अन्न फळ पोषण आरोग्य आहार

बेलाचा मुरब्बा खाणे योग्य की अयोग्य? आणि बेल खाण्याचे फायदे आणि नुकसान स्पष्ट करा?

3 उत्तरे
3 answers

बेलाचा मुरब्बा खाणे योग्य की अयोग्य? आणि बेल खाण्याचे फायदे आणि नुकसान स्पष्ट करा?

3
✍️✍️
महादेवाच्या पूजेमध्ये प्रामुख्याने वापरले जानारे पान☘️ म्हणजे बेलपत्र. याच बेलाच्या पत्रांची व फळांची आरोग्यासाठीही तेवढाच महत्व आहे. बेलपत्रासोबतच बेलफळ (कवठ) हेदेखील अर्पण केले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात बेलफळाचा मुरंबा प्रामुख्याने खाल्ला जातो. धार्मिक महत्त्वाप्रमाणेच बेल आणि बेलफळाचे आरोग्यदायी💪 गुणधर्मदेखील आढळतात. आयुर्वेदामध्ये बेलाला दशमूळांपैकी एक मानले जाते. मधूमेहींसाठी बेल अतिशय गुणकारी आहे. यासोबतच ताप🗣️, बद्धकोष्ठता आणि डोळ्यांच्या 👀विकारामध्येही बेल गुणकारी ठरतो.

बेलपत्रामध्ये अ‍ॅन्टी–डाएबिटीक गुणधर्म आढळतात हे वैज्ञानिकदृष्ट्यादेखील सिद्ध झाले आहे. बेलपत्राचा रस रक्तातील साखरेप्रमाणे💗 कोलेस्ट्रॉलवरही नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. बेलपत्राच्या रसात हायपोग्ल्यास्मिक आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट गुणधर्माने परिपूर्ण असतो. ज्या पदार्थांमध्ये ग्ल्यासमिक इंडेक्स कमी तितका तो पदार्थ मधूमेहींसाठी फायदेशीर ठरतो. बेलपत्राच्या पानांमुळे स्वादूपिंडाच्या कार्याला चालना मिळते. परिणामी इन्सुलिनची निर्मिती सुधारते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

ही बेलपत्राची पान तुम्ही तुमच्या आहारात देखील समावेश करू शकता.त्यासाठी खालील काही गोष्टी नक्की लक्ष्यात ठेवावे.

 रिकाम्या पोटी किमान ४-५ स्वच्छ धुतलेली आणि ताजी बेलपत्राची पानं चघळा. हा प्रयोग नियमित केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. काही ताज्या बेलपत्राच्या पानांचा मिक्सरमधून रस काढून घ्या. त्यामध्ये काळामिरीची चिमूटभर पावडर मिसळा. तयार मिश्रण नियमित प्या.बेलपत्रासोबत तुम्ही काही तुळशीची पानंदेखील चघळून खाऊ शकता. यामुळे मधूमेहासोबत कोलेस्ट्रॉलवरही नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.

 बेलाच्या पानांचा २० मि.लि. रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. तसच सतत बाथरुमला जाण्याचा त्रासही कमी होतो.क्षयरोगाच्या रुग्णांनी कच्चा बेलाचा गर,साखर आणि मध जेवनानंतर नियमित सेवन केल्यास लवकर आराम पडतो.किमान चाळीस दिवस तरी हे औषध म्हणून घ्याव.सकाळी उपाशी पोटी बेलाची तीन ते चार पान आणि काळी मिरी कोमट पाण्यासोबत एक महिना घेतल्यास अस्थमाचा त्रास कमी होतो.

 

 टीप- बेलपत्राचे  सेवन गरोदर स्त्रियांनी टाळावे. बाळासाठी प्रयत्न करत असल्यास किंवा गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बेलफळ किंवा बेलपत्राचा आहारात समावेश करावा

✔️
उत्तर लिहिले · 12/4/2018
कर्म · 26630
2
*आरोग्यशास्त्र*

*बेलाचे औषधी उपयोग*

बेलाचे झाड आयुर्वेदात अत्यंत उपयुक्ते म्हणून वर्णन केले गेले आहे. बेल हे देवी-देवतांचे फळ मानले जाते. त्यामुळेच मंदिरांभोवती विशेषतः भगवान शंकराच्या मंदिराभोवती बेलाची झाडे आढळतात. बेल हा दोन प्रकारचा असतो. छोटा बेल जंगली असतो. मोठ्या बेलाचे झाड कोठेही उवगवते. दोन्ही झाडांचे गुण सारखेच असतात. मात्र, औषधी वापरासाठी जंगली बेल उपयुक्तस असल्याचे सांगितले जाते.

