Topic icon

फळ

0
मला नक्की कशाबद्दल माहिती हवी आहे, हे स्पष्ट होत नाही आहे. कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा. उदाहरणार्थ, तुम्ही कोणत्या फळांबद्दल बोलत आहात आणि ते कोणती गावे आहेत?
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 860
0
आजोबांच्या नावावर विहीर असल्यास, सामाजिक क्षेत्रफळांमध्ये (Social Land) वाटून घेण्यासाठी खालील प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे लागू शकतात:

कायदेशीर प्रक्रिया:

  1. उत्तराधिकार (Inheritance):

    आजोबांच्या नावावर असलेली विहीर त्यांच्या वारसांना (heirs) कायदेशीररीत्या मिळू शकते. यासाठी वारसा हक्क प्रमाणपत्र (Heirship Certificate) मिळवणे आवश्यक आहे.

  2. वाटणीपत्र (Partition Deed):

    सर्व वारसांमध्ये जमिनीची वाटणी करण्यासाठी वाटणीपत्र तयार करणे आवश्यक आहे. या वाटणीपत्रात कोणाला किती भाग मिळणार आहे हे स्पष्टपणे नमूद केलेले असावे.

  3. नोंदणी (Registration):

    वाटणीपत्र तयार झाल्यावर ते दुय्यम निबंधक कार्यालयात (Sub-Registrar Office) नोंदवणे आवश्यक आहे. यामुळे त्या वाटणीपत्राला कायदेशीर मान्यता मिळते.

  4. ग्रामपंचायत/तलाठी कार्यालयात नोंद:

    आपल्या ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयात जमिनीच्या नोंदीमध्ये वारसांची नावे दाखल करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे:

  • आजोबांचे मृत्यू प्रमाणपत्र (Death Certificate).
  • वारसा हक्क प्रमाणपत्र (Heirship Certificate).
  • जमिनीची कागदपत्रे (Land Documents) जसे की 7/12 उतारा आणि मालमत्ता पत्रक.
  • ओळखीचे पुरावे (Identity Proofs) जसे की आधार कार्ड, ভোটার কার্ড.
  • सर्व वारसांचे संमतीपत्र (Consent Letter).
  • वाटणीपत्राचा मसुदा (Draft of Partition Deed).

सामाजिक क्षेत्रफळात (Social Land) रूपांतरण:

जर विहीर सामाजिक कामांसाठी वापरायची असेल, तर तिचे रूपांतरण सामाजिक क्षेत्रफळात करणे आवश्यक आहे. यासाठी:

  1. ग्रामसभा ठराव:

    ग्रामसभेत याबद्दल ठराव मांडावा लागेल की विहीर सामाजिक कामांसाठी वापरायची आहे.

  2. सरकारी परवानगी:

    तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.

  3. नोंदणी:

    विहिरीचे रूपांतरण सामाजिक कामांसाठी झाल्यावर त्याची नोंदणी सरकारी दफ्तरी करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी:

  • तुम्ही वकील किंवा कायदेशीर सल्लागाराची मदत घेऊ शकता.
  • तलाठी कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यालयात संपर्क साधा.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 860
3
काही फळांमध्ये एकच बि असते म्हणून अशी फळझाडे कमी प्रमाणात असतात  त्यामुळे त्या फळांचे उत्पादन कमी येते अशी झाडावर पिकलेली फळे आहारात  कमी असली तरी पण आपल्या  आहारात नियमित किंवा मोसमा प्रमाणे  असावीत . आणि ज्या फळांमध्ये अनेक बीया असतात त्यांची अनेक झाडे तयार होत असतात त्यामुळे त्या फळांचे उत्पादन जास्त मिळते . आणि अशा प्रकारे झाडांवर पिकलेली फळे आहारात नियमित किंवा मोसमा प्रमाणे असावीत   निसर्गाने निसर्गातील प्रत्येक सजीवाला पोटभर खायला फळे मिळाली पाहिजेत  म्हणून तर विविध चवीची भेसळ मुक्त भरपूर  बिया असलेली फळे खाण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिली . आपण जर नियमित पोटभर आपल्या येथे पिकणाऱ्या फळांचे सेवन केल्यास आणि  खाल्लेल्या फळातील बिया ज्यांना शक्य असेल त्यांनी जरी  जमीनीमध्ये  लावल्यास इतर सजीवांच्या   आरोग्याच्या  सर्व समस्या निश्चितच कमी होतील. आता निसर्ग निर्मित तयार पिकलेली फळे खाऊन पोटातील अग्नी मध्ये शिजवायची  का मानव निर्मित अग्नी मध्ये निसर्गातील झाडांच्या बिया बारीक पीठ करून  भाजून , किंवा शिजवून  तेलामध्ये फोडणी देऊन मीठ मसाले लावून त्या पासून अन्न  तयार करून खायचे हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे.

