3 उत्तरे
3 answers

गुडघेदुखीवर घरगुती उपाय कोणते?

12
सांधेदुखीवर घरगुती उपाय

वाढत्या वयानुसार सांधेदुखी चा त्रास वाढायला लागतो. चालताना, उठताना व बसताना, काम करताना, वाकताना सांध्यांमध्ये त्रास होतो. अश्या वेळी सांधेदुखीवर घरगुती उपाय करून आराम मिळू शकतो.

सामान्य लक्षणे:

काम किंवा हालचाल करताना सांधे दुखणे, सांध्यावर सूज येणे, सकाळी उठल्यावर सांधे दुखने, विशेषतः हात पायाची बोटे जखडणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

सांधेदुखी मध्ये काय खावे:

गहू, तांदूळ, दुधी, दोडका, घोसाळे, तूर, मूग कुळीथ, द्राक्षे, कोहळा, दूध, तूप, लोणी, आले, लसूण, गरम पाणी इत्यादी पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करावे.

काय खाऊ नये:

वरई, नाचणी, चवळी, वाल, पावटे, कारले, कैरी, कच्चा टोमॅटो, आंबट दही, चिंच, इडली, वैगैरे आंबवलेले पदार्थ खाण्याचे टाळावे.

सांधेदुखीवर घरगुती उपाय :

सांधेदुखी चा त्रास असल्यास दोन चमचे बडीशोप व सुंठीचे तुकडा चार कप पाण्यामध्ये घालून एक कप राही पर्यंत उकळावे व अर्धा चमचा एरंडेल तेल घालून घ्यावे. याप्रमाणे महिना भर केल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होईल.

दोन चमचे सुंठ व दोन चमचे एरंदमुळाची भरड चार कप पाण्यात उकळावे व एक कप पाणी राहिल्यावर गळून घ्यावे. व पिऊन घ्यावे. हा काढा नियमित घेतल्यास सांधेदुखी मध्ये निश्चित आराम मिडेल. याशिवाय याने परसाकडे साफ होऊन संध्यावरील सूज कमी होऊन वेदना कमी होतात.

निर्गुडीची पाने पाण्यामध्ये उकळून त्याच्या वाफेने सांधा शेकल्यास सुज व वेदना कमी होतात.

जर सांधा दुखत असेल तर मूठभर ओवा एरंडेल तलावर गरम करून सुटी कापडात बांधून पुरचुंडी करावी व त्याने दुखाणार सांधा शेकावा.

सांधा सुजला असेल व वेदना होत असतील तर सूज व वेदना कमी करण्यासाठी एरंडची पाने वाफवून कुटून दुखत असलेल्या सांध्यावर बांधावे.

रोजची कनिक मळताना चमचाभर एरंड तेलाचे मोहन घालून केलेली पोळी किंवा फुलका खावा. याने सांधेदुखीचा व सर्व सांधे संबंधित समस्या दूर होतात.

अशक्तपणा मुले सांधे दुखत असल्यास मेथीचे व डिंकाचे लाडू नियमित खाल्ल्यास फायदा होतो.

रात्री उशिरा भरपेट जेवण करू नये, वजन जास्त असल्यास कमी करावे, नियमित योगासने करावी, व सकाळी चालायला जावे. असे केल्यास सांधे दुखीचा त्रास होत नाही.

तीळ व आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले तेल नियमित लावल्यास व आहारामध्ये योग्य प्रमाणात साजूक तूप समाविष्ट केल्यास शरीराचे स्नेहन होऊन सांधेदुखी कमी होते.

उत्तर लिहिले · 19/3/2018
कर्म · 65405
1

गुडघे दुखी वर घरगुती उपचार –   गुडघे व शरीराचे इतर सांधे दुखी सुरू होते. शरीरातील सांधे असे अवयव असतात जेथे दोन किंवा त्यापेक्षा जास्त हाडे एकमेकांना जुळलेले असतात. गुडघे हे देखील शरीराचे सांधे आहेत. परंतु आजकाल वाढत्या वयासोबत अनेक लोकांमध्ये गुडघेदुखीची समस्या निर्माण होत आहे.
..

 
गुडघेदुखीवर उपाय

गुडघे दुखी ची कारणे
इजा होणे अथवा मार बसणे
गुडघेदुखी चे प्रमुख कारण मार बसणे किंवा गुडघ्याला इजा होने असू शकते. कारण गुडघ्यावर मार बसल्याने गुडघ्यातील लिगामेंट्स, टेंडन और तरल पदार्थाला नुकसान पोहोचते.

लूज बॉडीज
गुडघ्यात लिगामेंट हाडाचे लहान लहान भाग असतात. जे गुडघ्यात मोकळेपणाने फिरत असतात. परंतु गुडघ्यातील यांचा प्रवाह थांबल्याने गुडघेदुखी सुरू होते. याशिवाय ऑस्टियोआर्थराइटिस, ऑस्टियोमायइलिटिस, टेन्डीनिस, बेकर्स सिस्ट, घासलेला लिगामेंट, घासला गेलेला कार्टिलेज इत्यादी गुडघे दुखी ची कारणे असू शकतात.