मे ते ऑगस्ट या तीन-चार महिन्यांत बेल भरपूर प्रमाणात उपलब्ध होतो. बेलफळ हे नारळासारखेच असते. मात्र, नारळाप्रमाणे बेलफळावर आवरण नसते. कीड, रोगराई यापासून बचाव करण्यासाठी बेलाच्या झाडावर कसलेही औषध फवारावे लागत नाही. या झाडाचे आयुष्य खूपच मोठे असते. बेलफळ नियमित खाल्ल्याने आरोग्याच्या द‍ृष्टीने अनेक फायदे होतात. मेंदूचे विकार दूर करण्यात बेल उपयुक्तो ठरतो. ज्यांची स्मरणशक्तीा कमी आहे अशांनी बेलाची पाने नियमित खाल्ली. तर त्यांची स्मरणशक्तीत सुधारण्यास मदत होते. तसेच पचनशक्तीी सुधारण्यासही मदत होते.
पोट साफ राहते. मूळव्याधीसाठीही बेल उपयुक्ते ठरतो. ज्यांना द‍ृष्टिदोष आहेत अशांनी बेलाच्या पानांचा रस नियमितपणे डोळ्यात सोडला तर त्यांचे द‍ृष्टिदोष दूर होऊ शकतात. ज्यांना हृदरोगाची व्याधी आहे, अशांनाही बेलाच्या सेवनाने फायदा होतो. अशक्तषपणा असलेल्या रुग्णांना नवी ताकद, जोम देण्याचे काम बेल करतो.
वात विकार असणार्यांयना तसेच कफाची व्याधी असणार्यांअनाही बेलामुळे आराम मिळतो. अपचनामुळे अनेकांना भूक न लागण्याची समस्या निर्माण होते. अशांनी बेल नियमित खाल्ल्यास त्यांना भूक लागणे सुरू होते. पोट साफ नसल्यास तसेच अपचन झाले असल्यास आपल्याला अनेक व्याधींना तसेच शरीराच्या अनेक तक्रारींना तोंड द्यावे लागते. अशा रुग्णांनी दररोज सकाळी आणि संध्याकाळी 20 ग्रॅम बेलफळ खाल्ल्यास उपयुक्तड ठरते. बेलफळ खाण्यापूर्वी त्यातील बी काढून टाकली पाहिजे. उष्णता, आतड्यांच्या व्याधी, बद्धकोष्टता यासारख्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये बेलाचे सेवन उपयुक्ता ठरते. काळ्या मिरचीबरोबर बेलाच्या पानांचा रस घेतल्यास अपचनाच्या तक्रारी दूर होतात.
फुलांमुळे, फळांमुळे प्रसिद्ध असलेले बरेच वृक्ष आहे पण केवळ पानांसाठी ओळखले जाणारे थोडेच आहेत. बेल शास्त्रीय नाव: Aegle marmelos,एगल मार्मेलोस, इंग्लिश: Bael, बेल हा दक्षिण आशिया व आग्नेय आशिया या उष्णकटिबंधीय भूप्रदेशांत आढळणारा एक दिव्यवृक्ष त्यापैकीच एक आहे. भारतीय संस्कृतीत बिल्वपत्रला नव्हे तर संपूर्ण बेल वृक्षाला फार महत्व आहे. प्रत्येक शुभकार्याच्या प्रसंगी पूजनात बिल्व पत्राचा उपयोग केला जातो त्यामुळे हिंदूधर्मात बेल आणि बिल्वपत्रला पवित्र स्थान आहे. बिल्ववृक्ष हा चित्रा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. ह्या दिव्य वृक्षाची प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून, त्याला पुजेतही स्थान देऊन त्याचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून केला गेला आहे. पानांबरोबरच बेलाच्या फळालाही महत्त्व पावलेले आहेत. बेलाची जन्मभूमी भारत पण त्याचे शास्त्रीय नाव एगिल या इजिप्तशियन या देवतेवरून ठेवले गेले.
बेल हा एगेल प्रजातील एकमेव वृक्ष आहे. या वृक्षला देशाच्या विविध भागामध्ये आणि देशाबाहेरही वेगवेगळ्या नावाने ओळखले जाततात जसे मराठी (बेल); हिंदी (बेल, सिरल); संस्कृत (बिल्वा, श्रीफळ, शिवद्रम, शिवपाल); तेलगू (मारे डू); बंगाली (बिल्बम); गुजराती (बिल); कन्नड (बिप्तारा, कुंबळा, मालुरा); तामिळ (कुवलम); थाई  (मातम आणि मॅपिन); कंबोडिया (फ्नू किंवा पीनोई); व्हिएतनामी (बाऊनऊ); मलायन (माझ पास); फ्रेंच (ओरंगेर ड्यू मालाबार); पोर्तुगीज (मार्मेलोस) अशा वेगवेगळ्या नावांनी बेल वृक्षाला संबोधले जाते.