उत्तर लिहिले · 19/4/2022
कर्म · 810
4
खरं आहे धान्य, कडधान्य फळातील बिया ,या मध्ये वनस्पतीचा जीव असतो. धान्य ,कडधान्ये फळातील व काही शेंगा  मधील सुकलेल्या बिया  आहे त्या नैसर्गिक अवस्थेत खाऊन मानव पोटातील अग्नी मध्ये  शिजवू  शकत नाही. त्या साठी त्यावर काही प्रकीया करावी लागते. मानवाने सतत अभ्यास निरीक्षण संशोधन करून अग्नी चा शोध लागल्यानंतर ज्वारी ,बाजरी ,गहू इत्यादी धान्य जे लवकर शिजू शकत नाही त्याचे पीठ करून  बाहेरील अग्नी मध्ये  भाजून ,तांदूळ शिजवून, कडधान्ये यांच्या डाळी तयार करुन शिजवून किंवा  कडधान्ये यांना मोड आणून   शिजवून खाण्यास सुरुवात केली .  आणि आज मानवाने  तेच अन्न म्हणून स्वीकारले आहे . निसर्गात मुबलक मिळते व खाल्यावर लगेच  भूक लागत नाही. शरीर कुपोषित दिसत नाही आकर्षक दिसते  हे एक त्यामागील कारण असावे असे मला वाटते .
उत्तर लिहिले · 17/4/2022
कर्म · 810
3
प्रत्येक माणूस तीन काळातून जातो अन् प्रत्येक काळाशी त्याच्या आरोग्याचा संबंध दडलेला असतो. बालपण, तारूण्य आणि वृद्धत्व हे तीन काळ एकेका दोषाने प्रभावीत झालेले दिसतात. बालपण कफाने, तारूण्य पित्ताने तर वृद्धत्व वात दोषाने प्रभाव‌ति झालेले असते. आज आपण ज्येष्ठांमधील आजार हा विषय पाहत असल्याने ज्येष्ठत्वातील वाताच्या विकृत प्रवृत्तीवर नियंत्रणासाठी आयुर्वेदाच्या अंगाने उपचार पाहणार आहोत.

कोणत्या आहार आणि विहाराने वाताच्या दोषाची वाढ नियंत्रणात आणता येते याचा विचार करताना कोणती आहार व विहारपद्धती या दोषांना वाढवते हे अभ्यासणं आवश्यक ठरतं. आहाराचा प्रत्येक कण शरीर आणि मनोषक असतो. तसा तो शरीर आणि मनोघातक ही प्रकृती काळाप्रमाणे ठरताना दिसते. म्हणूनच आयुर्वेद ग्रंथकारांनी दिनचर्या आणि ऋतूचर्या यांचं पालन करायला सांगितलं आहे. या ही पुढे जाऊन वयोमानाप्रमाणे शरीरात दोषांची साठवण होण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने वयाच्या अनुषंगाने आहार पद्धती योजणं आवश्यक ठरतं. साधारणपणे वृद्धापकाळात हाडांची ठिसुळता, मणक्यांचे विकार, पोटाचे विकार, मलावष्टंम, डोळ्यांचा अशक्तपणा कानाचे आणि श्वसनाचा त्रास, हृदयविकार, वात नाड्यांचे विकार, प्रोस्टेट ग्रंथीचे विकार, विस्मृती, वात वाहन संस्थेचे विकार अधिक प्रमाणात आढळून येतात. या सर्वांवर वाताचा परिणाम असला तरी शरीराने अगोदरच्या काळात घेतलेल्या काळजीचा थेट संबंध येथे येतो. अगोदर प्रस्तूत जशी काळजी घेतल्यास पुढील ऋतूचा त्रास उद्भवत नाही तसंच बालपण, तारूण्य या अवस्थांमध्ये उत्तम नियोन केल्यास वृद्धापकाळात अधिक त्रास होत नाही. त्याची अनेक उदाहरणं दिसून येतात आणि ही सर्व मागील पिढीमध्ये दिसतात हे विशेष. त्याचं उत्तर योग्य आहार आणि विहार. वय वाढतं तसा आहार कमी होतो विहार मंदावतो आणि वात दोषाची विकृती वाढते. आवडणाऱ्या गोष्टींवर प्रतिबंध येतात. म्हणून मा‌नसिक वाताचासुद्धा क्षोभ होतो आणि आजारपण बळावते. मागील पिढीचा आहार आणि विहार योग्य होता म्हणूनच कालमर्यादा, वयोमर्यादा तसंच सशक्त शरीरासह जीवनशैली दिसून येते.