गुडघे दुखी वर घरगुती उपचार व गुडघेदुखीवर रामबाण उपाय
गुडघे दुखी वर घरगुती उपचार

गुडघेदुखी पासून वाचण्यासाठी व गुडघे दुखीवरील घरगुती उपाय म्हणून पुढील गोष्टी नेहमी लक्षात असू द्या-


 
रात्रीच्या वेळी हलके अन्न खावे.
रात्रीच्या वेळी हरभरे, भेंडी, बटाटे, काकडी, मुळा, दही इत्यादींचे सेवन चुकूनही करू नका.
गुडघेदुखी असणार्‍यांना रात्रीच्या वेळी दूध किंवा दाळ खाणे हानिकारक आहे.
जास्त करून लोकांमध्ये गुडघेदुखीची समस्या मार लागल्याने सुरू होते, म्हणून गुडघ्यांना मार लागण्यापासून वाचवावे. जर आपण एखाद्या खेळ खेळत असाल तर गुडघ्यांवर सेफ्टी पँड जरूर वापरा.
गतिशील राहा : नेहमी कार्यरत व गतिशील राहिल्याने गुडघ्यांचा योग्य पद्धतीने व्यायाम होतो. जो व्यक्ती नियमित व्यायाम, चालणे व खेळ खेळणे इत्यादी गोष्टी करतो त्याला गुडघेदुखीची समस्या कधीही होत नाही.
वजन नियंत्रणात ठेवा : जर तुमचे शारीरिक वजन नियंत्रणात असेल तर गुडघे व पायांवर अधिक दबाव येणार नाही. शरीराचे अत्याधिक वजन कंबर आणि पायांवर दबाव टाकते ज्यामुळे तुमच्या शरीराचे कार्टिलेज तुटण्याचा धोका असतो. म्हणूनच आपल्याला आपले वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
गुडघेदुखीवर रामबाण उपाय
हळदीचा लेप
गुडघेदुखीवर रामबाण उपाय म्हणजेच हळद आणि चुना होय. हळद आणि चुना गुडघ्याचे दुखणे दूर करण्यात खूप सहाय्यक आहे. यासाठी तुम्हाला हळद आणि चुना मोहरीच्या तेलात मिसळून गरम करून घ्यायचे आहे. यानंतर हा कोमट झालेला लेप गुडघ्यांवर लावा. हा उपाय केल्याने गुडघेदुखी नक्कीच कमी होईल.

बर्फ उपचार
जर हात लावताच गुडघे दुखत असतील व गुडघ्यांमध्ये सुजन आलेली असेल तर गुडघेदुखीवर उपचार म्हणून आईस थेरेपी गुडघ्याचे दुखणे व सुजन कमी करण्यात सहाय्यक आहे. गुडघेदुखी होत असल्यास एका पॅकेट मध्ये बर्फ टाकून गुडघे शेकावे. यामुळे सुजन कमी होण्यात मदत मिळेल. यासोबतच आपण हाताने गुडघ्याला हळूवार मसाज करु शकतात.

गुडघे दुखी साठी व्यायाम
योग आणि व्यायाम अशी पद्धती आहे जिच्या मदतीने अनेक कठीण रोग चांगले केले जाऊ शकतात. व्यायाम आणि योग हे गुडघे दुखी साठी आयुर्वेदिक औषध सिद्ध होऊ शकते. म्हणून पुढे आपणास गुडघे दुखी साठी व्यायाम देत आहोत.


 
बद्धकोनासान
गुडघेदुखीवर रामबाण उपाय गुडघेदुखीवर घरगुती उपचार
गुडघे दुखी साठी औषध
गुडघे दुखी साठी व्यायाम
गुडघे दुखी साठी व्यायाम व योग मधील पहिले आसन आहे बद्धकोनासान. हे एक अतिशय सोपे आसन आहे. आणि याला कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकतात. चित्रात दाखवल्याप्रमाणे हे जांघ आणि मांडीच्या नसांना ताण देते. सोबतच कुल्ले, पाय, ताच आणि गुडघ्यांसाठी उपयुक्त आसन आहे.

पाद पश्चिमोत्तानासन
गुडघे दुखी वर घरगुती उपचार
गुडघेदुखीवर रामबाण उपाय
गुडघे व पायांच्या दुखिवर अत्यंत उपयुक्त असे आसन आहे. हे आसन करण्यासाठी तुम्हाला चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्या हातांनी पायांच्या अंगठा धरण्याचा प्रयत्न करायचा आहे. 10-15 वेळा हे आसन केल्याने पायांचा चांगला व्यायाम होतो व गुडघेदुखी दूर पडते.

वीरासन

वीरासन करण्यासाठी चटई टाकून गुडघे वाकून बसावे. हातांना चित्रात दाखवल्याप्रमाणे मागील बाजूला नेऊन एकमेकांना जोडावे. या आसनाचा कालावधी 30 सेकंदापासून सुरू करून 2 मिनिटापर्यंत वाढवावा.


 
स्क्वाट


गुडघे दुखी साठी व्यायाम
स्क्वाट अर्थात उठबश्या हा व्यायाम केल्याने पाय, कंबर, गुडघे व संपूर्ण शरीराचे सांधे ताणले जातात. ज्यामुळे लवचिकता वाढते. गुडघ्यांसाठी हा व्यायाम अतिशय उपयुक्त आहे. परंतु गुडघेदुखी अति असेल तर हा व्यायाम जास्त वेळा करू नका व योग्य योग ट्रेनर चा सल्ला घ्या.


उत्तर लिहिले · 22/2/2022
कर्म · 121765
0
गुडघेदुखी कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय खालीलप्रमाणे:
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2380

Related Questions

कंबर लचकली आहे यावर उपाय काय?
अचानक खांदा दुखू लागला आहे तर कोणता उपाय करावा?
हाताला खूप कळ येते आणि ताकद कमी आहे, यावर उपाय?
मानेच्या मणक्यांतील अंतर कमी झाले आहे, पूर्ववत करण्यासाठी काय करावे?
कंबरदुखीवर घरगुती उपाय कोणता?
पाठ खूप दुखते, यावर घरगुती उपाय काय आहे?
गुडघ्याचे हाड वाढले असेल तर ते ऑपरेशनशिवाय पूर्ववत होऊ शकते का?