बेलाचा वृक्ष १८ मीटर उंचीपर्यंत वाढतो भारताच्या बहुतेक भागाच्या जंगलात बेलाची झाडे नैसर्गिकरित्या वाढतात आणि शिवपूजेसाठी अत्याव्यश्यक मानली गेल्यामुळे गावोगावी, देवाळांजवळ, उद्यानांमध्ये, किंवा घराच्या परसबागेत वाढवली जातात.  या झाडांना खूप महत्व आहे. वातावरणामध्ये ते हवामानातील शुद्धीकरणाचे कार्य करते कारण भरपूर प्रमाणात प्राणवायू इतर झाडाच्या तुलनेत जास्त सोडतात, प्राणवायूचा एक स्त्रोत म्हणुन बेल वृक्ष कार्य करतो आणि वातावरणामधील विषारी वायू शोषून घेतो. या झाडाची फळे अतिशय रुचकर व गुणकारी असतात. बेलफळांचा रंग सोनेरी पिवळट हिरवा असतो आणि या गुणवंत फळाचा  चंदनासारखा सुगंध वातावरण भारून टाकणारा असतो. केवळ बेलफळांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये भरपूर केला जातो असे नाही त्या झाडाची पाने, फुले, झाडाची साल व खोडाचा गाभा याचाही आयुर्वेदिक औषधी म्हणून  उपयोग करता येतो.
एका छोट्याशा बेलापासून आरोग्यवर्धक अनेक गुण दडलेले आहेत. पोटदुखीपासून तर मधुमेहापर्यंतच्या सर्व समस्यांवर बेल गुणकारी आहे. बिल्वपत्रासाठी बेलाच्या झाडाचा वापर सर्वसामान्यांना माहिती आहे. पण, या झाडाला लागणारे बेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. उपचारात्मक फळ म्हणून बेलफळ ओळखले जाते  कारण बेल फळामधील उपयोगी गुणधर्मामुळे आयुर्वेदात बेल फळाला अनन्नसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. बेलाचे हे फळ वरून अतिशय टणक असते. पण, त्याला फोडल्यास त्याच्या आतील गर तितकाच मऊ व चिकट असतो. चिकट, तंतुमय पदार्थ आणि त्यात असलेल्या मोठ्या प्रमाणातील बिया यामुळे बेल फळ खाण्यासाठी अवघड जाते. गावखेड्यात जुन्या जाणकारांकडून बेलाच्या या फळाचा वापर केला जातो. पण, बदलत्या व्यवस्थेत या फळाच्या गुणाकडे काहीसे दुर्लक्ष होत चालले आहे. पण, बेलापासून अनेक फायदे असल्याने प्रत्येकाने या फळाचा उपयोग करायला पाहिजे. बेल फळाच्या औषधी उपयोगाची गणना करता येत नाही. बेलाचे विविध भाग विविध उपचारत्मक म्हणून वापरले जातात. जसे की अस्थमा, रक्तक्षय, अशक्तपणा, जखमा, सूज येणे, उच्च रक्तदाब, कावीळ, अतिसार, अशा अनेक रोगावर गुणकारी आहे. पौष्टिक मूल्यामध्ये बेल फळ उच्च आहे त्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्व, खनिजे, तंतुमय पदार्थ यांचा चांगला स्त्रोत आहे. बेल फळात जीवनसत्व ब2 सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. बेल फळ सर्वात पौष्टिक फळापैकी एक आहे. बेल फळामधील चिकट पोत आणि लागद्याला अगदी आकर्षक रंग आणि उत्कृष्ट सुगंध जो प्रक्रिया केल्यानंतरही नष्ट होत नाही.
बेल फळाचे पौष्टिक मूल्य:
बेल फळाच्या लगदया मध्ये स्टिरॉइड्स, कूमारिन्स, फ्लॅनोनोयड्स, टेरपेनॉईड, फिनोलॉलिक संयुगे, लिग्निन, इनुलीन, आणि अन्य एंटिऑक्सिडेंट जी आपल्याला जुनाट रोगांपासून वाचवू शकते. याव्यतिरिक्त, त्यात प्रथिने, कर्बोदके, खनिजे (कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह) आणि जीवनसत्वे (विट ए, विट बी, विट सी आणि रिबोफॅव्हिन) यांचा समावेश आहे. अॅल्कॉइड, कार्डियाक ग्लायकोसाइड आणि फ्लॅनोनोयड्स इत्यादीचा उत्तम स्त्रोत आहे. बेलफळ हे स्थानिक पारंपारिक औषधांसाठी वापरले जाणाऱ्या महत्वाचे झाडांपैकी एक आहे. पारंपारिक औषधांमध्ये त्याच्या वापराचे असंख्य संदर्भ दिलेले आहेत.
*आरोग्यवर्धक फायदे:*