वातवर्धक आहार : सर्व प्रकारच्या कोरड्या उसळी, कोरडे अन्न, थंड अन्न, स्नेह नसलेले पदार्थ (तूप, तेल विरहीत पदार्थ), मेथी, शेपू, पालकसारख्या हिरव्या पालेभाज्या, मैद्याचे तळलेले पदार्थ, डबा बंद पदार्थ, शिळे अन्न, उशिरा आंबवलेले अन्न पदार्थ, वाळवलेली फळे, आंबट फळे, आंबट पदार्थ, मासे, पपई, अननस, कच्च्या भाज्या, कच्चा कांदा, चणाडाळ, वाळलेले काजू, सोयाबिन, पांढरा तसंच काळा वाटाणा, कारले, मका, काकडी, पांढरा कोंडा, बकरीचे-डुकराचे मांस हे वात दोषांची वाढ करतात. या यादीकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की वृद्धापकाळात‘अती अभ्यास’करून हेच पदार्थ खातांना व्यक्ती आढळतात. म्हणजेच डाएट करण्याच्या अट्टहासात आपण जे खायला नको तेच खातो. हे पदार्थ संख्यात्मक दृष्ट्या कदाच‌ति चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील. पण गुणात्मक दृष्ट्या संपूर्ण शरीराची स्थिती बिघडवतात.

वृद्धकाळाच्या आगमनापासून विशिष्ट आहार वाढवल्यास त्याचा उपयोग उत्तम होतो. हे शास्त्र सिद्ध आहे. किमान १ चमचा शुद्ध तूप एकावेळी आहारात हे वातावर नियंत्रण ठेवणारे आहे. (त्यासाठी तूप खाण्याची अवस्था शरीराची अगोदरपासून ठेवणं आवश्यक आहे.) ओल्या नारळाचा वापर, सुक्या खोबऱ्याचा वापर, अंजीर, खजुर, मोसंबी, आंबा, संत्री, पपया, चेरी सर्व प्रकारच्या बेरी, अक्रोड ही फळं अत्यंत लाभदायी ठरतात. तिळाचा, खुरासणीचा आहारात आवर्जून वापर करावा, शतावरी (भाजीची), गाजर, मेथीदाणा, गाजर, मटार, मोहरी, ओक्रा, ऑलिव्ह भिजवलेला कांदा, तूपात तळलेला लसुण भोपळा, बदाम, आमचूर, तुळस, केळफूल, दगडफूल, लवंग, दालचिनी, कोथिंबीर, आलं, पिंपनी, चिंच, हळद, वेनित्रा, संत्रासाल, पेपरमिंट, पुदिना, काळेतील यांचा वापर मिळेल तसा करावा. आपला मसाला हा वातनाशक करू शकता.

मूग, मसूर, लाल माठ, तांदुळका, चाकवत, काही आदिवासी भागात मिळणाऱ्या पालेभाज्या यांचा शरीराला फायदा होतो. ऊसाचा रस (आलं लिंबू टाकून) बदाम, पिस्ते, भोपळ्याच्या बिया, ताक, गाईचे दूध, मऊ चीज, लोणी, सर्व प्रकारचे तांदूळ याचं सेवन व्हायलाच हवं. समुद्रातील तसंच गोड्या पाण्यातील मासे, कोंबडी मांस, तिसऱ्या (शिंपल्या) हे मांसाहार विशेषत: उपयोगी ठरतात. सध्या उपलब्ध असलेले विविध वनस्पतीजन्य चहा निश्च‌तिपणे गुणकारी ठरतात. सामान्यपणे वर दिल्याप्रमाणे वाताचा त्रास असलेल्या ज्येष्ठांनी काय खायचं अथवा काय खायचं नाही याचं नियोजन केल्यास नक्की चांगला फायदा होताना दिसतो.
उत्तर लिहिले · 8/2/2022
कर्म · 121765
0

मला समजले आहे की तुम्हाला कफचा त्रास आहे आणि तुम्ही विचारत आहात की कोणती फळे खाल्ल्याने तो वाढू शकतो. काही फळे आहेत ज्यामुळे कफ वाढू शकतो, विशेषत: जर तुम्हाला सर्दी किंवा ऍलर्जी असेल. खाली काही फळांची यादी दिली आहे जी कफ वाढवू शकतात:

