  प्रयत्न करा त्यामुळे  त्यांचा व्यक्तिमत्त्वमध्ये खूप सुधारणा होत जाईल. रोज नवीन नवीन मित्रांमध्ये तुम्ही त्यांना घेऊन जावा त्याचं चांगल्या गोष्टीच कौतुक करत चला.त्याना तुम्ही सारखे कोणतेही प्रश्न विचारत चला त्यामुळे तुमचा मित्र आपोआप भीतीमुक्त होईल..मित्राला बद्दल आपुलकीने प्रश्न विचारलात छान वाटले..चांगली मैत्री प्रगतीकडे घेऊन जाते याचे तुमची मैत्री एक चांगले उदाहरण आहे...
                *** धन्यवाद ****
          
         **धन्यवाद **
उत्तर लिहिले · 13/12/2018
कर्म · 11700