*मधुमेह विरोधी*: मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेल अतिशय लाभदायी आहे. बेलाच्या पानांचा रस काढून दिवसाला दोन वेळा घेतल्यास मधुमेहापासून मुक्तता मिळविणे शक्य आहे. रोज याचे सेवन केल्यास याचा फरक दिसून येतो. किंवा 250 मिली ग्राम प्रती किलो ग्राम शरीराच्या वजनानुसार बेल फळाचा अर्क घेतल्यास त्याचा परिणाम दिसून येतो कारण कौमारीन (coumarins) नावाचा घटक बेल फळामध्ये असल्यामुळे इन्सुलिन निर्माण करण्यासाठी बीटा पेशीला उत्तेजित करतो.

*अतिसार आणि आमांश विरोधी*: उन्हाळ्याच्या दिवसात अतिसार ही समस्या आता अधिकांश लोकांमध्ये दिसून येते. अलीकडे या रुग्णांचे प्रमाण वाढीस लागले आहेत. या परिस्थितीत उलट्या, हगवण, मळमळ वाटू लागते. बेलाच्या पाण्यात साखर मिसळून प्यायल्यास याचे लाभ दिसून येतात. किंवा कच्चे फळे खाल्यास अतिसार नियंत्रणामध्ये येतो. अर्धे पिकलेली फळ हे सर्वोत्तम मानले जाते परंतु संपूर्ण पिकलेली फळे किंवा अगदी फळाचा चूर्ण परिणामकारक परिणाम दर्शवितो.

*बद्धकोष्ठता*: योग्य परिपक्व फळ सर्वोत्तम रेचक मानले गेले आहे. पिकलेले फळे 2 ते 3 महिने नियमितपणे खाल्यास जड पदार्थ काढण्यात प्रभावी आहे.

*अपचनापासून मुक्ती:* पोटाच्या दुखण्यांवर बेलाचे फळ रामबाण औषध आहे. बहुतांश रोगांची सुरुवात पोटापासून होत असते. बेलाच्या नियमित सेवनाने अपचनापासून कायमची मुक्ती मिळणे शक्य आहे. पुढचे मोठे आजार टाळणे शक्य आहे.