  • केळी: केळीमध्ये नैसर्गिकरित्या जास्त साखर असते आणि ती पचायला जड असू शकते, ज्यामुळे काही लोकांमध्ये कफ वाढू शकतो.
  • संत्री आणि लिंबूवर्गीय फळे: जरी व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत असले तरी, काहीवेळा लिंबूवर्गीय फळे कफ वाढवू शकतात, विशेषत: जर तुम्हाला ऍसिड रिफ्लक्सचा त्रास असेल तर.
  • स्ट्रॉबेरी: काही लोकांना स्ट्रॉबेरीमुळे ऍलर्जी होऊ शकते, ज्यामुळे कफ आणि इतर लक्षणे दिसू शकतात.
  • द्राक्षे: द्राक्षे थंड मानली जातात आणि काही लोकांमध्ये कफ निर्माण करू शकतात.
  • पपई: पपई देखील काही लोकांमध्ये कफ वाढवू शकते.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक व्यक्ती फळांना वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देते. त्यामुळे, तुमच्यासाठी कोणते फळ कफ वाढवते हे पाहण्यासाठी तुम्ही प्रयोग करू शकता.

कफ कमी करण्यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकता:

  • गरम पाणी प्या: गरम पाणी प्यायल्याने कफ पातळ होतो आणि आराम मिळतो.
  • आले: आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि ते कफ कमी करण्यास मदत करू शकतात.
  • मध: मधामध्ये बॅक्टेरिया-विरोधी गुणधर्म असतात आणि ते घसा खवखवणे आणि कफ कमी करण्यास मदत करतात.

जर तुम्हाला कफचा जास्त त्रास होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित आहे.

टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहे आणि वैद्यकीय सल्ला नाही.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 860
1


फळाचे ज्युस सतत पिण्याची सवय पडू शकते महागात, 

फळाचे ज्युस सतत पिण्याची सवय पडू शकते महागात, वेळीच व्हा सावध
आपल्या आरोग्यासाठी नेहमीच फळं आणि त्यांचा रस अर्थात ज्युस चांगले असतात असं वारंवार ऐकिवात येत असतं आणि त्याप्रमाणे आपण आपल्या डाएटमध्ये ज्युसचा समावेशही करून घेतो. पण फळाचे ज्युस तुम्हाला सतत पिण्याची सवय लागली तर ते तुमच्यासाठी महाग ठरू शकतं याची तुम्हाला कल्पना आहे का? हो तुम्ही बरोबर वाचलं आहे. फळांचे ज्युस सतत प्यायल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. हे खरं आहे. फळांच्या बाबतीत सांगायचं झालं तर फळांचा ज्युस करून पिण्यापेक्षा फळं कापून खाणं हे कधीही आरोग्यासाठी अधिक चांगलं ठरतं. अधिक प्रमाणात तुम्ही फळांचा ज्युस प्यायल्याने तुमच्या शरीराला अधिक नुकसाच होतं. नक्की काय तोटे आहेत ते आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही ही सवय कशी वाईट आहे हे जाणून घ्या. फळांमध्ये शरीराला आवश्यक प्रोटीन, विटामिन्स मिळतात. पण ज्युस केल्यास, ते विटामिन्स आणि प्रोटीन्स निघून जातात. त्यामुळे सहसा ज्युस करून पिण्यापेक्षा डायरेक्ट फळं कापून खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने जास्त चांगलं आहे. आता नक्की वाईट परिणाम काय होतात ते आपण पाहूया – 

1. मूड स्विंग



आता तुम्ही म्हणाल मूड स्विंग आणि फळांच्या रसाचा नक्की काय संबंध? तर नक्कीच आहे. फळांचा रस सतत पित राहिल्यास, तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात साखर जाते. ज्यामुळे तुम्हाला आळस येतो. आळशीपणामुळे मूड स्विंग होत राहतो. कारण कोणतंही काम करण्याची इच्छाच होत नाही. त्यामुळे सतत मूड स्विंग होत चिडचिडेपणा वाढू लागतो आणि इतर लोकांबरोबरही यामुळे भांडणं होत राहातात. त्यामुळे सहसा जेवणाच्या वेळी अथवा अगदी सकाळीदेखील किमान एक ग्लासापेक्षा अधिक फळांचा रस पिऊ नये. रोज प्यायचा झाल्यास, त्याचं एक अर्ध्या ग्लासाचं प्रमाण ठरवून घ्यावं. पण शक्यतो रोज फळांचा रस पिणं टाळावं. हे आपल्या आरोग्यासाठी अधिक चांगलं ठरतं. 

