फळ

काही फळांमध्ये एकच बी तर काही फळांमध्ये अनेक बिया असतात, असे का?

2 उत्तरे
2 answers

काही फळांमध्ये एकच बी तर काही फळांमध्ये अनेक बिया असतात, असे का?

3
काही फळांमध्ये एकच बि असते म्हणून अशी फळझाडे कमी प्रमाणात असतात  त्यामुळे त्या फळांचे उत्पादन कमी येते अशी झाडावर पिकलेली फळे आहारात  कमी असली तरी पण आपल्या  आहारात नियमित किंवा मोसमा प्रमाणे  असावीत . आणि ज्या फळांमध्ये अनेक बीया असतात त्यांची अनेक झाडे तयार होत असतात त्यामुळे त्या फळांचे उत्पादन जास्त मिळते . आणि अशा प्रकारे झाडांवर पिकलेली फळे आहारात नियमित किंवा मोसमा प्रमाणे असावीत   निसर्गाने निसर्गातील प्रत्येक सजीवाला पोटभर खायला फळे मिळाली पाहिजेत  म्हणून तर विविध चवीची भेसळ मुक्त भरपूर  बिया असलेली फळे खाण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिली . आपण जर नियमित पोटभर आपल्या येथे पिकणाऱ्या फळांचे सेवन केल्यास आणि  खाल्लेल्या फळातील बिया ज्यांना शक्य असेल त्यांनी जरी  जमीनीमध्ये  लावल्यास इतर सजीवांच्या   आरोग्याच्या  सर्व समस्या निश्चितच कमी होतील. आता निसर्ग निर्मित तयार पिकलेली फळे खाऊन पोटातील अग्नी मध्ये शिजवायची  का मानव निर्मित अग्नी मध्ये निसर्गातील झाडांच्या बिया बारीक पीठ करून  भाजून , किंवा शिजवून  तेलामध्ये फोडणी देऊन मीठ मसाले लावून त्या पासून अन्न  तयार करून खायचे हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे.

उत्तर लिहिले · 19/4/2022
कर्म · 810
0

काही फळांमध्ये एक बी असते तर काहीमध्ये अनेक, याचे कारण वनस्पतींच्या फुलांच्या आणि फळांच्या विकासाच्या प्रक्रियेत दडलेले आहे. फुलातील स्त्रीकेसर (pistil) आणि बीजांड (ovules) यांच्या संख्येवर हे अवलंबून असते.

एक बी असणारी फळे:

  • स्त्रीकेसर (Pistil): या फळांच्या फुलांमध्ये साधारणतः एकच स्त्रीकेसर असते.
  • बीजांड (Ovules): एका स्त्रीकेसरात एकच बीजांड असते. पराग सिंचनानंतर (pollination) हे बीजांड फलित होते आणि बी मध्ये रूपांतरित होते.
  • उदाहरण: आंबा, चेरी, एव्होकॅडो (avocado).

अनेक बिया असणारी फळे:

  • स्त्रीकेसर (Pistil): या फळांच्या फुलांमध्ये अनेक स्त्रीकेसर किंवा एकाच स्त्रीकेसरात अनेक बीजांड असतात.
  • बीजांड (Ovules): प्रत्येक बीजांड फलित होऊन एक स्वतंत्र बी बनते. त्यामुळे एका फळात अनेक बिया तयार होतात.
  • उदाहरण: पपई, कलिंगड, टोमॅटो, डाळिंब.

याव्यतिरिक्त, काही फळांमध्ये बियांची संख्या जनुकीय (genetic) आणि पर्यावरणीय घटकांवर देखील अवलंबून असते.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 860

Related Questions

या फळांची झाडे त्या विशिष्ट गावांच्या परिसरातच का वाढत असतील?
आजोबांच्या नावावर विहीर आहे, सामाजिक क्षेत्रफळांमध्ये वाटून घेण्यासाठी काय करावे लागेल?
वनस्पतीच्या बिया म्हणजे धान्य, कडधान्य, फळांतील बिया यांमध्ये वनस्पतीचा जीव असतो, मग धान्य, कडधान्य हे शाकाहारी अन्न कसे काय?
कोणती फळं व कोणत्या भाज्या वात वाढवतात?
कोणती फळे खाल्ली असता कफ होण्याचा त्रास होऊ शकतो? (मला कफ होण्याचा त्रास आहे).
फळे खाणे चांगले की फळांचा ज्यूस पिणे चांगले? रोज किंवा एक दिवसाआड ज्यूस पिणे योग्य आहे का? कोणत्या फळांचा ज्यूस नियमित/एक दिवसाआड प्यावा? खोकला व कफ याचा त्रास असल्यास कोणत्या फळाचा ज्यूस घेऊ नये?
घोलवड, सासवड आणि देवगड हे ठिकाण कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहे? या फळांची झाडे त्या विशिष्ट गावांच्या परिसरातच का वाढत असतील? महाराष्ट्राच्या नकाशात ही स्थळे दाखवा.