*रक्तक्षयविरोधी*: बदलत्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताच्या कमरतेचे लक्षण दिसून येतात. अशा परिस्थितीत वाळलेल्या बेलाच्या गराचा चूर्ण तयार करून गरम दुधात रोज एक चमचा शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते.

*गर्भवती महिलांसाठी:गर्भवती महिलांना उलट्यांचा त्रास सर्वसामान्य मानला जातो. या  अनेकदा जेवण बंद केले जाते. त्याचा परिणाम बाळावर होऊन पुढच्या त्रास वाढतो. पण, या समस्येवर बेल सर्वोत्तम उपाय आहे. बेलाचा गर कुटून तांदळाच्या पाण्यासोबत त्याचा लगदा तयार करावा. नंतर त्याची छाननी करून प्यावे. त्यापासून गर्भवती महिलांना आराम मिळतो.

उन लागल्यास जागतीक तापमानवाढीमुळे दरवर्षी पारा उन्हाळ्यात वाढत जातो. दरवर्षीचा हा अनुभव असल्याने अनेकांना ऊन लागते. हा त्रास सुरू झाल्यास बेलाच्या ताज्या पानांना कुटून मेहंदीप्रमाणे तळपायावर लावावे. अशा वेळी बेलाचा शरबत प्यायल्यास तत्काळ आराम मिळतो.

याचबरोबर इतर आजारात अनेक रोगावर बेल फळ रामबण उपाय म्हणून वापरले जाते जसे की मलेरिया विरोधी, व्रणविरोधी, कर्करोगविरोधी, जीवाणू विरोधी, आणि कावीळ इत्यादी रोगावर बिल्ववृक्षाचा झाडांच्या जवळजवळ सर्व भाग उदा. मूळ, झाडाची साल, पाने, फुले किंवा फळे एक किंवा इतर मानवी आजार बरा करण्यासाठी वापरतात. यांच्यात असलेल्या विशिष्ठ आरोग्यवर्धक घटकामुळे उपचारत्मक म्हणून बेल फळ ओळखले जाते.
उत्तर लिहिले · 5/8/2019
कर्म · 4045
0

बेलाचा मुरब्बा खाणे योग्य की अयोग्य?

बेलाचा मुरब्बा योग्य प्रमाणात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बेलामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, त्यामुळे तो मुरब्बा रूपात खाणे देखील फायद्याचे असते. मात्र, मुरब्बा बनवताना त्यात साखर वापरली जाते, त्यामुळे मधुमेहींनी (Diabetics) तो कमी प्रमाणात खावा.

बेल खाण्याचे फायदे:

  • पचनक्रिया सुधारते: बेलामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. WebMD
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवते: बेलामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
  • शरीराला थंडावा देतो: बेलाची प्रकृती थंड असल्यामुळे तो शरीराला थंडावा देतो आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला आराम मिळवतो.
  • रक्त शुद्ध करतो: बेलामध्ये रक्त शुद्ध करणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात.

बेल खाण्याचे नुकसान:

  • पोटदुखी: जास्त प्रमाणात बेल खाल्ल्यास काही लोकांना पोटदुखी किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो.
  • ऍलर्जी: काही लोकांना बेलाची ऍलर्जी (allergy) असू शकते, त्यामुळे त्यांना त्वचेवर पुरळ उठणे किंवा इतर समस्या येऊ शकतात.
  • मधुमेह: बेलामध्ये नैसर्गिक शर्करा असते, त्यामुळे मधुमेहींनी तो जपून खावा.

टीप: कोणताही पदार्थ moderation मध्ये खाणे आरोग्यासाठी उत्तम असते.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1820

Related Questions

जेवण पोटभर जात नाही?
जेवण जात नाही?
एखाद्या व्यक्तीला एनर्जी एकदम कमी झाल्यावर लवकर एनर्जी येण्यासाठी काय करावे?
पसाभर बदामामध्ये किती प्रोटीन असते?
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी कोणता आहार घ्यावा?
100 ग्रॅम सोयाबीनमध्ये प्रथिने किती असतात?
200 ग्राम भिजलेल्या हरभऱ्यामध्ये किती प्रथिने असतात?