हे नॅचरल ड्रिंक्स पिऊन तुमच्या चेहऱ्यावर येईल महिन्याभरात ‘ग्लो’

2. जाडेपणा


Shutterstock

फळांमध्ये मुळातच गोडपणा आणि साखरेचा अर्क नैसर्गिकरित्या असतो. तसंच फळांचा रस करत असताना अधिक प्रमाणात अर्थात अतिरिक्त साखर त्यामध्ये घातली जाते. त्यामुळे नियमित जर फळांचा रस पित राहिलात तर तुमचं वजन वाढून तुमचा जाडेपणा अधिक वाढीला लागतो. एकदा जाडेपणा वाढायला लागला की, नियंत्रित करण्यासाठी खूपच त्रासदायक ठरतं. फळांमध्ये मुळातच साखर असल्याने हा जाडेपणा कधी वाढतो त्याचा अंदाजही येत नाही. त्यामुळे फळांचा रस नियमित पित असाल तर तुम्ही वेळीच काळजी घ्या. कोणत्या फळांचा रस पित आहात आणि त्यामधून साखर किती प्रमाणात तुमच्या शरीरात जात आहे याचा वेळीच अंदाज घेणं गरजेचं आहे. ज्युस पिण्यापेक्षा स्मूदी पिणं हे नेहमीच सोपं ठरतं. कारण त्यामध्ये नैसर्गिक फळांचा समावेश असून साखरेचा अर्क घातला जात नाही. तरीही ही सवय जास्त लावून घेऊ नका. 

चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो आवळ्याचा रस

3. डोकेदुखी

शरीरात साखर जास्त प्रमाणात जाऊ लागली की साहजिक त्याचा परिणाम डोक्यावर सर्वात पहिल्यांदा होतो. त्यामुळे सतत ज्युस प्यायल्याने तुम्हाला डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. त्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. अंगात फळांच्या ज्युसमुळे साखर जास्त होऊन अंग आणि डोकं जड होतं आणि त्यामुळे त्याचा परिणाम डोकेदुखीमध्ये होतो. त्यामुळे शक्यतो ही सवय लावून घेऊ नका. आठवड्यातून एक अथवा दोन दिवस तुम्ही कोणत्याही फळांचा ज्युस प्यायल्यास, तुम्हाला हा त्रास जाणवणार नाही. तसंच फळांचा रस पिताना नक्की कोणत्या फळांचा रस तुम्ही पित आहात याकडेही लक्ष देणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला त्रासदायक ठरणाऱ्या फळांंचा रस पिणं टाळणंच योग्य आहे. 

दररोज केळं खाण्यामुळे होतील हे फायदे

4. रक्तातील साखरेची वाढ

सर्वात महत्त्वाचा आणि योग्य मुद्दा. सतत ज्युस पिण्याच्या सवयीने तुमच्या शरीरातील साखरेची पातळी वाढते आणि त्यामुळे अनेक आजारही बळवतात. डोकेदुखी, मधुमेह, अंग जड होणं, सतत डोळ्यांना दिसायला त्रास होणं यासारखे असंख्य आजार याबरोबर बळावतात. त्यामुळे सहसा नियमित फळांचा ज्युस पिण्याची सवय स्वतःला लावून घेऊ नका. त्याने तुमच्या आरोग्याचं अधिक नुकसान आहे हे लक्षात घ्या. फळांचा आपल्या आहारात समावेश करणं योग्य आहे. पण तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही फळांचं आणि फळांच्या ज्युसचं सेवन करणं योग्य आहे. 






फळांचे औषधी उपयोग
अवस्था:
उघडा

फळांचे औषधी उपयोग
आंबा
अंजीर
आवळा
ऊस
द्राक्षे
पपई
लिंबु
जांभूळ
डाळींब
केळे
स्ट्रॉबेरी
बोरे
आंबा
आंबा हा फळांचा राजा तो फक्त वैशाख व ज्येष्ठ महिन्यातच खावा, असे आयुर्वेदाच्या अभ्यासकांचे सांगणे आहे. हे फळ शक्तिवर्धक आहे. अन्नाबद्दल रूचि उत्पन्न करणे व भूक वाढविणे हे त्याचे प्रमुख गुण होत तसेच शरीराची आग होत असल्यास आंबा उपयुक्त ठरतो. यावरून उन्हाळ्यात आंबा खाणे योग्य आहे. हे दिसून येते. अतिसार म्हणजे वारंवार शौचास होणे. या व्याधीवर आंब्याची साल व कोय उपयुक्त आहे. साल ठेवून तिचा काढा तयार करून घेतात. तसेच कोय भाजून तिचे चूर्ण करून मधातून दिल्यास विशेषतः लहान मुलांचा अतिसर दूर होतो.

अंजीर
Anjeerअंजीर ह्या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथात तसेच बायबलमध्ये उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असते. अंजीरातून शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यांच्या सेवनाने गॅससेची तक्रार दूर होते. तसेच पित्त विकार, रक्तविकार, व वात विकार यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात.

अपचन ऍसिडीटी, गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ-संध्याकाळ १ ते २ अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा. वरील त्रासापासून आराम मिळेल. अंजीर खाल्यानी बौद्धिक व शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात. त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत. दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते.

अंजीर खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यावर अंजीर खाल्यामुळे त्याचे पाणी होते, असे म्हणतात. अंजीर शक्तीवर्धक आहे. तसेच ते सारकही आहे. म्हणजे ओली किंवा सुकी दोन अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे पाणि प्यावे. थोड्याच दिवसात तक्रार दूर होते.

आवळा
Awalaआवळा हे फळ हे फळ बहुगुणी आहे. हे मुख्यतः पित्तशामक आहे. आवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त कमी होते. पित्तामुळे भोवळे येणे कमी होते. लघवीच्या विकारांवर हे परिणामकारक औषध आहे. आवळा व खडीसाखर घेतल्याने लघवीला साफ होते आणि लघवीच्या वेळी आग होणे किंवा लघवी कमी होणे या तक्रारी दूर होतात. आवळा उपलब्ध नसल्यास त्या पासून तयार केलेली आवळकंठी वापरतात येते. याशिवाय अंगावर खरका किंवा कोरडी खरूज उठल्यास आवळकंठी पाण्यात भिजवून अंगास लावावी. आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा हा तर पित्तावर उत्तम आहे. रोज परसाकडेला साफ होत नाही, पोट जड वाटते, भूक लागत नाही, मन प्रसन्न राहत नाही, आजारी असल्यासारखे वाटते अशा तक्रारींवर मोरावळा रामबाण आहे. रोज नियमाने मोरावळ्यातले दोन आवळे खाण्यामुळे, ही नेहमी दिसून येणारी तक्रार दूर होते. आवळ्यापासून बनविलेले तेल डोके थंड राखण्यासाठी उपयुक्त आहे.

ऊस
Sugar Caneऊस खाण्यामुळे लघवी साफ होते. तसेच लघवीच्या वेळी आग होत असल्यासही तो उपयुक्त ठरतो. कावीळ झालेल्या रोग्यास तर ऊसासारखे दुसरे औषध नाही. काविळीचे रोग्याने रोज दोन वेळा जेवणापूर्वी ऊस खावा. चार पाच दिवसात प्रकृतीत सुधारणा होते. ऊस हा थंड आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घेतल्यास उपकारक ठरतो. त्याचप्रमाणे कलिंगड हे एक थंड फळ आहे. त्याबद्दल एकच काळजी घेणे आवश्यक आहे. रस्त्यात गाडीवर मिळणार्‍या उघड्या फोडी खाल्यामुळे एखाद्या वेळी अपाय होण्याचा संभव असतो. कारण त्याच्यावर माशा बसून व रस्त्यातील धूळ उडून त्या दूषित झाल्या असण्याचा संभव असतो.

द्राक्षे
Grapesद्राक्षे हे मलावरोधावर उत्तम औषध आहे. तसेच त्यापासून तयार केलेला मनुकाही एक चांगले टॉनिक आहे. पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्षे उपयोगी आहेत. घसा जळजळणे, घशाशी येणे, पोटदुखी, आंबट ढेकरा, उलटी या अपचन व आम्ल पित्ताच्या लक्षणावर द्राक्षे खावी. मूठभर द्राक्षे व मूठभर बडीशेप ठेचून कपभर पाण्यात रात्री भिजत घालून ठेवावी व सकाली कुसकरून थोडी खडीसाखर घालून सेवन केल्याने वरील सर्व तक्रारी दूर होतात. मोठ्या तापानंतर आलेल्या अशक्ततेवर मनुका मनुका उपयुक्त आहेत. रोज सकाळी १०-१५ मनुका बिया काढुन खाव्या आणि त्यावर १-१.५ कप दूध घ्यावे. त्यामुळे भूक वाढते. अन्न पचन होते व शक्ति येते. घसा बसणे, कावीळ व अन्नाबद्दल रूचिहीन वाटणे या विविध विकारांमध्ये मनुका खाण्याने फायदा होतो. मनुका तुपावर परतून व त्यात चवीपुरते सैंधव घालून खाल्याने चक्कर येण्याचे थांबते. मनुका, जेष्ठमध व गुळवेल समप्रमाणात एकत्र करून तयार केलेला काढा पित्तावर उपयुक्त ठरतो. क्षय इत्यादी छातीच्या विकारांत खोकल्याबरोबर रक्त पडते, त्या वेळी हा काढा घ्यावा क्षयरोगांमध्ये येणारी अशक्तता मनुक खाण्यामुळे कमी होते.

पपई
Papayaपपई हे फार मोठे औषध आहे. रोज नियमाने खाल्ल्यास भूक उत्तम लागते व अन्न पचते. पपईचा चीक गजकर्ण, खरूज, नायटा या त्वचारोगावर लावल्यास उपयुक्त ठरतो. जंतावर हे एक चांगले औषध आहे. हा चीक व मध दोन दोन चमचे एकत्र घोटावा. त्यात दुपट्ट गरम पाणी घालून थंड झाल्यावर लहान मुलांना अर्धा चमचाभर ओळीने तीन दिवस द्यावा. जंत पडून जाताट. गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये. त्यांना ती अपायकारक असते.

लिंबु
Limeलिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबु उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते. मेदवृद्धि म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठीही रोज लिंबाचा रस उन पाण्यात घालुन घेतल्याने उपयोत होतो. वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते. अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा व ऊन पाण्याने स्नान करावे. कंड कमी होतो. नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.

जांभूळ
Jamunजांभूळ हे अत्यंत पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. परंतु ते तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे.

जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करावा. व त्यात अर्धा तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घ्यावा. दिवसातून दोन वेळा असा घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते. स्त्रियांच्या अंगावर जाणारे पाणीदेखील वरील काढ्याने थांबते. चांगल्या पिकलेल्या जांभळाच रस काढून बरणीत भरून ठेवता व एक वर्ष जाऊ द्यावे. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब, खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात. जांभळाचे आसव तर वेळेव अर्धा तोळा चौपट पाणी घालून घ्यावे, त्याने मोडशी व पोटदुखी बरी होते. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक एक मासा घोटभर ऊन पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्य केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते.

डाळींब
Dalimb Anarडाळिंबात अनेक औषधी गुण आहेत. डाळिंबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होते. अपचन दूर होते. आणि त्यामुळे निर्माण झालेला शौचाचा विकार (संगहणी) बरा होतो. काविळीवरही हे एक चांगले औषध आहे. हृदयविकारामुळे छातीत दुखत असल्यास डाळींबाचा रस उपयोगी पडतो. डाळींबाचा रस, मध, साखर यांचे चाटण लहान मुलांचा खोकला बरे करते. फार बोलण्याने आवाज बसला असल्यास तो सुधारतो.

केळे
Bananaकेळे हे शक्तिवर्धक आहे. पण पचण्यास जड असते. हे लक्षात ठेवावे. तसेच ते थंड असल्यामुळे अंगाची आग कमी करते. वारंवार पित्त होण्याची तक्रार असल्यास केळे खाण्याने उपयोग होतो. तरूण वयात उद्भवणाऱ्या स्वप्नावस्थेच्या विकारावररोज जेवणानंतर १ ते २ केळी खाल्याने १५-२० दिवसांत उपाय होतो.

स्ट्रॉबेरी
Strawberryचवीस आंबट, किंचित गोड, जिभेची चुणचुण करणारी स्ट्रॉबेरी आंबट चवीमुळे पित्त वाढविणारी व रक्ताची निर्मिती करणारी आहे. त्यामुळे अजीर्ण, मळमळ, त्यामुळे अन्नपचन न होणे अशा वेळी स्ट्रॉ चावून खावी. वर पाणी पिऊ नये. रक्तवाढीसाठी अर्थात पंडुरोग किंवा ऍनिमियामध्ये लोहाच्या कल्पांबरोबर स्ट्रॉबेरीचा वापर केल्यास लोहाच्या औषधांचे दुष्परिणाम टाळता येतात.

छातीत धडधड, भीती वाटणे, आत्मविश्वासाचा अभाव, थोड्या श्रमाने थकवा येणे असा वेळी स्ट्रॉबेरी रस व खडीसाखर हे मिश्रण थोडे थोडे सायंकाळी घ्यावे. एकदम पिऊ नये. उपयोग उत्तम होतो.

स्ट्रॉबेरीचे आईसक्रीम, मिल्कशेक हे प्रकार खाऊ नयेत. त्याने आम्लपित्त, त्वचा विकार, मूळव्याध होऊ शकते. सर्दी खोकला असतांना वापरू नये. पित्ताच्या उलट्या होत असल्यास स्ट्रॉबेरी वापरू नये.

बोरे
आंबट-गोड बोरात व्हिटॅमिन ए, सी, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट इत्यादी जीवनाश्यक सत्वे आढळतात. यांच्या नियमित सेवनाने मुत्रपिंडातील खडा, अतिसार, हगवण, वातविकार यावरती अतिशय लाभदायक होऊ शकते. मूठभर वाळलेली बोरे घ्या आणि ग्लासभर पाण्यामध्ये उकळत टाका. निम्या प्रमाणात पानी आटले की ते पाणी थंड करा. हा बोरांचा काढा अशाप्रकारे तयार करावा. त्यात चवीसाठी साखर किंवा मध टाकून रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या. यामुळे मेंदूचा थकवा दूर होऊन स्मरणशक्ती वाढते. हे सर्वात स्वस्तच प्रभावी ‘ब्रेनटॉनिक’ होऊ शकते. बी काढलेली बोरे जाळून त्याचे भस्म व लगदा यांच्या मिश्रणात थोडासा लिंबाचा रस टाकून मलग तयार करा. हे मलम चेहऱ्यावरच्या मुरमांवर लावल्यास मुरमे नाहीशी होतात.












फळ खावे की ज्यूस प्यावा ?


आजकाल फळांचा ज्यूस पिण्याचे वेड चालवले आहे. एखादे फळ तसेच खाण्यापेक्षा रस पिणे असते म्हणून ज्यूस अधिक पसंत केला जायला पाहिजे. मात्र या संबंधले फक्त रस प्राण्यापेक्षा फळ खाणे हे फायदेशीर घटक निर्वाळा करणे. कारण प्राशन करताना तो गटागटा घशातून उतरवला रस. किंबहुना फळ खात बसण्यापेक्षा रस पिण्यास कमी वेळ म्हणूनही रसाला पसंती दिली जाते. एखादे फळ खायला दहा पाच मिनिट मात्र त्याचा रस काढला तर एका बाजूला पोटात. खरे तर कारण फळ जास्त गुणकारी ठरते. आपण खातो तेव्हा तो पदार्थ पोटात जातो ना किती लाळंबली जाते याला फार महत्त्व असते.

" पचायला सोपा भेटतो. फळ खाताना बनवले जाते आणि चावताना ती खालावली जाते. आपण फळे पचायला सांगतो. त्याचा रस पिता त्याला लाळंबली जात नाही आणि पचायला अवघड मात्र. आपण पौष्टिक अन्नाची बाब अशी की, फळष्टिक असते पण त्याचे घटक काही रसात नसतात. काही फळांच्या शात तर काही गरात पोषण द्रव्ये असतात. आपण फक्त रस पीतो तेव्हा साल आणि गर फेकून देतो म्हणजे त्यांच्यातल्या पोषण द्रव्यांना वचित होतो. हे घटक तंतुमय पदार्थही असतात. फक्त रस प्राशन केले तर तंतुमय पदार्थही आपल्याला मिळतात.

आयुर्वेदाचे फळ खाते असे सांगतात की गोडी म्हणजे शुगरचे प्रमाण कमी असते पण आपण त्याचा रस काढतो तेव्हा शुगरचे प्रमाण खाली चौपटीने वाढवलेले असते. असा हा रस आपण करतो तेव्हा तो साखरेचा प्राण जादा प्रमाणाने पचायला अवघड बसतो. पण आपल्याला ज्यूसची प्यायची फार हौस असेल तर ब्रेक फास्टच्या बाजूला तो प्यावा आणि तोही फक्त ४० मिली लीटर एवढाचवा घ्या. अजून साखर मिसळली जाते. उलट आहे त्या रसात मिरपूड टाकता आली तर पहावे. मी रस अधिक पाचक होतो. पण अशा काही काज्या पाहिल्याच ज्यूस प्राशन केला पाहिजे. सिंगला रस प्राशन करू नये कारण प्रिझर्व्हेटर आणि इतर काही रसायनेयुक्त असतात. ती आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरते. ज्यूस प्यायची भारी हौसच असेल तर आपण काढावा आणि ताराच प्यावा.



 
उत्तर लिहिले · 3/1/2022
कर्म · 121765